२ राजे
१ अहाबचा मृत्यू झाल्यावर मवाब+ राष्ट्राने इस्राएलविरुद्ध बंड केलं.
२ एकदा शोमरोनमध्ये, अहज्या आपल्या छतावरच्या खोलीत असताना तिथल्या जाळीतून* खाली पडला आणि जखमी झाला. मग त्याने दूतांना असं सांगून पाठवलं: “एक्रोनच्या+ बआल-जबूब दैवताकडे जा, आणि मी बरा होईन की नाही याची चौकशी करा.”+ ३ पण यहोवाचा* स्वर्गदूत एलीया*+ तिश्बी याला म्हणाला: “ऊठ आणि शोमरोनच्या राजाच्या दूतांना जाऊन भेट. त्यांना असं म्हण: ‘तुम्ही चौकशी करायला एक्रोनच्या बआल-जबूब दैवताकडे का चाललात? इस्राएलमध्ये काय देव नाही?+ ४ म्हणून आता यहोवा असं म्हणतो: “तू ज्या बिछान्यावर पडून आहेस त्यावरून उठणार नाहीस. तू नक्की मरशील.”’” मग एलीया निघून गेला.
५ राजाचे दूत परत आले तेव्हा राजाने लगेच त्यांना विचारलं: “तुम्ही इतक्या लवकर परत कसं आलात?” ६ त्यावर ते राजाला म्हणाले: “एक माणूस आम्हाला भेटायला आला होता आणि तो आम्हाला म्हणाला: ‘ज्या राजाने तुम्हाला पाठवलंय त्याच्याकडे परत जाऊन त्याला सांगा, की “यहोवा असं म्हणतो: ‘तुम्ही चौकशी करायला एक्रोनच्या बआल-जबूब दैवताकडे का चाललात? इस्राएलमध्ये काय देव नाही? म्हणून आता तू ज्या बिछान्यावर पडून आहेस, त्यावरून उठणार नाहीस. तू नक्की मरशील.’”’”+ ७ तेव्हा राजाने त्यांना विचारलं: “जो माणूस तुम्हाला भेटायला आला होता आणि या सगळ्या गोष्टी बोलला, तो कसा दिसत होता?” ८ ते राजाला म्हणाले: “त्याने एक केसाळ झगा+ घातला होता आणि कमरेला चामड्याचा पट्टा बांधला होता.”+ तेव्हा राजा लगेच म्हणाला: “तो एलीया तिश्बीच आहे.”
९ मग राजाने, ५० सैनिकांवर प्रमुख असलेल्या एका अधिकाऱ्याला ५० सैनिकांसोबत एलीयाकडे पाठवलं. तो अधिकारी एलीयाकडे गेला तेव्हा एलीया डोंगरमाथ्यावर बसला होता. अधिकारी त्याला म्हणाला: “हे खऱ्या देवाच्या माणसा,+ राजाचा हुकूम आहे: ‘खाली ये!’” १० पण एलीया, त्या अधिकाऱ्याला म्हणाला: “मी जर खऱ्या देवाचा माणूस असेन, तर आकाशातून अग्नी येऊन+ तुला आणि तुझ्या ५० माणसांना भस्म करो.” तेव्हा आकाशातून अग्नी आला आणि त्याने त्या अधिकाऱ्याला व त्याच्या ५० माणसांना भस्म केलं.
११ राजाने मग, ५० सैनिकांवर प्रमुख असलेल्या दुसऱ्या एका अधिकाऱ्याला ५० सैनिकांसोबत परत एलीयाकडे पाठवलं. तो अधिकारी एलीयाकडे गेला आणि त्याला म्हणाला: “हे खऱ्या देवाच्या माणसा, राजाचा आदेश आहे: ‘ताबडतोब खाली ये!’” १२ पण एलीया म्हणाला: “मी जर खऱ्या देवाचा माणूस असेन, तर आकाशातून अग्नी येऊन तुला आणि तुझ्या ५० माणसांना भस्म करो.” तेव्हा आकाशातून देवाचा अग्नी आला आणि त्याने त्या अधिकाऱ्याला व त्याच्या ५० माणसांना भस्म केलं.
१३ मग राजाने, ५० सैनिकांवर प्रमुख असलेल्या तिसऱ्या एका अधिकाऱ्याला ५० सैनिकांसोबत एलीयाकडे पाठवलं. हा तिसरा अधिकारी मात्र डोंगरावर गेला आणि एलीयासमोर गुडघे टेकून त्याने त्याला नमन केलं. मग त्याच्याकडे दयेची भीक मागून तो अशी विनंती करू लागला: “हे खऱ्या देवाच्या माणसा, कृपया माझा आणि तुमच्या या ५० सेवकांचा जीव तुमच्या नजरेत मौल्यवान ठरू द्या. १४ आकाशातून आलेल्या अग्नीने आधीच, दोन अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या ५०-५० माणसांना भस्म करून टाकलंय. पण माझ्यावर दया करा. माझा नाश करू नका.”
१५ तेव्हा यहोवाचा स्वर्गदूत एलीयाला म्हणाला: “घाबरू नकोस. त्याच्यासोबत खाली जा.” म्हणून मग एलीया खाली उतरून त्याच्यासोबत राजाकडे गेला. १६ एलीया राजाला म्हणाला: “यहोवा असं म्हणतो: ‘तू तुझ्या दूतांना एक्रोनच्या+ बआल-जबूब दैवताकडे चौकशी करायला का पाठवलंस? इस्राएलमध्ये काय देव नाही?+ तू त्याच्याकडे चौकशी का केली नाहीस? म्हणून आता तू ज्या बिछान्यावर पडून आहेस, त्यावरून उठणार नाहीस. तू नक्की मरशील.’” १७ नंतर अहज्याचा मृत्यू झाला; एलीयाने यहोवाचा जो संदेश सांगितला होता त्याप्रमाणेच हे घडलं. अहज्याला कोणी मुलगा नव्हता, म्हणून यहोराम*+ त्याच्या जागी राजा बनला; यहूदाचा राजा यहोशाफाट याच्या मुलाच्या, म्हणजे यहोरामच्या+ शासनकाळाच्या दुसऱ्या वर्षी तो राजा बनला.
१८ अहज्याविषयीची+ बाकीची माहिती, म्हणजे त्याने जे काही केलं ते सर्व इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे.
२ यहोवा देव एलीयाला+ वादळातून आकाशात घेऊन जाणार होता+ ती वेळ आता आली होती. तेव्हा एलीया आणि अलीशा+ हे दोघं गिलगालमधून+ निघाले. २ मग एलीया अलीशाला म्हणाला: “यहोवाने मला बेथेलला जायला सांगितलंय. तेव्हा तू इथेच थांब.” पण अलीशा त्याला म्हणाला: “जिवंत देव यहोवा याची आणि तुमच्या जिवाची शपथ! मी तुमची साथ सोडणार नाही.” म्हणून मग ते दोघं बेथेलला+ गेले. ३ तेव्हा बेथेल इथे असलेले संदेष्ट्यांचे पुत्र* अलीशाकडे आले आणि त्याला म्हणाले: “यहोवा तुझ्या प्रभूला, तुझ्या मस्तकाला आज तुझ्यापासून घेऊन जाणार आहे, हे तुला माहीत आहे का?”+ त्यावर तो म्हणाला: “मला माहीत आहे. शांत राहा!”
४ यानंतर एलीया त्याला म्हणाला: “अलीशा, यहोवाने मला यरीहोला+ जायला सांगितलंय. तेव्हा तू इथेच थांब.” पण अलीशा म्हणाला: “जिवंत देव यहोवा याची आणि तुमच्या जिवाची शपथ! मी तुमची साथ सोडणार नाही.” म्हणून मग ते दोघं यरीहोला गेले. ५ तेव्हा यरीहो इथे असलेले संदेष्ट्यांचे पुत्र अलीशाकडे आले आणि त्याला म्हणाले: “यहोवा तुझ्या प्रभूला, तुझ्या मस्तकाला आज तुझ्यापासून घेऊन जाणार आहे, हे तुला माहीत आहे का?” त्यावर तो म्हणाला: “मला माहीत आहे. शांत राहा!”
६ नंतर एलीया त्याला म्हणाला: “यहोवाने मला यार्देन नदीकडे जायला सांगितलंय. तेव्हा तू इथेच थांब.” पण अलीशा त्याला म्हणाला: “जिवंत देव यहोवा याची आणि तुमच्या जिवाची शपथ! मी तुमची साथ सोडणार नाही.” मग ते दोघं पुढे गेले, ७ आणि संदेष्ट्यांचे ५० पुत्र त्यांच्यामागे गेले. ते दोघं यार्देनजवळ उभे असताना संदेष्ट्यांचे पुत्र त्यांना दुरून पाहत होते. ८ मग एलीयाने आपला झगा*+ काढून तो गुंडाळला आणि नदीच्या पाण्यावर मारला. तेव्हा पाण्याचे दोन भाग झाले आणि ते दोघं कोरड्या जमिनीवरून चालत पलीकडे गेले.+
९ नदीच्या पलीकडे जाताच एलीया अलीशाला म्हणाला: “देव मला तुझ्यापासून दूर नेईल, त्याआधी मी तुझ्यासाठी काय करावं अशी तुझी इच्छा आहे?” त्यावर अलीशा त्याला म्हणाला: “कृपया, मला तुमच्या शक्तीचा*+ दुप्पट हिस्सा+ मिळू शकेल का?” १० तेव्हा एलीया म्हणाला: “तू फारच कठीण गोष्ट मागितलीस. मला तुझ्यापासून दूर नेलं जाईल, त्या वेळी जर तू मला पाहू शकलास तर तू म्हणतोस तसं होईल. पण जर तू मला पाहू शकला नाहीस, तर तसं होणार नाही.”
११ मग ते दोघं एकमेकांशी बोलत रस्त्याने जात असताना, अचानक एका अग्नीच्या रथाने आणि अग्नीच्या घोड्यांनी+ त्यांना एकमेकांपासून वेगळं केलं. आणि एलीया वादळातून वर आकाशात गेला.+ १२ अलीशा हे सर्व पाहत असताना मोठ्याने म्हणत होता: “माझ्या पित्या! माझ्या पित्या! पाहा, इस्राएलचा रथ आणि त्याचे घोडेस्वार!”+ एलीया दृष्टिआड झाला, तेव्हा अलीशाने दुःखाने आपले कपडे फाडले.+ १३ त्यानंतर अलीशाने एलीयाच्या अंगावरून पडलेला झगा*+ उचलला आणि तो परत यार्देन नदीच्या काठावर जाऊन उभा राहिला. १४ मग एलीयाचा झगा नदीच्या पाण्यावर मारून तो म्हणाला: “एलीयाचा देव यहोवा कुठे आहे?” झगा पाण्यावर मारताच पाण्याचे दोन भाग झाले आणि अलीशा चालत पलीकडे गेला.+
१५ यरीहो इथल्या संदेष्ट्यांच्या पुत्रांनी अलीशाला दुरून पाहिलं, तेव्हा ते म्हणाले: “एलीयाची शक्ती आता अलीशाला मिळाली आहे.”+ मग ते त्याला भेटायला गेले आणि त्यांनी जमिनीवर पडून त्याला नमन केलं. १६ ते त्याला म्हणाले: “इथे तुमच्या सेवकांकडे ५० धडधाकट पुरुष आहेत. कृपया त्यांना परवानगी द्या, म्हणजे ते जाऊन तुमच्या प्रभूला शोधतील. कदाचित, यहोवाच्या शक्तीने त्यांना उचलून एखाद्या डोंगरावर किंवा एखाद्या खोऱ्यात नेलं असेल.”+ पण अलीशा म्हणाला: “त्यांना पाठवू नका.” १७ पण तरीही ते त्याला आग्रह करत राहिले. शेवटी तो त्यांना म्हणाला: “पाठवा त्यांना.” तेव्हा त्यांनी त्या ५० माणसांना पाठवलं. ते तीन दिवस एलीयाला शोधत राहिले, पण त्यांना तो सापडला नाही. १८ ते परत आले, तेव्हा अलीशा यरीहोमध्ये+ होता. तो त्यांना म्हणाला: “मी तुम्हाला सांगितलं होतं ना, जाऊ नका.”
१९ मग काही काळाने शहरातली माणसं अलीशाकडे येऊन म्हणाली: “प्रभू, तुम्हाला तर दिसतंय की हे शहर सुंदर ठिकाणी वसलंय.+ फक्त इथलं पाणी खराब आहे आणि जमीन नापीक आहे.”* २० यावर तो म्हणाला: “एका नवीन वाटीत मीठ टाकून माझ्याकडे आणा.” तेव्हा त्यांनी तसं केलं. २१ मग तो पाण्याच्या झऱ्याकडे गेला आणि पाण्यात मीठ टाकून+ म्हणाला: “यहोवा असं म्हणतो: ‘मी हे पाणी शुद्ध केलंय. या पाण्यामुळे आता कोणीही मरणार नाही किंवा जमीन नापीक राहणार नाही.’”* २२ आणि अलीशाने म्हटलं होतं त्याप्रमाणे, आजपर्यंत ते पाणी शुद्ध आहे.
२३ मग अलीशा तिथून बेथेलकडे जायला निघाला. रस्त्याने जात असताना काही मुलं शहरातून बाहेर आली आणि त्याची थट्टा करू लागली.+ ती मुलं त्याला म्हणत होती: “अरे टकल्या, निघ इथून! अरे टकल्या, निघ इथून!” २४ शेवटी त्याने मागे वळून त्यांच्याकडे पाहिलं, आणि यहोवाच्या नावाने त्यांना शाप दिला. तेव्हा जंगलातून दोन अस्वली+ बाहेर आल्या आणि त्यांनी त्यांतल्या ४२ मुलांना फाडून ठार मारलं.+ २५ मग अलीशा तिथून कर्मेल डोंगराकडे+ गेला आणि नंतर शोमरोनात परत आला.
३ यहूदाचा राजा यहोशाफाट याच्या शासनकाळाच्या १८ व्या वर्षी, अहाबचा मुलगा यहोराम+ हा शोमरोन इथे इस्राएलचा राजा बनला. त्याने १२ वर्षं राज्य केलं. २ यहोवाच्या दृष्टीने जे वाईट ते तो करत राहिला. पण आपल्या आईवडिलांइतकी वाईट कामं त्याने केली नाहीत; कारण त्याच्या वडिलांनी बआल दैवताच्या उपासनेसाठी उभा केलेला पूजेचा स्तंभ+ त्याने काढून टाकला. ३ असं असलं, तरी नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलला जी पापं करायला लावली होती, तीच तो करत राहिला;+ ती पापं करण्याचं त्याने सोडलं नाही.
४ मवाबचा राजा मेशा याच्याकडे मेंढरांचे बरेच कळप होते. तो इस्राएलच्या राजाला १,००,००० कोकरं आणि १,००,००० लोकर न कातरलेले एडके कर* म्हणून द्यायचा. ५ पण अहाबचा मृत्यू होताच,+ मवाबच्या राजाने इस्राएलच्या राजाविरुद्ध बंड केलं.+ ६ तेव्हा, यहोराम राजा शोमरोनातून निघाला आणि त्याने सगळ्या इस्राएली लोकांना लढाईसाठी एकत्र जमवलं. ७ तसंच, त्याने यहूदाचा राजा यहोशाफाट याला असा संदेश पाठवला: “मवाबच्या राजाने माझ्याविरुद्ध बंड केलंय. म्हणून त्याच्याशी युद्ध करायला माझ्यासोबत येशील का?” त्यावर तो म्हणाला: “हो मी येईन.+ माझे लोक आणि माझे घोडे घेऊन मी तुझ्यासोबत येईन.”+ ८ त्याने विचारलं: “आपण कोणत्या रस्त्याने जायचं?” तो म्हणाला: “आपण अदोमच्या ओसाड रानातून जाऊ.”
९ मग इस्राएलचा राजा हा यहूदाच्या राजासोबत आणि अदोमच्या+ राजासोबत निघाला. पण सात दिवस प्रवास केल्यानंतर सैनिकांना आणि सोबत असलेल्या जनावरांना प्यायला पाणी नव्हतं. १० तेव्हा इस्राएलचा राजा म्हणाला: “काय हे संकट! यहोवाने आम्हा तिघा राजांना मवाबच्या हाती देण्यासाठीच एकत्र आणलंय!” ११ त्यावर यहोशाफाटने विचारलं: “आपल्याला ज्याच्याकडून यहोवाचा सल्ला घेता येईल असा कोणी यहोवाचा संदेष्टा इथे नाही का?”+ तेव्हा इस्राएलच्या राजाच्या सेवकांपैकी एक म्हणाला: “हो आहे. एलीयाच्या हातांवर पाणी ओतणारा* शाफाटचा मुलगा+ अलीशा+ इथे आहे.” १२ त्यावर यहोशाफाट म्हणाला: “यहोवाची इच्छा काय आहे हे तोच आपल्याला सांगू शकेल.” मग यहोशाफाट, इस्राएलचा राजा आणि अदोमचा राजा हे तिघं अलीशाकडे गेले.
१३ तेव्हा अलीशा इस्राएलच्या राजाला म्हणाला: “तू माझ्याकडे कशाला आलास?*+ तुझ्या आईवडिलांच्या संदेष्ट्यांकडे जा!”+ पण इस्राएलचा राजा त्याला म्हणाला: “असं बोलू नका. कारण यहोवानेच आम्हा तिघा राजांना मवाबच्या हाती देण्यासाठी एकत्र आणलंय.” १४ त्यावर अलीशा म्हणाला: “ज्या देवाची मी सेवा करतो,* त्या सैन्यांच्या जिवंत देवाची, यहोवाची शपथ! यहूदाचा राजा यहोशाफाट+ याच्याबद्दल मला आदर नसता, तर मी तुझ्याकडे लक्ष दिलं नसतं किंवा तुझ्याकडे ढुंकूनही पाहिलं नसतं.+ १५ आता वीणा वाजवणाऱ्या एखाद्या माणसाला बोलवा.”+ तो माणूस वीणा वाजवू लागताच, यहोवाची शक्ती* अलीशावर कार्य करू लागली.+ १६ तेव्हा तो म्हणाला: “यहोवा असं म्हणतो: ‘या खोऱ्यात* ठिकठिकाणी खड्डे खोदा. १७ कारण यहोवा म्हणतो: “वारा वाहणार नाही किंवा पाऊस पडणार नाही, पण तरी हे खोरं पाण्याने भरून जाईल.+ आणि तुम्हाला व तुमच्या जनावरांना प्यायला पाणी मिळेल.”’ १८ ही तर यहोवासाठी खूपच क्षुल्लक गोष्ट आहे.+ तो तर मवाबच्या लोकांनाही तुमच्या हाती देईल.+ १९ तुम्ही त्यांच्या प्रमुख शहरांचा आणि मजबूत भिंती असलेल्या सगळ्या शहरांचा नाश करा;+ तिथलं प्रत्येक चांगलं झाड कापून टाका; पाण्याचे सर्व झरे बुजवून टाका आणि दगड टाकून प्रत्येक चांगल्या जमिनीची नासाडी करा.”+
२० मग सकाळी, म्हणजे सकाळच्या अन्नार्पणाच्या वेळी+ अदोमच्या दिशेने अचानक पाणी येऊ लागलं आणि संपूर्ण खोरं पाण्याने भरून गेलं.
२१ आपल्याविरुद्ध राजे लढाई करायला आले आहेत हे मवाबी लोकांनी ऐकलं. तेव्हा त्यांनी शस्त्र चालवणाऱ्या आपल्या सर्व माणसांना एकत्र केलं, आणि ते सीमेवर जाऊन तैनात झाले. २२ ते सकाळी उठले तेव्हा सूर्य पाण्यावर चमकत होता. आणि पलीकडून त्यांना ते पाणी रक्तासारखं लाल दिसलं. २३ ते पाहून मवाबी लोक म्हणाले: “हे तर रक्त आहे! त्या राजांनी नक्कीच एकमेकांना तलवारीने मारून टाकलं असावं. मवाबी लोकांनो! लूटमार करायला चला!”+ २४ मवाबी लोक इस्राएलच्या छावणीत आले, तेव्हा इस्राएली लोकांनी उठून त्यांच्यावर हल्ला केला. मवाबी लोक पळू लागले,+ तेव्हा इस्राएली लोक त्यांची कत्तल करत-करत त्यांच्यामागे मवाब देशात गेले. २५ त्यांनी त्यांची शहरं उद्ध्वस्त केली. तसंच, त्यांच्यापैकी प्रत्येकाने तिथल्या चांगल्या जमिनींवर दगड टाकून त्यांची नासाडी केली. त्यांनी पाण्याचे सर्व झरे बुजवून टाकले,+ आणि प्रत्येक चांगलं झाड कापून टाकलं.+ शेवटी फक्त कीर-हरेसेथ+ या शहराच्या दगडी भिंतीच उभ्या होत्या. पण गोफण चालवणाऱ्या सैनिकांनी त्या शहराला वेढा घालून त्याचाही नाश केला.
२६ आपण युद्ध हरत आहोत हे मवाबच्या राजाच्या लक्षात आलं. तेव्हा त्याने तलवार चालवणाऱ्या ७०० सैनिकांना सोबत घेतलं आणि अदोमच्या+ राजाभोवती असलेला वेढा फोडण्याचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी झाला नाही. २७ म्हणून मग त्याने आपल्या पहिल्या मुलाचं, म्हणजे जो त्याच्या जागी राजा होणार होता त्या मुलाचं शहराच्या भिंतीवर होमार्पण केलं.+ तेव्हा इस्राएलविरुद्ध संतापाची लाट उसळली आणि लोकांनी मवाबच्या राजाविरुद्ध लढाई करण्याचं सोडून दिलं. ते सर्व आपापल्या देशात परत गेले.
४ एकदा, संदेष्ट्यांच्या पुत्रांपैकी*+ एकाची बायको अलीशाकडे आली. ती त्याच्यापुढे रडून म्हणू लागली: “माझ्या नवऱ्याचा, तुमच्या सेवकाचा मृत्यू झालाय. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, की तुमचा हा सेवक नेहमी यहोवाला भिऊन वागायचा.+ माझ्या नवऱ्याने एका माणसाकडून कर्ज घेतलं होतं. आणि आता तो माणूस माझ्या दोन्ही मुलांना दास करून न्यायला आलाय.” २ त्यावर अलीशा तिला म्हणाला: “मी तुझ्यासाठी काय करावं अशी तुझी इच्छा आहे? मला सांग, तुझ्याकडे घरात काय आहे?” ती म्हणाली: “तुमच्या या दासीकडे, एका भांड्यात* थोडं तेल आहे;+ त्याशिवाय घरात दुसरं काहीही नाही.” ३ तेव्हा तो तिला म्हणाला: “तुझ्या सगळ्या शेजाऱ्यांकडे जा आणि त्यांच्याकडे रिकामी भांडी माग; मिळतील तेवढी भांडी गोळा कर. ४ मग आपल्या मुलांना घेऊन घरात जा आणि दार लावून घे. त्यानंतर सगळ्या रिकाम्या भांड्यांत तेल भर, आणि भरलेली भांडी बाजूला ठेव.” ५ मग ती स्त्री तिथून निघाली.
घरी आल्यावर तिने मुलांना आत घेऊन दार लावलं. मग तिच्या मुलांनी तिला एकेक भांडं दिलं आणि ती त्यात तेल ओतत गेली.+ ६ सर्व भांडी भरल्यावर ती तिच्या मुलाला म्हणाली: “आणखी एक भांडं दे.”+ पण तो म्हणाला: “आता एकही भांडं उरलं नाही.” त्या वेळी तेल यायचं बंद झालं.+ ७ मग त्या स्त्रीने खऱ्या देवाच्या माणसाकडे जाऊन त्याला ही गोष्ट सांगितली. तेव्हा तो तिला म्हणाला: “आता बाजारात जाऊन ते तेल वीक आणि तुझं जे काही कर्ज असेल ते फेडून टाक. आणि उरलेल्या पैशांतून तुझ्या आणि तुझ्या मुलांच्या पोटापाण्याची सोय कर.”
८ एक दिवस अलीशा शूनेमला+ गेला. तिथे राहणाऱ्या एका प्रतिष्ठित स्त्रीने त्याला जेवणाचा आग्रह केला.+ अलीशा जेव्हा-जेव्हा तिथून जायचा, तेव्हा-तेव्हा तो तिच्याकडे जेवायला थांबायचा. ९ एकदा ती स्त्री आपल्या नवऱ्याला म्हणाली: “इथून नेहमी जाणारा हा माणूस नक्कीच देवाचा खास सेवक असावा. १० म्हणून आपण त्याच्यासाठी घराच्या छतावर एक लहान खोली बांधू या.+ आणि त्यात एक पलंग, मेज, खुर्ची आणि एक दिवा ठेवू या; म्हणजे जेव्हाही तो आपल्याकडे येईल, तेव्हा त्याला तिथे राहता येईल.”+
११ एक दिवस अलीशा तिथे आला आणि छतावरच्या त्या खोलीत आराम करायला गेला. १२ मग तो आपला सेवक गेहजी+ याला म्हणाला: “त्या शूनेमकरीण+ स्त्रीला बोलावून आण.” तेव्हा गेहजीने तिला बोलावलं. १३ मग अलीशा गेहजीला म्हणाला: “तिला विचार, ‘तू आमच्यासाठी खूप कष्ट घेतलेस;+ तर आता सांग, मी तुझ्यासाठी काय करू शकतो?+ मी राजाकडे+ किंवा सेनापतीकडे तुझी शिफारस करू का?’” पण ती म्हणाली: “मी माझ्या लोकांमध्ये सुखात आहे.” १४ म्हणून मग अलीशाने गेहजीला विचारलं: “तिच्यासाठी दुसरं काही करता येईल का?” त्यावर गेहजी म्हणाला: “तिला मुलगा नाही;+ आणि तिचा नवराही वयस्कर आहे.” १५ तेव्हा तो लगेच म्हणाला: “तिला बोलव.” म्हणून गेहजीने तिला बोलावलं आणि ती दाराजवळ येऊन उभी राहिली. १६ मग अलीशा तिला म्हणाला: “पुढच्या वर्षी या वेळी तुझ्या कुशीत मुलगा असेल.”+ पण ती म्हणाली: “माझ्या प्रभू, तुम्ही खऱ्या देवाचे माणूस आहात! तुमच्या या दासीसोबत असं खोटं बोलू नका.”
१७ पण अलीशाने सांगितलं होतं त्याप्रमाणे ती स्त्री गरोदर राहिली आणि पुढच्या वर्षी त्याच सुमारास तिला मुलगा झाला. १८ मुलगा मोठा झाल्यावर एक दिवस असं झालं, की त्याचे वडील शेतात कापणी करणाऱ्यांसोबत असताना तो त्यांच्याकडे गेला. १९ तो त्यांना म्हणत राहिला: “माझं डोकं खूप दुखतंय!” तेव्हा त्याचे वडील आपल्या सेवकाला म्हणाले: “याला त्याच्या आईकडे घेऊन जा.” २० म्हणून त्या सेवकाने त्या मुलाला उचलून त्याच्या आईकडे नेलं. दुपारपर्यंत तो मुलगा आपल्या आईच्या मांडीवरच बसून राहिला, आणि नंतर मेला.+ २१ तेव्हा तिने त्याला वरच्या खोलीत नेलं आणि खऱ्या देवाच्या माणसाच्या पलंगावर ठेवलं.+ मग खोलीचं दार लावून ती निघाली. २२ तिने आपल्या नवऱ्याला बोलावून म्हटलं: “कृपा करून, एक सेवक आणि एक गाढव माझ्यासाठी पाठवा; म्हणजे मी पटकन खऱ्या देवाच्या माणसाकडे जाऊन येते.” २३ पण तो तिला म्हणाला: “तू त्यांच्याकडे आज का चाललीस? आज तर नवचंद्राचा दिवसही*+ नाही आणि शब्बाथही नाही.” त्यावर ती म्हणाली: “काळजी करू नका, सगळं ठीक आहे.” २४ मग गाढव तयार करून ती त्यावर बसली आणि आपल्या सेवकाला म्हणाली: “लवकर चल. मी सांगत नाही तोपर्यंत गाढव हाकण्याचं थांबवू नकोस.”
