लेवीय
१ मग यहोवाने* मोशेला बोलावलं आणि तो भेटमंडपातून त्याच्याशी बोलला+ आणि म्हणाला: २ “इस्राएली लोकांशी* बोल आणि त्यांना सांग, की ‘तुमच्यापैकी कोणी आपल्या जनावरांतून यहोवासाठी एखादं अर्पण आणलं, तर तुम्ही ते गुराढोरांच्या कळपातून किंवा बकऱ्यांच्या वा मेंढरांच्या कळपातून आणावं.+
३ जर त्याचं अर्पण हे गुराढोरांच्या कळपातलं होमार्पण असेल, तर त्याने कोणताही दोष नसलेला नर आणावा.+ त्याने भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ स्वेच्छेने+ तो यहोवासमोर आणावा. ४ त्याने होमार्पण म्हणून आणलेल्या प्राण्याच्या डोक्यावर हात ठेवावा, म्हणजे तो त्याच्यासाठी प्रायश्चित्त म्हणून स्वीकारला जाईल.
५ त्यानंतर तो गोऱ्हा* यहोवासमोर कापावा. मग याजक,+ म्हणजे अहरोनची मुलं त्याचं रक्त आणून, भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ असलेल्या वेदीच्या सभोवती ते शिंपडतील.+ ६ होमार्पण म्हणून आणलेल्या प्राण्याची कातडी काढून त्याचे तुकडे करावेत.+ ७ याजकांनी, म्हणजे अहरोनच्या मुलांनी वेदीवर आग पेटवावी+ आणि आगीवर लाकडं रचून ठेवावीत. ८ मग अर्पण म्हणून आणलेल्या प्राण्याच्या शरीराचे तुकडे, तसंच, त्याचं डोकं आणि त्याच्या गुरद्यांवरची चरबी याजकांनी, म्हणजे अहरोनच्या मुलांनी वेदीच्या आगीवर असलेल्या लाकडांवर ठेवावी.+ ९ त्याची आतडी आणि पाय पाण्याने धुवावेत आणि याजकाने हे सर्व वेदीवर होमार्पण म्हणून जाळावं.* हे अग्नीत जाळून केलेलं अर्पण आहे आणि त्याच्या सुवासाने यहोवाला आनंद होईल.*+
१० जर त्याचं अर्पण हे बकऱ्यांच्या वा मेंढरांच्या कळपातलं+ होमार्पण असेल, तर त्याने कोणताही दोष नसलेला नर आणावा.+ ११ त्या प्राण्याला वेदीच्या उत्तरेकडे यहोवासमोर कापावं आणि याजकांनी, म्हणजे अहरोनच्या मुलांनी त्याचं रक्त वेदीच्या सभोवती शिंपडावं.+ १२ मग प्राण्याच्या शरीराचे तुकडे करावेत, आणि याजकाने हे तुकडे, तसंच त्याचं डोकं आणि त्याच्या गुरद्यांवरची चरबी वेदीच्या आगीवर असलेल्या लाकडांवर ठेवावी. १३ त्याची आतडी आणि पाय पाण्याने धुवावेत आणि याजकाने हे सर्व आणून वेदीवर जाळावं. हे एक होमार्पण, म्हणजे अग्नीत जाळून केलेलं अर्पण आहे आणि त्याच्या सुवासाने यहोवाला आनंद होईल.*
१४ पण जर त्याला यहोवासाठी पक्ष्यांचं होमार्पण करायचं असेल, तर त्याने पारवे किंवा कबुतराची पिल्लं अर्पण म्हणून आणावीत.+ १५ याजकाने तो पक्षी वेदीजवळ आणून त्याची मान तोडावी आणि त्याला वेदीवर जाळावं. पण, त्याचं रक्त वेदीच्या बाजूला वाहू द्यावं. १६ त्याने त्याच्या गळ्यातली पिशवी आणि त्याची पिसं काढून, ती पूर्वेकडे, वेदीच्या बाजूला राख* टाकतात तिथे फेकून द्यावी.+ १७ त्याने त्याला पंखांच्या मधोमध कापावं, पण त्याचे दोन भाग करू नयेत. मग याजकाने त्याला वेदीच्या आगीवर असलेल्या लाकडांवर जाळावं. हे एक होमार्पण, म्हणजे अग्नीत जाळून केलेलं अर्पण आहे आणि त्याच्या सुवासाने यहोवाला आनंद होईल.*
२ जर कोणी यहोवासाठी अन्नार्पण+ आणलं, तर ते चांगल्या पिठाचं असावं आणि त्याने त्यावर तेल ओतून ऊद* ठेवावा.+ २ मग त्याने ते याजकांकडे, म्हणजे अहरोनच्या मुलांकडे आणावं. तेव्हा याजक त्यातून मूठभर चांगलं पीठ, तेल आणि सगळा ऊद काढून घेईल आणि ते अर्पणाचं प्रतीक* म्हणून वेदीवर जाळेल.+ हे अग्नीत जाळून केलेलं अर्पण आहे आणि त्याच्या सुवासाने यहोवाला आनंद होईल.* ३ अन्नार्पणाचा उरलेला भाग अहरोनचा आणि त्याच्या मुलांचा असेल.+ हा यहोवासाठी अग्नीत जाळून केलेल्या अर्पणांतला भाग आहे आणि तो परमपवित्र आहे.+
४ जर तू भट्टीत भाजलेलं अन्नार्पण आणलंस, तर चांगल्या पिठाच्या तेलात मळलेल्या बेखमीर* भाकरी किंवा तेल लावलेल्या बेखमीर पापड्या आण.+
५ जर तू तव्यावर भाजलेलं अन्नार्पण आणलंस,+ तर ते तेलात मळलेल्या चांगल्या, बेखमीर पिठाचं असावं. ६ त्याचे तुकडे करून त्यावर तेल ओतावं.+ हे एक अन्नार्पण आहे.
७ जर तू कढईत तळलेलं अन्नार्पण आणलंस, तर ते तेलात मळलेल्या चांगल्या पिठाचं असावं. ८ यांपासून बनवलेलं अन्नार्पण तू यहोवासाठी आणावं आणि ते याजकाकडे द्यावं, म्हणजे याजक ते वेदीजवळ नेईल. ९ मग याजक त्या अन्नार्पणातलं काही अर्पणाचं प्रतीक*+ म्हणून घेईल आणि वेदीवर जाळेल. ते अग्नीत जाळून केलेलं अर्पण आहे आणि त्याच्या सुवासाने यहोवाला आनंद होईल.*+ १० या अन्नार्पणाचा उरलेला भाग अहरोनचा आणि त्याच्या मुलांचा असेल. हा यहोवासाठी अग्नीत जाळून केलेल्या अर्पणांतला भाग आहे आणि तो परमपवित्र आहे.+
११ यहोवासाठी तुम्ही आणलेल्या कोणत्याही अन्नार्पणात खमीर* नसावं.+ खमीर आणि मध यहोवासाठी अर्पण म्हणून अग्नीत कधीच जाळू नका.