२५ मग ती कर्मेल डोंगरावर खऱ्या देवाच्या माणसाकडे गेली. तिला दुरून पाहताच खऱ्या देवाचा माणूस आपल्या सेवकाला, गेहजीला म्हणाला: “ती पाहा! शूनेमकरीण स्त्री येत आहे. २६ धावत जा आणि तिला विचार: ‘तू ठीक आहेस ना? तुझा नवरा आणि तुझा मुलगा तर ठीक आहे ना?’” त्यावर ती म्हणाली: “सगळं ठीक आहे.” २७ ती डोंगरावर खऱ्या देवाच्या माणसाकडे आली आणि तिने लगेच त्याचे पाय धरले.+ तेव्हा गेहजी तिला दूर लोटण्यासाठी जवळ आला. पण खऱ्या देवाचा माणूस त्याला म्हणाला: “असू दे. तिला काही करू नकोस. ती फार दुःखी आहे. पण कशामुळे ते मला माहीत नाही. कारण यहोवाने मला ते सांगितलं नाही.” २८ मग ती म्हणाली: “माझ्या प्रभू! मी तुमच्याकडे मुलगा मागितला होता का? मी म्हणाले होते ना, ‘मला खोटी आशा दाखवू नका’?”+
२९ तेव्हा अलीशा लगेच गेहजीला म्हणाला: “आपला झगा कंबरेला बांध+ आणि माझी काठी घेऊन निघ. रस्त्यात कोणी भेटला तर त्याला नमस्कार करू नकोस; किंवा कोणी तुला नमस्कार केला तर त्याला उत्तर देऊ नकोस. जा आणि माझी काठी त्या मुलाच्या तोंडावर ठेव.” ३० त्यावर मुलाची आई अलीशाला म्हणाली: “जिवंत देव यहोवा याची शपथ आणि तुमच्या जिवाची शपथ, तुम्ही सोबत आल्याशिवाय मी जाणार नाही.”+ म्हणून मग अलीशा उठून तिच्यासोबत गेला. ३१ आणि गेहजी त्यांच्यापुढे गेला व त्याने जाऊन मुलाच्या तोंडावर काठी ठेवली. पण मुलाने काही हालचाल केली नाही किंवा आवाजही केला नाही.+ म्हणून गेहजी परत अलीशाकडे आला आणि म्हणाला: “मुलगा काही उठला नाही.”
३२ अलीशा घरात आला तेव्हा मेलेला मुलगा आपल्या पलंगावर असलेला त्याला दिसला.+ ३३ तो खोलीत गेला आणि त्याने दार लावून घेतलं; खोलीत ते दोघंच होते. मग अलीशा यहोवाला प्रार्थना करू लागला.+ ३४ नंतर पलंगावर जाऊन तो त्या मुलावर पालथा पडला; मुलाच्या तोंडाला तोंड, डोळ्यांना डोळे आणि हातांना हात लावून तो त्याच्यावर पालथा पडून राहिला. तेव्हा मुलाच्या शरीरात ऊब येऊ लागली.+ ३५ मग अलीशा घरात फेऱ्या मारू लागला. नंतर पुन्हा पलंगावर जाऊन तो मुलावर पालथा पडला. तेव्हा मुलगा सात वेळा शिंकला आणि नंतर त्याने आपले डोळे उघडले.+ ३६ मग अलीशाने गेहजीला बोलावून म्हटलं: “शूनेमकरीण स्त्रीला बोलव.” तेव्हा त्याने तिला बोलावलं आणि ती आली. मग अलीशा तिला म्हणाला: “आपल्या मुलाला उचलून घे.”+ ३७ तेव्हा ती स्त्री आत आली आणि तिने त्याच्या पायांजवळ, जमिनीवर पडून त्याला नमन केलं. नंतर आपल्या मुलाला उचलून ती बाहेर गेली.
३८ पुढे अलीशा गिलगालला परत गेला, तेव्हा देशात दुष्काळ पडला होता.+ एकदा संदेष्ट्यांचे पुत्र+ अलीशासमोर बसलेले असताना, तो आपल्या सेवकाला म्हणाला:+ “चुलीवर मोठं पातेलं ठेव आणि संदेष्ट्यांच्या पुत्रांसाठी खायला रस्सा बनव.” ३९ मग त्यांच्यापैकी एक जण रानात फळभाज्या गोळा करायला गेला. तेव्हा एका जंगली वेलीवर त्याला फळं दिसली. त्याने ती आपल्या ओटीत भरून आणली. नंतर त्याने ती चिरून पातेल्यात टाकली; ती फळं कसली आहेत हे त्याला माहीत नव्हतं. ४० नंतर त्यांनी तो रस्सा सर्व माणसांना वाढला. पण तो चाखताच ते ओरडू लागले: “हे खऱ्या देवाच्या माणसा! पातेल्यात विष आहे!” आणि कोणीही तो रस्सा खाऊ शकला नाही. ४१ तेव्हा अलीशा म्हणाला: “थोडं पीठ घेऊन या.” मग ते पीठ पातेल्यात टाकून तो म्हणाला: “आता लोकांना वाढा.” त्यानंतर पातेल्यात काहीही विषारी राहिलं नाही.+
४२ नंतर बआल-शालीशा+ इथून एक माणूस आला. त्याने खऱ्या देवाच्या माणसासाठी, जवाच्या पहिल्या उत्पन्नातून बनवलेल्या २० भाकरी+ आणि एक गोणी जवाची हिरवी कणसं आणली.+ मग अलीशा म्हणाला: “लोकांना हे खायला दे.” ४३ पण त्याचा सेवक त्याला म्हणाला: “हे १०० माणसांना कसं काय पुरेल?”+ त्यावर तो म्हणाला: “तू ते लोकांना खायला दे, कारण यहोवा असं म्हणतो, ‘ते सर्व त्यातून खातील, शिवाय त्यातलं काही उरेलही.’”+ ४४ तेव्हा सेवकाने ते लोकांना वाढलं आणि त्यांनी ते खाल्लं. तसंच, यहोवाने सांगितल्याप्रमाणे त्यातलं थोडं उरलंसुद्धा.+
५ सीरियाच्या राजाचा एक सेनापती होता. त्याचं नाव नामान. तो एक प्रतिष्ठित माणूस असून राजाच्या नजरेत त्याला फार मान होता. कारण त्याच्या हातून यहोवाने सीरियाला विजय मिळवून दिला होता. नामान एक कुष्ठरोगी होता.* असं असलं, तरी तो एक पराक्रमी योद्धा होता. २ सीरियाचे सैनिक सहसा इस्राएल देशात येऊन लूटमार करायचे. एकदा, लूटमार करताना त्यांनी इस्राएलमधून एका लहान मुलीला बंदी बनवून नेलं. ती मुलगी नामानच्या बायकोची दासी झाली. ३ एक दिवस, ती आपल्या मालकिणीला म्हणाली: “आपले मालक जर शोमरोनातल्या संदेष्ट्याला+ जाऊन भेटले, तर किती चांगलं होईल! ते त्यांचा कुष्ठरोग बरा करतील.”+ ४ म्हणून मग तो* राजाकडे गेला आणि इस्राएली मुलीने जे काही म्हटलं होतं, ते त्याने राजाला सांगितलं.
५ तेव्हा सीरियाचा राजा म्हणाला: “मग लगेच जायला निघ! मी इस्राएलच्या राजाला एक पत्रही पाठवतो.” म्हणून नामान आपल्यासोबत दहा तालान्त* चांदी, सोन्याचे ६,००० तुकडे आणि कपड्यांचे दहा जोड घेऊन निघाला. ६ त्याने इस्राएलच्या राजाला ते पत्र दिलं. त्यात असं लिहिलं होतं: “या पत्रासोबत, मी माझा सेवक नामान याला तुमच्याकडे पाठवतोय. त्याचा कुष्ठरोग तुम्ही बरा करावा.” ७ ते पत्र वाचताच इस्राएलच्या राजाने आपले कपडे फाडले आणि तो म्हणाला: “त्याने या माणसाला माझ्याकडे पाठवून मला त्याचा कुष्ठरोग बरा करायला सांगितलंय! मी काय देव आहे?+ जीवन किंवा मरण देणं काय माझ्या हातात आहे? बघा तो माणूस कसा माझ्याशी भांडण करायचं कारण शोधतोय!”
८ इस्राएलच्या राजाने आपले कपडे फाडले हे जेव्हा खऱ्या देवाच्या माणसाने, म्हणजे अलीशाने ऐकलं, तेव्हा त्याने लगेच राजाला असा निरोप पाठवला: “तू आपले कपडे का फाडलेस? त्या माणसाला माझ्याकडे पाठवून दे; म्हणजे इस्राएलमध्ये एक संदेष्टा आहे हे त्याला समजेल.”+ ९ म्हणून नामान आपले घोडे आणि युद्धाचे रथ घेऊन अलीशाच्या घरासमोर येऊन उभा राहिला. १० पण अलीशाने एका दूताला पाठवून नामानला सांगितलं: “जा, यार्देन+ नदीत सात वेळा+ डुबकी मार. मग तुझं शरीर आधीसारखं होऊन तू शुद्ध होशील.” ११ ते ऐकून नामान संतापला आणि परत जायला निघाला. तो म्हणाला: “मी असा विचार केला होता, की ‘तो माझ्याकडे बाहेर येईल आणि इथे उभा राहील. मग त्याचा देव यहोवा याला प्रार्थना करून तो कुष्ठरोगाच्या ठिकाणी हात फिरवेल आणि मला बरं करेल.’ १२ इस्राएलच्या नद्यांपेक्षा दिमिष्कमधल्या+ अबाना आणि परपर या नद्या काय चांगल्या नाहीत का? मी त्यांत डुबकी मारून शुद्ध होऊ शकत नाही का?” असं म्हणून तो मागे फिरला आणि रागाच्या भरात तिथून निघून गेला.
१३ पण त्याचे सेवक त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले: “हे प्रभू!* त्या संदेष्ट्याने जर तुम्हाला एखादं अवघड काम करायला सांगितलं असतं, तर तुम्ही ते केलं नसतं का? पण त्याने तर तुम्हाला इतकंच सांगितलंय, की ‘डुबकी मारा आणि शुद्ध व्हा.’ मग तसं करायला काय हरकत आहे?” १४ तेव्हा, खऱ्या देवाच्या माणसाने सांगितल्याप्रमाणे नामान यार्देन नदीकडे गेला आणि त्याने सात वेळा नदीत डुबकी मारली.+ त्यानंतर त्याचं शरीर आधीसारखं झालं; त्याची त्वचा लहान मुलाच्या त्वचेसारखी होऊन+ तो शुद्ध झाला.+
१५ त्यानंतर तो आपल्या सर्व सैनिकांना घेऊन परत खऱ्या देवाच्या माणसाकडे गेला+ आणि त्याच्यासमोर उभा राहून म्हणाला: “आता मला समजलंय, की या संपूर्ण पृथ्वीवर फक्त इस्राएलमध्येच देव आहे;+ दुसरीकडे कुठेही नाही. तर आता कृपा करून तुमच्या या सेवकाने आणलेली भेट स्वीकारा.” १६ पण अलीशा त्याला म्हणाला: “ज्या जिवंत देवाची, यहोवाची मी सेवा करतो* त्याची शपथ, मी हे स्वीकारणार नाही.”+ नामान तरीही त्याला आग्रह करत राहिला, पण त्याने ती भेट स्वीकारली नाही. १७ शेवटी नामान म्हणाला: “ठीक आहे. पण कृपा करून, दोन खेचरं वाहू शकतील इतकी माती या देशातून घेऊन जाण्याची तुमच्या या सेवकाला परवानगी द्या. कारण इथून पुढे तुमचा हा सेवक यहोवाशिवाय दुसऱ्या कोणत्याही देवाला होमार्पण किंवा बलिदान अर्पण करणार नाही. १८ पण यहोवाने तुमच्या या सेवकाला फक्त एका गोष्टीसाठी क्षमा करावी: माझे प्रभू जेव्हा रिम्मोनच्या मंदिरात नमन करायला जातात, तेव्हा ते माझ्या हाताचा आधार घेऊन नमन करतात. त्यामुळे मलाही त्या मंदिरात खाली वाकावं लागतं. म्हणून जेव्हा-जेव्हा मी रिम्मोनच्या मंदिरात खाली वाकीन, तेव्हा-तेव्हा यहोवाने कृपा करून तुमच्या या सेवकाला क्षमा करावी.” १९ तेव्हा अलीशा त्याला म्हणाला: “शांतीने जा.” मग नामान तिथून निघून गेला. तो काही अंतरावर गेला, २० तेव्हा खऱ्या देवाच्या माणसाचा,+ अलीशाचा सेवक गेहजी+ मनात म्हणाला: ‘सीरियाच्या नामानने+ आणलेल्या भेटीतून काहीही न घेता माझ्या प्रभूने त्याला असंच जाऊ दिलं. जिवंत देवाची, यहोवाची शपथ! मी त्याच्या मागे धावत जाईन आणि त्याच्याकडून काहीतरी घेईन.’ २१ म्हणून गेहजी नामानच्या मागे धावत गेला. आपल्यामागे कोणीतरी धावत येत असल्याचं पाहून नामान त्याला भेटायला आपल्या रथातून खाली उतरला आणि म्हणाला: “सगळं ठीक आहे ना?” २२ त्यावर तो म्हणाला: “सगळं ठीक आहे. पण माझ्या प्रभूने मला असं सांगून पाठवलंय: ‘नुकतेच माझ्याकडे, एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातून संदेष्ट्यांच्या पुत्रांपैकी* दोघं जण आले आहेत. तेव्हा कृपा करून, त्यांच्यासाठी एक तालान्त चांदी आणि कपड्यांचे दोन जोड द्या.’”+ २३ नामान त्याला म्हणाला: “एक काय, दोन तालान्त घे.” नामान त्याला आग्रह करत राहिला.+ मग नामानने दोन तालान्त चांदी व कपड्यांचे दोन जोड घेतले आणि ते दोन गोण्यांमध्ये बांधून आपल्या दोन सेवकांकडे दिले. हे सर्व घेऊन सेवक गेहजीच्या पुढे चालू लागले.
२४ मग ओफेल* इथे पोहोचल्यावर गेहजीने त्यांच्या हातून त्या गोण्या घेतल्या आणि घरात ठेवल्या. नंतर त्याने त्या माणसांना पाठवून दिलं. ते गेल्यावर, २५ गेहजी आत गेला आणि आपल्या प्रभूजवळ, अलीशाजवळ जाऊन उभा राहिला. तेव्हा अलीशाने त्याला विचारलं: “गेहजी, तू कुठे गेला होतास?” त्यावर तो म्हणाला: “कुठेही नाही, तुमचा हा सेवक तर इथेच होता.”+ २६ तेव्हा अलीशा त्याला म्हणाला: “तुला काय वाटतं, तू त्या माणसाच्या मागे गेला आणि तो तुला भेटायला रथातून खाली उतरला हे काय मला माहीत नाही? ही वेळ काय चांदी, कपडे, जैतुनाच्या बागा, द्राक्षमळे, मेंढरं, गुरंढोरं किंवा दास-दासी घेण्याची आहे का?+ २७ म्हणून आता नामानचा कुष्ठरोग+ तुला आणि तुझ्या वंशजांना कायमचा लागेल.” तेव्हा गेहजीला कुष्ठरोग* होऊन तो लगेच बर्फासारखा* पांढरा पडला,+ आणि अलीशासमोरून निघून गेला.
६ एकदा संदेष्ट्यांचे पुत्र*+ अलीशाला म्हणाले: “आम्ही तुमच्यासोबत जिथे राहतो ती जागा आम्हाला खूप कमी पडत आहे. २ तर आता आम्हाला यार्देन नदीकडे जायची परवानगी द्या. तिथे जाऊन आमच्यापैकी प्रत्येक जण लाकडाचा एक ओंडका घेईल आणि आम्हाला सगळ्यांना राहायला तिथे एक घर बांधेल.” त्यावर तो म्हणाला: “ठीक आहे, जा.” ३ तेव्हा त्यांच्यापैकी एक जण अलीशाला म्हणाला: “कृपया तुम्ही आपल्या सेवकांसोबत याल का?” त्यावर तो म्हणाला: “हो मी येईन.” ४ मग तो त्यांच्यासोबत गेला. ते सर्व यार्देनकडे गेले आणि झाडं तोडू लागले. ५ झाडं तोडत असताना अचानक एका माणसाच्या कुऱ्हाडीचं पातं दांड्यातून निसटून पाण्यात पडलं. तेव्हा तो ओरडला आणि म्हणाला: “हे प्रभू! मी तर ती कुऱ्हाड मागून आणली होती!” ६ खऱ्या देवाच्या माणसाने त्याला विचारलं: “ती कुठे पडली?” तेव्हा त्याने ती जागा त्याला दाखवली. मग अलीशाने लाकडाचा एक तुकडा तोडून तिथे टाकला, आणि कुऱ्हाडीचं पातं वर आलं आणि पाण्यावर तरंगू लागलं. ७ मग तो म्हणाला: “ते काढून घे.” तेव्हा त्याने हात पुढे करून ते पातं काढून घेतलं.
८ एकदा सीरियाचा राजा इस्राएलशी युद्ध करायला निघाला.+ तो आपल्या सेवकांशी सल्लामसलत करून म्हणाला: “मी अमुक-अमुक ठिकाणी तुमच्यासोबत छावणी देईन.” ९ इकडे, खऱ्या देवाच्या माणसाने+ इस्राएलच्या राजाला असा निरोप पाठवला: “सावध राहा! तिथून जाऊ नकोस. कारण सीरियाचे लोक तुझ्यावर हल्ला करायला तिथेच येत आहेत.” १० म्हणून मग, खऱ्या देवाच्या माणसाने ज्या ठिकाणाबद्दल इशारा दिला होता, त्या ठिकाणी असलेल्या आपल्या लोकांना इस्राएलच्या राजाने सावध केलं. खऱ्या देवाचा माणूस इस्राएलच्या राजाला सावध करायचा आणि राजा त्या ठिकाणांपासून दूर राहायचा; असं अनेकदा घडलं.+
११ त्यामुळे सीरियाचा राजा खूप संतापला. त्याने आपल्या सेवकांना बोलावून विचारलं: “मला सांगा, आपल्यातला कोण इस्राएलच्या राजाच्या बाजूने आहे?” १२ तेव्हा एक सेवक त्याला म्हणाला: “हे राजा, माझ्या प्रभू! आमच्यातला कोणीही नाही! हे सगळं इस्राएलमधला अलीशा संदेष्टा करतोय. तुम्ही तुमच्या आतल्या खोलीत जे काही बोलता, अगदी तेसुद्धा तो इस्राएलच्या राजाला सांगतो.”+ १३ तेव्हा राजा म्हणाला: “जा! तो कुठे आहे ते शोधून काढा; म्हणजे त्याला पकडायला मी माणसं पाठवीन.” नंतर राजाला अशी खबर देण्यात आली, की “तो दोथानमध्ये आहे.”+ १४ म्हणून राजाने लगेच घोडे आणि युद्धाचे रथ, तसंच मोठं सैन्य तिथे पाठवलं. त्यांनी रातोरात येऊन त्या शहराला वेढा घातला.
१५ मग खऱ्या देवाच्या माणसाचा सेवक सकाळीच उठून बाहेर आला, तेव्हा त्याने पाहिलं की घोडे आणि युद्धाचे रथ घेऊन सैन्याने शहराला वेढा घातला आहे. ते पाहताच तो सेवक अलीशाला म्हणाला: “हे प्रभू! आता काय करायचं?” १६ पण अलीशा त्याला म्हणाला: “घाबरू नकोस!+ त्यांच्यासोबत जितके आहेत, त्यापेक्षा जास्त आपल्यासोबत आहेत.”+ १७ मग अलीशा प्रार्थना करू लागला आणि म्हणाला: “हे यहोवा! कृपा करून याचे डोळे उघड, म्हणजे याला दिसेल.”+ यहोवाने लगेच त्या सेवकाचे डोळे उघडले. तेव्हा अलीशाच्या सभोवती+ असलेल्या संपूर्ण डोंगराळ प्रदेशावर त्याला अग्नीचे घोडे आणि अग्नीचे युद्ध-रथ दिसले.+
१८ सीरियाचे लोक हल्ला करायला पुढे येऊ लागले, तेव्हा अलीशा यहोवाला प्रार्थना करून म्हणाला: “कृपा करून या राष्ट्राला आंधळं कर.”+ तेव्हा अलीशाच्या विनंतीप्रमाणे त्याने त्यांना आंधळं केलं. १९ मग अलीशा त्यांना म्हणाला: “तुम्ही रस्ता चुकलात; हे ते शहर नाही. माझ्यामागे या. तुम्ही ज्या माणसाला शोधताय त्याच्याकडे मी तुम्हाला घेऊन जाईन.” पण अलीशा त्यांना शोमरोनमध्ये+ घेऊन गेला.
२० ते शोमरोनात आले तेव्हा अलीशा म्हणाला: “हे यहोवा! यांचे डोळे उघड, म्हणजे यांना दिसेल.” यहोवाने त्यांचे डोळे उघडले, तेव्हा आपण शोमरोनमध्ये आहोत असं त्यांना दिसलं. २१ इस्राएलच्या राजाने त्यांना पाहिलं तेव्हा तो अलीशाला म्हणाला: “हे प्रभू, मारून टाकू का यांना? कत्तल करू का यांची?” २२ पण तो त्याला म्हणाला: “नाही, त्यांना मारू नकोस. तू ज्यांना तुझ्या तलवारीच्या आणि धनुष्याच्या जोरावर कैद करून आणतोस, त्यांना काय मारून टाकतोस? यांना भाकरी आणि पाणी दे, म्हणजे ते खाऊन-पिऊन+ आपल्या राजाकडे परत जातील.” २३ म्हणून इस्राएलच्या राजाने त्यांना एक मोठी मेजवानी दिली आणि त्या लोकांनी खाणंपिणं केलं. मग त्याने त्यांना आपल्या राजाकडे परत पाठवून दिलं. त्यानंतर लूटमार करणाऱ्या सीरियाच्या टोळ्या+ पुन्हा कधीही इस्राएल देशात आल्या नाहीत.
२४ पुढे काही काळाने, सीरियाचा राजा बेन-हदाद याने आपलं सगळं सैन्य जमा केलं आणि जाऊन शोमरोनला वेढा घातला.+ २५ त्यामुळे शोमरोनात मोठा दुष्काळ पडला.+ सीरियाच्या सैन्याचा वेढा इतका काळ राहिला, की गाढवाच्या डोक्याची+ किंमत चांदीचे ८० तुकडे इतकी झाली. आणि काब* मापाच्या चौथ्या भागाएवढ्या कबुतराच्या विष्ठेची किंमत चांदीचे पाच तुकडे इतकी झाली. २६ इस्राएलचा राजा शहराच्या तटबंदीवरून चालत असताना, एक स्त्री त्याला हाक मारून म्हणाली: “हे राजा, माझ्या प्रभू! आम्हाला मदत कर!” २७ त्यावर राजा म्हणाला: “जर यहोवाच तुला मदत करत नाही, तर मी कुठून करणार? मी कुठून तुला अन्नधान्य, द्राक्षारस किंवा तेल देणार?” २८ राजाने पुढे विचारलं: “काय झालं तुला?” त्यावर तिने उत्तर दिलं: “ही स्त्री मला म्हणाली होती, की ‘तू तुझा मुलगा दे, म्हणजे आज आपण त्याला खाऊ. मग उद्या आपण माझा मुलगा खाऊ.’+ २९ म्हणून आम्ही माझ्या मुलाला शिजवून खाल्लं.+ मग दुसऱ्या दिवशी मी तिला म्हणाले, की ‘आता तुझा मुलगा दे, म्हणजे आपण त्याला खाऊ.’ पण तिने त्याला लपवून ठेवलंय.”
३० त्या स्त्रीचे हे शब्द ऐकताच, राजाने आपले कपडे फाडले.+ तो शहराच्या तटबंदीवरून चालत जात असताना लोकांनी पाहिलं, की त्याने आपल्या कपड्यांच्या आत गोणपाट घातलं आहे. ३१ मग तो म्हणाला: “आज जर मी त्या शाफाटच्या मुलाचं, अलीशाचं मुंडकं उडवलं नाही, तर देव मला कठोरातली कठोर शिक्षा करो!”+
३२ त्या वेळी अलीशा आपल्या घरात काही वडीलजनांसोबत बसला होता. इकडे राजाने एका दूताला आपल्यापुढे पाठवलं. पण तो दूत पोहोचण्याआधीच अलीशा वडीलजनांना म्हणाला: “पाहा! त्या खुनी माणसाच्या+ मुलाने माझं डोकं उडवण्यासाठी आपल्या दूताला पाठवलंय. लक्ष ठेवा, तो दूत आला की दार लावून घ्या. त्याने आत येऊ नये म्हणून दार धरून ठेवा. त्याच्यामागे मला त्याच्या मालकाच्या पावलांचाही आवाज ऐकू येतोय.” ३३ अलीशा बोलतच होता इतक्यात तो दूत त्याच्याकडे आला. त्याच्या पाठोपाठ राजाही आला आणि म्हणाला: “यहोवानेच हे संकट आणलंय; मग मी मदतीसाठी यहोवाची वाट का बघत बसू?”
७ त्यावर अलीशा म्हणाला: “यहोवाचा संदेश ऐका! यहोवा असं म्हणतो: ‘उद्या या वेळेपर्यंत शोमरोनच्या दरवाजात* एका शेकेलला* एक सेया माप* चांगलं पीठ मिळेल, आणि एका शेकेलला दोन सेया मापं* जव मिळेल.’”+ २ तेव्हा राजा ज्या अधिकाऱ्याच्या हाताचा आधार घेऊन उभा होता, तो अधिकारी खऱ्या देवाच्या माणसाला म्हणाला: “यहोवाने आकाशाची दारं जरी उघडली, तरी हे शक्य आहे का?”+ त्यावर अलीशा म्हणाला: “तू स्वतः आपल्या डोळ्यांनी हे पाहशील,+ पण त्यातलं काहीही खाणार नाहीस.”+
३ शोमरोनच्या दरवाजाजवळ चार कुष्ठरोगी बसले होते.+ ते एकमेकांना म्हणाले: “आपण इथे बसून मरायची वाट का बघतोय? ४ आपण इथेच बसून राहिलो, तरी मरू आणि शहरात गेलो, तरी दुष्काळामुळे मरू.+ त्यापेक्षा आपण सीरियाच्या छावणीत जाऊ या. त्यांनी जर आपल्याला जिवंत ठेवलं, तर जगू आणि आपला जीव घेतला, तर मरू.” ५ मग संध्याकाळी अंधार पडल्यावर ते निघाले आणि सीरियाच्या छावणीकडे गेले. ते छावणीच्या हद्दीवर पोहोचले, तेव्हा त्यांना एकही माणूस तिथे दिसला नाही.
६ कारण यहोवाने सीरियाच्या लोकांना युद्धाच्या रथांचा, घोड्यांचा आणि एका मोठ्या सैन्याचा आवाज ऐकवला होता.+ तेव्हा ते एकमेकांना म्हणाले: “इस्राएलच्या राजाने आपल्यावर हल्ला करण्यासाठी नक्कीच हित्ती लोकांच्या राजांना आणि इजिप्तच्या* राजांना पैसे देऊन बोलवलंय!” ७ त्यामुळे ते सगळे लगेच पळाले; आपले तंबू, घोडे, गाढवं आणि छावणीतलं सर्वकाही तसंच सोडून ते संध्याकाळच्या अंधारात जीव मुठीत घेऊन पळाले.
८ छावणीच्या हद्दीवर पोहोचल्यावर ते कुष्ठरोगी एका तंबूत गेले आणि खाऊ-पिऊ लागले. त्यांनी तिथून सोनं, चांदी आणि काही कपडे घेतले आणि जाऊन ते लपवून ठेवले. मग ते छावणीकडे परत आले आणि दुसऱ्या एका तंबूत गेले. त्यांनी तिथल्याही वस्तू घेतल्या आणि जाऊन त्या लपवून ठेवल्या.
९ शेवटी ते एकमेकांना म्हणाले: “आपण जे करतोय ते बरोबर नाही. हा दिवस आनंदाची बातमी सांगण्याचा दिवस आहे! आपण जर गप्प बसलो आणि पहाटेपर्यंत वाट बघत राहिलो, तर आपल्याला नक्कीच शिक्षा होईल. तर आता चला, आपण जाऊन राजाच्या महालात ही खबर पोहोचवू.” १० मग ते गेले आणि शहराच्या दरवाजावर असलेल्या पहारेकऱ्यांना हाक मारून म्हणाले: “आम्ही सीरियाच्या छावणीत गेलो होतो, पण तिथे कोणीही नव्हतं; कोणाचा आवाजही आम्हाला ऐकू आला नाही. तिथे फक्त घोडे व गाढवं बांधलेली होती आणि तंबू जसेच्या तसे होते.” ११ तेव्हा पहारेकऱ्यांनी लगेच हाक मारून राजाच्या महालात ही खबर पोहोचवली.