१२ तुम्ही या वस्तू पहिल्या पिकाचं अर्पण+ म्हणून यहोवासाठी आणू शकता, पण त्या कधीही सुवासासाठी* वेदीवर जाळल्या जाऊ नयेत.
१३ तू दिलेल्या प्रत्येक अन्नार्पणात मीठ असावं; तुझ्या अन्नार्पणात देवाच्या कराराची आठवण करून देणारं मीठ घालायला विसरू नकोस. तुझ्या प्रत्येक अर्पणासोबत तू मीठ अर्पण कर.+
१४ जर तुला यहोवासाठी पहिल्या पिकातलं काही अन्नार्पण म्हणून आणायचं असेल, तर तू आगीवर भाजलेल्या हिरव्या कणसांचे दाणे भरडून, पहिल्या पिकाचं अन्नार्पण म्हणून ते द्यावेत.+ १५ तू त्यावर तेल ओतून ऊद ठेवावा. हे एक अन्नार्पण आहे. १६ भरडलेले दाणे आणि तेल यांतलं काही, तसंच सगळा ऊद, अर्पणाचं प्रतीक*+ म्हणून याजक जाळेल. हे यहोवासाठी अग्नीत जाळून केलेलं अर्पण आहे.
३ जर कोणाला आपल्या गुराढोरांच्या कळपातून शांती-अर्पण द्यायचं असेल,+ तर त्याने एक नर किंवा मादी आणावी. त्याने कोणताही दोष नसलेला प्राणी यहोवासमोर आणावा. २ त्याने अर्पण म्हणून आणलेल्या प्राण्याच्या डोक्यावर हात ठेवावा. मग तो प्राणी भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ कापावा; त्यानंतर याजक, म्हणजे अहरोनची मुलं त्या प्राण्याचं रक्त वेदीच्या सभोवती शिंपडतील. ३ शांती-अर्पणातले हे भाग यहोवासाठी अग्नीत जाळून केलेलं अर्पण म्हणून दिले जावेत:+ आतड्यांवर आणि त्यांच्या आजूबाजूला असलेली चरबी,+ ४ तसंच दोन्ही गुरदे आणि त्यांवर असलेली कमरेजवळची चरबी. गुरद्यांसोबतच यकृतावरची चरबीही काढावी.+ ५ अहरोनच्या मुलांनी हे सर्व वेदीच्या आगीवर असलेल्या लाकडांवरच्या होमार्पणावर जाळावं.+ हे अग्नीत जाळून केलेलं अर्पण आहे आणि त्याच्या सुवासाने यहोवाला आनंद होईल.*+
६ जर कोणाला बकऱ्यांच्या वा मेंढरांच्या कळपातून यहोवाला शांती-अर्पण द्यायचं असेल, तर त्याने एक नर किंवा मादी आणावी. त्याने कोणताही दोष नसलेला प्राणी आणावा.+ ७ जर त्याला अर्पण म्हणून मेंढा द्यायचा असेल, तर त्याने तो यहोवासमोर आणावा. ८ त्याने अर्पण म्हणून आणलेल्या प्राण्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा. मग तो प्राणी भेटमंडपासमोर कापावा; यानंतर अहरोनची मुलं त्या प्राण्याचं रक्त वेदीच्या सभोवती शिंपडतील. ९ यहोवासाठी अग्नीत जाळून केलेलं अर्पण म्हणून शांती-अर्पणातली चरबी आणावी.+ मणक्याजवळचं संपूर्ण चरबीदार शेपूट, तसंच आतड्यांवर आणि त्यांच्या आजूबाजूला असलेली चरबी, १० तसंच दोन्ही गुरदे आणि त्यांवर असलेली कमरेजवळची चरबी काढावी. गुरद्यांसोबतच यकृतावरची चरबीही काढावी.+ ११ मग याजकाने हे सर्व वेदीवर अन्न* म्हणून जाळावं. हे यहोवासाठी अग्नीत जाळून केलेलं अर्पण आहे.+
१२ जर त्याला बकरा अर्पण करायचा असेल, तर त्याने तो यहोवासमोर आणावा. १३ त्याने अर्पण म्हणून आणलेल्या प्राण्याच्या डोक्यावर हात ठेवावा. मग तो प्राणी भेटमंडपासमोर कापावा; त्यानंतर अहरोनची मुलं त्या प्राण्याचं रक्त वेदीच्या सभोवती शिंपडतील. १४ यहोवासाठी अग्नीत जाळून केलेलं अर्पण म्हणून हे भाग आणावेत: आतड्यांवर आणि त्यांच्या आजूबाजूला असलेली चरबी,+ १५ तसंच दोन्ही गुरदे आणि त्यांवर असलेली कमरेजवळची चरबी. गुरद्यांसोबतच यकृतावरची चरबीही काढावी. १६ मग याजकाने हे सर्व वेदीवर अन्न* म्हणून जाळावं. हे सुवासासाठी* अग्नीत जाळून केलेलं अर्पण आहे. सगळी चरबी यहोवाची आहे.+
१७ तुमच्या सगळ्या वस्त्यांमध्ये, पिढ्या न् पिढ्या पाळण्याचा हा कायमचा नियम आहे: तुम्ही कोणत्याही प्रकारची चरबी किंवा रक्त मुळीच खाऊ नका.’”+
४ मग यहोवा मोशेला म्हणाला: २ “इस्राएली लोकांना सांग, ‘यहोवाने ज्या गोष्टी करण्याची मनाई केली आहे, त्यांपैकी चुकून एखादी गोष्ट करून जर कोणी* पाप केलं+ तर असं केलं जावं:
३ जर अभिषिक्त याजकाने*+ पाप करून+ लोकांवर दोष आणला, तर त्याने आपल्या पापाबद्दल, कोणताही दोष नसलेला एक गोऱ्हा* पापार्पण म्हणून यहोवासाठी आणावा.+ ४ त्याने गोऱ्हा भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ यहोवासमोर आणावा+ आणि गोऱ्ह्याच्या डोक्यावर हात ठेवावा. मग त्याने तो यहोवासमोर कापावा.+ ५ यानंतर अभिषिक्त याजकाने+ गोऱ्ह्याचं काही रक्त घेऊन ते भेटमंडपात आणावं. ६ याजकाने आपलं बोट त्या रक्तात बुडवून,+ काही रक्त पवित्र ठिकाणाच्या पडद्यासमोर यहोवापुढे सात वेळा शिंपडावं.+ ७ मग याजकाने काही रक्त भेटमंडपात यहोवासमोर असलेल्या धूपवेदीच्या शिंगांनाही लावावं;+ गोऱ्ह्याचं उरलेलं सगळं रक्त त्याने भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ असलेल्या होमार्पणाच्या वेदीच्या पायथ्याशी ओतावं.+
८ मग त्याने पापार्पणाच्या गोऱ्ह्याची सगळी चरबी, म्हणजेच आतड्यांवर आणि त्यांच्या आजूबाजूला असलेली चरबी काढावी. ९ तसंच, त्याने दोन्ही गुरदे व त्यांवर असलेली कमरेजवळची चरबी आणि गुरद्यांसोबतच यकृतावरची चरबीही काढावी.+ १० शांती-अर्पणाच्या+ गोऱ्ह्याच्या बाबतीत केलं जातं, तसंच या गोऱ्ह्याच्या बाबतीतही केलं जावं. मग याजकाने हे भाग होमार्पणाच्या वेदीवर जाळावेत.
११ पण गोऱ्ह्याची कातडी, त्याचं सगळं मांस, त्याचं डोकं, पाय, आतडी आणि शेण+ १२ म्हणजे गोऱ्ह्याचे उरलेले सगळे भाग त्याने छावणीच्या बाहेर, राख* फेकली जाते त्या स्वच्छ ठिकाणी नेऊन लाकडांवर ठेवून जाळावेत.+ राख फेकली जाते त्या ठिकाणी त्याने ते जाळावेत.
१३ जर इस्राएलच्या सर्व लोकांनी चुकून एखादं पाप केल्यामुळे त्यांच्यावर दोष आला असेल;+ पण यहोवाने मनाई केलेली गोष्ट आपण केल्याचं मंडळीला* माहीत नसेल,+ १४ आणि नंतर ते पाप कळून आलं, तर मंडळीने* पापार्पण म्हणून एक गोऱ्हा भेटमंडपासमोर आणावा. १५ इस्राएली लोकांच्या वडीलजनांनी यहोवासमोर त्या गोऱ्ह्याच्या डोक्यावर हात ठेवावा आणि मग तो यहोवासमोर कापावा.
१६ यानंतर, अभिषिक्त याजकाने गोऱ्ह्याचं काही रक्त भेटमंडपात आणावं. १७ याजकाने त्या रक्तात आपलं बोट बुडवून, काही रक्त पडद्यासमोर यहोवापुढे सात वेळा शिंपडावं.+ १८ मग त्याने काही रक्त भेटमंडपात यहोवासमोर असलेल्या वेदीच्या+ शिंगांनाही लावावं; उरलेलं सगळं रक्त त्याने भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ असलेल्या होमार्पणाच्या वेदीच्या+ पायथ्याशी ओतावं. १९ त्याने सगळी चरबी काढून ती वेदीवर जाळावी.+ २० याजकासाठी दिलेल्या पापार्पणाच्या गोऱ्ह्याच्या बाबतीत केलं होतं, तसंच या गोऱ्ह्याच्या बाबतीतही केलं जावं. त्याने या गोऱ्ह्याच्या बाबतीतही तसंच करावं. अशा प्रकारे याजकाने लोकांसाठी प्रायश्चित्त करावं+ म्हणजे त्यांना क्षमा केली जाईल. २१ मग त्याने आधीचा गोऱ्हा जाळला होता, तसाच हा गोऱ्हाही छावणीच्या बाहेर नेऊन जाळावा.+ हे मंडळीसाठी दिलेलं पापार्पण आहे.+
२२ आपला देव यहोवा याने मनाई केलेल्या सर्व गोष्टींपैकी एखादी गोष्ट चुकून केल्याबद्दल जर एक प्रधान+ दोषी ठरला, २३ किंवा, आपण एखादी आज्ञा मोडून पाप केल्याचं त्याला कळलं, तर त्याने कोणताही दोष नसलेला एक बकरा अर्पण म्हणून आणावा. २४ त्याने त्या बकऱ्याच्या डोक्यावर हात ठेवावा आणि होमार्पणाचा पशू यहोवासमोर जिथे कापला जातो, तिथे त्याला कापावं.+ हे एक पापार्पण आहे. २५ मग, याजकाने आपल्या बोटाने या पापार्पणाचं काही रक्त घेऊन, ते होमार्पणाच्या वेदीच्या शिंगांना लावावं+ आणि उरलेलं सगळं रक्त त्याने होमार्पणाच्या वेदीच्या पायथ्याशी ओतावं.+ २६ त्याने शांती-अर्पणाच्या चरबीप्रमाणेच या अर्पणाचीही सगळी चरबी वेदीवर जाळावी.+ अशा रितीने याजक प्रधानाच्या पापाचं प्रायश्चित्त करेल, म्हणजे त्याला क्षमा केली जाईल.
२७ जर देशातल्या लोकांपैकी एखाद्याने* चुकून पाप केलं, आणि यहोवाने मनाई केलेली एखादी गोष्ट केल्याबद्दल तो दोषी ठरला,+ २८ किंवा आपण केलेल्या एखाद्या पापाबद्दल त्याला कळलं, तर त्याने दोष नसलेली एक बकरी आपल्या पापाबद्दल अर्पण म्हणून आणावी. २९ त्याने पापार्पण म्हणून आणलेल्या बकरीच्या डोक्यावर हात ठेवावा आणि होमार्पणाचा पशू कापतात तिथेच तिला कापावं.+ ३० मग, याजकाने आपल्या बोटाने तिचं काही रक्त घेऊन, ते होमार्पणाच्या वेदीच्या शिंगांना लावावं आणि उरलेलं सगळं रक्त होमार्पणाच्या वेदीच्या पायथ्याशी ओतावं.+ ३१ शांती-अर्पणाच्या चरबीप्रमाणेच या अर्पणाचीही सगळी चरबी काढावी+ आणि याजकाने ती वेदीवर जाळावी; या सुवासाने यहोवाला आनंद होईल.* अशा रितीने, याजक त्याच्यासाठी प्रायश्चित्त करेल म्हणजे त्याला क्षमा केली जाईल.