१२ राजा रात्रीच उठला आणि आपल्या सेवकांना म्हणाला: “सीरियाच्या लोकांचा काय डावपेच आहे हे मी तुम्हाला सांगतो. त्यांना चांगलं माहीत आहे, की आपली उपासमार होत आहे.+ म्हणून ते छावणीतून निघून रानात जाऊन लपलेत. त्यांचा असा विचार आहे, की ‘इस्राएली लोक जसं शहरातून बाहेर पडतील, तसं आपण त्यांना जिवंत पकडू आणि त्यांच्या शहरात घुसू.’”+ १३ तेव्हा राजाचा एक सेवक म्हणाला: “शहरात उरलेल्या घोड्यांपैकी पाच घोडे घेऊन काही माणसांना तिकडे जाऊ द्या. ते जरी वाचले, तरी त्यांची दशा इथे उरलेल्या इस्राएली लोकांसारखीच होईल; आणि मारले गेले, तरी जे इस्राएली लोक मेले आहेत त्यांच्यासारखीच त्यांची अवस्था होईल.” १४ म्हणून त्यांनी दोन रथांना घोडे जुंपले, आणि राजाने त्यांना सीरियाच्या छावणीत पाठवलं. तो त्यांना म्हणाला: “जा आणि बघून या.” १५ ते थेट यार्देन नदीपर्यंत त्यांच्यामागे त्यांचा शोध घेत गेले. तेव्हा त्या रस्त्यावर सगळीकडे कपडे आणि भांडी पडलेली त्यांना दिसली; सीरियाच्या लोकांनी पळण्याच्या गडबडीत या वस्तू टाकून दिल्या होत्या. मग दूत परत आले आणि त्यांनी राजाला ही खबर दिली.
१६ मग सर्व लोक शहराबाहेर पडले आणि त्यांनी जाऊन सीरियाची छावणी लुटली. तेव्हा यहोवाने सांगितल्याप्रमाणे एका शेकेलला एक सेया माप चांगलं पीठ आणि एका शेकेलला दोन सेया मापं जव मिळू लागलं.+ १७ राजा ज्या अधिकाऱ्याच्या हाताचा आधार घेऊन उभा राहायचा, त्याला राजाने शहराच्या दरवाजावर नेमलं होतं. पण तिथे तो लोकांच्या पायांखाली तुडवला गेला आणि मेला; राजा जेव्हा खऱ्या देवाच्या माणसाकडे आला होता, तेव्हा खऱ्या देवाच्या माणसाने त्याला जसं सांगितलं होतं, अगदी तसंच घडून आलं. १८ शिवाय, खऱ्या देवाचा माणूस राजाला जे म्हणाला होता, तेही पूर्ण झालं. तो म्हणाला होता: “उद्या या वेळेपर्यंत शोमरोनच्या दरवाजात एका शेकेलला दोन सेया मापं जव मिळेल. आणि एका शेकेलला एक सेया माप चांगलं पीठ मिळेल.”+ १९ पण तो अधिकारी खऱ्या देवाच्या माणसाला म्हणाला होता: “यहोवाने आकाशाची दारं जरी उघडली, तरी हे शक्य आहे का?” त्यावर अलीशा म्हणाला होता: “तू स्वतः आपल्या डोळ्यांनी हे पाहशील, पण त्यातलं काहीही तू खाणार नाहीस.” २० त्या अधिकाऱ्याच्या बाबतीत अगदी तसंच घडलं. कारण, शहराच्या दरवाजाजवळ लोकांनी त्याला पायांखाली तुडवलं आणि तो मेला.
८ अलीशाने ज्या स्त्रीच्या मुलाला पुन्हा जिवंत केलं होतं,+ त्या स्त्रीला तो म्हणाला: “ऊठ, आपल्या घराण्यातल्या लोकांना सोबत घे, आणि तुला शक्य असेल तिथे जाऊन विदेशी म्हणून राहा. कारण यहोवा या देशात दुष्काळ पाडणार आहे.+ आणि तो दुष्काळ सात वर्षं राहील.” २ म्हणून मग ती स्त्री निघाली आणि खऱ्या देवाच्या माणसाने तिला सांगितलं होतं तसं तिने केलं; आपल्या घराण्यातल्या लोकांना सोबत घेऊन ती सात वर्षं पलिष्ट्यांच्या देशात+ जाऊन राहिली.
३ मग सात वर्षं संपल्यावर, ती स्त्री पलिष्ट्यांच्या देशातून परत आली. आणि आपलं घरदार व शेतीवाडी परत मिळावी म्हणून राजाकडे फिर्याद घेऊन गेली. ४ त्या वेळी राजा खऱ्या देवाच्या माणसाच्या सेवकाशी, म्हणजे गेहजीशी बोलत होता. राजा त्याला म्हणाला: “अलीशाने ज्या सर्व मोठमोठ्या गोष्टी केल्या आहेत त्यांबद्दल मला सांग.”+ ५ मग अलीशाने एका मेलेल्या मुलाला कसं जिवंत केलं हे गेहजी राजाला सांगत होता;+ इतक्यात, ज्या स्त्रीच्या मुलाला जिवंत केलं होतं, ती स्त्री आपल्या घराची व शेतीची फिर्याद घेऊन राजाकडे आली.+ तिला पाहताच गेहजी म्हणाला: “हे राजा, माझ्या प्रभू! हीच ती स्त्री आहे, आणि अलीशाने ज्याला जिवंत केलं होतं तो हा तिचा मुलगा.” ६ तेव्हा राजाने त्या स्त्रीला विचारलं आणि तिने त्याला सगळी हकिगत सांगितली. मग राजाने आपल्या एका अधिकाऱ्याला बोलावून म्हटलं: “हिचं जे काही असेल, ते तिला परत द्या. आणि ती इथे नव्हती त्या संपूर्ण काळात, तिच्या शेतीच्या उत्पन्नातून तिने जितके पैसे मिळवले असते तितके पैसे तिला देऊन टाका.”
७ पुढे अलीशा दिमिष्कला+ गेला; त्या वेळी सीरियाचा राजा बेन-हदाद+ हा खूप आजारी होता. तेव्हा, “खऱ्या देवाचा माणूस+ इथे आलाय,” अशी खबर राजाला देण्यात आली. ८ म्हणून राजा आपला सेवक हजाएल+ याला म्हणाला: “सोबत भेटवस्तू घे आणि खऱ्या देवाच्या माणसाकडे जा.+ त्याला यहोवाकडे असं विचारायला सांग: ‘मी या आजारातून बरा होईन का?’” ९ तेव्हा हजाएल अलीशाला भेटायला गेला. त्याने ४० उंटांवर दिमिष्कमधल्या चांगल्यातल्या चांगल्या वस्तू लादून नेल्या. मग तो अलीशाकडे आला आणि म्हणाला: “तुमचा सेवक, सीरियाचा राजा बेन-हदाद याने मला तुमच्याकडे असं विचारायला पाठवलंय, की ‘मी या आजारातून बरा होईन का?’” १० त्यावर अलीशा त्याला म्हणाला: “त्याला जाऊन सांग: ‘हो, तू बरा होशील.’ पण यहोवाने मला हेसुद्धा दाखवलंय की तो नक्की मरेल.”+ ११ मग अलीशा एकटक हजाएलकडे पाहत राहिला; तो त्याच्याकडे इतका वेळ पाहत राहिला, की हजाएलला अगदी अवघडल्यासारखं वाटू लागलं. त्यानंतर खऱ्या देवाचा माणूस रडू लागला. १२ तेव्हा हजाएलने त्याला विचारलं: “माझे प्रभू, तुम्ही का रडताय?” त्यावर अलीशा म्हणाला: “कारण तू इस्राएली लोकांवर कोणकोणते अत्याचार करणार आहेस हे मला माहीत आहे.+ तू त्यांची तटबंदीची शहरं जाळून टाकशील, त्यांच्या शूरवीरांची तलवारीने कत्तल करशील, त्यांच्या मुलाबाळांना आपटून मारशील आणि त्यांच्या गर्भवती स्त्रियांना चिरून टाकशील.”+ १३ त्यावर हजाएल म्हणाला: “तुमचा हा दास तर केवळ एक कुत्रा आहे. मग मी हे कसं करू शकतो?” पण अलीशा त्याला म्हणाला: “यहोवाने मला दाखवलंय, की तू सीरियाचा राजा बनशील.”+
१४ मग हजाएल अलीशाकडून निघाला आणि आपल्या प्रभूकडे परत आला. तेव्हा राजाने त्याला विचारलं: “अलीशाने तुला काय सांगितलं?” त्यावर तो म्हणाला: “त्याने मला सांगितलं, की तुम्ही नक्की बरे व्हाल.”+ १५ पण दुसऱ्या दिवशी हजाएलने एक जाड चादर घेतली, आणि ती पाण्यात बुडवून राजाच्या तोंडावर दाबून धरली.* त्यामुळे तो मेला+ आणि त्याच्या जागी हजाएल राजा बनला.+
१६ यहोशाफाट यहूदाचा राजा असतानाच त्याचा मुलगा यहोराम+ हा यहूदाचा राजा बनला; इस्राएलचा राजा अहाब याचा मुलगा यहोराम+ याच्या शासनकाळाच्या पाचव्या वर्षी हे घडलं. १७ यहोराम राजा बनला तेव्हा तो ३२ वर्षांचा होता. आणि त्याने आठ वर्षं यरुशलेममधून राज्य केलं. १८ अहाबच्या घराण्याप्रमाणेच+ तोही इस्राएलच्या राजांसारखाच वाईट वागला.+ कारण त्याने अहाबच्या मुलीशी लग्न केलं होतं;+ यहोवाच्या नजरेत जे वाईट ते तो करत राहिला.+ १९ पण आपला सेवक दावीद याच्यामुळे यहूदाचा नाश करण्याची यहोवाची इच्छा नव्हती.+ कारण, त्याने दावीदला आणि त्याच्या मुलांना वचन दिलं होतं, की तो त्यांच्या वंशाचा दिवा कायम ठेवेल.+
२० यहोरामच्या काळात अदोमने यहूदाविरुद्ध बंड केलं+ आणि आपला स्वतःचा एक राजा नेमला.+ २१ म्हणून यहोराम आपले सगळे रथ घेऊन पलीकडे साईरमध्ये गेला. तिथे अदोमी लोकांनी येऊन त्याला आणि त्याच्या रथ-दलाच्या अधिकाऱ्यांना घेरलं. पण यहोरामने रात्री उठून त्यांच्यावर हल्ला केला व त्यांना हरवलं; आणि सैनिक आपल्या तंबूंकडे पळाले. २२ अदोमने यहूदाविरुद्ध केलेलं ते बंड आजपर्यंत चालू आहे. त्याच काळात लिब्नानेही+ बंड केलं.
२३ यहोरामविषयीची बाकीची माहिती, म्हणजे त्याने जे काही केलं ते सर्व यहूदाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे. २४ मग यहोरामचा मृत्यू झाला* आणि त्याला दावीदपुरात आपल्या पूर्वजांच्या कबरेत दफन करण्यात आलं.+ आणि त्याच्या जागी त्याचा मुलगा अहज्या+ हा राजा बनला.
२५ इस्राएलचा राजा अहाब याच्या मुलाच्या, म्हणजे यहोरामच्या शासनकाळाच्या १२ व्या वर्षी, यहूदाचा राजा यहोराम याचा मुलगा अहज्या हा राजा बनला.+ २६ अहज्या राजा बनला त्या वेळी तो २२ वर्षांचा होता. त्याने एक वर्ष यरुशलेममधून राज्य केलं. त्याच्या आईचं नाव अथल्या+ असून ती इस्राएलचा राजा अम्री+ याची नात* होती. २७ अहज्या हा अहाबच्या घराण्यासारखाच वागला;+ अहाबच्या घराण्याप्रमाणेच तो यहोवाच्या नजरेत जे वाईट ते करत राहिला; कारण त्याचं अहाबच्या घराण्याशी नातं होतं.+ २८ तो अहाबच्या मुलासोबत, म्हणजे यहोरामसोबत सीरियाचा राजा हजाएल याच्याशी युद्ध करायला रामोथ-गिलाद+ इथे गेला. पण सीरियाच्या सैनिकांनी यहोरामला जखमी केलं.+ २९ म्हणून बरं होण्यासाठी यहोराम इज्रेलला+ परत आला; कारण, सीरियाचा राजा हजाएल याच्याशी रामा इथे युद्ध करत असताना सीरियाच्या सैनिकांनी त्याला जखमी केलं होतं.+ अहाबचा मुलगा यहोराम जखमी झाल्यामुळे* यहूदाचा राजा यहोराम याचा मुलगा अहज्या त्याला भेटायला इज्रेलला गेला.
९ अलीशा संदेष्ट्याने मग संदेष्ट्यांच्या पुत्रांपैकी* एकाला बोलावून म्हटलं: “आपला झगा कंबरेला बांध आणि ही तेलाची कुपी घेऊन लगेच रामोथ-गिलादला+ जा. २ तिथे पोहोचल्यावर निमशीचा नातू, म्हणजे यहोशाफाटचा मुलगा येहू+ याला शोध. मग त्याला त्याच्या भाऊबंदांपासून बाजूला घेऊन आतल्या खोलीत जा. ३ आणि या कुपीतलं तेल त्याच्या डोक्यावर ओतून म्हण: ‘यहोवा असं म्हणतो, की “मी तुला इस्राएलचा राजा म्हणून अभिषिक्त करतोय.”’+ त्यानंतर लगेच दार उघडून तिथून पळून जा.”
४ म्हणून मग संदेष्ट्याचा तो सेवक रामोथ-गिलादला जायला निघाला. ५ तो तिथे पोहोचला तेव्हा त्याला सेनाधिकारी बसलेले दिसले. तो म्हणाला: “हे सेनाधिकारी! तुझ्यासाठी एक निरोप आहे.” त्यावर येहूने विचारलं: “आमच्यापैकी कोणासाठी?” तेव्हा तो म्हणाला: “हे सेनाधिकारी! तुझ्यासाठी.” ६ म्हणून येहू उठला आणि घरात गेला. त्या सेवकाने मग त्याच्या डोक्यावर तेल ओतलं आणि तो म्हणाला: “इस्राएलचा देव यहोवा असं म्हणतो: ‘मी यहोवा तुला माझ्या लोकांवर, इस्राएलवर राजा म्हणून अभिषिक्त करतोय.+ ७ तू तुझ्या प्रभूच्या, अहाबच्या घराण्याचा नाश कर; ईजबेलने माझ्या संदेष्ट्यांचा आणि यहोवाच्या इतर सर्व सेवकांचा खून केलाय,+ त्याचा बदला मला घ्यायचाय. ८ अहाबच्या संपूर्ण घराण्याचा नाश होईल; त्याच्या घराण्यातला प्रत्येक पुरुष व मुलगा, मग तो लाचार असो किंवा दुर्बळ, त्याचा मी इस्राएलमधून समूळ नाश करीन.+ ९ नबाटचा मुलगा यराबाम आणि अहीयाचा मुलगा बाशा यांच्या घराण्यांसारखीच+ मी अहाबच्या घराण्याचीही दशा करीन.+ १० ईजबेलच्या बाबतीत म्हणशील, तर तिला इज्रेलच्याच जमिनीवर कुत्री खाऊन टाकतील,+ आणि कोणीही तिला दफन करणार नाही.’” मग तो सेवक दार उघडून तिथून पळून गेला.+
११ येहू सेनाधिकाऱ्यांकडे परत आला, तेव्हा त्यांनी त्याला विचारलं: “सगळं काही ठीक आहे ना? तो वेडा माणूस तुझ्याकडे कशाला आला होता?” त्यावर तो म्हणाला: “तो माणूस आणि त्याचं बोलणं तर तुम्हाला माहीतच आहे.” १२ पण ते त्याला म्हणाले: “तू खोटं बोलतोस! तो काय बोलला ते आम्हाला सांग.” त्यावर येहू म्हणाला: “त्याने मला असं-असं सांगितलं. मग तो म्हणाला, की ‘इस्राएलचा देव यहोवा म्हणतो: “मी तुला इस्राएलवर राजा म्हणून अभिषिक्त करतोय.”’”+ १३ तेव्हा त्यांनी लगेच आपापले कपडे घेऊन पायऱ्यांवर त्याच्या पायांखाली पसरवले,+ आणि शिंग फुंकून ते म्हणाले: “येहू राजा बनलाय!”+ १४ मग निमशीचा नातू, म्हणजे यहोशाफाटचा मुलगा येहू+ याने यहोरामविरुद्ध कट रचला.
त्या वेळी यहोराम आणि इस्राएलचं सैन्य रामोथ-गिलादमध्ये+ होतं. ते तिथे सीरियाचा राजा हजाएल+ याच्या हल्ल्यांपासून इस्राएलचं संरक्षण करत होते. १५ नंतर यहोराम राजा हा इज्रेलला+ परत आला; सीरियाचा राजा हजाएल याच्याशी लढाई करत असताना सीरियाच्या सैनिकांनी त्याला जखमी केलं होतं, म्हणून बरं होण्यासाठी तो इज्रेलला परत आला.+
येहू मग सेनाधिकाऱ्यांना म्हणाला: “तुम्ही जर माझ्या बाजूने असाल, तर शहरातून एकाही माणसाला इज्रेलमध्ये खबर द्यायला जाऊ देऊ नका.” १६ नंतर तो आपल्या रथातून इज्रेलला जायला निघाला. कारण यहोराम जखमी झाल्यामुळे तिथे पडून होता, आणि यहूदाचा राजा अहज्या त्याला भेटायला गेला होता. १७ इज्रेलच्या बुरुजावर जो पहारेकरी उभा होता, त्याला येहूच्या माणसांचा एक मोठा जमाव येताना दिसला. तो लगेच म्हणाला: “मला माणसांचा एक मोठा जमाव दिसतोय.” तेव्हा यहोराम म्हणाला: “एका घोडेस्वाराला त्यांच्याकडे पाठवा आणि असं विचारायला सांगा, की ‘तुम्ही शांतीच्या उद्देशानेच येताय ना?’” १८ म्हणून एक घोडेस्वार त्याला भेटायला गेला आणि म्हणाला: “राजा विचारतोय, की ‘तुम्ही शांतीच्या उद्देशानेच येताय ना?’” पण येहू त्याला म्हणाला: “मी ‘शांतीने’ येतोय की नाही याच्याशी तुला काय घेणं-देणं? मागे हो आणि माझ्याबरोबर चल!”
पहारेकऱ्याने मग कळवलं: “निरोप घेऊन जाणारा दूत तिथे पोहोचला खरा, पण तो काही परत आला नाही.” १९ मग त्याने दुसऱ्या एका घोडेस्वाराला पाठवलं. तो त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला: “राजा विचारतोय, की ‘तुम्ही शांतीच्या उद्देशानेच येताय ना?’” पण येहू त्याला म्हणाला: “मी ‘शांतीने’ येतोय की नाही याच्याशी तुला काय घेणं-देणं? मागे हो आणि माझ्याबरोबर चल!”
२० तेव्हा पहारेकऱ्याने कळवलं: “तो दूत त्यांच्यापर्यंत पोहोचला खरा, पण परत आला नाही. आणि त्यांच्या प्रमुखाचं रथ चालवणं हे निमशीच्या नातवासारखं, येहूसारखंच आहे. कारण तो वेड्यासारखा भरधाव वेगाने रथ चालवतोय.” २१ त्यावर यहोराम म्हणाला: “रथ तयार करा!” तेव्हा त्याचा युद्धाचा रथ तयार करण्यात आला. मग इस्राएलचा राजा यहोराम आणि यहूदाचा राजा अहज्या+ हे दोघंही आपापल्या रथात स्वार होऊन येहूला भेटायला निघाले. आणि इज्रेलकर नाबोथच्या मळ्यात+ त्यांची त्याच्याशी गाठ पडली.
२२ येहूला पाहताच यहोराम म्हणाला: “तुझं येणं शांतीचं आहे ना येहू?” पण तो त्याला म्हणाला: “जोपर्यंत तुझी आई ईजबेल+ हिची वेश्येची आणि भूतविद्येची कामं+ चालू आहेत, तोपर्यंत शांती कशी असणार?” २३ हे ऐकताच यहोरामने तिथून पळून जाण्यासाठी आपला रथ वळवला, आणि तो अहज्याला म्हणाला: “अहज्या! आपल्याला फसवलं गेलंय!” २४ तेव्हा येहूने धनुष्य घेऊन यहोरामला असा बाण मारला, की तो त्याच्या पाठीत घुसून हृदयातून आरपार निघाला; आणि तो आपल्या रथातच कोसळून पडला. २५ मग आपल्यासोबत असलेला योद्धा बिदकर याला येहू म्हणाला: “त्याला उचल आणि इज्रेलकर नाबोथच्या मळ्यात फेकून दे.+ तुला आठवतं! आपण त्याचा बाप अहाब याच्यामागे रथातून चाललो होतो, तेव्हा यहोवाने स्वतः त्याच्याबद्दल असा न्यायाचा संदेश सांगितला होता:+ २६ ‘यहोवा म्हणतो, की “मी काल नाबोथचं आणि त्याच्या मुलांचं रक्त सांडलेलं पाहिलं.+ म्हणून आता ‘याच जमिनीवर मी तुझा बदला घेईन,’ असं यहोवा म्हणतो.”’+ तर आता यहोवाने सांगितलं होतं तसं याला उचलून मळ्यात फेकून दे.”+
२७ हे सगळं यहूदाच्या राजाने, अहज्याने+ पाहिलं तेव्हा तो बागेतल्या घराच्या रस्त्याने पळून गेला. (नंतर येहूने त्याचा पाठलाग केला आणि तो म्हणाला: “यालाही मारून टाका!” म्हणून मग त्यांनी त्याच्यावर वार केला; त्या वेळी अहज्या आपल्या रथातून इब्लामजवळ+ असलेल्या गुर या ठिकाणी पळून चालला होता. पण वार होऊनही अहज्या तसाच पुढे मगिद्दोला पळाला आणि तिथे जाऊन मेला. २८ मग त्याच्या सेवकांनी त्याला रथात टाकून यरुशलेमला नेलं आणि दावीदपुरात+ त्याच्या पूर्वजांच्या कबरेत दफन केलं. २९ अहाबचा मुलगा यहोराम याच्या शासनकाळाच्या ११ व्या वर्षी अहज्या+ यहूदाचा राजा बनला होता.)
३० येहू इज्रेलमध्ये+ आला आहे, हे ईजबेलने+ ऐकलं. तेव्हा ती डोळ्यांत सुरमा घालून* आणि केस वगैरे करून खिडकीतून बाहेर बघू लागली. ३१ येहू फाटकातून आत आला, तेव्हा ती त्याला म्हणाली: “आपल्या प्रभूचा खून करणाऱ्या जिम्रीचं काय झालं हे तुला माहीत आहे ना?”+ ३२ तेव्हा येहूने वर खिडकीकडे पाहिलं आणि तो म्हणाला: “माझ्या बाजूने कोण आहे? आहे कोणी?”+ तेवढ्यात राजमहालातल्या दोघा-तिघा अधिकाऱ्यांनी खाली डोकावून त्याच्याकडे पाहिलं. ३३ मग तो म्हणाला: “तिला खाली फेका!” म्हणून त्यांनी तिला खाली फेकून दिलं. तेव्हा तिच्या रक्ताचे शिंतोडे भिंतीवर व घोड्यांवर उडाले; आणि त्याने तिला आपल्या घोड्यांच्या पायांखाली तुडवलं. ३४ त्यानंतर येहूने आत जाऊन खाणंपिणं केलं. मग तो म्हणाला: “जा, त्या शापित बाईला दफन करा; शेवटी ती राजाची मुलगी आहे.”+ ३५ पण जेव्हा ते तिला दफन करायला गेले, तेव्हा त्यांना तिची कवटी, पाय आणि हातांचे तळवे यांशिवाय काहीच दिसलं नाही.+ ३६ मग त्यांनी परत येऊन येहूला ही गोष्ट सांगितली. त्यावर तो म्हणाला: “यहोवाने आपला सेवक एलीया तिश्बी याच्याद्वारे जसं सांगितलं होतं तसंच घडलं.+ तो म्हणाला होता: ‘इज्रेलच्याच जमिनीवर कुत्री ईजबेलचं मांस खाऊन टाकतील.+ ३७ आणि ईजबेलचा मृतदेह इज्रेलच्या जमिनीवर शेतासाठी खत बनेल; म्हणजे ही ईजबेल आहे हे कोणीही ओळखू शकणार नाही.’”
१० अहाबची+ ७० मुलं शोमरोनमध्ये राहत होती. म्हणून येहूने शोमरोनमध्ये असलेल्या वडीलजनांना,+ इज्रेलच्या प्रमुखांना आणि अहाबच्या मुलांचा सांभाळ करणाऱ्यांना पत्रं पाठवली. पत्रांत त्याने असं लिहिलं: २ “पाहा! तुमच्याजवळ तुमच्या प्रभूची मुलं आहेत. शिवाय, तुमच्याकडे तटबंदीचं शहर, युद्धाचे रथ, घोडे आणि शस्त्रंही आहेत. तेव्हा हे पत्र मिळताच, ३ तुमच्या प्रभूच्या मुलांपैकी जो सगळ्यात उत्तम व योग्य असेल त्याला निवडा आणि त्याला त्याच्या वडिलांच्या राजासनावर बसवा. मग आपल्या प्रभूच्या घराण्यासाठी लढा.”
४ पण ते फार घाबरले आणि म्हणाले: “त्याच्यासमोर जर दोन राजे टिकले नाहीत,+ तर आपण काय टिकणार?” ५ तेव्हा, राजमहालाचा व्यवस्थापक, शहराचा अधिकारी, वडीलजन आणि अहाबच्या मुलांचा सांभाळ करणारे या सर्वांनी येहूला असा निरोप पाठवला: “आम्ही तुमचे दास आहोत. तुम्ही म्हणाल ते सगळं आम्ही करू. आम्ही कोणालाही राजा बनवणार नाही. तुम्हाला जसं योग्य वाटतं, तसं करा.”
६ मग येहूने त्यांना आणखी एक पत्र पाठवलं. तो म्हणाला: “तुम्ही जर माझ्या बाजूने असाल आणि माझं ऐकायला तयार असाल, तर उद्या या वेळेपर्यंत तुमच्या प्रभूच्या मुलांची मुंडकी मला इज्रेलमध्ये आणून द्या.”
अहाब राजाच्या ७० मुलांना शहरातली प्रतिष्ठित माणसं सांभाळायची. ७ पत्र मिळताच त्यांनी राजाच्या ७० मुलांना घेऊन त्यांची कत्तल केली.+ मग त्यांची मुंडकी टोपल्यांमध्ये टाकून त्यांनी त्या टोपल्या इज्रेलमध्ये येहूकडे पाठवल्या. ८ तेव्हा एका सेवकाने येऊन येहूला सांगितलं: “ते राजाच्या मुलांची मुंडकी घेऊन आलेत.” त्यावर तो म्हणाला: “शहराच्या दरवाजाजवळ त्यांचे दोन ढीग करा आणि सकाळपर्यंत ते तसेच राहू द्या.” ९ मग सकाळी येहू बाहेर गेला आणि सर्व लोकांसमोर उभा राहून म्हणाला: “तुम्ही निर्दोष* आहात. मी माझ्या प्रभूविरुद्ध कट रचला. हो, मीच त्याला ठार मारलं.+ पण या सगळ्यांना कोणी ठार मारलं? १० तर आता लक्षात ठेवा, की यहोवाने अहाबच्या घराण्याबद्दल जे काही सांगितलं होतं, त्यातला यहोवाचा एकूण एक शब्द पूर्ण होईल.+ आणि यहोवा आपला सेवक एलीया याच्याद्वारे जे काही बोलला होता ते त्याने पूर्ण केलंय.”+ ११ येहूने इज्रेलमध्ये अहाबच्या घराण्यातला जो कोणी उरला होता, त्या प्रत्येकाला ठार मारलं; तसंच, त्याने अहाबच्या सर्व प्रतिष्ठित माणसांना, मित्रांना आणि त्याच्या याजकांनाही ठार मारलं;+ त्यांतल्या एकालाही त्याने जिवंत सोडलं नाही.+
१२ मग येहू शोमरोनकडे जायला निघाला. रस्त्यात त्याला लोकर कातरणाऱ्यांचं घर लागलं. १३ तिथे येहूला यहूदाच्या राजाचे, अहज्याचे+ भाऊ भेटले. येहूने त्यांना विचारलं: “तुम्ही कोण आहात?” ते म्हणाले: “आम्ही अहज्याचे भाऊ आहोत. आणि राजाची मुलं व राजमातेची मुलं ही सगळी ठीक आहेत की नाही, ते पाहण्यासाठी आम्ही तिकडे चाललोय.” १४ त्यावर तो लगेच म्हणाला: “धरा या सगळ्यांना!” तेव्हा त्यांनी त्या ४२ जणांना पकडलं आणि लोकर कातरणाऱ्यांच्या घराजवळ असलेल्या विहिरीकडे नेऊन ठार मारलं; त्यांतल्या एकालाही येहूने जिवंत सोडलं नाही.+
१५ तिथून पुढे गेल्यावर येहूला रेखाबचा+ मुलगा यहोनादाब+ भेटला; तो येहूलाच भेटायला येत होता. त्याने त्याला नमस्कार केला.* मग येहू त्याला म्हणाला: “मी जसा मनापासून तुला विश्वासू आहे, तसा तूही मनापासून मला विश्वासू आहेस का?”