३२ पण जर त्याने पापार्पण म्हणून कोकरू आणलं, तर त्याने कोणताही दोष नसलेली मादी आणावी. ३३ त्याने पापार्पण म्हणून आणलेल्या पशूच्या डोक्यावर हात ठेवावा आणि होमार्पणाचा पशू जिथे कापला जातो, तिथे त्याला पापार्पण म्हणून कापावं.+ ३४ मग, याजकाने आपल्या बोटाने पापार्पणाचं काही रक्त घेऊन ते होमार्पणाच्या वेदीच्या शिंगांना लावावं+ आणि उरलेलं सगळं रक्त होमार्पणाच्या वेदीच्या पायथ्याशी ओतावं. ३५ शांती-अर्पणाच्या मेंढ्याप्रमाणेच या अर्पणाचीही सगळी चरबी काढावी आणि याजकाने ती वेदीवर, यहोवासाठी अग्नीत जाळून केल्या जाणाऱ्या अर्पणांवर ठेवून जाळावी;+ अशा रितीने, त्या मनुष्याने केलेल्या पापाबद्दल याजक प्रायश्चित्त करेल, म्हणजे त्याला क्षमा केली जाईल.+
५ एखाद्याने* अपराध घडताना पाहिला किंवा त्याला त्याबद्दल कळलं, तर तो त्याचा साक्षीदार आहे. पण जर त्याने अपराध करणाऱ्याच्या विरुद्ध साक्ष देण्याची जाहीर घोषणा*+ ऐकूनही त्याबद्दल सांगितलं नाही, तर ते पाप आहे आणि त्याला त्याच्या चुकीची शिक्षा मिळेल.
२ किंवा जर कोणी* एखाद्या अशुद्ध वस्तूला, म्हणजे एखाद्या अशुद्ध जंगली प्राण्याच्या, किंवा अशुद्ध पाळीव प्राण्याच्या किंवा इतर लहान अशुद्ध प्राण्याच्या* मेलेल्या शरीराला स्पर्श केला,+ तर तो अशुद्ध आहे आणि त्याने नकळत तसं केलं असलं, तरी तो दोषी आहे. ३ किंवा कोणी देवाच्या नजरेत अशुद्ध असलेल्या एखाद्या माणसाला किंवा वस्तूला नकळत स्पर्श केला,+ म्हणजे अशुद्ध करणाऱ्या कोणत्याही अशुद्ध गोष्टीला त्याने स्पर्श केला आणि ही गोष्ट त्याला कळली, तर तो दोषी आहे.
४ किंवा एखाद्याने* विचार न करता काही करण्याची शपथ घेतली, मग ती चांगली किंवा वाईट अशी कोणतीही गोष्ट असो; पण नंतर त्याला समजलं, की आपण विचार न करता शपथ घेतली होती, तर तो दोषी आहे.*+
५ जर यांपैकी कोणत्याही गोष्टींविषयी तो दोषी ठरला, तर आपण कोणतं पाप केलं आहे, हे त्याने कबूल करावं.+ ६ आपल्या हातून घडलेल्या पापाबद्दल त्याने यहोवासाठी दोषार्पण आणावं.+ त्याने एक मेंढी किंवा बकरी पापार्पण म्हणून आणावी. मग याजक त्याच्या पापासाठी प्रायश्चित्त करेल.
७ जर बकऱ्यांच्या वा मेढरांच्या कळपातून एखादा प्राणी देण्याची त्याची ऐपत नसेल, तर त्याने आपल्या पापाबद्दल दोषार्पण म्हणून, यहोवासाठी दोन पारवे किंवा कबुतराची दोन पिल्लं आणावीत;+ एक पापार्पण म्हणून आणि एक होमार्पण म्हणून.+ ८ त्याने ती याजकाकडे आणावीत आणि याजकाने त्यांतला पहिला पक्षी पापार्पण म्हणून द्यावा. त्याने त्याची मान समोरून तोडावी, पण त्याचं डोकं शरीरापासून वेगळं करू नये. ९ त्याने पापार्पणातलं काही रक्त वेदीच्या बाजूला शिंपडावं, पण उरलेलं रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतावं.+ हे एक पापार्पण आहे. १० याजकाने दुसरा पक्षी नेहमीच्या पद्धतीप्रमाणे होमार्पण म्हणून द्यावा.+ अशा प्रकारे, याजक त्या माणसाने केलेल्या पापासाठी प्रायश्चित्त करेल आणि त्याला क्षमा केली जाईल.+
११ जर दोन पारवे किंवा कबुतराची दोन पिल्लं देण्याची त्या माणसाची ऐपत नसेल, तर त्याने आपल्या पापाबद्दल एक एफाचा दहावा भाग*+ चांगलं पीठ पापार्पण म्हणून आणावं. त्याने त्यात तेल घालू नये किंवा त्यावर ऊद* ठेवू नये, कारण हे एक पापार्पण आहे. १२ तो ते याजकाकडे आणेल आणि याजक त्यातून मूठभर घेऊन ते अर्पणाचं प्रतीक* म्हणून वेदीवर, यहोवासाठी अग्नीत जाळून केल्या जाणाऱ्या अर्पणांवर जाळेल. हे एक पापार्पण आहे. १३ त्याने केलेल्या पापाबद्दल याजक त्याच्यासाठी प्रायश्चित्त करेल. त्याने यांपैकी कोणतंही पाप केलं असेल, तर ते क्षमा केलं जाईल.+ अन्नार्पणाप्रमाणेच या अर्पणाचाही उरलेला भाग याजकाचा होईल.’”+
१४ यहोवा मोशेला पुढे म्हणाला: १५ “जर कोणी* यहोवाच्या पवित्र गोष्टींच्या विरोधात नकळत पाप करून अविश्वासूपणे वागला,+ तर त्याने कळपातून कोणताही दोष नसलेला मेंढा दोषार्पण म्हणून यहोवासाठी आणावा.+ त्याचं मूल्य चांदीच्या शेकेलमध्ये,* पवित्र ठिकाणाच्या ठरलेल्या शेकेलप्रमाणे* असावं.+ १६ तसंच, त्याने पवित्र ठिकाणाच्या विरोधात केलेल्या पापाची भरपाई करावी आणि त्यासोबतच त्या भरपाईच्या मूल्याचा पाचवा भागही द्यावा.+ त्याने हे याजकाला द्यावं, म्हणजे याजक दोषार्पणाचा मेंढा अर्पण करून त्याच्यासाठी प्रायश्चित्त करेल+ आणि त्याच्या पापाची क्षमा केली जाईल.+
१७ यहोवाने मनाई केलेली एखादी गोष्ट कोणी* नकळत जरी केली, तरीही तो दोषी आहे आणि त्याला त्याच्या चुकीची शिक्षा मिळेल.+ १८ त्याने कळपातून कोणताही दोष नसलेला आणि योग्य मूल्याचा एक मेंढा दोषार्पण म्हणून याजकाकडे आणावा.+ म्हणजे त्याने चुकून किंवा नकळत केलेल्या अपराधाबद्दल याजक त्याच्यासाठी प्रायश्चित्त करेल आणि त्याच्या पापाची क्षमा केली जाईल. १९ हे एक दोषार्पण आहे. यहोवाविरुद्ध पाप केल्याबद्दल तो नक्कीच दोषी आहे.”