त्यावर यहोनादाब म्हणाला: “हो आहे.”
तेव्हा येहू म्हणाला: “तसं असेल, तर आपला हात पुढे कर.”
म्हणून मग यहोनादाबने आपला हात पुढे केला आणि येहूने त्याचा हात धरून त्याला आपल्या रथात घेतलं. १६ तो त्याला म्हणाला: “माझ्यासोबत चल, आणि यहोवासाठी मला किती आवेश आहे ते बघ.”*+ अशा प्रकारे ते यहोनादाबला रथात घेऊन पुढे निघाले. १७ नंतर येहू शोमरोनमध्ये आला. तिथे अहाबच्या घराण्यातला जो कोणी उरला होता त्या प्रत्येकाला त्याने ठार मारलं;+ यहोवाने एलीयाला सांगितलं होतं त्याप्रमाणे येहूने त्यांचा समूळ नाश केला.+
१८ नंतर येहूने सगळ्या लोकांना एकत्र जमवलं आणि तो त्यांना म्हणाला: “बआलची उपासना करण्यासाठी अहाबने फारसं काही केलं नाही;+ पण बआलची उपासना करण्यासाठी येहू सगळं काही करेल. १९ म्हणून आता बआलच्या सगळ्या संदेष्ट्यांना,+ त्याच्या सगळ्या भक्तांना आणि त्याच्या सगळ्या पुजाऱ्यांना+ माझ्याकडे बोलवा. त्यातला एकही गैरहजर राहायला नको. जो कोणी येणार नाही त्याला मारून टाकलं जाईल! कारण मी बआलसाठी एक मोठं बलिदान देणार आहे.” पण येहू खरंतर, बआलच्या सगळ्या भक्तांचा नाश करण्यासाठी चलाखीने वागत होता.
२० येहू पुढे म्हणाला: “बआलसाठी एक पवित्र सभा ठेवा आणि त्याची घोषणा करा.” तेव्हा त्यांनी तशी घोषणा केली. २१ त्यानंतर येहूने संपूर्ण इस्राएलमध्ये संदेश पाठवला आणि बआलचे सगळे भक्त त्याच्याकडे आले; त्यांतला एकही मागे राहिला नाही. मग ते सगळे बआलच्या मंदिरात+ गेले आणि मंदिर लोकांनी खचाखच भरलं. २२ मग येहूने वस्त्र-भांडाराच्या अधिकाऱ्याला अशी आज्ञा दिली: “बआलच्या सगळ्या भक्तांसाठी पोशाख आण.” तेव्हा त्याने त्या सगळ्यांसाठी पोशाख आणले. २३ यानंतर येहू आणि रेखाबचा मुलगा यहोनादाब+ हे बआलच्या मंदिरात गेले. मग येहू बआलच्या भक्तांना म्हणाला: “इथे सगळे बआलचेच भक्त आहेत ना, यहोवाचा एकही भक्त नाही याची पक्की खातरी करा.” २४ शेवटी, बलिदानं देण्यासाठी आणि होमार्पणं करण्यासाठी ते आत गेले. इकडे, येहूने आपल्या ८० सैनिकांना बाहेर तैनात केलं होतं. त्याने त्यांना असा आदेश दिला होता: “ज्या माणसांना मी तुमच्या हाती देणार आहे, त्यांच्यातल्या एकालाही निसटू देऊ नका; निसटला तर त्याच्या बदल्यात तुमचा जीव घेतला जाईल.”
२५ मग त्याने होमार्पण दिलं. होमार्पण देऊन झाल्या-झाल्या येहूने आपल्या सैनिकांना आणि सेनाधिकाऱ्यांना आज्ञा दिली: “आत या आणि यांना ठार मारा! एकालाही पळून जाऊ देऊ नका!”+ तेव्हा त्यांनी आत येऊन त्यांना तलवारीने मारून टाकलं आणि बाहेर फेकून दिलं. लोकांची कत्तल करत-करत ते मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत* गेले. २६ मग त्यांनी बआलच्या मंदिरातले पूजेचे स्तंभ बाहेर काढून+ ते सगळे जाळून टाकले.+ २७ त्यांनी बआलच्या मंदिरातले पूजेचे स्तंभ पाडले.+ आणि ते मंदिर जमीनदोस्त करून+ त्या ठिकाणाला सार्वजनिक शौचालय करून टाकलं; आणि आजपर्यंत ते तसंच आहे.
२८ अशा प्रकारे येहूने इस्राएलमधून बआलची उपासना पूर्णपणे नष्ट केली. २९ पण, नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलला जी पापं करायला लावली होती, ती येहूने सोडली नाहीत; त्याने बेथेल आणि दान इथली सोन्याची वासरं तशीच राहू दिली.+ ३० यहोवा त्याला म्हणाला: “अहाबच्या घराण्याच्या बाबतीत मी जे ठरवलं होतं,+ ते सगळं पूर्ण करून तू माझ्या नजरेत चांगलं तेच केलंस आणि योग्य वागलास. म्हणून तुझ्या चौथ्या पिढीपर्यंत तुझी मुलं इस्राएलच्या राजासनावर बसतील.”+ ३१ पण येहू, इस्राएलचा देव यहोवा याच्या नियमशास्त्रानुसार पूर्ण मनाने चालला नाही;+ यराबामने इस्राएलला जी पापं करायला लावली होती, ती येहूने सोडली नाहीत.+
३२ त्या काळात, यहोवा इस्राएल देशाची सीमा हळूहळू कमी करू लागला.* हजाएलने इस्राएलच्या संपूर्ण प्रदेशात ठिकठिकाणी हल्ले करायला सुरुवात केली.+ ३३ तो यार्देनपासून पूर्वेकडे असलेल्या गिलादच्या संपूर्ण प्रदेशावर, म्हणजे गाद, रऊबेन आणि मनश्शे यांचे वंशज+ राहायचे त्या संपूर्ण प्रदेशावर हल्ले करू लागला; या प्रदेशात, अर्णोनच्या खोऱ्याजवळ असलेल्या अरोएरपासून गिलाद आणि बाशानपर्यंतचा प्रदेश येतो.+
३४ येहूबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याने केलेली पराक्रमाची कामं आणि त्याने जे काही केलं ते सर्व इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे. ३५ मग येहूचा मृत्यू झाला* आणि त्याला शोमरोनात दफन करण्यात आलं. त्याच्या जागी त्याचा मुलगा यहोआहाज+ राजा बनला. ३६ येहूने एकूण २८ वर्षं शोमरोनमधून इस्राएलवर राज्य केलं.
११ अहज्याची आई अथल्या+ हिने जेव्हा पाहिलं, की आपल्या मुलाचा मृत्यू झाला आहे,+ तेव्हा तिने राजघराण्यातल्या सगळ्या वारसदारांना मारून टाकलं.+ २ पण राजाच्या ज्या मुलांना मारलं जाणार होतं, त्यांच्यापैकी अहज्याचा मुलगा यहोआश+ याला यहोशेबाने पळवून नेलं; यहोशेबा ही अहज्याची बहीण आणि यहोराम राजाची मुलगी होती. तिने यहोआशला आणि त्याच्या दाईला एका आतल्या खोलीत लपवून ठेवलं. यहोआशला अथल्यापासून लपवून ठेवल्यामुळे तो वाचला. ३ त्याला सहा वर्षं यहोवाच्या मंदिरात लपवून ठेवण्यात आलं. त्या काळात अथल्या देशावर राज्य करत होती.
४ सातव्या वर्षी, यहोयादाने शंभर कारी अंगरक्षकांवर* अधिकारी असलेल्या प्रमुखांना आणि राजमहालाच्या शंभर रक्षकांवर+ अधिकारी असलेल्या प्रमुखांना यहोवाच्या मंदिरात बोलावून घेतलं. तिथे यहोवाच्या मंदिरात त्याने त्यांच्याशी एक करार केला आणि त्यांना तो पाळायची शपथ घ्यायला लावली. मग त्याने त्यांना राजाचा मुलगा दाखवला.+ ५ त्याने त्यांना अशी सूचना दिली: “तुम्ही असं करा: तीन तुकड्यांपैकी रक्षकांची जी तुकडी शब्बाथाच्या दिवशी पहाऱ्यावर असेल, तिने राजमहालावर कडक पहारा ठेवावा;+ ६ दुसरी तुकडी ‘पाया’ नावाच्या दरवाजावर पहारा ठेवेल आणि तिसरी राजमहालाच्या रक्षकांच्या मागे असलेल्या दरवाजावर पहारा ठेवेल. तुम्ही आळीपाळीने मंदिरावर पहारा ठेवा. ७ तुमच्यापैकी ज्या दोन तुकड्या शब्बाथाच्या दिवशी पहाऱ्यावर नसतात, त्यासुद्धा राजाचं रक्षण करण्यासाठी यहोवाच्या मंदिरावर कडक पहारा ठेवतील. ८ तुम्ही शस्त्रं घेऊन चारही बाजूंनी राजाचं संरक्षण करा. कोणीही पहारा फोडून आत आला, तर त्याला ठार मारून टाका. आणि राजा जिथे कुठे जाईल तिथे त्याच्यासोबत राहा.”
९ तेव्हा, यहोयादा याजकाने सांगितलं होतं, अगदी तसंच त्या शंभर रक्षकांच्या प्रमुखांनी+ केलं. त्यांच्यापैकी प्रत्येकाने, शब्बाथाच्या दिवशी पहाऱ्यावर असलेली आपली माणसं सोबत घेतली; तसंच, जी माणसं शब्बाथाच्या दिवशी पहाऱ्यावर नव्हती त्या माणसांनाही त्यांनी सोबत घेतलं. मग ते सगळे यहोयादा याजकाकडे आले.+ १० तेव्हा याजकाने शंभर रक्षकांच्या त्या प्रमुखांना, यहोवाच्या मंदिरात असलेल्या दावीद राजाच्या गोलाकार ढाली आणि भाले दिले. ११ मग राजमहालाचे रक्षक+ हातात शस्त्रं घेऊन आपापल्या जागी उभे राहिले. ते मंदिराच्या उजव्या टोकापासून डाव्या टोकापर्यंत तैनात झाले; ते वेदीच्या+ आणि मंदिराच्या जवळ, राजाच्या सभोवती तैनात झाले. १२ नंतर यहोयादाने राजाच्या मुलाला बाहेर आणलं.+ मग त्याने त्याच्या डोक्यावर मुकुट आणि साक्षपट*+ ठेवला. अशा रितीने त्यांनी त्याला राजा बनवलं आणि त्याचा अभिषेक केला. नंतर ते टाळ्या वाजवून अशी घोषणा करू लागले: “राजाला दीर्घायुष्य लाभो!”+
१३ अथल्याने जेव्हा लोक पळत असल्याचा आणि ओरडत असल्याचा आवाज ऐकला, तेव्हा ती लगेच त्या लोकांकडे यहोवाच्या मंदिरात गेली.+ १४ तिने पाहिलं, की रिवाजाप्रमाणे राजा स्तंभाजवळ उभा आहे.+ आणि रक्षकांचे प्रमुख व कर्णे वाजवणारे+ राजासोबत आहेत. तसंच, देशातले सगळे लोकही जल्लोष करून कर्णे वाजवत आहेत. हे सर्व पाहून अथल्याने आपले कपडे फाडले आणि ती मोठ्याने ओरडून म्हणाली: “विश्वासघात! विश्वासघात!” १५ मग यहोयादा याजकाने शंभर रक्षकांच्या प्रमुखांना,+ म्हणजे सैन्यावर नेमलेल्या अधिकाऱ्यांना अशी आज्ञा दिली: “तिला पहारेकऱ्यांमधून बाहेर काढा आणि जो कोणी तिच्या मागे जाईल त्याला तलवारीने मारून टाका!” कारण, याजकाने त्यांना आधीच सांगितलं होतं, की “तिला यहोवाच्या मंदिरात ठार मारू नका.” १६ म्हणून त्यांनी तिला पकडून नेलं. आणि ज्या ठिकाणी घोडे राजमहालात+ प्रवेश करतात, त्या ठिकाणी आल्यावर त्यांनी तिला ठार मारलं.
१७ मग यहोयादाच्या मार्गदर्शनाखाली राजाने आणि प्रजेने यहोवासोबत करार केला,+ की ते यहोवाचे लोक म्हणून राहतील. तसंच, राजा आणि लोक यांच्यातही एक करार करण्यात आला.+ १८ त्यानंतर देशातल्या सगळ्या लोकांनी बआलच्या मंदिरात जाऊन त्याच्या वेदी पाडून टाकल्या,+ त्याच्या मूर्तींचा पूर्णपणे चुराडा केला+ आणि वेदींसमोरच बआलच्या पुजाऱ्याला, मत्तानला मारून टाकलं.+
मग यहोवाच्या मंदिराची देखरेख करण्यासाठी यहोयादा याजकाने माणसं नेमली.+ १९ नंतर राजाला यहोवाच्या मंदिरातून राजमहालात घेऊन जाण्यासाठी, यहोयादाने शंभर रक्षकांच्या प्रमुखांना,+ कारी अंगरक्षकांना,* राजमहालाच्या रक्षकांना+ आणि देशातल्या सगळ्या लोकांना आपल्यासोबत घेतलं. मग ते सगळे राजमहालातल्या रक्षकांच्या दरवाजातून महालात आले, आणि राजा राजासनावर जाऊन बसला.+ २० तेव्हा देशातल्या सगळ्या लोकांनी आनंदोत्सव केला. आणि अथल्याला राजमहालात तलवारीने मारून टाकण्यात आल्यामुळे शहर शांत झालं.
२१ यहोआश+ राजा बनला तेव्हा तो सात वर्षांचा होता.+
१२ येहूच्या+ शासनकाळाच्या सातव्या वर्षी यहोआश+ राजा बनला. त्याने ४० वर्षं यरुशलेममधून राज्य केलं. त्याच्या आईचं नाव सिब्या असून ती बैर-शेबा+ इथली होती. २ यहोयादा याजक जोपर्यंत मार्गदर्शन करत होता, तोपर्यंत यहोआश राजा यहोवाच्या नजरेत योग्य ते करत राहिला. ३ पण उपासनेची उच्च स्थानं*+ काढून टाकण्यात आली नव्हती. आणि लोक अजूनही उच्च स्थानांवर बलिदानं अर्पण करत होते आणि बलिदानांचं हवन करत होते.*
४ मग यहोआश याजकांना म्हणाला: “यहोवाच्या मंदिरात पवित्र अर्पण+ म्हणून येणारा सगळा पैसा गोळा करा; म्हणजे प्रत्येकाला द्यावी लागणारी ठरावीक रक्कम,+ नवस करणाऱ्या लोकांनी दिलेला पैसा, तसंच, यहोवाच्या मंदिरासाठी प्रत्येकाने स्वेच्छेने दिलेलं दान, हे सर्व गोळा करा.+ ५ याजकांनी स्वतः लोकांकडून* तो पैसा घ्यावा आणि जिथे कुठे मंदिराची मोडतोड झाली असेल,* तिथली दुरुस्ती करण्यासाठी त्याचा वापर करावा.”+
६ पण, यहोआश राजाच्या शासनकाळाच्या २३ व्या वर्षापर्यंत याजकांनी मंदिराची दुरुस्ती केली नव्हती.+ ७ म्हणून राजाने, यहोयादा+ याजकाला आणि इतर याजकांना बोलावून विचारलं: “तुम्ही मंदिराची दुरुस्ती का करत नाहीत? जर लोकांकडून घेतलेला पैसा तुम्ही मंदिराची दुरुस्ती करायला वापरत नसाल, तर आता लोकांकडून आणखी पैसा घेऊ नका.”+ ८ तेव्हा, लोकांकडून आणखी पैसे घ्यायचे नाहीत आणि मंदिराच्या दुरुस्तीची जबाबदारीही परत देऊन टाकायची असं याजकांनी मान्य केलं.
९ मग यहोयादा याजकाने एक पेटी+ घेऊन तिच्या झाकणाला एक छिद्र पाडलं. त्याने ती पेटी वेदीच्या बाजूला, म्हणजे यहोवाच्या मंदिरात येणाऱ्यांच्या उजवीकडे ठेवली. द्वारपाल म्हणून काम करणारे याजक यहोवाच्या मंदिरात येणारा सगळा पैसा त्यात टाकायचे.+ १० पेटीत भरपूर पैसे जमले, की राजाचा सचिव आणि महायाजक येऊन यहोवाच्या मंदिरात आलेला सगळा पैसा गोळा करायचे* आणि मोजायचे.+ ११ मग हा मोजलेला पैसा ते यहोवाच्या मंदिराचं दुरुस्तीचं काम पाहणाऱ्या माणसांना द्यायचे. पुढे ही माणसं तो पैसा यहोवाच्या मंदिरात काम करणाऱ्या सुतारांना व बांधकाम करणाऱ्यांना,+ १२ गवंड्यांना व दगड फोडणाऱ्यांना मजुरी म्हणून द्यायचे. तसंच, या पैशातून यहोवाच्या मंदिराची डागडुजी करण्यासाठी ते लाकडं आणि घडवलेले दगडही विकत घ्यायचे; शिवाय, दुरुस्तीचा इतर सर्व खर्च भागवण्यासाठीही ते या पैशाचा उपयोग करायचे.
१३ पण यहोवाच्या मंदिरात येणाऱ्या पैशांचा उपयोग चांदीची गंगाळं, आग विझवण्याच्या कातरी, वाट्या किंवा कर्णे+ विकत घ्यायला; किंवा मग यहोवाच्या मंदिरासाठी सोन्या-चांदीच्या वस्तू विकत घ्यायला केला जात नव्हता.+ १४ तर हा पैसा फक्त बांधकाम करणाऱ्यांना दिला जायचा आणि या पैशाने ते यहोवाच्या मंदिराची डागडुजी करायचे. १५ कामगारांना मजुरी देण्यासाठी ज्या माणसांना नेमलं होतं, त्यांच्याकडून पैशांचा हिशोब घेतला जात नव्हता; कारण ही माणसं भरवशालायक होती.+ १६ दोषार्पणं+ आणि पापार्पणं यांसाठी दिल्या जाणाऱ्या पैशाचा उपयोग मात्र यहोवाच्या मंदिराची दुरुस्ती करण्यासाठी केला जात नव्हता; त्या पैशांवर याजकांचा हक्क होता.+
१७ त्याच काळात, सीरियाचा राजा हजाएल+ याने गथ+ शहरावर हल्ला करून ते काबीज केलं. मग त्याने यरुशलेमवर हल्ला करायचं ठरवलं.+ १८ तेव्हा यहूदाचा राजा यहोआश याने आपल्या वाडवडिलांनी, म्हणजे यहोशाफाट, यहोराम आणि अहज्या या यहूदाच्या राजांनी पवित्र अर्पण म्हणून राखून ठेवलेला पैसा घेतला आणि तो सीरियाचा राजा हजाएल याला पाठवला; तसंच यहोआशने स्वतः पवित्र अर्पण म्हणून राखून ठेवलेला पैसा आणि यहोवाच्या मंदिरातल्या व राजमहालातल्या भांडारांतलं सगळं सोनंसुद्धा हजाएलला पाठवलं.+ तेव्हा हजाएलने यरुशलेमवर हल्ला करण्याचा विचार सोडून दिला आणि तो तिथून निघून गेला.
१९ यहोआशबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याने जे काही केलं ते सर्व यहूदाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे. २० पण, यहोआशच्या सेवकांनी त्याच्याविरुद्ध कट रचला,+ आणि सिल्ला या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यावर असलेलं बेथ-मिल्लो*+ इथे त्यांनी त्याला ठार मारलं. २१ त्याला त्याच्या सेवकांनी, म्हणजे शिमाथचा मुलगा योजाखार आणि शोमरचा मुलगा यहोजाबाद यांनी ठार मारलं.+ त्यांनी त्याला दावीदपुरात त्याच्या पूर्वजांच्या कबरेत दफन केलं. आणि त्याच्या जागी त्याचा मुलगा अमस्या राजा बनला.+
१३ यहूदाचा राजा अहज्या+ याच्या मुलाच्या, म्हणजे यहोआशच्या+ शासनकाळाच्या २३ व्या वर्षी, येहूचा मुलगा यहोआहाज राजा बनला.+ त्याने शोमरोन इथून १७ वर्षं इस्राएलवर राज्य केलं. २ यहोआहाजने यहोवाच्या नजरेत जे वाईट ते केलं. नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलला जे पाप करायला लावलं होतं,+ तेच तो करत राहिला; त्याने ते करायचं सोडलं नाही. ३ म्हणून इस्राएलवर यहोवाचा क्रोध+ भडकला+ आणि त्याने त्यांना सीरियाचा राजा हजाएल+ व त्याचा मुलगा बेन-हदाद+ यांच्या हाती दिलं; आणि त्यांनी बराच काळ इस्राएलवर अत्याचार केले.
४ तेव्हा, यहोआहाजने मदतीसाठी यहोवाकडे याचना केली आणि यहोवाने ती ऐकली. कारण सीरियाच्या राजाने इस्राएलवर किती अत्याचार केले होते ते देवाने पाहिलं होतं.+ ५ म्हणून सीरियाच्या तावडीतून इस्राएलची सुटका करण्यासाठी यहोवाने एक वाचवणारा पाठवला.+ त्यानंतर इस्राएली लोक आधीसारखंच आपापल्या घरांत शांतीने राहू लागले. ६ (असं असलं, तरी यराबामच्या घराण्याने इस्राएलला जे पाप करायला लावलं होतं,+ ते करण्याचं त्यांनी सोडलं नाही; ते पाप ते करतच राहिले. तसंच, शोमरोनमध्ये असलेला पूजेचा खांबही*+ त्यांनी काढून टाकला नाही.) ७ यहोआहाजकडे आता फक्त ५० घोडेस्वार, १० रथ आणि १०,००० पायदळ सैनिक उरले होते. कारण सीरियाच्या राजाने त्याच्या बाकीच्या सैन्याचा नाश केला होता;+ मळणीच्या वेळी खळ्यात* तुडवल्या गेलेल्या धुळीसारखा त्याने त्यांचा नाश केला होता.+
८ यहोआहाजबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याने केलेली पराक्रमाची कामं आणि त्याने जे काही केलं, ते सर्व इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे. ९ मग यहोआहाजचा मृत्यू झाला* आणि त्याला शोमरोनात दफन करण्यात आलं.+ त्याच्या जागी त्याचा मुलगा यहोआश राजा बनला.
१० यहूदाचा राजा यहोआश याच्या शासनकाळाच्या ३७ व्या वर्षी यहोआहाजचा मुलगा यहोआश+ राजा बनला; त्याने शोमरोनमधून १६ वर्षं इस्राएलवर राज्य केलं. ११ यहोवाच्या नजरेत जे वाईट, ते तो करत राहिला. नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलला जी पापं करायला लावली होती,+ ती सगळी तो करत राहिला; त्याने ती सोडली नाहीत.
१२ यहोआशबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याने केलेली पराक्रमाची कामं आणि त्याने जे काही केलं; तसंच, यहूदाचा राजा अमस्या याच्याशी तो कसा लढला+ ते सर्व इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे. १३ मग यहोआशचा मृत्यू झाला* आणि त्याला शोमरोनात इस्राएलच्या राजांच्या कबरेत दफन करण्यात आलं.+ त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा यराबाम*+ राजासनावर बसला.
१४ एकदा अलीशा+ आजारी पडला आणि पुढे त्याच आजाराने त्याचा मृत्यू झाला. तो आजारी असताना इस्राएलचा राजा यहोआश त्याला भेटायला आला होता. तो अलीशासमोर रडून म्हणू लागला: “माझ्या पित्या, माझ्या पित्या! पाहा, इस्राएलचा रथ आणि त्याचे घोडेस्वार!”+ १५ तेव्हा अलीशा त्याला म्हणाला: “धनुष्य आणि बाण घे.” म्हणून त्याने धनुष्य आणि काही बाण घेतले. १६ मग तो इस्राएलच्या राजाला म्हणाला: “धनुष्यावर आपला हात ठेव.” तेव्हा राजाने धनुष्यावर हात ठेवला. नंतर अलीशाने राजाच्या हातांवर आपले हात ठेवले. १७ अलीशा पुढे म्हणाला: “पूर्वेकडची खिडकी उघड!” तेव्हा त्याने ती उघडली. मग अलीशा म्हणाला: “बाण सोड!” तेव्हा त्याने बाण सोडला. अलीशा मग म्हणाला: “हा सीरियावर विजय मिळवून देणारा, यहोवाचा विजयाचा बाण! तू अफेक+ इथे सीरियाचं नामोनिशाण मिटेपर्यंत त्याचा नाश करशील.”*
१८ अलीशा पुढे म्हणाला: “बाण घे.” तेव्हा इस्राएलच्या राजाने हातात काही बाण घेतले. मग अलीशा म्हणाला: “जमिनीवर बाण मार.” तेव्हा राजाने तीन वेळा जमिनीवर बाण मारले आणि तो थांबला. १९ त्यावर खऱ्या देवाच्या माणसाला खूप राग आला आणि तो म्हणाला: “तू पाच-सहा वेळा तरी जमिनीवर बाण मारायला हवे होते! तसं केलं असतं, तर सीरियाचं नामोनिशाण मिटेपर्यंत तू त्याचा नाश केला असता. पण आता तू फक्त तीन वेळा सीरियाला हरवशील.”+
२० मग अलीशाचा मृत्यू झाला आणि त्याला दफन करण्यात आलं. त्यानंतर, दर वर्षाच्या सुरुवातीला* इस्राएल देशात लूटमार करणाऱ्या मवाबी टोळ्या यायच्या.+ २१ एकदा, काही लोक एका मेलेल्या माणसाला दफन करत असताना त्यांना लूटमार करणारी एक टोळी दिसली. टोळी पाहताच त्यांनी त्याला अलीशाच्या कबरेत फेकलं आणि ते तिथून पळून गेले. अलीशाच्या हाडांचा स्पर्श होताच, तो मेलेला माणूस जिवंत झाला+ आणि उठून उभा राहिला.
२२ यहोआहाज राज्य करत होता, त्या संपूर्ण काळात सीरियाचा राजा हजाएल+ याने इस्राएली लोकांवर अत्याचार केले.+ २३ पण यहोवाने त्यांच्यावर कृपा केली आणि त्यांना दया दाखवली;+ अब्राहाम,+ इसहाक+ आणि याकोब यांच्याशी केलेल्या करारामुळे+ त्याला त्यांची काळजी वाटली. त्याला त्यांचा नाश करायची इच्छा नव्हती. म्हणून आजपर्यंत त्याने त्यांना आपल्यासमोरून घालवून दिलं नाही. २४ सीरियाच्या राजाचा, हजाएलचा मृत्यू झाल्यावर त्याचा मुलगा बेन-हदाद त्याच्या जागी राजा बनला. २५ तेव्हा यहोआहाजचा मुलगा यहोआश याने हजाएलच्या मुलाकडून, बेन-हदादकडून आपली सगळी शहरं परत घेतली. ही शहरं बेन-हदादने यहोआशच्या वडिलांशी लढाई करून, म्हणजे यहोआहाजशी लढाई करून घेतली होती. यहोआशने त्याला तीन वेळा हरवून+ इस्राएलची शहरं त्याच्याकडून परत मिळवली.