६ यहोवा मोशेला पुढे म्हणाला: २ “जर कोणी* पुढीलपैकी एखादी गोष्ट करून पाप केलं आणि यहोवाविरुद्ध अविश्वासूपणे वागला;+ म्हणजे जर त्याने आपल्याजवळ सांभाळायला दिलेल्या किंवा गहाण ठेवलेल्या एखाद्या वस्तूसाठी आपल्या शेजाऱ्याला फसवलं,+ किंवा ती वस्तू चोरली, किंवा शेजाऱ्याला लुबाडलं, ३ किंवा एखादी हरवलेली वस्तू सापडल्यावर जर तो तिच्याबद्दल खोटं बोलला किंवा आपल्या हातून घडलेल्या अशा कोणत्याही पापाबद्दल त्याने खोटी शपथ घेतली,+ तर त्याने पुढे सांगितल्याप्रमाणे करावं: ४ जर त्याने ते पाप केलं असेल आणि तो दोषी असेल तर त्याने जे चोरलं, जे लुबाडलं, जे फसवून घेतलं, सांभाळायला दिलेली जी वस्तू ठेवून घेतली किंवा एखादी हरवलेली वस्तू सापडल्यावर ठेवून घेतली, ती त्याने परत करावी. ५ किंवा ज्या गोष्टीबद्दल त्याने खोटी शपथ घेतली ती त्याने परत करावी. त्याने त्या गोष्टीची पूर्ण भरपाई करावी+ आणि सोबतच तिच्या किमतीचा पाचवा भागही द्यावा. ज्या दिवशी त्याचा दोष सिद्ध होईल, त्याच दिवशी त्याने ती वस्तू तिच्या मालकाला परत करावी. ६ मग त्याने त्याचं दोषार्पण म्हणून कळपातून, कोणताही दोष नसलेला आणि योग्य मूल्य असलेला एक मेंढा याजकाकडे यहोवासाठी दोषार्पण म्हणून आणावा.+ ७ याजक त्याच्यासाठी यहोवासमोर प्रायश्चित्त करेल, म्हणजे त्याने जे काही केलं असेल आणि ज्यामुळे त्याच्यावर दोष आला असेल, त्याबद्दल त्याला क्षमा केली जाईल.”+
८ यहोवा मोशेला पुढे म्हणाला: ९ “अहरोनला आणि त्याच्या मुलांना आज्ञा दे आणि सांग, ‘हा होमार्पणाचा नियम आहे:+ होमार्पण रात्रभर वेदीच्या आगीवर राहावं आणि वेदीवर आग जळत राहावी. १० याजकाने आपली मलमलीची खास वस्त्रं, तसंच मलमलीची अंतर्वस्त्रं* घालावीत.+ मग त्याने वेदीवरच्या आगीत जळलेल्या होमार्पणाची राख* काढावी+ आणि ती वेदीच्या बाजूला ठेवावी. ११ यानंतर त्याने आपली वस्त्रं काढून+ दुसरी वस्त्रं घालावीत आणि ती राख छावणीबाहेर एका स्वच्छ ठिकाणी न्यावी.+ १२ वेदीवरची आग सतत जळत ठेवावी. ती विझू नये. याजकाने रोज सकाळी वेदीवर लाकडं जाळावीत.+ त्याने त्या आगीवर होमार्पण रचून ठेवावं आणि शांती-अर्पणाची चरबी त्या आगीवर जाळावी.+ १३ वेदीवर आग सतत जळत ठेवावी. ती विझू नये.
१४ हा अन्नार्पणाचा नियम आहे:+ अहरोनच्या मुलांनी वेदीपुढे ते यहोवासाठी अर्पण करावं. १५ त्यांच्यापैकी एकाने अन्नार्पणातलं मूठभर चांगलं पीठ, त्यातलं काही तेल आणि अन्नार्पणावरचा सगळा ऊद* घ्यावा. त्याने ते अर्पणाचं प्रतीक* म्हणून वेदीवर जाळावं आणि त्याच्या सुवासाने यहोवाला आनंद होईल.*+ १६ अन्नार्पणातलं जे उरेल ते अहरोनने आणि त्याच्या मुलांनी खावं.+ त्याच्या बेखमीर* भाकरी बनवून एका पवित्र ठिकाणी खाव्यात. त्यांनी त्या भेटमंडपाच्या अंगणात खाव्यात.+ १७ ते खमीर* असलेल्या कोणत्याही गोष्टीसोबत भाजू नका.+ माझ्यासाठी अग्नीत जाळून केल्या जाणाऱ्या अर्पणांमधून हा मी त्यांना दिलेला भाग आहे.+ हा भाग, पापार्पण आणि दोषार्पण यांसारखाच परमपवित्र आहे.+ १८ अहरोनच्या वंशातल्या प्रत्येक पुरुषाने तो खावा.+ यहोवासाठी अग्नीत जाळून केलेल्या अर्पणांमधून हा पिढ्या न् पिढ्या त्यांचा कायमचा हिस्सा आहे.+ ज्या गोष्टींना या अर्पणांचा स्पर्श होईल, त्या पवित्र ठरतील.’”
१९ यहोवा मोशेला पुन्हा म्हणाला: २० “अहरोनने आणि त्याच्या मुलांपैकी प्रत्येकाने त्यांच्या अभिषेकाच्या दिवशी यहोवासाठी हे अर्पण आणावं:+ त्यांनी अन्नार्पण म्हणून एक एफाचा दहावा भाग*+ चांगलं पीठ आणावं.+ यातलं अर्धं सकाळी आणि अर्धं संध्याकाळी अर्पण करावं. २१ ते तव्यावर, तेल लावून बनवलेलं असावं.+ त्याने ते तेलात चांगलं मिसळून आणावं. मग भाजून तयार केलेल्या या अन्नार्पणाचे तुकडे त्याने अर्पण करावेत, म्हणजे त्याच्या सुवासाने यहोवाला आनंद होईल.* २२ अहरोनच्या मुलांपैकी जो अभिषिक्त याजक त्याच्याजागी येईल,+ त्याने ते बनवावं. हा एक कायमचा नियम आहे: हे अर्पण यहोवासाठी पूर्णपणे जाळावं. २३ याजकाचं प्रत्येक अन्नार्पण पूर्णपणे जाळावं. ते खाऊ नये.”