१४ इस्राएलचा राजा यहोआहाज+ याच्या मुलाच्या, म्हणजे यहोआशच्या शासनकाळाच्या दुसऱ्या वर्षी, यहूदाचा राजा यहोआश याचा मुलगा अमस्या हा राजा बनला. २ अमस्या राजा बनला तेव्हा तो २५ वर्षांचा होता. त्याने यरुशलेममधून २९ वर्षं राज्य केलं. त्याच्या आईचं नाव यहोअद्दीन असून ती यरुशलेमची राहणारी होती.+ ३ अमस्या यहोवाच्या नजरेत जे योग्य ते करत राहिला; मात्र आपला पूर्वज दावीद याच्याइतकं नाही.+ त्याचे वडील यहोआश यांच्यासारखंच त्याने सगळं काही केलं.+ ४ पण उपासनेची उच्च स्थानं* काढून टाकण्यात आली नव्हती.+ आणि लोक अजूनही उच्च स्थानांवर बलिदानं अर्पण करत होते व बलिदानांचं हवन करत होते.*+ ५ अमस्याने राज्यावरची आपली पकड मजबूत करताच आपल्या वडिलांचा खून करणाऱ्या आपल्या सेवकांना ठार मारलं.+ ६ पण त्या सेवकांच्या मुलांना त्याने ठार मारलं नाही. कारण, यहोवाने मोशेच्या नियमशास्त्रात अशी आज्ञा दिली होती: “मुलांच्या पापासाठी वडिलांना, किंवा वडिलांच्या पापासाठी मुलांना ठार मारलं जाऊ नये. तर प्रत्येकाला स्वतःच्याच पापासाठी ठार मारलं जावं.”+ ७ मग अमस्याने क्षार खोऱ्यात+ अदोमच्या+ १०,००० माणसांना ठार मारलं. त्याने युद्ध करून सेला शहर काबीज केलं+ आणि त्याला यकथेल असं नाव दिलं; आजपर्यंत ते याच नावाने ओळखलं जातं.
८ मग अमस्याने इस्राएलचा राजा येहू याच्या नातवाला, म्हणजे यहोआहाजचा मुलगा यहोआश याला दूतांच्या हातून असा संदेश पाठवला: “चल, युद्ध करायला ये! आपण समोरासमोर लढू.”+ ९ त्यावर इस्राएलचा राजा यहोआश याने यहूदाचा राजा अमस्या याला असं उत्तर दिलं: “लबानोनच्या काटेरी झुडपाने लबानोनच्या देवदार वृक्षाला एकदा असा निरोप पाठवला: ‘तुझी मुलगी माझ्या मुलाला बायको म्हणून दे.’ पण लबानोनच्या एका जंगली प्राण्याने तिथून जाताना, त्या काटेरी झुडपाला आपल्या पायांखाली तुडवलं. १० हे खरंय, की तू अदोमला हरवलंस,+ आणि यामुळे तुझं मन गर्वाने फुगलंय. तर आता आपल्या घरातच बसून विजयाचा आनंद घे. संकटाला आमंत्रण का देतोस? स्वतःसोबत यहूदालाही संकटात का पाडतोस?” ११ पण अमस्याने त्याचं ऐकलं नाही.+
म्हणून इस्राएलचा राजा यहोआश यहूदाच्या राजाशी, अमस्याशी युद्ध करायला गेला. आणि ते यहूदामधल्या+ बेथ-शेमेश+ या ठिकाणी एकमेकांशी लढले. १२ युद्धात इस्राएलने यहूदाला हरवलं, आणि यहूदाचे सगळे सैनिक घरी पळून गेले. १३ मग इस्राएलचा राजा यहोआश याने बेथ-शेमेश इथे यहूदाचा राजा अमस्या याला बंदी बनवलं (अमस्या हा अहज्याचा नातू आणि यहोआशचा मुलगा होता). यहोआशने अमस्याला बंदी बनवून यरुशलेमला आणलं. तिथे त्याने यरुशलेमच्या भिंतीचा ४०० हात* लांब भाग, म्हणजे एफ्राईमच्या दरवाजापासून+ कोपऱ्याच्या दरवाजापर्यंतचा+ भाग तोडून टाकला. १४ मग त्याने यहोवाच्या मंदिरात आणि राजमहालाच्या भांडारांत असलेलं सगळं सोनं, चांदी व सगळ्या वस्तू लुटल्या; आणि लोकांना बंदी बनवून तो शोमरोनला परत गेला.
१५ यहोआशबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याने केलेली पराक्रमाची कामं आणि तो यहूदाचा राजा अमस्या याच्याशी कसा लढला; तसंच, त्याने जे काही केलं ते सर्व इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे. १६ मग यहोआशचा मृत्यू झाला* आणि त्याला शोमरोनात इस्राएलच्या राजांच्या कबरेत दफन करण्यात आलं.+ त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा यराबाम*+ त्याच्या जागी राजा बनला.
१७ यहूदाचा राजा यहोआश याचा मुलगा अमस्या+ हा इस्राएलचा राजा यहोआहाज याच्या मुलाच्या, म्हणजे यहोआशच्या+ मृत्यूनंतर आणखी १५ वर्षं जगला.+ १८ अमस्याबद्दलची बाकीची माहिती, यहूदाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आली आहे. १९ पुढे अमस्याविरुद्ध यरुशलेममध्ये कट रचण्यात आला;+ म्हणून तो लाखीशला पळून गेला. पण त्याच्या शत्रूंनी लाखीशला त्याच्यामागे माणसं पाठवली आणि त्याला ठार मारलं. २० मग, त्यांनी त्याचा मृतदेह घोड्यावर टाकून यरुशलेममध्ये परत आणला; आणि दावीदपुरात त्याच्या पूर्वजांच्या कबरेत त्याला दफन केलं.+ २१ त्यानंतर यहूदाच्या सर्व लोकांनी अमस्याचा मुलगा अजऱ्या*+ याला त्याच्या वडिलांच्या जागी राजा बनवलं.+ त्या वेळी अजऱ्या १६ वर्षांचा होता.+ २२ अमस्या राजाचा मृत्यू झाल्यानंतर* अजऱ्याने एलाथ+ शहर पुन्हा बांधलं आणि ते यहूदाच्या सत्तेखाली आणलं.+
२३ यहूदाच्या राजाचा मुलगा, म्हणजे यहोआशचा मुलगा अमस्या याच्या शासनकाळाच्या १५ व्या वर्षी, इस्राएलचा राजा यहोआश याचा मुलगा यराबाम+ हा शोमरोनात राजा बनला; त्याने ४१ वर्षं राज्य केलं. २४ यहोवाच्या नजरेत जे वाईट ते तो करत राहिला. नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलला जी पापं करायला लावली होती,+ ती त्याने सोडली नाहीत. २५ त्याने लबो-हमाथपासून*+ थेट अराबाच्या+ समुद्रापर्यंतचा* इस्राएलचा संपूर्ण प्रदेश परत मिळवला. इस्राएलचा देव यहोवा याने आपल्या सेवकाद्वारे, म्हणजे योना संदेष्ट्याद्वारे जे सांगितलं होतं त्याप्रमाणे त्याने हे केलं; योना+ हा अमित्तय याचा मुलगा असून गथ-हेफेर+ इथला राहणारा होता. २६ यहोवाने पाहिलं होतं, की इस्राएलला किती दुःख सहन करावं लागत आहे.+ शिवाय, इस्राएलला मदत करण्यासाठी कोणीही उरला नव्हता; अगदी लाचार किंवा दुर्बळ माणूसही उरला नव्हता. २७ पण यहोवाने अशी शपथ घेतली होती, की तो पृथ्वीवरून इस्राएलचं नाव कधीही मिटवून टाकणार नाही.+ म्हणून त्याने यहोआशचा मुलगा यराबाम याचा उपयोग करून इस्राएलला वाचवलं.+
२८ यराबामबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याने केलेली पराक्रमाची कामं, तो कसा लढला आणि त्याने कशा प्रकारे दिमिष्क+ आणि हमाथ+ हे यहूदा व इस्राएलच्या सत्तेखाली परत आणलं; तसंच, त्याने जे काही केलं ते सर्व इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे. २९ मग यराबामचा मृत्यू झाला* आणि त्याला इस्राएलच्या राजांच्या कबरेत दफन करण्यात आलं. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जखऱ्या+ त्याच्या जागी राजा बनला.
१५ इस्राएलचा राजा यराबाम* याच्या शासनकाळाच्या २७ व्या वर्षी अजऱ्या*+ राजा बनला;+ तो यहूदाच्या राजाचा, अमस्याचा+ मुलगा होता. २ अजऱ्या राजा बनला त्या वेळी तो १६ वर्षांचा होता. त्याने ५२ वर्षं यरुशलेममधून राज्य केलं. त्याच्या आईचं नाव यखल्या असून ती यरुशलेमची राहणारी होती. ३ आपले वडील अमस्या यांच्याप्रमाणेच अजऱ्यासुद्धा यहोवाच्या नजरेत जे योग्य ते करत राहिला.+ ४ पण उपासनेची उच्च स्थानं* काढून टाकण्यात आली नव्हती.+ आणि लोक अजूनही उच्च स्थानांवर बलिदानं अर्पण करत होते व बलिदानांचं हवन करत होते.*+ ५ यहोवाने अजऱ्या राजाला कुष्ठरोगाने* पीडित केलं, आणि तो मरेपर्यंत कुष्ठरोगीच राहिला.+ कुष्ठरोगामुळे राजा वेगळ्या घरात राहायचा;+ या काळात, राजाचा मुलगा योथाम+ हा राजमहालाचा कारभार पाहायचा आणि देशातल्या लोकांचा न्यायनिवाडा करायचा.+ ६ अजऱ्याबद्दलची+ बाकीची माहिती, म्हणजे त्याने जे काही केलं ते सर्व यहूदाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे. ७ मग, अजऱ्याचा मृत्यू झाला*+ आणि त्याला दावीदपुरात आपल्या पूर्वजांच्या कबरेत दफन करण्यात आलं. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा योथाम त्याच्या जागी राजा बनला.
८ यहूदाचा राजा अजऱ्या+ याच्या शासनकाळाच्या ३८ व्या वर्षी यराबामचा मुलगा जखऱ्या+ इस्राएलचा राजा बनला. त्याने शोमरोनमधून सहा महिने इस्राएलवर राज्य केलं. ९ आपल्या पूर्वजांप्रमाणेच जखऱ्यासुद्धा यहोवाच्या नजरेत जे वाईट ते करत राहिला. नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलला जी पापं करायला लावली होती,+ ती करण्याचं जखऱ्याने सोडलं नाही. १० मग याबेशचा मुलगा शल्लूम याने जखऱ्याविरुद्ध कट रचून त्याला इब्लाम+ इथे ठार मारलं.+ त्याला ठार मारल्यावर शल्लूम त्याच्या जागी राजा बनला. ११ जखऱ्याबद्दलची बाकीची माहिती इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आली आहे. १२ अशा प्रकारे, यहोवाने येहूला सांगितलं होतं ते पूर्ण झालं. तो म्हणाला होता: “तुझ्या चौथ्या पिढीपर्यंत तुझी मुलं+ इस्राएलच्या राजासनावर बसतील.”+ आणि अगदी तसंच घडलं.
१३ यहूदाचा राजा उज्जीया+ याच्या शासनकाळाच्या ३९ व्या वर्षी याबेशचा मुलगा शल्लूम राजा बनला. त्याने एक महिना शोमरोनमधून राज्य केलं. १४ मग गादीचा मुलगा मनहेम हा तिरसा+ इथून शोमरोनला आला. आणि तिथे त्याने याबेशचा मुलगा शल्लूम+ याला ठार मारलं. शल्लूमला ठार मारल्यावर मनहेम त्याच्या जागी राजा बनला. १५ शल्लूमबद्दलची बाकीची माहिती आणि त्याने रचलेल्या कटाबद्दल, इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे. १६ त्या वेळी, मनहेम हा तिरसातून निघून तिफसाह या ठिकाणी आला. पण तिथल्या लोकांनी त्याच्यासाठी तिफसाहचे दरवाजे उघडले नाहीत. म्हणून त्याने तिथल्या आणि आसपासच्या प्रदेशांतल्या लोकांवर हल्ला केला आणि त्यांना मारून टाकलं; तिथे राहणाऱ्या गरोदर स्त्रियांना त्याने चिरून टाकलं. अशा रितीने त्याने तिफसाहचा नाश केला.
१७ यहूदाचा राजा अजऱ्या याच्या शासनकाळाच्या ३९ व्या वर्षी गादीचा मुलगा मनहेम इस्राएलचा राजा बनला; त्याने दहा वर्षं शोमरोनमधून राज्य केलं. १८ यहोवाच्या नजरेत जे वाईट ते तो करत राहिला. नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलला जी पापं करायला लावली होती,+ ती करण्याचं मनहेमने आयुष्यभर सोडलं नाही. १९ अश्शूरचा राजा पूल+ इस्राएलवर हल्ला करायला आला, तेव्हा मनहेमने त्याला १,००० तालान्त* चांदी दिली; राज्यावरची आपली पकड मजबूत करण्यासाठी अश्शूरच्या राजाने आपल्याला मदत करावी, या उद्देशाने मनहेमने असं केलं.+ २० अश्शूरच्या राजाला चांदी देण्यासाठी मनहेमने इस्राएलच्या प्रत्येक श्रीमंत आणि प्रतिष्ठित माणसाकडून ५० शेकेल* चांदी जबरदस्ती काढून घेतली.+ तेव्हा अश्शूरच्या राजाने देशावर हल्ला करण्याचा आपला विचार सोडला आणि तो परत निघून गेला. २१ मनहेमबद्दलची+ बाकीची माहिती, म्हणजे त्याने जे काही केलं ते सर्व इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे. २२ मग मनहेमचा मृत्यू झाला* आणि त्याच्या जागी त्याचा मुलगा पकयाह राजा बनला.
२३ यहूदाचा राजा अजऱ्या याच्या शासनकाळाच्या ५० व्या वर्षी मनहेमचा मुलगा पकयाह इस्राएलचा राजा बनला. त्याने शोमरोनमधून दोन वर्षं इस्राएलवर राज्य केलं. २४ यहोवाच्या नजरेत जे वाईट ते तो करत राहिला. नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलला जी पापं करायला लावली होती,+ ती पकयाहने सोडली नाहीत. २५ मग पकयाहच्या+ सेनाधिकाऱ्याने, म्हणजे रमाल्याहचा मुलगा पेकह याने त्याच्याविरुद्ध कट रचून त्याला ठार मारलं. त्याने त्याला अर्गोब आणि अरये यांच्यासोबत शोमरोनातल्या राजमहालाच्या मनोऱ्यात ठार मारलं; गिलादची ५० माणसंही त्याच्यासोबत होती. पकयाहला मारून टाकल्यानंतर पेकह त्याच्या जागी राजा बनला. २६ पकयाहबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याने जे काही केलं ते सर्व इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे.
२७ यहूदाचा राजा अजऱ्या याच्या शासनकाळाच्या ५२ व्या वर्षी रमाल्याहचा मुलगा पेकह+ इस्राएलचा राजा बनला. त्याने शोमरोनमधून २० वर्षं इस्राएलवर राज्य केलं. २८ यहोवाच्या नजरेत जे वाईट ते तो करत राहिला. नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलला जी पापं करायला लावली होती,+ ती पेकहने सोडली नाहीत. २९ इस्राएलचा राजा पेकह याच्या शासनकाळात, अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर+ याने ईयोन, आबेल-बेथ-माका,+ यानोहा, केदेश,+ हासोर व गिलाद+ आणि गालील, म्हणजे नफतालीच्या+ सगळ्या प्रदेशावर हल्ला करून ते काबीज केलं. तसंच, त्याने तिथल्या लोकांना बंदी बनवून अश्शूरला नेलं.+ ३० मग एलाहचा मुलगा होशे+ याने रमाल्याहचा मुलगा पेकह याच्याविरुद्ध कट रचला; त्याच्यावर हल्ला करून त्याने त्याला ठार मारलं, आणि तो पेकहच्या जागी राजा बनला. उज्जीयाचा मुलगा योथाम+ याच्या शासनकाळाच्या २० व्या वर्षी होशे राजा बनला. ३१ पेकहबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याने जे काही केलं ते सर्व इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे.
३२ इस्राएलचा राजा रमाल्याह याच्या मुलाच्या, म्हणजे पेकहच्या शासनकाळाच्या दुसऱ्या वर्षी, यहूदाचा राजा उज्जीया+ याचा मुलगा योथाम+ हा राजा बनला. ३३ योथाम राजा बनला तेव्हा तो २५ वर्षांचा होता. त्याने १६ वर्षं यरुशलेममधून राज्य केलं. त्याच्या आईचं नाव यरूशा असून ती सादोकची मुलगी होती.+ ३४ योथाम हा आपले वडील उज्जीया यांच्याप्रमाणेच यहोवाच्या नजरेत जे योग्य ते करत राहिला.+ ३५ त्यानेच यहोवाच्या मंदिराचा वरचा दरवाजा बनवून घेतला होता.+ पण उपासनेची उच्च स्थानं काढून टाकण्यात आली नव्हती.+ आणि लोक अजूनही उच्च स्थानांवर बलिदानं अर्पण करत होते व बलिदानांचं हवन करत होते. ३६ योथामबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याने जे काही केलं ते सर्व यहूदाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे. ३७ त्या काळात यहोवा, यहूदावर हल्ले करण्यासाठी+ रमाल्याहचा मुलगा पेकह+ आणि सीरियाचा राजा रसीन यांना पाठवू लागला. ३८ मग योथामचा मृत्यू झाला* आणि त्याला आपला पूर्वज दावीद याच्या शहरात, म्हणजे दावीदपुरात आपल्या पूर्वजांच्या कबरेत दफन करण्यात आलं. त्यानंतर त्याचा मुलगा आहाज त्याच्या जागी राजा बनला.
१६ रमाल्याहचा मुलगा पेकह याच्या शासनकाळाच्या १७ व्या वर्षी, यहूदाचा राजा योथाम याचा मुलगा आहाज+ हा राजा बनला. २ तो राजा बनला तेव्हा २० वर्षांचा होता. त्याने १६ वर्षं यरुशलेममधून राज्य केलं. आपला पूर्वज दावीद याने जसं आपला देव यहोवा याच्या नजरेत योग्य ते केलं, तसं आहाजने केलं नाही.+ ३ तो इस्राएलच्या राजांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालला.+ इतकंच नाही, तर त्याने आपल्या स्वतःच्या मुलाचाही अग्नीत होम केला.*+ यहोवाने ज्या राष्ट्रांना इस्राएली लोकांमधून घालवून दिलं होतं, त्यांच्या घृणास्पद चालीरितींचं त्याने अनुसरण केलं.+ ४ याशिवाय, तो उच्च स्थानांवर,*+ टेकड्यांवर आणि प्रत्येक हिरव्यागार वृक्षाखाली बलिदानं अर्पण करत राहिला व बलिदानांचं हवन करत राहिला.*+
५ या काळात, इस्राएलचा राजा रमाल्याह याचा मुलगा पेकह आणि सीरियाचा राजा रसीन हे आहाजशी युद्ध करायला आले. त्यांनी येऊन यरुशलेमला वेढा घातला,+ पण ते त्या शहरावर कब्जा करू शकले नाहीत. ६ त्या वेळी, सीरियाचा राजा रसीन याने एलाथ+ शहर जिंकून ते परत अदोमच्या सत्तेखाली आणलं. त्याने एलाथमध्ये राहणाऱ्या यहुदी लोकांना* तिथून हाकलून लावलं. मग अदोमी लोक तिथे येऊन राहू लागले; आणि आजपर्यंत ते तिथेच राहत आहेत. ७ तेव्हा आहाजने अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर+ याला दूतांच्या हातून असा संदेश पाठवला: “मी तर तुमचा सेवक, तुमचा मुलगाच आहे. सीरियाचा राजा आणि इस्राएलचा राजा माझ्याशी युद्ध करायला आले आहेत. तर आता, त्यांच्या हातून मला वाचवायला या.” ८ आहाजने मग यहोवाच्या मंदिरात आणि राजमहालाच्या भांडारांत असलेलं सोनं-चांदी घेतलं, आणि ते अश्शूरच्या राजाला भेट म्हणून पाठवलं.+ ९ तेव्हा अश्शूरच्या राजाने त्याची विनंती मान्य केली. त्याने दिमिष्कला जाऊन ते शहर काबीज केलं व रसीन राजाला ठार मारलं;+ आणि तिथल्या लोकांना बंदी बनवून कीर+ या ठिकाणी नेलं.
१० मग आहाज राजा अश्शूरच्या राजाला, म्हणजे तिग्लथ-पिलेसर याला भेटायला दिमिष्कला गेला. आहाजने तिथली वेदी पाहिली, तेव्हा त्याने त्या वेदीचा आकार आणि तिची घडण यांचा एक नमुना उरीया याजकाला पाठवला.+ ११ आहाज राजाने दिमिष्कमधून दिलेल्या सर्व सूचनांप्रमाणे उरीया+ याजकाने एक वेदी बांधली.+ राजा दिमिष्कहून परत यायच्या आत त्याने ती वेदी बांधून पूर्ण केली. १२ राजाने दिमिष्कवरून परत आल्यावर ती वेदी पाहिली, तेव्हा त्याने जाऊन त्या वेदीवर अर्पणं दिली.+ १३ त्या वेदीवर त्याने होमार्पणं आणि अन्नार्पणं जाळली; तसंच, त्यावर पेयार्पणं ओतली आणि शांती-अर्पणांचं रक्तही शिंपडलं. १४ मग, त्याने यहोवाच्या मंदिराच्या व आपण बनवलेल्या वेदीच्या मधे असलेली तांब्याची वेदी,+ म्हणजे यहोवापुढे मंदिरासमोर असलेली तांब्याची वेदी तिच्या जागेवरून काढली; आणि आपण बनवलेल्या वेदीच्या उत्तरेकडे ती ठेवली. १५ नंतर आहाज राजाने उरीया+ याजकाला अशी आज्ञा दिली: “या भव्य वेदीवर+ सकाळचं होमार्पण आणि संध्याकाळचं अन्नार्पण जाळ.+ तसंच, राजाने दिलेलं होमार्पण आणि अन्नार्पणही त्यावर जाळ; आणि लोकांनी दिलेली होमार्पणं, अन्नार्पणं आणि पेयार्पणंसुद्धा या वेदीवर जाळ. याशिवाय, या वेदीवर तू सर्व होमार्पणांचं आणि इतर सर्व बलिदानांचं रक्त शिंपड. तांब्याच्या वेदीचं मात्र काय करायचं ते मी नंतर ठरवीन.” १६ तेव्हा आहाज राजाने सांगितल्याप्रमाणे उरीया याजकाने सगळं काही केलं.+
१७ याशिवाय, आहाज राजाने मंदिरात असलेल्या तांब्याच्या गाड्यांचे+ पत्रे काढून त्यांचे तुकडे केले आणि त्यांवर असलेली गंगाळं+ काढून टाकली. तसंच, त्याने तांब्याच्या बैलांवर आधारलेला मोठा गंगाळ-सागरही+ काढून तो खाली दगडी फरशीवर ठेवला.+ १८ आणि मंदिरात शब्बाथासाठी बांधलेली छताची जागा व मंदिरात जाण्याचं राजाचं प्रवेशद्वार आहाजने यहोवाच्या मंदिरापासून दुसरीकडे हलवलं; त्याने हे सगळं अश्शूरच्या राजाच्या भीतीमुळे केलं.
१९ आहाजबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याने जे काही केलं ते सर्व यहूदाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे.+ २० मग आहाजचा मृत्यू झाला* आणि त्याला दावीदपुरात आपल्या पूर्वजांच्या कबरेत दफन करण्यात आलं; आणि त्याच्या जागी त्याचा मुलगा हिज्कीया*+ राजा बनला.
१७ यहूदाचा राजा आहाज याच्या शासनकाळाच्या १२ व्या वर्षी एलाहचा मुलगा होशे+ इस्राएलचा राजा बनला. त्याने शोमरोन इथून नऊ वर्षं इस्राएलवर राज्य केलं. २ यहोवाच्या नजरेत जे वाईट ते तो करत राहिला; पण त्याच्याआधी होऊन गेलेल्या इस्राएलच्या इतर राजांइतकं वाईट त्याने केलं नाही. ३ अश्शूरचा राजा शल्मनेसर याने होशेवर हल्ला केला,+ तेव्हा होशे त्याच्या अधीन झाला आणि त्याला नजराणा* देऊ लागला.+ ४ पुढे अश्शूरच्या राजाला कळलं, की होशे आपल्याविरुद्ध कट रचत आहे. कारण, होशेने इजिप्तचा राजा सो याच्याकडे काही दूतांना पाठवलं होतं.+ तसंच, पूर्वी तो अश्शूरच्या राजाला जो नजराणा द्यायचा, तो द्यायचाही त्याने बंद केला होता. म्हणून अश्शूरच्या राजाने त्याला पकडलं आणि बेड्या घालून तुरुंगात टाकलं.
५ अश्शूरच्या राजाने संपूर्ण इस्राएल देशावर हल्ला केला. आणि शोमरोनला येऊन त्याने त्या शहराला तीन वर्षं वेढा घातला. ६ होशे राजाच्या शासनकाळाच्या नवव्या वर्षी, अश्शूरच्या राजाने शोमरोन शहर काबीज केलं.+ मग त्याने इस्राएलच्या लोकांना बंदी बनवून अश्शूरला नेलं.+ त्याने त्यांना मेदच्या शहरांमध्ये,+ तसंच हलह शहरात व गोजान+ नदीजवळ असलेल्या हाबोर शहरात वसवलं.
७ हे सर्व यासाठी घडलं, कारण ज्या यहोवा देवाने इस्राएलच्या लोकांना इजिप्तच्या राजाच्या, म्हणजे फारोच्या हातून सोडवलं होतं आणि इजिप्त देशातून बाहेर आणलं होतं,+ त्या आपल्या देवाविरुद्ध त्यांनी पाप केलं. त्यांनी इतर देवांची उपासना केली;+ ८ तसंच, यहोवाने ज्या राष्ट्रांना इस्राएली लोकांपुढून हाकलून लावलं होतं, त्या राष्ट्रांच्या चालीरितींचं त्यांनी अनुसरण केलं; आणि इस्राएलच्या राजांनी लावून दिलेल्या रितीरिवाजांप्रमाणे ते चालत राहिले.
९ इस्राएली लोक, आपला देव यहोवा याच्या नजरेत योग्य नसलेल्या गोष्टींच्या मागे लागले. त्यांनी आपल्या सर्व शहरांमध्ये, म्हणजे पहारेकऱ्यांच्या बुरुजांपासून तटबंदीच्या शहरांपर्यंत सगळीकडे,* उपासनेची उच्च स्थानं* बांधली.+ १० त्यांनी आपल्यासाठी प्रत्येक उंच टेकडीवर व प्रत्येक हिरव्यागार वृक्षाखाली+ पूजेचे स्तंभ व पूजेचे खांब* उभे केले.+ ११ आणि यहोवाने ज्या राष्ट्रांना इस्राएली लोकांपुढून हाकलून लावलं होतं,+ त्या राष्ट्रांप्रमाणेच ते उच्च स्थानांवर बलिदानांचं हवन करत राहिले. यहोवाला क्रोध येईल अशा सर्व वाईट गोष्टी त्यांनी केल्या.
१२ यहोवाने ज्या घृणास्पद मूर्तींची* उपासना करण्याविषयी त्यांना सांगितलं होतं, की “असं करू नका!”+ तेच ते करत राहिले.+ १३ आपल्या सर्व संदेष्ट्यांद्वारे आणि दृष्टान्त पाहणाऱ्या प्रत्येकाद्वारे यहोवा त्यांना असा इशारा देत राहिला:+ “आपले वाईट मार्ग सोडून द्या!+ आणि मी माझ्या संदेष्ट्यांद्वारे तुमच्या पूर्वजांना जे नियमशास्त्र दिलं होतं, त्यात सांगितलेल्या माझ्या आज्ञा आणि कायदे पाळा.” १४ पण त्यांनी त्याचं ऐकलं नाही. आणि आपल्या पूर्वजांसारखंच ते हट्टीपणे वागत राहिले; त्यांच्या पूर्वजांनीही आपला देव यहोवा याच्यावर विश्वास असल्याचं दाखवलं नाही.+ १५ इस्राएली लोकांनी वारंवार देवाचे नियम मोडले आणि त्याने त्यांच्या पूर्वजांसोबत जो करार केला होता, तोसुद्धा त्यांनी पाळला नाही.+ तसंच, त्यांना इशारा देण्यासाठी देवाने ज्या स्मरण-सूचना* दिल्या होत्या, त्यांकडेही त्यांनी लक्ष दिलं नाही.+ आणि ज्या आजूबाजूच्या राष्ट्रांबद्दल यहोवाने इस्राएली लोकांना असं बजावलं होतं, की त्यांचं अनुकरण करू नका, नेमकं तेच त्यांनी केलं;+ ते निरुपयोगी मूर्तींच्या मागे लागले+ आणि त्यांच्यासारखेच झाले.+
१६ त्यांनी आपला देव यहोवा याच्या सर्व आज्ञा पाळायचं सोडून दिलं. त्यांनी पूजेचा खांब* बनवला+ व धातूपासून वासरांच्या दोन मूर्ती बनवल्या.+ आणि ते आकाशातल्या सैन्याच्या+ व बआल दैवताच्या पाया पडले.+ १७ याशिवाय, त्यांनी आपल्या मुलामुलींचा अग्नीत होम केला.*+ तसंच, ते शकुन व भविष्य पाहायचे.+ अशा प्रकारे, यहोवाच्या नजरेत जे वाईट ते करण्याच्या ते आहारी गेले.* हे सर्व करून त्यांनी त्याला क्रोध आणला.