२४ यहोवा पुन्हा मोशेसोबत बोलला आणि म्हणाला: २५ “अहरोनला आणि त्याच्या मुलांना सांग, ‘हा पापार्पणाचा नियम आहे:+ ज्या ठिकाणी होमार्पणाचा पशू कापला जातो,+ तिथेच पापार्पणाचा पशूही यहोवासमोर कापला जावा. हे परमपवित्र अर्पण आहे. २६ जो याजक पापासाठी ते अर्पण करेल, त्याने ते खावं.+ ते एका पवित्र ठिकाणी, म्हणजे भेटमंडपाच्या अंगणात खावं.+
२७ अर्पणाच्या मांसाचा स्पर्श होणारी प्रत्येक गोष्ट पवित्र होईल. जर एखाद्याच्या कपड्यांवर त्याचं रक्त उडालं, तर ते कपडे एका पवित्र ठिकाणी धुवावेत. २८ ज्या मातीच्या भांड्यात ते मांस उकळण्यात आलं असेल, ते फोडून टाकावं. पण जर ते एखाद्या तांब्याच्या भांड्यात उकळण्यात आलं असेल, तर ते भांडं घासून पाण्याने धुवावं.
२९ याजक असलेल्या प्रत्येक पुरुषाने त्या अर्पणातलं मांस खावं.+ ते परमपवित्र आहे.+ ३० पण, ज्या पापार्पणातलं काही रक्त प्रायश्चित्त करण्यासाठी पवित्र ठिकाणी, म्हणजे भेटमंडपात आणलं जातं, ते पापार्पण खाल्लं जाऊ नये.+ ते आगीत जाळून टाकावं.
७ हा दोषार्पणाचा नियम आहे:+ ते परमपवित्र आहे. २ होमार्पणाचा पशू जिथे कापतात, तिथेच दोषार्पणाचा पशू कापावा आणि त्याचं रक्त+ वेदीच्या सभोवती शिंपडावं.+ ३ त्याने त्याची सगळी चरबी,+ म्हणजे चरबीदार शेपूट, तसंच आतड्यांवरची चरबी अर्पण करावी. ४ तसंच, त्याने दोन गुरदे आणि त्यांवरची कमरेजवळची चरबीही अर्पण करावी. गुरद्यांसोबत त्याने यकृतावरची चरबीही काढावी.+ ५ याजक हे भाग, यहोवासाठी अग्नीत जाळून केलं जाणारं अर्पण म्हणून वेदीवर जाळेल.+ हे एक दोषार्पण आहे. ६ याजक असलेल्या प्रत्येक पुरुषाने ते खावं+ आणि ते एका पवित्र ठिकाणी खाल्लं जावं. ते परमपवित्र आहे.+ ७ पापार्पणाविषयी असलेला नियम दोषार्पणालाही लागू होतो; जो याजक हे अर्पण देऊन प्रायश्चित्त करेल त्याला ते मिळेल.+
८ याजक एखाद्यासाठी होमार्पण करेल तेव्हा याजकाकडे आणलेली होमार्पणाची कातडी+ त्या याजकाची होईल.
९ भट्टीत भाजलेलं, तसंच कढईत किंवा तव्यावर तयार केलेलं+ प्रत्येक अन्नार्पण, ते अर्पण करणाऱ्या याजकाचं होईल. ते त्याचंच होईल.+ १० पण तेलात मिसळून तयार केलेलं+ किंवा कोरडं असलेलं+ प्रत्येक अन्नार्पण अहरोनच्या सर्व मुलांसाठी असेल; प्रत्येकाला त्यातून सारखा भाग मिळेल.
११ यहोवासाठी आणल्या जाणाऱ्या शांती-अर्पणासाठी हा नियम आहे:+ १२ जर ते अर्पण आभार मानण्यासाठी असेल,+ तर मग या आभाराच्या अर्पणासोबत त्याने तेलात मळलेल्या बेखमीर* भाकरी, तेल लावलेल्या बेखमीर पापड्या आणि भरपूर तेल मिसळून बनवलेल्या चांगल्या पिठाच्या बेखमीर भाकरीही द्याव्यात. १३ आभार मानण्यासाठी असलेल्या त्याच्या या शांती-अर्पणांसोबत त्याने खमीर* घातलेल्या भाकरीही द्याव्यात. १४ त्याने या प्रत्येक प्रकारच्या भाकरींतून एकेक, यहोवासाठी पवित्र भाग म्हणून द्यावी. हा भाग शांती-अर्पणाचं रक्त शिंपडणाऱ्या याजकाचा होईल.+ १५ आभार मानण्यासाठी दिलेल्या त्याच्या शांती-अर्पणांचं मांस, अर्पण देण्याच्या दिवशीच खाल्लं जावं. त्यातलं काहीही सकाळपर्यंत ठेवू नये.+
१६ जर त्याच्या अर्पणाचं बलिदान हे नवस फेडण्यासाठी+ किंवा स्वेच्छेने दिलेलं बलिदान असेल,+ तर ते बलिदान देण्याच्या दिवशी खाल्लं जावं. जर त्यातून काही उरलं, तर ते दुसऱ्या दिवशीही खाल्लं जाऊ शकतं. १७ पण तिसऱ्या दिवशी, बलिदानाच्या मांसातलं जे उरेल ते आगीत जाळून टाकावं.+ १८ जर कोणी शांती-अर्पणातलं मांस तिसऱ्या दिवशी खाल्लं, तर ज्याने ते अर्पण दिलं होतं, त्याला स्वीकारलं जाणार नाही. त्या अर्पणामुळे त्याच्यावर कृपा होणार नाही; ती एक वाईट गोष्ट आहे आणि ते मांस खाणाऱ्याला* आपल्या अपराधाची शिक्षा मिळेल.+ १९ कोणत्याही अशुद्ध गोष्टीचा स्पर्श झालेलं मांस खाल्लं जाऊ नये. ते आगीत जाळून टाकावं. शुद्ध असलेलं मांस हे शुद्ध असलेल्यानेच खावं.
२० पण अशुद्ध असलेल्या कोणत्याही माणसाने* यहोवासाठी असलेल्या शांती-अर्पणाचं मांस खाल्लं, तर त्याला* ठार मारलं जावं.+ २१ कोणीही* एखाद्या अशुद्ध गोष्टीला, म्हणजेच एखाद्या अशुद्ध माणसाला,+ किंवा अशुद्ध प्राण्याला+ किंवा कोणत्याही अशुद्ध व घृणास्पद गोष्टीला स्पर्श केला+ आणि यहोवासाठी असलेल्या शांती-अर्पणातलं मांस खाल्लं, तर त्याला* ठार मारलं जावं.’”
२२ यहोवा मोशेला पुढे म्हणाला: २३ “इस्राएली लोकांना सांग, ‘तुम्ही बैलाची, मेंढ्याची किंवा बकऱ्याची चरबी खाऊ नका.+ २४ मेलेल्या स्थितीत सापडलेल्या प्राण्याची आणि दुसऱ्या प्राण्याने मारलेल्या प्राण्याची चरबी तुम्ही इतर कोणत्याही गोष्टीसाठी वापरू शकता, पण तुम्ही ती कधीच खाऊ नका.+ २५ यहोवासाठी अग्नीत जाळून केलेलं अर्पण म्हणून दिलेल्या प्राण्याची चरबी जो कोणी खाईल, त्याला ठार मारलं जावं.