१८ म्हणून इस्राएलवर यहोवाचा क्रोध भडकला; आणि त्याने त्यांना आपल्यापुढून घालवून दिलं.+ यहूदाचा वंश सोडून त्याने दुसऱ्या कोणत्याही वंशाला देशात राहू दिलं नाही.
१९ पण यहूदानेही आपला देव यहोवा याच्या आज्ञा पाळल्या नाहीत;+ इस्राएलच्या लोकांनी जे रितीरिवाज पाळले होते, तेच यहूदाच्या लोकांनीसुद्धा पाळले.+ २० म्हणून यहोवाने इस्राएलच्या सर्व वंशजांना नाकारलं व अपमानित केलं; तो त्यांना आपल्यापुढून घालवून देईपर्यंत लुटारूंच्या हाती देत राहिला. २१ त्याने इस्राएलला दावीदच्या घराण्यापासून वेगळं केलं. मग लोकांनी नबाटचा मुलगा यराबाम याला राजा बनवलं.+ पण यराबामने इस्राएलला यहोवाच्या उपासनेपासून दूर नेऊन खूप मोठं पाप केलं. २२ आणि यराबामने जी पापं केली होती, ती सर्व पापं इस्राएलचे लोक करत राहिले.+ ती करण्याचं त्यांनी सोडलं नाही; २३ यहोवाने आपल्या सर्व संदेष्ट्यांद्वारे सांगितलं होतं, त्याप्रमाणे त्याने इस्राएलला आपल्यापुढून घालवून देईपर्यंत त्यांनी ती पापं करण्याचं सोडलं नाही.+ म्हणून इस्राएलच्या लोकांना अश्शूर देशात बंदी बनवून नेण्यात आलं,+ आणि आजपर्यंत ते तिथेच आहेत.
२४ मग अश्शूरच्या राजाने बाबेल, कूथा, अव्वा, हमाथ आणि सफरवाईम+ इथे राहणाऱ्या लोकांना आणलं; आणि त्यांना इस्राएली लोकांच्या जागी शोमरोनच्या शहरांत वसवलं. त्या लोकांनी शोमरोनचा ताबा घेतला आणि ते तिथल्या शहरांमध्ये राहू लागले. २५ ते तिथे राहू लागले, तेव्हा सुरुवातीला ते यहोवाचं भय बाळगत नव्हते.* म्हणून यहोवाने त्यांच्यामध्ये सिंह पाठवले+ आणि त्यांनी त्यांच्यापैकी काही लोकांना मारून टाकलं. २६ तेव्हा अश्शूरच्या राजाला असं सांगण्यात आलं: “तुम्ही ज्या राष्ट्रांतल्या लोकांना बंदी बनवून शोमरोनच्या शहरांमध्ये वसवलंय, त्यांना त्या देशातल्या देवाची उपासना कशी करायची ते माहीत नाही. म्हणून तो देव लोकांना मारून टाकण्यासाठी त्यांच्यामध्ये सिंह पाठवतो. त्यांच्यापैकी एकालाही त्या देशातल्या देवाच्या उपासनेची पद्धत माहीत नाही.”
२७ यावर अश्शूरच्या राजाने असा हुकूम दिला: “तुम्ही ज्या लोकांना त्या देशातून बंदी बनवून नेलंय, त्यांच्यातल्या एका याजकाला त्या देशात जाऊन राहायला आणि तिथल्या देवाची उपासना कशी करायची ते शिकवायला परत पाठवा.” २८ म्हणून मग, शोमरोनातून बंदी बनवून नेलेल्या याजकांपैकी एक जण परत बेथेलमध्ये+ राहायला आला, आणि लोकांना यहोवाचं भय कसं बाळगायचं* ते शिकवू लागला.+
२९ पण तरीसुद्धा प्रत्येक राष्ट्रातून आलेल्या लोकांनी आपापले देव बनवले; आणि शोमरोनी लोकांनी उपासनेसाठी जी उच्च स्थानं बनवली होती, तिथल्या मंदिरांत त्यांनी ते देव ठेवले; प्रत्येक राष्ट्रातून आलेल्या लोकांनी ते राहत असलेल्या शहरांमध्ये असंच केलं. ३० बाबेलच्या लोकांनी सुक्कोथ-बनोथ दैवत बनवलं; तसंच, कूथाच्या लोकांनी नेरगल, हमाथच्या+ लोकांनी अशीमा, ३१ आणि अव्वाच्या लोकांनी निभज व तर्ताक ही दैवतं बनवली. शिवाय, सफरवाईमचे लोक अद्रम्मेलेक आणि अनम्मेलेक या सफरवाईमच्या+ दैवतांपुढे आपल्या मुलांचा अग्नीत होम करायचे. ३२ हे लोक यहोवाचं भय तर बाळगत होते, पण उपासनेच्या उच्च स्थानांवर सेवा करण्यासाठी त्यांनी आपल्याच लोकांमधून काहींना याजक म्हणूनही नेमलं होतं; हे याजक त्यांच्या वतीने उच्च स्थानांवर असलेल्या मंदिरांत सेवा करायचे.+ ३३ अशा रितीने, ते यहोवाचं भय तर बाळगायचे, पण ज्या राष्ट्रांमधून त्यांना घालवून देण्यात आलं होतं, तिथल्या उपासनेच्या पद्धतींप्रमाणे ते आपापल्या देवाची उपासनाही करायचे.+
३४ आजपर्यंत हे लोक आपले पूर्वीचेच रितीरिवाज पाळत आहेत; त्यांच्यापैकी कोणीही यहोवाची उपासना करत नाही. तसंच, यहोवाने ज्या याकोबचं नाव बदलून इस्राएल ठेवलं होतं,+ त्याच्या मुलांना दिलेल्या कायद्यांचं, न्याय-निर्णयांचं,* नियमशास्त्राचं आणि आज्ञेचंही हे लोक पालन करत नाहीत. ३५ यहोवाने इस्राएलशी करार केला,+ तेव्हा त्याने त्यांना अशी आज्ञा दिली होती: “तुम्ही इतर देवांची उपासना करू नका, त्यांच्या पाया पडू नका, त्यांची सेवा करू नका किंवा त्यांच्यासाठी बलिदानं देऊ नका.+ ३६ तर, फक्त यहोवाचीच उपासना करा,+ त्याच्याच पाया पडा आणि त्याच्यासाठीच बलिदानं द्या; कारण त्यानेच तुम्हाला मोठ्या सामर्थ्याने आणि शक्तिशाली हाताने इजिप्त देशातून बाहेर आणलं.+ ३७ तसंच, त्याने तुम्हाला लिहून दिलेले कायदे, न्याय-निर्णय, नियमशास्त्र आणि आज्ञा यांचं नेहमी काळजीपूर्वक पालन करा;+ दुसऱ्या कोणत्याही देवाची उपासना करू नका. ३८ मी तुमच्यासोबत केलेला करार कधीही विसरू नका.+ दुसऱ्या कोणत्याही देवाची उपासना करू नका; ३९ फक्त तुमचा देव यहोवा याचीच उपासना करा. कारण तोच तुम्हाला तुमच्या सर्व शत्रूंच्या हातून सोडवेल.”
४० पण या राष्ट्रांनी त्याचं ऐकलं नाही; ते आपले पूर्वीचे रितीरिवाजच पाळत राहिले.+ ४१ अशा प्रकारे, या राष्ट्रांनी यहोवाचं भय तर बाळगलं,+ पण त्यासोबतच ते आपल्या कोरीव मूर्तींचीही उपासना करत राहिले. आणि आजपर्यंत त्यांची मुलं व नातवंडं आपल्या पूर्वजांप्रमाणेच करत आले आहेत.
१८ इस्राएलचा राजा एलाह याचा मुलगा होशे+ याच्या शासनकाळाच्या तिसऱ्या वर्षी, हिज्कीया+ यहूदाचा राजा बनला; तो आहाज+ राजाचा मुलगा होता. २ हिज्कीया राजा बनला तेव्हा तो २५ वर्षांचा होता आणि त्याने २९ वर्षं यरुशलेममध्ये राज्य केलं. त्याच्या आईचं नाव अबी* असून ती जखऱ्याची मुलगी होती.+ ३ आपला पूर्वज दावीद याच्याप्रमाणेच+ हिज्कीया यहोवाच्या नजरेत जे योग्य ते करत राहिला.+ ४ त्याने उपासनेची उच्च स्थानं काढून टाकली+ आणि पूजेचे स्तंभ व पूजेचे खांबही* तोडून टाकले.+ तसंच, मोशेने जो तांब्याचा साप बनवला होता, त्याचाही त्याने चुराडा केला.+ कारण त्या काळापर्यंत, इस्राएली लोक त्या सापापुढे बलिदानांचं हवन करत होते.* त्या तांब्याच्या सापाला नहूशतान* म्हटलं जायचं. ५ हिज्कीयाने इस्राएलचा देव यहोवा याच्यावर भरवसा ठेवला.+ यहूदामध्ये त्याच्याआधी जितके राजे होऊन गेले आणि त्याच्यानंतर जितके राजे झाले, त्या सगळ्यांमध्ये हिज्कीयासारखा कोणी नव्हता. ६ हिज्कीया यहोवाला एकनिष्ठ राहिला.+ त्याने यहोवाच्या मार्गावर चालण्याचं कधीही सोडलं नाही; देवाने मोशेद्वारे ज्या आज्ञा दिल्या होत्या, त्यांचं तो पालन करत राहिला. ७ यहोवा त्याच्यासोबत होता. आणि हिज्कीयाने जी काही कामं केली, ती सगळी हुशारीने केली. त्याने अश्शूरच्या राजाविरुद्ध बंड केलं; तो त्याच्या अधीन राहिला नाही.+ ८ हिज्कीयाने थेट गाझा आणि त्याचे प्रदेश इथपर्यंत पलिष्टी लोकांना हरवलं;+ त्याने पहारेकऱ्यांच्या बुरुजांपासून ते तटबंदीच्या शहरांपर्यंत,* त्यांना हरवलं.
९ हिज्कीया राजाच्या शासनकाळाच्या चौथ्या वर्षी, म्हणजे इस्राएलचा राजा एलाह याचा मुलगा होशे+ याच्या शासनकाळाच्या सातव्या वर्षी, अश्शूरचा राजा शल्मनेसर हा शोमरोनशी लढाई करायला आला. आणि त्याने त्या शहराला वेढा घातला.+ १० मग तीन वर्षांच्या शेवटी, अश्शूरी लोकांनी ते शहर काबीज केलं.+ त्यांनी हिज्कीयाच्या शासनकाळाच्या सहाव्या वर्षी, म्हणजे इस्राएलचा राजा होशे याच्या शासनकाळाच्या नवव्या वर्षी शोमरोन शहर काबीज केलं. ११ नंतर अश्शूरच्या राजाने इस्राएलच्या लोकांना बंदी बनवून अश्शूरला नेलं.+ त्याने त्यांना मेदच्या शहरांमध्ये, तसंच हलह शहरात व गोजान नदीजवळ असलेल्या हाबोर शहरात वसवलं.+ १२ हे सर्व यामुळे घडलं, कारण त्यांनी आपला देव यहोवा याचं ऐकलं नाही. यहोवाचा सेवक मोशे याने दिलेल्या सर्व आज्ञा ते मोडत राहिले; आणि असं करून त्यांनी त्याचा करार पाळला नाही.+ त्यांनी देवाचं ऐकलं नाही आणि ते त्याच्या सांगण्याप्रमाणे वागलेही नाहीत.
१३ हिज्कीया राजाच्या शासनकाळाच्या १४ व्या वर्षी, अश्शूरचा राजा सन्हेरीब+ याने तटबंदी असलेल्या यहूदाच्या सगळ्या शहरांवर हल्ला करून ती शहरं काबीज केली.+ १४ म्हणून यहूदाचा राजा हिज्कीया याने अश्शूरच्या राजाला लाखीश इथे असा संदेश पाठवला: “माझ्याकडून चूक झाली. आता तुम्ही जो काही दंड भरायला लावाल, तो मी भरीन. पण हा वेढा मात्र काढून घ्या.” तेव्हा, अश्शूरच्या राजाने यहूदाचा राजा हिज्कीया याला ३०० तालान्त* चांदी आणि ३० तालान्त सोनं इतका दंड भरायला लावला. १५ म्हणून मग, हिज्कीयाने यहोवाच्या मंदिरात आणि राजमहालातल्या भांडारांत जितकी चांदी होती ती सगळी घेऊन अश्शूरच्या राजाला दिली.+ १६ त्या वेळी, हिज्कीयाने यहोवाच्या मंदिरातले दरवाजे+ आणि त्यांच्या चौकटी काढून अश्शूरच्या राजाला दिल्या; ते दरवाजे आणि चौकटी त्याने सोन्याने मढवल्या होत्या.+
१७ मग अश्शूरच्या राजाने तर्तान,* रबसारीस* आणि रबशाके* यांना लाखीश+ इथून एक मोठी सेना घेऊन यरुशलेमला हिज्कीया राजाकडे पाठवलं.+ हे सर्व यरुशलेममध्ये आले आणि वरच्या तळ्याच्या पाटाजवळ* तैनात झाले; पाण्याचा हा पाट, धोब्याच्या मैदानाकडे जाणाऱ्या महामार्गावर होता.+ १८ त्यांनी राजाला बाहेर बोलावलं, तेव्हा राजमहालाची व्यवस्था पाहणारा हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम,+ सचिव शेबना+ आणि इतिहास-लेखक असलेला आसाफचा मुलगा यवाह, हे तिघं त्यांच्याकडे बाहेर आले.
१९ तेव्हा रबशाके त्यांना म्हणाला: “जा, जाऊन हिज्कीयाला सांगा, ‘अश्शूरचा महान राजा असं म्हणतो: “कसल्या गोष्टीचा तुला एवढा भरवसा आहे?+ २० तू म्हणतोस, ‘माझ्याकडे युद्धनीती आणि युद्ध करायची ताकद आहे.’ पण हे सगळे वायफळ शब्द आहेत. तू कोणाच्या भरवशावर माझ्याविरुद्ध बंड करायला निघालास?+ २१ इजिप्तच्या?+ तो तर चेपलेली वेताची काठी* आहे. कोणी त्या काठीवर टेकायला जरी गेला, तरी ती तुटून त्याच्याच हातात घुसेल. जे इजिप्तच्या राजावर, फारोवर भरवसा ठेवतात त्यांच्यासाठी तो असल्या वेताच्या काठीसारखाच आहे. २२ आणि तुम्ही जर असं म्हणत असाल, की ‘आमचा भरवसा आमच्या यहोवा देवावर आहे,’+ तर हा तोच देव आहे ना ज्याच्या वेदी आणि ज्याची उच्च स्थानं हिज्कीयाने पाडून टाकली,+ आणि ‘तुम्ही यरुशलेममधल्या या वेदीपुढेच नमन केलं पाहिजे,’ असं त्याने यहूदा आणि यरुशलेमच्या लोकांना सांगितलं?”’+ २३ तर आता चल, माझ्या प्रभूशी, अश्शूरच्या राजाशी पैज लाव! मी तुला २,००० घोडे देतो. हिंमत असेल तर त्यांच्यासाठी तितके घोडेस्वार आणून दाखव.+ २४ इजिप्तने तुला रथ आणि घोडेस्वार जरी पुरवले, तरी माझ्या प्रभूची सेवा करणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी सगळ्यात छोट्या अधिकाऱ्याला तरी तू हरवू शकशील का? २५ तुला काय वाटतं, मी काय यहोवाच्या परवानगीशिवाय या जागेचा नाश करायला आलोय? यहोवाने स्वतः मला सांगितलंय: ‘जाऊन त्या देशावर हल्ला कर आणि त्याचा नाश कर.’”
२६ त्यावर हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम, शेबना+ आणि यवाह हे तिघं रबशाकेला+ म्हणाले: “कृपया आपल्या या सेवकांशी अरामी* भाषेत बोला.+ कारण आम्हाला ती भाषा समजते. शहराच्या तटबंदीवर असलेल्या लोकांसमोर आमच्याशी यहुदी लोकांच्या भाषेत बोलू नका.”+ २७ पण रबशाके त्यांना म्हणाला: “माझ्या प्रभूने मला काय फक्त तुमच्या प्रभूशी आणि तुमच्याशी बोलायला पाठवलंय? त्यांनी मला शहराच्या तटबंदीवर असलेल्या लोकांशीही बोलायला पाठवलंय. कारण तुमच्यासोबत तेसुद्धा स्वतःचं मलमूत्र खातील.”
२८ मग रबशाके पुढे आला आणि यहुदी लोकांच्या भाषेत मोठ्याने ओरडून म्हणाला: “अश्शूरचा महान राजा काय म्हणतो ते ऐका!+ २९ राजा असं म्हणतो, ‘हिज्कीया तुम्हाला फसवतोय. त्याचं ऐकू नका. तो काही तुम्हाला माझ्या हातून वाचवू शकणार नाही.+ ३० तो तुम्हाला असं सांगतोय, की “यहोवा आपल्याला नक्की वाचवेल. हे शहर अश्शूरच्या राजाच्या हाती जाणार नाही.” पण त्याचं ऐकून यहोवावर भरवसा ठेवू नका.+ ३१ तुम्ही हिज्कीयाचं काहीही ऐकू नका. कारण अश्शूरचा राजा असं म्हणतो: “माझ्याशी सलोखा करा आणि मला शरण या. मग तुमच्यापैकी प्रत्येक जण आपापल्या द्राक्षवेलीचं आणि अंजिराच्या झाडाचं फळ खाईल; आणि प्रत्येक जण आपापल्या विहिरीचं पाणी पिईल. ३२ नंतर मी येईन आणि तुम्हाला तुमच्या देशासारख्या असलेल्या एका देशात घेऊन जाईन;+ एका अशा देशात जिथे भरपूर धान्य आणि नवीन द्राक्षारस आहे; जिथे भाकरी, द्राक्षमळे, जैतुनाची झाडं आणि भरपूर मध आहे. मग तुम्ही जिवंत राहाल, मरणार नाही. हिज्कीयाचं काहीएक ऐकू नका. ‘यहोवा आपल्याला वाचवेल,’ असं म्हणून तो तुम्हाला खरंतर फसवतोय. ३३ दुसऱ्या कोणत्याही राष्ट्रांच्या देवांनी त्यांच्या लोकांना अश्शूरच्या राजाच्या हातून वाचवलंय का? ३४ हमाथ+ आणि अर्पाद यांचे देव कुठे आहेत? सफरवाईम,+ हेना आणि इव्वा यांचे देव कुठे आहेत? यांच्यापैकी कोणीही शोमरोनला माझ्या हातून वाचवू शकला का?+ ३५ आजपर्यंत या सगळ्या देशांतल्या देवांपैकी कोणत्याही देवाने त्यांच्या देशाला माझ्या हातून वाचवलं नाही. तर मग, यहोवा कसं काय यरुशलेमला माझ्या हातून वाचवू शकेल?”’”+
३६ पण लोक शांत राहिले आणि त्यांनी त्याला एका शब्दानेही उत्तर दिलं नाही. कारण राजाचा असा हुकूम होता, की “तुम्ही त्याला काहीच उत्तर देऊ नका.”+ ३७ मग राजमहालाची व्यवस्था पाहणारा हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम, सचिव शेबना आणि इतिहास-लेखक असलेला आसाफचा मुलगा यवाह, हे तिघं आपले कपडे फाडून हिज्कीया राजाकडे आले; आणि रबशाके जे काही बोलला ते सर्व त्यांनी त्याला सांगितलं.
१९ हिज्कीया राजाने हे ऐकलं, तेव्हा दुःखी होऊन त्याने लगेच आपले कपडे फाडले आणि गोणपाट* घालून तो यहोवाच्या मंदिरात गेला.+ २ मग त्याने राजमहालाची व्यवस्था पाहणारा एल्याकीम, सचिव शेबना आणि याजकांचे प्रमुख यांना आमोजच्या मुलाकडे, म्हणजे यशया+ संदेष्ट्याकडे पाठवलं. ते सर्व गोणपाट घालून त्याच्याकडे गेले, ३ आणि यशयाला म्हणाले: “हिज्कीया असं म्हणतो, ‘आजचा हा दिवस अतिशय दुःखाचा, निंदेचा* आणि बदनामीचा दिवस आहे; कारण मुलांना जन्म द्यायची वेळ तर आली आहे, पण जन्म द्यायची ताकदच उरली नाही.+ ४ ज्या रबशाकेला त्याच्या प्रभूने, अश्शूरच्या राजाने जिवंत देवाची निंदा करायला पाठवलंय,+ त्याचे शब्द कदाचित आपला देव यहोवा ऐकेल. आणि त्या शब्दांसाठी आपला देव यहोवा त्याला शिक्षा करेल. म्हणून आता या देशात उरलेल्या लोकांसाठी तुम्ही प्रार्थना करा.’”+
५ हिज्कीया राजाचे सेवक यशयाकडे गेले,+ ६ तेव्हा यशया त्यांना म्हणाला: “तुमच्या प्रभूला सांगा: ‘यहोवा असं म्हणतो, की “अश्शूरच्या राजाच्या सेवकांनी ज्या शब्दांनी माझी निंदा केली,+ ते ऐकून तू घाबरून जाऊ नकोस.+ ७ मी त्याच्या मनात एक विचार घालीन आणि तो एक बातमी ऐकून आपल्या देशात परत जाईल. नंतर त्याच्याच देशात तो तलवारीने मारला जाईल असं मी करीन.”’”+
८ मग रबशाकेने ऐकलं, की अश्शूरच्या राजाने लाखीशमधून+ आपला तळ हलवला आहे. तो त्याच्याकडे गेला, तेव्हा राजा लिब्ना शहराशी लढाई करत असल्याचा त्याला दिसला.+ ९ मग अश्शूरच्या राजाला अशी खबर मिळाली, की इथियोपियाचा राजा तिऱ्हाका हा आपल्याशी लढाई करायला आलाय. तेव्हा त्याने आपल्या दूतांना हिज्कीयाकडे परत पाठवलं.+ तो त्यांना म्हणाला: १० “यहूदाचा राजा हिज्कीया याला जाऊन असं सांगा, ‘तुझा देव म्हणतो: “अश्शूरचा राजा यरुशलेमवर कब्जा करू शकणार नाही.” पण त्याच्यावर भरवसा ठेवू नकोस. तो तुला फसवतोय.+ ११ अश्शूरच्या राजांनी बाकीच्या सर्व देशांचा कसा नाश केला, हे तर तुला चांगलंच माहीत आहे.+ मग तू एकटाच कसा काय वाचशील? १२ माझ्या पूर्वजांनी ज्या राष्ट्रांचा नाश केला, त्यांचे देव तरी त्यांना वाचवू शकले का? गोजान, हारान+ आणि रेसफ ही राष्ट्रं आता कुठे आहेत? तलस्सार इथे राहणारे एदेनचे लोक कुठे आहेत? १३ हमाथचा राजा आणि अर्पादचा राजा यांचं काय झालं? सफरवाईम, हेना आणि इव्वा+ या शहरांच्या राजाचं काय झालं?’”
१४ हिज्कीयाने दूतांच्या हातातली पत्रं घेऊन वाचली. मग तो यहोवाच्या मंदिरात गेला आणि त्याने ती पत्रं यहोवासमोर ठेवली.+ १५ तिथे हिज्कीया यहोवाला अशी प्रार्थना करू लागला:+ “हे इस्राएलच्या देवा यहोवा! तू करुबांच्या+ वर* विराजमान आहेस! तूच पृथ्वीवरच्या सर्व राष्ट्रांचा खरा देव आहेस.+ आणि तूच आकाश व पृथ्वी बनवलीस. १६ हे यहोवा, कान लावून ऐक!+ हे यहोवा, डोळे उघड आणि पाहा!+ जिवंत देवाची निंदा करणाऱ्या सन्हेरीबच्या शब्दांकडे लक्ष दे. १७ हे यहोवा! हे खरंय, की अश्शूरच्या राजांनी राष्ट्रांचा आणि त्यांच्या जमिनींचा नाश केलाय.+ १८ आणि त्यांनी त्या राष्ट्रांच्या देवांना आगीत फेकून दिलंय. कारण ते काही खरे देव नव्हते;+ माणसांनीच बनवलेल्या त्या लाकडाच्या आणि दगडाच्या वस्तू होत्या.+ म्हणून ते त्यांचा नाश करू शकले. १९ पण आता हे यहोवा आमच्या देवा! कृपा करून आम्हाला त्याच्या हातून वाचव; म्हणजे, हे यहोवा! पृथ्वीवरच्या सगळ्या राष्ट्रांना कळून येईल, की फक्त तूच देव आहेस.”+
२० तेव्हा, आमोजचा मुलगा यशया याने हिज्कीयाला असा संदेश पाठवला: “इस्राएलचा देव यहोवा असं म्हणतो, की ‘अश्शूरचा राजा सन्हेरीब याच्याविषयी+ तू मला केलेली प्रार्थना मी ऐकली आहे.+ २१ तर आता मी, यहोवा त्याच्याविषयी असं म्हणतो:
“सीयोनची कुमारी तुला तुच्छ समजते, ती तुझी थट्टा करते.
यरुशलेमची मुलगी आपलं डोकं हलवून तुझ्यावर हसते.
२२ तू कोणाची थट्टा केलीस? कोणाची निंदा केलीस?+
तू कोणाविरुद्ध आवाज चढवून बोललास?+
गर्वाने फुगून तू कोणाकडे बघितलंस?
इस्राएलच्या पवित्र देवाकडे!+
२३ तुझ्या दूतांद्वारे+ तू यहोवाची निंदा केलीस+ आणि म्हणालास:
‘माझे असंख्य युद्ध-रथ घेऊन
मी पर्वतांवर चढेन,
लबानोनच्या सर्वात दूरच्या भागांत मी जाईन.
त्याचे मोठमोठे देवदार वृक्ष, चांगली-चांगली गंधसरूची झाडं मी कापून टाकीन.
त्याच्या सर्वात आतल्या भागांत, घनदाट जंगलांत मी शिरेन.
२४ मी विदेश्यांच्या प्रदेशांत विहिरी खणून तिथलं पाणी पिईन;
माझ्या पायांच्या तळव्यांनी मी इजिप्तचे सगळे झरे* आटवून टाकीन.’
आणि आता मी ती पूर्ण करीन.+
तू तटबंदीची शहरं उद्ध्वस्त करून त्यांना दगडमातीचा ढिगारा बनवशील.+
२६ तिथे राहणारे हतबल होतील;
भीतीने त्यांचा थरकाप उडेल आणि त्यांना अपमानित केलं जाईल.
ते रानातल्या झाडपाल्यासारखे होतील; हिरव्या गवतासारखे दुर्बळ होतील.+
पूर्वेकडच्या वाऱ्याने सुकून गेलेल्या छतावरच्या गवतासारखे ते होतील.
२८ तू माझ्यावर भडकलास+ आणि तुझी डरकाळी माझ्या कानांपर्यंत पोहोचली;+
म्हणून आता मी तुझ्या नाकात माझी वेसण, आणि तुझ्या तोंडात माझा लगाम घालीन.+
आणि ज्या रस्त्याने तू आलास, त्याच रस्त्याने मी तुला परत मागे घेऊन जाईन.”+
२९ आणि तुझ्यासाठी* हे चिन्ह असेल: या वर्षी तुम्ही आपोआप उगवलेलं* धान्य खाल; आणि दुसऱ्या वर्षी त्यातून अंकुरलेलं धान्य खाल.+ पण तिसऱ्या वर्षी मात्र तुम्ही धान्याची पेरणी आणि कापणी कराल. तसंच, तुम्ही द्राक्षमळे लावाल आणि त्यांचं फळ खाल.+ ३० यहूदाच्या घराण्यातले जे वाचतील,+ ते झाडाप्रमाणे खोलवर मूळ धरतील आणि फळ देतील. ३१ कारण उरलेले लोक यरुशलेममधून बाहेर निघतील, आणि बचावलेले सीयोन डोंगरातून बाहेर पडतील. सैन्यांचा देव यहोवा आपल्या आवेशामुळे हे घडवून आणेल.+
३२ अश्शूरच्या राजाविषयी यहोवा असं म्हणतो:+
“तो या शहरात येणार नाही,+
तो एक बाणसुद्धा मारणार नाही,
किंवा ढाल घेऊन सामना करणार नाही,
आणि वेढा घालण्यासाठी दगडमातीचा ढिगाराही रचणार नाही.+
३३ ज्या रस्त्याने तो आलाय, त्याच रस्त्याने तो परत मागे जाईल.
तो या शहरात पाऊलसुद्धा ठेवू शकणार नाही,” असं यहोवा म्हणतो.
३५ त्याच रात्री यहोवाच्या स्वर्गदूताने जाऊन अश्शूरी लोकांच्या छावणीतल्या १,८५,००० सैनिकांना ठार मारलं.+ मग लोक पहाटे उठले, तेव्हा त्यांना सगळीकडे मृतदेह पडलेले दिसले.+ ३६ त्यामुळे अश्शूरचा राजा सन्हेरीब परत निनवेला+ निघून गेला आणि तिथेच राहिला.+ ३७ एकदा सन्हेरीब राजा, निस्रोख या आपल्या दैवताच्या मंदिरात नमन करत होता. तेव्हा अद्रम्मेलेक व शरेसर या त्याच्या मुलांनी त्याला तलवारीने ठार मारलं.+ त्यानंतर ते अरारात+ देशात पळून गेले. आणि त्याचा मुलगा एसर-हद्दोन+ हा त्याच्या जागी राजा बनला.
२० त्या काळात, हिज्कीया खूप आजारी पडला आणि मरणाला टेकला.+ तेव्हा आमोजचा मुलगा, म्हणजे यशया संदेष्टा त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला: “यहोवा म्हणतो, की ‘आपल्या घराण्याची व्यवस्था लाव. कारण तू या आजारातून बरा होणार नाहीस, तू मरणार आहेस.’”+ २ हे ऐकून हिज्कीयाने आपलं तोंड भिंतीकडे वळवलं, आणि तो यहोवाला अशी प्रार्थना करू लागला: ३ “हे यहोवा, मी तुझ्याकडे भीक मागतो! मी तुझ्यासमोर नेहमी विश्वासूपणे चाललो, पूर्ण मनाने वागलो आणि तुझ्या नजरेत योग्य तेच करत आलो. कृपा करून या सगळ्याची आठवण कर.”+ असं म्हणून हिज्कीया ढसाढसा रडू लागला.
४ हिज्कीयाशी बोलून यशया राजमहालाच्या मधल्या अंगणापर्यंतही पोहोचला नव्हता, इतक्यात त्याला यहोवाकडून असा संदेश मिळाला:+ ५ “परत मागे जा आणि माझ्या लोकांचा पुढारी हिज्कीया याला असं सांग, की ‘तुझ्या पूर्वजाचा, दावीदचा देव यहोवा म्हणतो: “मी तुझी प्रार्थना ऐकली आहे आणि तुझे अश्रू पाहिले आहेत.+ मी तुला बरं करीन.+ पाहा! तू तिसऱ्या दिवशी उठून यहोवाच्या मंदिरात जाशील.+ ६ मी तुझं आयुष्य आणखी १५ वर्षं वाढवीन. मी तुला आणि या शहराला अश्शूरच्या राजाच्या हातून वाचवीन.+ माझ्या नावासाठी आणि माझा सेवक दावीद याच्यासाठी मी या शहराचं रक्षण करीन.”’”+
७ मग यशया राजाच्या सेवकांना म्हणाला: “वाळलेल्या अंजिरांची एक ढेप घेऊन या.” तेव्हा त्यांनी ती आणून हिज्कीयाच्या फोडावर* लावली. त्यानंतर तो हळूहळू बरा झाला.+
८ हिज्कीयाने यशयाला असं विचारलं होतं: “यहोवा मला बरं करेल आणि मी तिसऱ्या दिवशी उठून यहोवाच्या मंदिरात जाईन, हे कशावरून? याचं चिन्ह काय?”+ ९ त्यावर यशया म्हणाला: “यहोवा जे बोलला ते तो नक्की पूर्ण करेल याचं यहोवाकडून हे चिन्ह आहे: सांग, तुझी काय इच्छा आहे? जिन्यावरच्या* सावलीने दहा पायऱ्या पुढे जावं, की दहा पायऱ्या मागे यावं?”+ १० हिज्कीया म्हणाला: “सावली दहा पायऱ्या पुढे जाऊ शकते, पण ती मागे येऊ शकत नाही.” ११ म्हणून यशया संदेष्ट्याने यहोवा देवाला प्रार्थना केली, तेव्हा अहाजच्या जिन्यावर पुढे गेलेली सावली देवाने दहा पायऱ्या मागे आणली.+
१२ त्या दिवसांत, बाबेलचा* राजा बरोदख-बलदान याने, म्हणजे बलदानच्या मुलाने आपल्या दूतांच्या हातून हिज्कीयाला पत्रं आणि नजराणा पाठवला. कारण हिज्कीया आजारी असल्याचं त्याने ऐकलं होतं.+ १३ हिज्कीयाने त्यांचं स्वागत केलं* आणि त्यांना राजभांडारातला सगळा खजिना दाखवला.+ त्याने त्यांना आपलं सोनं, चांदी, बाल्सम* तेल व इतर मौल्यवान तेल; तसंच, आपलं शस्त्रांचं भांडार आणि राजभांडारात जे काही होतं ते सगळं दाखवलं. हिज्कीयाने त्यांना दाखवलं नाही असं त्याच्या राजमहालात आणि राज्यात काहीही नव्हतं.
१४ त्यानंतर यशया संदेष्टा हिज्कीया राजाकडे आला आणि त्याने त्याला विचारलं: “ते लोक कुठून आले होते? काय म्हणत होते ते?” तेव्हा हिज्कीया त्याला म्हणाला: “ते लोक एका दूरच्या देशातून, बाबेलमधून आले होते.”+ १५ मग त्याने विचारलं: “त्यांनी तुझ्या राजमहालात काय-काय बघितलं?” त्यावर हिज्कीया म्हणाला: “त्यांनी माझ्या राजमहालातल्या सगळ्या गोष्टी बघितल्या. माझ्या राजभांडारातलं असं काहीही नाही जे मी त्यांना दाखवलं नाही.”
१६ मग यशया हिज्कीयाला म्हणाला: “यहोवाचा संदेश ऐक,+ १७ ‘पाहा! असे दिवस येत आहेत, जेव्हा तुझ्या राजमहालात जे काही आहे ते सगळं, आणि तुझ्या वाडवडिलांनी आजपर्यंत जे काही साठवून ठेवलंय ते सगळं बाबेलला नेलं जाईल.+ इथे काहीच उरणार नाही,’ असं यहोवा म्हणतो. १८ ‘आणि तुझ्या काही वंशजांना बाबेलला नेलं जाईल.+ तिथे ते बाबेलच्या राजाच्या महालात राजदरबारी म्हणून सेवा करतील.’”+
१९ यावर हिज्कीया यशयाला म्हणाला: “यहोवाने कळवलेला संदेश योग्यच आहे.”+ पुढे तो म्हणाला: “मी जिवंत आहे तोपर्यंत तरी राज्यात शांती आणि स्थिरता* राहील ही चांगली गोष्ट आहे.”+
२० हिज्कीयाबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याने केलेली पराक्रमाची कामं, त्याने बांधलेलं तळं+ आणि शहरात पाणी आणण्यासाठी बांधलेला पाट*+ यांबद्दलची सगळी माहिती यहूदाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आली आहे. २१ मग हिज्कीयाचा मृत्यू झाला*+ आणि त्याच्या जागी त्याचा मुलगा मनश्शे+ राजा बनला.+
२१ मनश्शे+ राजा बनला तेव्हा तो १२ वर्षांचा होता. त्याने ५५ वर्षं यरुशलेममधून राज्य केलं.+ त्याच्या आईचं नाव हेफसीबा होतं. २ मनश्शेने यहोवाच्या नजरेत जे वाईट ते केलं. यहोवाने ज्या राष्ट्रांना इस्राएली लोकांमधून घालवून दिलं होतं,+ त्यांच्या घृणास्पद चालीरितींचं त्याने अनुसरण केलं.+ ३ त्याचे वडील हिज्कीया यांनी उपासनेची जी उच्च स्थानं* पाडून टाकली होती, ती त्याने पुन्हा बांधली.+ तसंच, त्याने बआल दैवतासाठी वेदी बांधल्या आणि इस्राएलचा राजा अहाब याच्याप्रमाणेच+ त्याने पूजेचा खांब* बनवला.+ त्याने आकाशातल्या सगळ्या सैन्याला नमन केलं आणि त्यांची उपासना केली.+ ४ यहोवा ज्या मंदिराबद्दल असं म्हणाला होता की “यरुशलेम माझ्या नावाने ओळखलं जाईल,”+ त्या यहोवाच्या मंदिरात त्याने वेदी बांधल्या.+ ५ तसंच, यहोवाच्या मंदिराच्या दोन्ही अंगणांत+ त्याने आकाशातल्या सगळ्या सैन्यासाठी वेदी बांधल्या.+ ६ याशिवाय, त्याने स्वतःच्या मुलाचा अग्नीत होम केला.* तसंच, त्याने जादूटोणा केला, शकुन पाहिले+ आणि भूतविद्या करणाऱ्यांना व ज्योतिषांना नेमलं.+ मनश्शेने फार मोठ्या प्रमाणावर यहोवाच्या नजरेत जे वाईट ते केलं आणि त्याचा क्रोध भडकवला.
७ तसंच, मनश्शेने जो पूजेचा खांब,*+ म्हणजे जी कोरीव मूर्ती बनवली होती, ती मंदिरात ठेवली. यहोवा या मंदिराविषयी दावीद आणि त्याचा मुलगा शलमोन यांना म्हणाला होता: “हे मंदिर आणि इस्राएलच्या सर्व वंशांतून मी निवडलेलं यरुशलेम, कायम माझ्या नावाने ओळखलं जाईल.+ ८ आणि जो देश मी इस्राएली लोकांच्या पूर्वजांना दिला होता, त्यातून मी त्यांना बाहेर काढून पुन्हा कधीही भटकायला लावणार नाही.+ पण त्यासाठी त्यांनी माझ्या सगळ्या आज्ञांचं, म्हणजे माझा सेवक मोशे याने इस्राएली लोकांना जे नियमशास्त्र पाळायला सांगितलं होतं, त्याचं काळजीपूर्वक पालन करणं गरजेचं आहे.”+ ९ पण इस्राएली लोकांनी त्या आज्ञा पाळल्या नाहीत. यहोवाने ज्या राष्ट्रांचा इस्राएली लोकांसमोर सर्वनाश केला होता,+ त्यांच्यापेक्षाही जास्त वाईट कामं करायला लावून मनश्शे त्यांना बहकवत राहिला.
१० यहोवा आपल्या सेवकांद्वारे, म्हणजे संदेष्ट्यांद्वारे वारंवार असा संदेश देत राहिला:+ ११ “यहूदाचा राजा मनश्शे याने अशी सगळी घृणास्पद कामं केली आहेत; त्याच्याआधी होऊन गेलेल्या+ अमोरी लोकांपेक्षाही तो वाईट वागत राहिला;+ आणि त्याने यहूदाला आपल्या घृणास्पद मूर्तींच्या* नादी लावून पाप करायला लावलं. १२ म्हणून इस्राएलचा देव यहोवा म्हणतो: ‘मी यरुशलेमवर आणि यहूदावर असं संकट आणतोय,+ की जो कोणी त्याबद्दल ऐकेल त्याला धक्का बसेल.*+ १३ आणि मोजमाप करण्याच्या ज्या दोरीने+ मी शोमरोनाला+ मोजलं, त्याच दोरीने मी यरुशलेमलाही मोजेन. आणि अहाबच्या घराण्याला लावलेला ओळंबा*+ मी यरुशलेमला लावीन. वाटी जशी घासूनपुसून पालथी घालून ठेवतात, तशीच मी यरुशलेमची दशा करीन.+ १४ माझ्या वारशातल्या+ उरलेल्या लोकांना मी सोडून देईन. मी त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हाती देईन. त्यांचे सर्व शत्रू त्यांना लुटतील आणि बंदी बनवून नेतील.+ १५ कारण माझ्या नजरेत जे वाईट ते त्यांनी केलं; आणि त्यांचे पूर्वज इजिप्तमधून बाहेर आले, त्या दिवसापासून आजपर्यंत ते माझा क्रोध भडकवत राहिले.’”+
१६ मनश्शेने यहूदाच्या लोकांना यहोवाच्या नजरेत जे वाईट ते करायला लावलं; याशिवाय, त्याने यरुशलेमच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात निर्दोष लोकांचं रक्तही सांडलं.+ १७ मनश्शेबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याने केलेली पापं आणि त्याने जे काही केलं ते सगळं यहूदाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे. १८ त्यानंतर मनश्शेचा मृत्यू झाला* आणि त्याला त्याच्या राजमहालाच्या बागेत, म्हणजे उज्जाच्या बागेत पुरण्यात आलं.+ मग त्याच्या जागी त्याचा मुलगा आमोन हा राजा बनला.
१९ आमोन+ राजा बनला तेव्हा तो २२ वर्षांचा होता. त्याने दोन वर्षं यरुशलेममधून राज्य केलं.+ त्याच्या आईचं नाव मशुल्लेमेथ असून ती योत्बा इथे राहणाऱ्या हारूसची मुलगी होती. २० आपले वडील मनश्शे यांच्याप्रमाणेच आमोन हा यहोवाच्या नजरेत जे वाईट ते करत राहिला.+ २१ तो आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालत राहिला. त्याच्या वडिलांनी ज्या घृणास्पद मूर्तींची उपासना केली होती, त्यांची तो उपासना करत राहिला आणि त्यांच्या पाया पडत राहिला.+ २२ अशा प्रकारे आमोनने आपल्या पूर्वजांच्या देवाला, यहोवाला सोडून दिलं; तो यहोवाच्या मार्गावर चालला नाही.+ २३ पुढे त्याच्या सेवकांनी त्याच्याविरुद्ध कट रचून त्याच्याच महालात त्याला ठार मारलं. २४ पण देशातल्या लोकांनी आमोन राजाविरुद्ध कट रचणाऱ्या सगळ्यांना मारून टाकलं आणि त्याच्या जागी त्याचा मुलगा योशीया याला राजा बनवलं.+ २५ आमोनबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याने जे काही केलं ते सगळं यहूदाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे. २६ त्यांनी आमोनला उज्जाच्या बागेत असलेल्या त्याच्या कबरेत पुरलं.+ मग त्याच्या जागी त्याचा मुलगा योशीया+ राजा बनला.
२२ योशीया+ राजा बनला तेव्हा तो आठ वर्षांचा होता. त्याने ३१ वर्षं यरुशलेममधून राज्य केलं.+ त्याच्या आईचं नाव यदीदा असून ती बसकाथ+ इथे राहणाऱ्या अदायाची मुलगी होती. २ योशीयाने यहोवाच्या नजरेत जे योग्य ते केलं. तो आपला पूर्वज दावीद याच्या सर्व मार्गांप्रमाणे चालला;+ त्यांपासून तो भरकटला नाही.
३ योशीया राजाने आपल्या शासनकाळाच्या १८ व्या वर्षी आपला सचिव शाफान याला यहोवाच्या मंदिरात पाठवलं;+ शाफान हा असल्याहचा मुलगा आणि मशुल्लामचा नातू होता. शाफानला पाठवताना राजा त्याला म्हणाला: ४ “हिल्कीया+ महायाजकाकडे जा आणि यहोवाच्या मंदिरात येणारा सगळा पैसा, म्हणजे द्वारपालांनी लोकांकडून गोळा केलेला सगळा पैसा+ त्याला जमा करायला सांग.+ ५ मग तो पैसा यहोवाच्या मंदिराचं काम पाहणाऱ्या माणसांना दिला जावा. पुढे ही माणसं, तो पैसा यहोवाच्या मंदिराची दुरुस्ती करणाऱ्या मजुरांना,+ ६ म्हणजे कारागिरांना, बांधकाम करणाऱ्यांना आणि गवंड्यांना देतील. या पैशाचा उपयोग त्यांनी मंदिराच्या दुरुस्तीसाठी लागणारी लाकडं आणि घडवलेले दगड विकत घेण्यासाठी करावा.+ ७ पण दिलेल्या पैशांचा हिशोब त्यांच्याकडून घेऊ नये; कारण ती माणसं भरवशालायक आहेत.”+
८ नंतर, हिल्कीया महायाजक राजाच्या सचिवाला, शाफानला म्हणाला:+ “मला यहोवाच्या मंदिरात नियमशास्त्राचं पुस्तक+ सापडलंय.” मग हिल्कीयाने ते पुस्तक शाफानला दिलं आणि तो ते वाचू लागला.+ ९ मग, सचिव शाफान हा राजाकडे गेला आणि त्याला म्हणाला: “तुमच्या सेवकांनी यहोवाच्या मंदिरातला सगळा पैसा जमा केलाय, आणि तो मंदिराच्या दुरुस्तीचं काम पाहणाऱ्या माणसांना दिलाय.”+ १० सचिव शाफानने राजाला असंही सांगितलं: “हिल्कीया याजकाने मला एक पुस्तक दिलंय.”+ मग शाफान ते पुस्तक राजासमोर वाचू लागला.
११ नियमशास्त्राच्या पुस्तकात लिहिलेली वचनं ऐकताच राजाने दुःखी होऊन आपले कपडे फाडले.+ १२ मग राजाने हिल्कीया याजक, शाफानचा मुलगा अहीकाम,+ मीखायाचा मुलगा अखबोर, सचिव शाफान आणि राजाचा सेवक असाया यांना असा हुकूम दिला: १३ “जा, आणि हे जे पुस्तक सापडलंय त्यात लिहिलेल्या वचनांविषयी माझ्या वतीने, लोकांच्या वतीने आणि सर्व यहूदाच्या वतीने यहोवाला विचारा. कारण आपल्यासाठी या पुस्तकात जे लिहिलंय त्यानुसार आपले पूर्वज वागले नाहीत. आणि म्हणूनच यहोवाचा क्रोध आपल्यावर खूप भडकलाय.”+
१४ तेव्हा हिल्कीया याजक, अहीकाम, अखबोर, शाफान आणि असाया हे सगळे हुल्दा संदेष्टीकडे+ गेले. हुल्दा ही वस्त्र-भांडाराची देखरेख करणाऱ्या शल्लूमची बायको होती. (शल्लूम हा तिकवाचा मुलगा आणि हरहसचा नातू होता.) हुल्दा यरुशलेमच्या उपनगरात राहायची. राजाने पाठवलेले लोक तिकडे जाऊन तिच्याशी बोलले.+ १५ ती त्यांना म्हणाली: “इस्राएलचा देव यहोवा म्हणतो, की ‘ज्या माणसाने तुम्हाला माझ्याकडे पाठवलंय त्याला जाऊन असं सांगा: १६ “यहोवा असं म्हणतो, ‘यहूदाच्या राजाने या पुस्तकात जे वाचलंय ते सगळं मी पूर्ण करीन;+ मी या जागेवर आणि इथे राहणाऱ्या लोकांवर संकट आणीन. १७ त्यांनी मला सोडून दिलंय. ते इतर देवांना बलिदानांचं हवन करत आहेत+ आणि आपल्या हातांनी बनवलेल्या वस्तूंनी+ मला संताप आणत आहेत. म्हणून या जागेवर माझा क्रोध भडकेल आणि तो शांत होणार नाही.’”+ १८ पण ज्या यहूदाच्या राजाने तुम्हाला यहोवाकडे चौकशी करायला पाठवलंय, त्याला असं सांगा, की “तू जी वचनं ऐकलीस, त्यांबद्दल इस्राएलचा देव यहोवा म्हणतो: १९ ‘या जागेविषयी आणि इथल्या लोकांविषयी मी जे बोललो, म्हणजे हे लोक शापित होतील आणि यांना पाहून लोक घाबरतील असं मी जे बोललो, ते ऐकून तू यहोवासमोर नम्र झालास+ आणि आपलं हृदय कोमल केलंस; तू आपले कपडे फाडून माझ्यासमोर रडलास.+ म्हणून यहोवा म्हणतो, की मी तुझा धावा ऐकलाय; २० आणि त्यामुळे तू जिवंत आहेस तोपर्यंत मी या जागेवर संकट आणणार नाही. तू तुझ्या पूर्वजांकडे जाशील;* तू शांतीने आपल्या कबरेत जाशील.’”’” मग, त्या लोकांनी हा संदेश राजाला येऊन सांगितला.
२३ तेव्हा योशीया राजाने निरोप पाठवून यहूदा आणि यरुशलेम इथल्या सगळ्या वडीलजनांना बोलावून घेतलं.+ २ त्यानंतर यहूदातले सगळे पुरुष, यरुशलेमचे सर्व रहिवासी, याजक व संदेष्टे अशा सर्व लहानमोठ्या लोकांना सोबत घेऊन राजा यहोवाच्या मंदिरात गेला. मग त्याने यहोवाच्या मंदिरात सापडलेल्या+ कराराच्या+ पुस्तकातली सगळी वचनं त्यांच्यासमोर वाचली.+ ३ योशीया स्तंभाजवळ उभा राहिला आणि त्याने यहोवासमोर असा करार केला,*+ की तो यहोवाच्या सांगण्यानुसार चालेल आणि त्याच्या आज्ञा, स्मरण-सूचना* व कायदे यांचं पूर्ण मनाने व पूर्ण जिवाने पालन करेल; तसंच, या पुस्तकात लिहिलेल्या कराराच्या सर्व वचनांप्रमाणे तो वागेल. तेव्हा, सर्व लोकांनीही कराराप्रमाणे वागण्याचं कबूल केलं.+
४ त्यानंतर राजाने हिल्कीया+ महायाजक, इतर याजक आणि द्वारपाल यांना असा हुकूम दिला, की बआल दैवतासाठी, पूजेच्या खांबासाठी*+ आणि आकाशातल्या सैन्यासाठी बनवलेली सगळी भांडी त्यांनी यहोवाच्या मंदिरातून बाहेर आणावी. मग त्याने ती सगळी भांडी यरुशलेमच्या बाहेर, किद्रोनच्या उतारांवर नेऊन जाळून टाकली आणि त्यांची राख बेथेलला नेली.+ ५ त्याने परक्या देवांच्या पुजाऱ्यांना हाकलून लावलं; यहूदाच्या राजांनी या पुजाऱ्यांना यहूदाच्या शहरांमध्ये आणि यरुशलेमच्या आसपासच्या प्रदेशांत उपासनेच्या उच्च स्थानांवर* बलिदानांचं हवन करायला* नेमलं होतं. याशिवाय, जे लोक बआल दैवतासाठी आणि सूर्य, चंद्र, राशीचक्रातली नक्षत्रं व आकाशातलं सर्व सैन्य यांच्यासाठी बलिदानांचं हवन करत होते त्यांनाही योशीयाने हाकलून लावलं.+ ६ त्याने यहोवाच्या मंदिरात असलेला पूजेचा खांब*+ यरुशलेमच्या बाहेर, किद्रोन खोऱ्यात आणला आणि तिथे तो जाळून टाकला.+ त्यानंतर, त्याने त्याचा चुराडा केला आणि तो चुरा सामान्य लोकांच्या कबरींवर फेकून दिला.+ ७ तसंच, त्याने यहोवाच्या मंदिरात असलेली पुरुष-वेश्यांची+ घरंही पाडून टाकली; या घरांमध्ये स्त्रिया, पूजेच्या खांबासाठी* तंबूचं कापड विणायच्या.
८ मग योशीयाने यहूदाच्या शहरांतून सगळ्या याजकांना बाहेर आणलं. नंतर, गेबापासून+ बैर-शेबापर्यंत+ असलेल्या उच्च स्थानांवर उपासना केली जाऊ नये, म्हणून त्याने ती भ्रष्ट केली; कारण या उच्च स्थानांवर याजक बलिदानांचं हवन करायचे. तसंच, शहराचा प्रमुख यहोशवा याच्या दरवाजाजवळ असलेली उच्च स्थानंही त्याने पाडून टाकली; ही उच्च स्थानं, शहराच्या दरवाजातून प्रवेश करताना डाव्या बाजूला होती. ९ उच्च स्थानांवर सेवा करणारे याजक यरुशलेममधल्या यहोवाच्या वेदीसमोर सेवा करत नव्हते;+ पण आपल्या भाऊबंदांसोबत ते बेखमीर* भाकर खायचे. १० तसंच, योशीयाने ‘हिन्नोम वंशजांच्या खोऱ्यात’*+ असलेली तोफेत+ ही जागा भ्रष्ट करून टाकली; म्हणजे कोणालाही तिथे आपल्या मुलाचा किंवा मुलीचा मोलख दैवताला आगीत होम करता येणार नाही.*+ ११ यहूदाच्या राजांनी काही घोडे सूर्याला समर्पित केले होते; योशीयाने यहोवाच्या मंदिरात या घोड्यांच्या प्रवेशावर बंदी घातली. हे घोडे, वऱ्हांड्याजवळ असलेल्या नथन-मेलेक दरबाऱ्याच्या खोलीतून* प्रवेश करायचे. योशीयाने सूर्याला+ समर्पित असलेले रथसुद्धा जाळून टाकले. १२ याशिवाय, आहाजच्या वरच्या खोलीच्या छतावर यहूदाच्या राजांनी बांधलेल्या वेदी,+ आणि यहोवाच्या मंदिराच्या दोन्ही अंगणांत मनश्शेने बांधलेल्या वेदी योशीयाने पाडून टाकल्या.+ त्याने त्यांचा चुराडा केला आणि तो किद्रोनच्या खोऱ्यात फेकून दिला. १३ आणि यरुशलेमच्या समोर, म्हणजे ‘विनाश पर्वताच्या’* दक्षिणेला असलेल्या उच्च स्थानांवर उपासना केली जाऊ नये, म्हणून त्याने ती भ्रष्ट केली; ही उच्च स्थानं इस्राएलच्या शलमोन राजाने सीदोनी लोकांची घृणास्पद देवी अष्टारोथ, मवाबी लोकांचं घृणास्पद दैवत कमोश आणि अम्मोनी लोकांचं घृणास्पद दैवत+ मिलकोम+ यांच्यासाठी बांधली होती. १४ योशीयाने पूजेच्या स्तंभांचे तुकडे-तुकडे केले व पूजेचे खांब*+ तोडून टाकले, आणि त्यांच्या जागी माणसांची हाडं टाकली. १५ तसंच, नबाटचा मुलगा यराबाम याने बेथेलमध्ये जी वेदी व उच्च स्थान बांधून इस्राएलला पाप करायला लावलं होतं,+ ते योशीयाने पाडून टाकलं. नंतर त्याने ते उच्च स्थान जाळून टाकलं, तिथल्या सगळ्या गोष्टींचा चुराडा केला आणि पूजेचा खांबही*+ जाळून टाकला.
१६ नंतर योशीयाने वळून पाहिलं, तेव्हा त्याला डोंगरावर कबरी दिसल्या. त्याने त्या कबरींमधून हाडं बाहेर काढली आणि ती वेदीवर जाळून वेदी भ्रष्ट केली. अशा प्रकारे, खऱ्या देवाच्या माणसाने यहोवाचा जो संदेश आधीच सांगितला होता, त्याप्रमाणे हे घडलं.+ १७ मग योशीया म्हणाला: “ती तिथे कोणाची कबर आहे?” त्यावर शहरातली माणसं त्याला म्हणाली: “ती यहूदातल्या खऱ्या देवाच्या माणसाची कबर आहे.+ बेथेलमधल्या वेदीचं तुम्ही जे काही केलंत, त्याबद्दल त्याने आधीच सांगितलं होतं.” १८ तेव्हा योशीया म्हणाला: “त्याच्या अस्थींना हात लावू नका. त्या तशाच राहू द्या.” म्हणून त्यांनी त्याच्या आणि शोमरोनातल्या संदेष्ट्याच्या अस्थी तशाच राहू दिल्या.+
१९ शोमरोनच्या शहरांतल्या उच्च स्थानांवर बांधलेली सगळी देवळं योशीयाने पाडून टाकली.+ इस्राएलच्या राजांनी ही देवळं बांधून देवाचा क्रोध भडकवला होता. योशीयाने बेथेलमधल्या उच्च स्थानांचं जे केलं होतं, तेच या देवळांच्या बाबतीतही केलं.+ २० त्याने उच्च स्थानांवर सेवा करणाऱ्या सर्व याजकांना वेदींवर मारून टाकलं आणि त्यांवर माणसांची हाडं जाळली.+ त्यानंतर तो यरुशलेमला परत आला.