२६ तुम्ही तुमच्या वस्त्यांमध्ये कोणत्याही प्रकारचं रक्त अजिबात खाऊ नका,+ मग ते पक्ष्यांचं असो किंवा प्राण्यांचं. २७ जो* कोणत्याही प्रकारचं रक्त खाईल त्याला ठार मारलं जावं.’”+
२८ यहोवा मोशेला पुढे म्हणाला: २९ इस्राएली लोकांना सांग, ‘जो कोणी यहोवासाठी शांती-अर्पण देतो, त्याने त्या अर्पणातला काही भाग यहोवासाठी आणावा.+ ३० त्याने त्यातली चरबी+ आणि छातीचा भाग, यहोवासाठी अग्नीत जाळून केलं जाणारं अर्पण म्हणून स्वतःच्या हाताने आणावा. तो त्याने ओवाळण्याचं अर्पण म्हणून यहोवापुढे ओवाळावा.+ ३१ याजक ती चरबी वेदीवर जाळेल,+ पण छातीचा भाग अहरोन आणि त्याच्या मुलांचा होईल.+
३२ तुमच्या शांती-अर्पणांतून उजवा पाय तुम्ही पवित्र भाग म्हणून याजकाला द्यावा.+ ३३ अहरोनच्या मुलांपैकी जो शांती-अर्पणांचं रक्त आणि चरबी अर्पण करेल त्याला उजवा पाय, त्याचा भाग म्हणून मिळेल.+ ३४ कारण, इस्राएली लोकांनी दिलेल्या शांती-अर्पणांतून, ओवाळलेला छातीचा भाग आणि पवित्र भागातला उजवा पाय, मी याजक असलेल्या अहरोनला आणि त्याच्या मुलांना देतो. हा इस्राएली लोकांसाठी कायमचा नियम आहे.+
३५ यहोवासाठी अग्नीत जाळून केल्या जाणाऱ्या अर्पणांमधून याजकांसाठी, म्हणजेच अहरोनसाठी आणि त्याच्या मुलांसाठी वेगळा केलेला हा भाग होता. ज्या दिवशी त्यांना यहोवासाठी याजक म्हणून सेवा करायला निवडण्यात आलं, त्या दिवशी तो त्यांच्यासाठी वेगळा करण्यात आला होता.+ ३६ याजकांचा अभिषेक केला जाईल त्या दिवशी इस्राएली लोकांनी हा भाग त्यांना द्यावा, अशी आज्ञा यहोवाने दिली.+ इस्राएली लोकांनी पिढ्या न् पिढ्या पाळावा, असा हा कायमचा नियम आहे.’”
३७ हा होमार्पण,+ अन्नार्पण,+ पापार्पण,+ दोषार्पण,+ नियुक्तीचं बलिदान+ आणि शांती-अर्पण+ यांबद्दलचा नियम आहे. ३८ हा नियम यहोवाने मोशेला सीनाय पर्वतावर दिला.+ ज्या दिवशी त्याने इस्राएली लोकांना सीनायच्या रानात यहोवाला अर्पणं देण्याची आज्ञा दिली, त्या दिवशी त्याने हा नियम दिला.+
८ यहोवा मोशेला पुढे म्हणाला: २ “अहरोन आणि त्याच्या मुलांना आपल्यासोबत घे,+ तसंच, याजकांची वस्त्रं,+ अभिषेकाचं तेल,+ पापार्पणाचा गोऱ्हा,* दोन मेंढे आणि बेखमीर* भाकरींची+ टोपलीही घे, ३ आणि सर्व लोकांना भेटमंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ एकत्र जमव.”
४ तेव्हा यहोवाने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने केलं आणि सर्व लोक भेटमंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ जमले. ५ मग मोशे त्यांना म्हणाला: “यहोवाने आपल्याला या सर्व गोष्टी करण्याची आज्ञा दिली आहे.” ६ तेव्हा मोशेने अहरोन आणि त्याच्या मुलांना जवळ बोलावून त्यांना अंघोळ घातली.+ ७ त्यानंतर त्याने अहरोनला अंगरखा घातला+ आणि त्याभोवती कमरबंद*+ गुंडाळला. मग त्याने त्याला बिनबाह्यांचा झगा+ आणि एफोद*+ घातलं आणि एफोदचा कमरपट्टा+ त्याच्या कमरेला बांधला. ८ नंतर त्याने त्याला ऊरपट*+ घातला आणि त्यात उरीम आणि थुम्मीम*+ ठेवलं. ९ मग त्याने त्याला पगडी घातली+ आणि पगडीच्या समोरच्या बाजूला त्याने सोन्याची चकाकती पट्टी, म्हणजे समर्पणाचं पवित्र चिन्ह*+ लावलं. यहोवाने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने हे केलं.
१० त्यानंतर मोशेने अभिषेकाचं तेल घेऊन उपासना मंडप आणि त्यातल्या सर्व वस्तूंचा अभिषेक केला+ आणि त्यांना पवित्र केलं. ११ मग त्याने थोडं तेल वेदीवर सात वेळा शिंपडलं आणि वेदी व तिची सर्व भांडी, तसंच तांब्याचं मोठं भांडं* व त्याची बैठक यांचा अभिषेक करून त्यांना पवित्र केलं. १२ शेवटी त्याने अभिषेकाचं थोडं तेल अहरोनच्या डोक्यावर ओतलं आणि त्याचा अभिषेक करून त्याला पवित्र केलं.+
१३ मग मोशेने अहरोनच्या मुलांना जवळ बोलावून त्यांना अंगरखे घातले आणि त्यांभोवती कमरबंद गुंडाळले. त्यानंतर त्याने त्यांना पगड्या घातल्या.*+ यहोवाने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने हे केलं.
१४ नंतर त्याने पापार्पणाचा गोऱ्हा आणला आणि अहरोन आणि त्याच्या मुलांनी पापार्पणाच्या गोऱ्ह्याच्या डोक्यावर हात ठेवले.+ १५ मग मोशेने तो गोऱ्हा कापला आणि बोटावर त्याचं रक्त+ घेऊन वेदीच्या चारही बाजूला असलेल्या शिंगांना लावलं आणि वेदीला पापापासून शुद्ध केलं. पण उरलेलं रक्त त्याने वेदीच्या पायथ्याशी ओतलं. अशा रितीने वेदीवर प्रायश्चित्त करता यावं म्हणून त्याने तिला पवित्र केलं. १६ त्यानंतर मोशेने आतड्यांवरची सगळी चरबी, यकृतावरची चरबी, दोन्ही गुरदे आणि त्यांवरची चरबी घेऊन ती वेदीवर जाळली.+ १७ मग त्याने गोऱ्ह्याचे उरलेले भाग, म्हणजे त्याची कातडी, मांस आणि शेण छावणीबाहेर नेऊन जाळलं.+ यहोवाने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने हे केलं.