२१ मग राजाने सगळ्या लोकांना अशी आज्ञा दिली: “या कराराच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे,+ तुमचा देव यहोवा याच्यासाठी वल्हांडण सण पाळा.”+ २२ न्यायाधीश न्याय करायचे त्या काळापासून, तसंच इस्राएल आणि यहूदामध्ये राजे शासन करायचे त्या काळापासून आतापर्यंत कधीही असा वल्हांडण सण पाळण्यात आला नव्हता.+ २३ यहोवासाठी असलेला हा वल्हांडण सण, योशीया राजाच्या शासनकाळाच्या १८ व्या वर्षी यरुशलेममध्ये पाळला गेला.
२४ यासोबतच योशीयाने, यहूदाच्या प्रदेशातून व यरुशलेममधून ज्योतिषांना+ आणि भूतविद्या करणाऱ्यांना काढून टाकलं; तसंच, त्याने कुलदैवतांच्या मूर्ती,*+ घृणास्पद मूर्ती* आणि इतर सगळ्या घृणास्पद गोष्टीही तिथून काढून टाकल्या. हिल्कीया याजकाला यहोवाच्या मंदिरात जे नियमशास्त्राचं पुस्तक सापडलं होतं,+ त्यात लिहिलेल्या वचनांप्रमाणे करता यावं म्हणून योशीयाने हे सगळं केलं.+ २५ मोशेच्या नियमशास्त्राचं पालन करून आपल्या पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने+ आणि पूर्ण शक्तीने यहोवाकडे परत येणारा योशीयासारखा एकही राजा त्याच्याआधी नव्हता किंवा त्याच्यानंतरही कधी झाला नाही.
२६ पण तरीही, यहूदावर असलेला यहोवाचा क्रोध शांत झाला नाही; कारण मनश्शेने केलेल्या अनेक घृणास्पद गोष्टींमुळे त्याचा क्रोध भडकला होता.+ २७ यहोवा म्हणाला: “मी इस्राएलला जसं माझ्या नजरेसमोरून दूर केलं,+ तसं यहूदालाही करीन;+ आणि मी निवडलेल्या या यरुशलेम शहराचा व ज्या मंदिराबद्दल मी म्हणालो होतो, की ‘माझं नाव कायम तिथे राहील,’+ त्या मंदिराचाही मी त्याग करीन.”
२८ योशीयाबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याने जे काही केलं ते सर्व यहूदाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे. २९ योशीयाच्या काळात, फारो-नखो हा इजिप्तचा राजा अश्शूरच्या राजाला भेटायला फरात नदीकडे गेला. तेव्हा, योशीया राजा त्याच्याशी लढायला गेला. पण नखो राजाने योशीयाला पाहिलं आणि त्याला मगिद्दो+ इथे ठार मारलं. ३० मग, त्याच्या सेवकांनी त्याचा मृतदेह रथात ठेवून मगिद्दोमधून यरुशलेमला आणला, आणि त्याला त्याच्या कबरेत पुरलं. त्यानंतर देशातल्या लोकांनी योशीयाचा मुलगा यहोआहाज याचा अभिषेक केला आणि त्याला त्याच्या वडिलांच्या जागी राजा बनवलं.+
३१ यहोआहाज+ राजा बनला तेव्हा तो २३ वर्षांचा होता. त्याने यरुशलेममधून तीन महिने राज्य केलं. त्याच्या आईचं नाव हमूटल+ असून ती लिब्ना इथे राहणाऱ्या यिर्मयाची मुलगी होती. ३२ यहोआहाजसुद्धा आपल्या पूर्वजांप्रमाणेच यहोवाच्या नजरेत जे वाईट ते सर्व करू लागला.+ ३३ यहोआहाजने यरुशलेममध्ये राज्य करू नये, म्हणून फारो-नखो+ याने त्याला कैद करून हमाथ देशातल्या रिब्ला+ इथे तुरुंगात टाकलं. तसंच, त्याने देशावर १०० तालान्त* चांदी आणि एक तालान्त सोनं इतका दंड लावला.+ ३४ याशिवाय, फारो-नखो याने योशीयाचा मुलगा एल्याकीम याला त्याच्या वडिलांच्या, म्हणजे योशीयाच्या जागी राजा बनवलं; आणि त्याचं नाव बदलून यहोयाकीम असं ठेवलं. पण यहोआहाजला मात्र तो इजिप्तला घेऊन गेला.+ आणि शेवटी तिथेच यहोआहाजचा मृत्यू झाला.+ ३५ फोरोने लावलेला दंड भरण्यासाठी यहोयाकीमने फारोला चांदी व सोनं दिलं. पण त्यासाठी त्याला देशातल्या लोकांकडून कर वसूल करावा लागला. त्याने देशातल्या लोकांकडून त्यांच्या जमिनींच्या किंमतीप्रमाणे चांदी व सोनं वसूल केलं आणि ते फारो-नखोला दिलं.
३६ यहोयाकीम+ राजा बनला तेव्हा तो २५ वर्षांचा होता. त्याने ११ वर्षं यरुशलेममधून राज्य केलं.+ त्याच्या आईचं नाव जबूदा असून ती रुमा इथे राहणाऱ्या पदायाह याची मुलगी होती. ३७ आपल्या पूर्वजांप्रमाणेच+ यहोयाकीमसुद्धा यहोवाच्या नजरेत जे वाईट ते करत राहिला.+
२४ यहोयाकीमच्या काळात बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर+ याने यहूदावर हल्ला केला; आणि यहोयाकीम तीन वर्षं त्याच्या अधीन राहिला. पण तिसऱ्या वर्षी त्याने त्याच्याविरुद्ध बंड केलं. २ मग यहोवा सीरियाच्या लोकांच्या, तसंच खास्दी,*+ मवाबी आणि अम्मोनी लोकांच्या लूटमार करणाऱ्या टोळ्या यहोयाकीमविरुद्ध पाठवू लागला. यहोवाने आपल्या सेवाकांद्वारे, म्हणजे संदेष्ट्यांद्वारे सांगितलं होतं, त्याप्रमाणे यहूदाचा नाश करण्यासाठी तो या टोळ्यांना पाठवत राहिला.+ ३ यहूदाला आपल्या नजरेसमोरून दूर करण्यासाठी यहोवाच्या आज्ञेवरूनच हे सर्व झालं.+ मनश्शेने खूप मोठ्या प्रमाणावर पापं केली होती;+ ४ आणि त्याने संपूर्ण यरुशलेम निर्दोष लोकांच्या रक्ताने भरून टाकलं होतं.+ म्हणून यहोवा यहूदाला क्षमा करायला तयार नव्हता.+
५ यहोयाकीमबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याने जे काही केलं ते सर्व यहूदाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे.+ ६ मग यहोयाकीमचा मृत्यू झाला*+ आणि त्याच्या जागी त्याचा मुलगा यहोयाखीन राजा बनला.
७ बाबेलच्या राजाने, इजिप्तच्या ओढ्यापासून+ फरात नदीपर्यंत+ असलेला इजिप्तचा सगळा प्रदेश काबीज केला होता.+ त्यामुळे, इजिप्तच्या राजाने पुन्हा कधीही आपलं सैन्य देशाबाहेर लढाईसाठी पाठवलं नाही.
८ यहोयाखीन+ राजा बनला तेव्हा तो १८ वर्षांचा होता. त्याने यरुशलेममधून तीन महिने राज्य केलं.+ त्याच्या आईचं नाव नेहूष्टा असून ती यरुशलेममध्ये राहणाऱ्या एलनाथानची मुलगी होती. ९ यहोयाखीन आपल्या वडिलांप्रमाणेच यहोवाच्या नजरेत जे वाईट ते करत राहिला. १० त्या काळात बाबेलच्या राजाचं, म्हणजे नबुखद्नेस्सरचं सैन्य यरुशलेमवर हल्ला करायला आलं, आणि त्या सैन्याने येऊन शहराला वेढा घातला.+ ११ सैन्याने शहराला वेढा घातलेला असताना, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरही तिथे आला.
१२ तेव्हा यहूदाचा राजा यहोयाखीन हा आपले सेवक, अधिकारी, दरबारी आणि आपली आई या सगळ्यांना घेऊन+ बाबेलच्या राजाला शरण गेला;+ बाबेलच्या राजाने आपल्या शासनकाळाच्या आठव्या वर्षी यहोयाखीनला बंदी बनवून नेलं.+ १३ त्याने यहोवाच्या मंदिरात आणि राजमहालात असलेला सगळा खजिना लुटला.+ तसंच, इस्राएलचा राजा शलमोन याने यहोवाच्या मंदिरासाठी जी सोन्याची भांडी बनवली होती,+ त्या सगळ्या भांड्यांचे त्याने तुकडे-तुकडे केले. यहोवाने भविष्यवाणी केली होती त्याप्रमाणेच हे सर्व घडलं. १४ नबुखद्नेस्सरने यरुशलेममधल्या सगळ्यांना, म्हणजे सर्व अधिकारी,*+ शूर योद्धे आणि सर्व कारागीर व लोहार* यांना बंदी बनवून नेलं;+ अशा एकूण १०,००० जणांना त्याने बंदी बनवून नेलं. देशात फक्त गरीब व कंगाल लोक उरले.+ १५ अशा प्रकारे, बाबेलच्या राजाने यहोयाखीन+ राजाला, त्याच्या आईला, बायकांना, दरबाऱ्यांना आणि देशातल्या सगळ्या प्रतिष्ठित माणसांना यरुशलेममधून बाबेलला बंदिवासात नेलं.+ १६ याशिवाय, त्याने सर्व ७,००० योद्धे आणि १,००० कारागीर व लोहार* यांनाही बंदी बनवून बाबेलला नेलं. ही सगळी माणसं शूरवीर असून युद्धासाठी प्रशिक्षित केलेली होती. १७ बाबेलच्या राजाने यहोयाखीनचा काका मत्तन्याह याला यहोयाखीनच्या जागी राजा बनवलं.+ त्याने त्याचं नाव बदलून सिद्कीया असं ठेवलं.+
१८ सिद्कीया राजा बनला तेव्हा तो २१ वर्षांचा होता. त्याने ११ वर्षं यरुशलेममधून राज्य केलं. त्याच्या आईचं नाव हमूटल+ असून ती लिब्ना इथे राहणाऱ्या यिर्मयाची मुलगी होती. १९ यहोयाखीनप्रमाणेच सिद्कीया यहोवाच्या नजरेत जे वाईट ते करत राहिला.+ २० यरुशलेममध्ये आणि यहूदामध्ये या सगळ्या गोष्टी घडल्या, कारण यहोवाचा क्रोध त्यांच्यावर भडकला होता; आणि शेवटी त्याने त्यांना आपल्या नजरेसमोरून दूर करून टाकलं.+ पुढे सिद्कीयाने बाबेलच्या राजाविरुद्ध बंड केलं.+
२५ सिद्कीया राजाच्या शासनकाळाच्या नवव्या वर्षी, दहाव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर+ आपलं सगळं सैन्य घेऊन यरुशलेमवर हल्ला करायला आला.+ त्याने येऊन शहरासमोर छावणी दिली आणि वेढा घालण्यासाठी शहराभोवती भिंत उभारली.+ २ शहराला पडलेला हा वेढा, सिद्कीया राजाच्या शासनकाळाच्या ११ व्या वर्षापर्यंत राहिला. ३ मग चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी, जेव्हा शहरातला दुष्काळ भयंकर वाढला होता+ आणि लोकांकडे खायला काहीही उरलं नव्हतं,+ ४ तेव्हा शहराच्या भिंतीचा काही भाग पाडण्यात आला.+ खास्दी* लोकांनी शहराला वेढा घातलेला असताना, शहरातले सर्व सैनिक राजाच्या बागेजवळ असलेल्या दोन भिंतींच्या मधल्या दरवाजातून रातोरात पळून गेले. आणि राजाही अराबाकडे जाणाऱ्या रस्त्याने पळाला.+ ५ पण खास्दी लोकांच्या सैन्याने राजाचा पाठलाग केला आणि यरीहोच्या ओसाड रानात त्याला गाठलं. तेव्हा राजाचे सर्व सैनिक त्याला सोडून इकडे-तिकडे पळून गेले. ६ मग त्यांनी सिद्कीया राजाला कैद करून+ रिब्ला इथे बाबेलच्या राजाकडे आणलं; तिथे त्याला शिक्षा सुनावण्यात आली. ७ त्यांनी सिद्कीयासमोर त्याच्या मुलांना मारून टाकलं. नंतर नबुखद्नेस्सरने सिद्कीयाचे डोळे फोडले आणि त्याला तांब्याच्या बेड्या घालून बाबेलला आणलं.+
८ मग पाचव्या महिन्याच्या सातव्या दिवशी, म्हणजे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याच्या शासनकाळाच्या १९ व्या वर्षी, नबुजरदान+ यरुशलेममध्ये आला;+ तो बाबेलच्या राजाचा सेवक असून त्याच्या रक्षकांचा प्रमुख होता. ९ त्याने यरुशलेममधलं यहोवाचं मंदिर,+ राजाचा महाल+ आणि तिथली सगळी घरं जाळून टाकली.+ तसंच, त्याने तिथल्या प्रत्येक प्रतिष्ठित माणसाचं घरही जाळून टाकलं.+ १० मग रक्षकांच्या प्रमुखासोबत असलेल्या खास्द्यांच्या सैन्याने यरुशलेमभोवती असलेली तटाची भिंत पाडून टाकली.+ ११ रक्षकांचा प्रमुख नबुजरदान याने शहरात उरलेल्या लोकांना बंदी बनवून नेलं. तसंच, त्याने बाबेलच्या राजाच्या बाजूने झालेल्या लोकांना आणि शहरात असलेल्या इतर लोकांनाही बंदी बनवून नेलं.+ १२ पण देशात उरलेल्या काही गरीब व कंगाल लोकांना मात्र त्याने द्राक्षमळ्यांत काम करण्यासाठी आणि सक्तीची मजुरी करण्यासाठी मागे ठेवलं.+ १३ खास्दी लोकांनी यहोवाच्या मंदिरात असलेले तांब्याचे स्तंभ+ फोडून त्यांचे तुकडे-तुकडे केले. तसंच, त्यांनी यहोवाच्या मंदिरात असलेल्या तांब्याच्या गाड्या+ आणि तांब्याचा गंगाळ-सागर+ यांचेही तुकडे-तुकडे करून टाकले. त्यानंतर हे सगळं तांबं घेऊन ते बाबेलला गेले.+ १४ याशिवाय, मंदिरात वापरले जाणारे प्याले, फावडी, आग विझवायच्या कातरी, राख काढायच्या बादल्या आणि सर्व तांब्याची भांडी ते घेऊन गेले. १५ तसंच, शुद्ध सोन्या-चांदीने बनवलेली धूप जाळण्याची पात्रं आणि कटोरेही रक्षकांचा प्रमुख घेऊन गेला.+ १६ शलमोनने यहोवाच्या मंदिरासाठी जे दोन स्तंभ, गंगाळ-सागर आणि तांब्याच्या गाड्या बनवल्या होत्या, त्या सगळ्यांच्या तांब्याचं वजन इतकं होतं, की ते मोजताही येत नव्हतं.+ १७ प्रत्येक स्तंभाची उंची १८ हात* असून+ त्यावर तीन हात उंचीचा तांब्याचा कळस होता. कळसाभोवती असलेली जाळी व डाळिंबांची नक्षीसुद्धा तांब्याची होती.+ दुसरा स्तंभही असाच होता.
१८ रक्षकांच्या प्रमुखाने मुख्य याजक सराया,+ सहायक याजक सफन्या+ आणि तीन द्वारपाल यांना बंदी बनवून नेलं.+ १९ तसंच, त्याने सैनिकांवर अधिकारी असलेल्या दरबाऱ्याला आणि शहरात असलेल्या राजाच्या पाच खास सल्लागारांनाही बंदी बनवून नेलं; याशिवाय, देशातल्या सैन्याची जमवाजमव करणाऱ्या सेनापतीच्या सचिवाला आणि शहरात सापडलेल्या ६० सामान्य माणसांनाही तो घेऊन गेला. २० या सगळ्यांना घेऊन रक्षकांचा प्रमुख नबुजरदान+ हा रिब्ला इथे बाबेलच्या राजाकडे आला.+ २१ तेव्हा, बाबेलच्या राजाने त्या सर्वांना हमाथ+ देशातल्या रिब्ला इथे मारून टाकलं. अशा प्रकारे, यहूदाच्या लोकांना त्यांच्या देशातून कैद करून बंदिवासात नेण्यात आलं.+
२२ बाबेलच्या नबुखद्नेस्सर राजाने गदल्या+ याला यहूदाच्या देशात मागे ठेवलेल्या लोकांवर अधिकारी म्हणून नेमलं;+ गदल्या हा अहीकामचा+ मुलगा आणि शाफानचा+ नातू होता. २३ बाबेलच्या राजाने गदल्याला अधिकारी म्हणून नेमलं आहे, हे सर्व सेनाधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या माणसांनी ऐकलं, तेव्हा ते लगेच गदल्याकडे मिस्पा इथे आले; नथन्याचा मुलगा इश्माएल, कारेहचा मुलगा योहानान, नटोफा इथे राहणारा तन्हूमेथचा मुलगा सराया आणि एका माकाथी माणसाचा मुलगा याजन्या, हे सर्व आपल्या माणसांना घेऊन गदल्याकडे आले.+ २४ तेव्हा गदल्या त्या सेनाधिकाऱ्यांना आणि त्यांच्या माणसांना शपथ घेऊन म्हणाला: “खास्दी लोकांचे सेवक बनायला घाबरू नका. या देशात राहा आणि बाबेलच्या राजाची सेवा करा, म्हणजे तुमचं भलं होईल.”+
२५ मग सातव्या महिन्यात नथन्याचा मुलगा, म्हणजे अलीशामाचा नातू इश्माएल+ हा दहा माणसांना सोबत घेऊन आला; तो राजवंशातला होता. त्यांनी येऊन गदल्याला आणि त्याच्यासोबत मिस्पामध्ये असलेल्या यहुद्यांना व खास्दी लोकांना मारून टाकलं.+ २६ तेव्हा खास्दी लोकांच्या भीतीमुळे,+ छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळे लोक आणि सगळे सेनाधिकारी इजिप्तला पळून गेले.+
२७ यहूदाचा राजा यहोयाखीन+ याच्या बंदिवासाच्या ३७ व्या वर्षी, अवील-मरोदख हा बाबेलचा राजा बनला. त्याच वर्षाच्या १२ व्या महिन्याच्या २७ व्या दिवशी त्याने यहोयाखीनला तुरुंगातून बाहेर काढलं.+ २८ अवील-मरोदखने त्याला चांगली वागणूक दिली आणि त्याला बाबेलमधल्या इतर राजांपेक्षा जास्त मानाचं पद दिलं. २९ यहोयाखीनने आपले तुरुंगातले कपडे बदलले आणि तो आयुष्यभर बाबेलच्या राजासोबत त्याच्या मेजावर जेवू लागला. ३० यहोयाखीन जिवंत होता तोपर्यंत बाबेलचा राजा त्याला दररोज अन्न पुरवत राहिला.
ही कदाचित, सूर्यप्रकाश येण्यासाठी छताला असलेल्या झरोक्यावरची लाकडी जाळी असावी.
शब्दार्थसूची पाहा.
म्हणजे “माझा देव यहोवा आहे.”
म्हणजे, अहज्याचा भाऊ.
“संदेष्ट्यांचे पुत्र” हा वाक्यांश संदेष्ट्यांच्या समूहाला किंवा प्रशिक्षण मिळणाऱ्या संदेष्ट्यांच्या गटाला सूचित करत असावा.
किंवा “संदेष्ट्याचा झगा.”
ही देवाची पवित्र शक्ती असू शकते किंवा एलीयाचा स्वभाव असू शकतो.
किंवा “संदेष्ट्याचा झगा.”
किंवा कदाचित, “आणि त्यामुळे देशात गर्भपात होतात.”
किंवा कदाचित, “गर्भपात होणार नाहीत.”
किंवा “खंडणी.”
किंवा “एलीयाचा सेवक.”
किंवा “मला तुझ्याशी काय घेणंदेणं?”
शब्दशः “ज्याच्यासमोर मी उभा राहतो.”
शब्दशः “हात.”
शब्दार्थसूची पाहा.
“संदेष्ट्यांचे पुत्र” हा वाक्यांश संदेष्ट्यांच्या समूहाला किंवा प्रशिक्षण मिळणाऱ्या संदेष्ट्यांच्या गटाला सूचित करत असावा.
किंवा “सुरईत.”
चंद्राची पहिली कोर दिसते तो दिवस.
किंवा “त्याला एक प्रकारचा त्वचारोग होता.” शब्दार्थसूचीत “कुष्ठरोग” पाहा.
हा कदाचित नामान असावा.
एक तालान्त म्हणजे ३४.२ किलो. अति. ख१४ पाहा.
शब्दशः “माझ्या पित्या.”
शब्दशः “ज्याच्यासमोर मी उभा राहतो.”
“संदेष्ट्यांचे पुत्र” हा वाक्यांश संदेष्ट्यांच्या समूहाला किंवा प्रशिक्षण मिळणाऱ्या संदेष्ट्यांच्या गटाला सूचित करत असावा.
शोमरोनातलं एक ठिकाण; कदाचित एक टेकडी किंवा तटबंदी असलेलं ठिकाण.
शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “हिम.”
“संदेष्ट्यांचे पुत्र” हा वाक्यांश संदेष्ट्यांच्या समूहाला किंवा प्रशिक्षण मिळणाऱ्या संदेष्ट्यांच्या गटाला सूचित करत असावा.
एक काब म्हणजे १.२२ ली. अति. ख१४ पाहा.
किंवा “बाजारांत.”
एक शेकेल म्हणजे ११.४ ग्रॅम. अति. ख१४ पाहा.
सुमारे ४ किलो चांगलं पीठ. अति. ख१४ पाहा.
सुमारे १० किलो. अति. ख१४ पाहा.
किंवा “मिसरच्या.”
किंवा “ठेवली.”
शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”
शब्दशः “मुलगी.”
किंवा “आजारी असल्यामुळे.”
“संदेष्ट्यांचे पुत्र” हा वाक्यांश संदेष्ट्यांच्या समूहाला किंवा प्रशिक्षण मिळणाऱ्या संदेष्ट्यांच्या गटाला सूचित करत असावा.
किंवा “डोळे रंगवून.”
किंवा “नीतिमान.”
किंवा “आशीर्वाद दिला.”
किंवा “मी यहोवाविरुद्ध कोणताही अविश्वासूपणा कसा खपवून घेत नाही ते बघ.”
शब्दशः “शहर,” कदाचित किल्ल्यासारखी मजबूत इमारत.
किंवा “देश छाटू लागला.”
शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”
शाही अंगरक्षक म्हणून काम करणारी सैनिकांची तुकडी.
कदाचित देवाचं नियमशास्त्र असलेली गुंडाळी.
शाही अंगरक्षक म्हणून काम करणारी सैनिकांची तुकडी.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “धूर वर जाण्यासाठी बलिदानं जाळत होते.”
शब्दशः “ओळखीच्या लोकांकडून.”
किंवा “भेगा पडल्या असतील.”
किंवा “थैल्यांमध्ये टाकायचे.” शब्दशः “बांधायचे.”
किंवा “टेकडीवरचा किल्ला.”
शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”
शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”
म्हणजे, यराबाम दुसरा.
किंवा “त्याला हरवशील.”
कदाचित वसंत ऋतूत.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “धूर वर जाण्यासाठी बलिदानं जाळत होते.”
सुमारे १७८ मी. (५८४ फूट). अति. ख१४ पाहा.
शब्दशः “तो आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”
म्हणजे, यराबाम दुसरा.
म्हणजे, “यहोवाने मदत केली आहे.” २रा १५:१३; २इति २६:१-२३; यश ६:१; आणि जख १४:५ या वचनांत त्याला उज्जीया म्हटलं आहे.
शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजल्यानंतर.”
किंवा “हमाथच्या प्रवेशद्वारापासून.”
म्हणजे, क्षार समुद्र, किंवा मृत समुद्र.
शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”
म्हणजे, यराबाम दुसरा.
म्हणजे, “यहोवाने मदत केली आहे.” २रा १५:१३; २इति २६:१-२३; यश ६:१; आणि जख १४:५ या वचनांत त्याला उज्जीया म्हटलं आहे.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “धूर वर जाण्यासाठी बलिदानं जाळत होते.”
शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”
एक तालान्त म्हणजे ३४.२ किलो. अति. ख१४ पाहा.
एक शेकेल म्हणजे ११.४ ग्रॅम. अति. ख१४ पाहा.
शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”
शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”
शब्दशः “अग्नीतून पार केलं.”
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “धूर वर जाण्यासाठी बलिदानं जाळत राहिला.”
किंवा “यहूदाच्या लोकांना.”
शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”
म्हणजे, “यहोवा बळ देतो.”
किंवा “कर, खंडणी.”
म्हणजे, प्रत्येक ठिकाणी; मग तिथे कमी लोकवस्ती असो किंवा जास्त लोकवस्ती असो.
शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
इथे वापरलेला हिब्रू शब्द, “विष्ठा” या अर्थाच्या शब्दाशी संबंधित असावा आणि तो तिरस्कार दाखवण्यासाठी वापरला जातो.
शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “अग्नीतून पार केलं.”
शब्दशः “स्वतःला विकून टाकलं.”
किंवा “उपासना करत नव्हते.”
किंवा “उपासना कशी करायची.”
शब्दार्थसूची पाहा.
हे अबीया नावाचं छोटं रूप आहे.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “धूर वर जाण्यासाठी बलिदानं जाळत होते.”
किंवा “तांब्याच्या सापाची मूर्ती.”
म्हणजे, प्रत्येक ठिकाणी; मग तिथे कमी लोकवस्ती असो किंवा जास्त लोकवस्ती असो.
एक तालान्त म्हणजे ३४.२ किलो. अति. ख१४ पाहा.
किंवा “सेनापती.”
किंवा “मुख्य दरबारी.”
किंवा “मुख्य प्यालेबरदार.”
किंवा “कालव्याजवळ.”
किंवा “बोरू.”
किंवा “सीरियाच्या.”
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “अपमानाचा.”
किंवा कदाचित, “करुबांच्या मधे.”
किंवा “नाईल नदीचे कालवे.”
म्हणजे, हिज्कीया.
किंवा “खाली पडलेल्या धान्यातून उगवलेलं.”
किंवा “गळवावर.”
कदाचित या जिन्याचा उपयोग एखाद्या सूर्य-घड्याळाप्रमाणे (शंकुयंत्राप्रमाणे) वेळ पाहण्यासाठी केला जात असावा.
किंवा “बॅबिलॉनचा.”
किंवा “त्यांचं ऐकलं.”
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “खरेपणा.”
किंवा “कालवा.”
शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”
शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “अग्नीतून पार केलं.”
शब्दार्थसूची पाहा.
इथे वापरलेला हिब्रू शब्द, “विष्ठा” या अर्थाच्या शब्दाशी संबंधित असावा आणि तो तिरस्कार दाखवण्यासाठी वापरला जातो.
शब्दशः “त्याचे दोन्ही कान भणभणतील.”
भिंत सरळ रेषेत बांधली जात आहे की नाही हे पाहण्याचं साधन.
शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”
काव्यात मरणाला सूचित करणारा वाक्यांश.
किंवा “पुन्हा करार केला.”
शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “धूर वर जाण्यासाठी बलिदानं जाळायला.”
शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूचीत “गेहन्ना” पाहा.
शब्दशः “अग्नीतून पार करता येणार नाही.”
किंवा “जेवणाच्या खोलीतून.”
म्हणजे, जैतुनांचा डोंगर; खासकरून दक्षिणेकडच्या टोकाचा तो भाग ज्याला ‘अपराधाचा डोंगर’ असंही म्हटलं जातं.
शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “तेराफीम मूर्ती.”
इथे वापरलेला हिब्रू शब्द, “विष्ठा” या अर्थाच्या शब्दाशी संबंधित असावा आणि तो तिरस्कार दाखवण्यासाठी वापरला जातो.
एक तालान्त म्हणजे ३४.२ किलो. अति. ख१४ पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”
किंवा “राजपुत्र.”
किंवा कदाचित, “सुरक्षा-भिंत बांधणारे.”
किंवा कदाचित, “सुरक्षा-भिंत बांधणारे.”
शब्दार्थसूची पाहा.
एक हात म्हणजे ४४.५ सें.मी. (१७.५ इंच). अति. ख१४ पाहा.