१८ नंतर त्याने होमार्पणाचा मेंढा आणला आणि अहरोन व त्याच्या मुलांनी मेंढ्याच्या डोक्यावर हात ठेवले.+ १९ मग मोशेने तो मेंढा कापला आणि त्याचं रक्त वेदीच्या सभोवती शिंपडलं. २० मोशेने मेंढ्याचे तुकडे केले आणि त्याने त्याचं डोकं व इतर तुकडे आणि गुरद्यांवरची चरबी वेदीच्या आगीवर ठेवली. २१ त्याने मेंढ्याची आतडी व पाय पाण्याने धुतले आणि संपूर्ण मेंढा वेदीवर जाळला. हे सुवासाचं* होमार्पण होतं. ते यहोवासाठी अग्नीत जाळून केलेलं अर्पण होतं. यहोवाने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने हे केलं.
२२ मग त्याने दुसरा मेंढा, म्हणजे नियुक्तीचा मेंढा+ आणला आणि अहरोन व त्याच्या मुलांनी मेंढ्याच्या डोक्यावर हात ठेवले.+ २३ मोशेने तो मेंढा कापला आणि त्याचं काही रक्त घेऊन ते अहरोनच्या उजव्या कानाच्या पाळीला, तसंच उजव्या हाताच्या आणि उजव्या पायाच्या अंगठ्याला लावलं. २४ त्यानंतर मोशेने अहरोनच्या मुलांना जवळ बोलावलं आणि मेंढ्याचं काही रक्त घेऊन ते त्यांच्या उजव्या कानाच्या पाळीला, तसंच उजव्या हाताच्या आणि उजव्या पायाच्या अंगठ्याला लावलं. पण उरलेलं रक्त त्याने वेदीच्या सभोवती शिंपडलं.+
२५ मग त्याने मेंढ्याची चरबी, चरबीदार शेपूट, आतड्यांवरची सगळी चरबी, यकृतावरची चरबी, दोन्ही गुरदे व त्यांच्यावरची चरबी आणि उजवा पाय घेतला.+ २६ त्यानंतर त्याने यहोवासमोर ठेवलेल्या बेखमीर भाकरींच्या टोपलीमधून एक बेखमीर भाकर,+ एक पापडी आणि एक तेल लावलेली भाकर+ घेतली. त्याने त्या भाकरी, चरबीच्या तुकड्यांवर आणि उजव्या पायावर ठेवल्या. २७ मग मोशेने हे सर्व अहरोन आणि त्याच्या मुलांच्या हातांवर ठेवलं आणि ओवाळण्याचं अर्पण म्हणून तो ते यहोवासमोर ओवाळू लागला. २८ त्यानंतर मोशेने ते सर्व त्यांच्या हातांतून घेऊन वेदीवरच्या होमार्पणावर जाळलं. हे सुवासासाठी* नियुक्तीचं बलिदान होतं. हे यहोवासाठी अग्नीत जाळून केलेलं अर्पण होतं.
२९ मग मोशेने छातीचा भाग घेऊन तो ओवाळण्याचं अर्पण म्हणून यहोवासमोर ओवाळला.+ यहोवाने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे, हा नियुक्तीच्या मेंढ्यातून मोशेचा भाग झाला.+
३० नंतर मोशेने अभिषेकाचं थोडं तेल+ आणि वेदीवरचं काही रक्त घेऊन ते अहरोनवर व त्याच्या वस्त्रांवर, तसंच त्याच्यासोबत असलेल्या त्याच्या मुलांवर व त्यांच्या वस्त्रांवर शिंपडलं. अशा रितीने त्याने अहरोनला व त्याच्या वस्त्रांना, आणि त्याच्या मुलांना व त्यांच्या वस्त्रांना पवित्र केलं.+
३१ मग मोशे अहरोनला आणि त्याच्या मुलांना म्हणाला: “हे मांस भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ उकळा+ आणि ते तिथेच टोपलीतल्या* भाकरींसोबत खा. ‘अहरोन आणि त्याच्या मुलांनी ते खावं,’ अशी जी आज्ञा मला देण्यात आली होती, त्याप्रमाणे तुम्ही ते खा.+ ३२ उरलेलं मांस आणि भाकरी जाळून टाका.+ ३३ तुम्हाला याजक म्हणून नियुक्त करण्यासाठी* सात दिवस लागतील. म्हणून तुमची नियुक्ती पूर्ण करण्याचे दिवस संपेपर्यंत, म्हणजे सात दिवसांपर्यंत तुम्ही भेटमंडपाच्या प्रवेशापासून दूर जाऊ नका.+ ३४ यहोवाने आज्ञा दिल्याप्रमाणे, तुमच्यासाठी प्रायश्चित्त+ करावं म्हणून आज आपण हे सर्व केलं आहे. ३५ तुम्ही सात दिवसांपर्यंत,+ रात्रंदिवस भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ राहून यहोवासाठीचं आपलं कर्तव्य पूर्ण करा,+ म्हणजे तुम्ही मरणार नाही; कारण तुम्ही हे करावं अशी मला आज्ञा देण्यात आली आहे.”
३६ मग, यहोवाने मोशेद्वारे आज्ञा दिल्याप्रमाणे अहरोन आणि त्याच्या मुलांनी सर्व गोष्टी केल्या.
९ आठव्या दिवशी+ मोशेने अहरोनला, त्याच्या मुलांना आणि इस्राएलच्या वडीलजनांना बोलावलं. २ तो अहरोनला म्हणाला: “तू स्वतःसाठी पापार्पण+ म्हणून एक गोऱ्हा,* तसंच होमार्पण म्हणून एक मेंढा घे आणि त्यांना यहोवासमोर आण. त्यांमध्ये कोणताही दोष नसावा. ३ पण तू इस्राएली लोकांना सांग, ‘तुम्ही पापार्पणासाठी एक बकरा आणि होमार्पणासाठी एकेक वर्षाचा एक गोऱ्हा आणि एक मेंढा आणा. त्यांमध्ये कोणताही दोष नसावा. ४ तसंच, शांती-अर्पणं+ म्हणून यहोवासमोर बलिदान करण्यासाठी एक बैल आणि एक मेंढा आणा. यासोबतच तेल घातलेलं अन्नार्पणही+ आणा, कारण आज यहोवा तुमच्यासमोर प्रकट होईल.’”+
५ तेव्हा मोशेने आज्ञा दिल्याप्रमाणे त्यांनी हे सर्व भेटमंडपासमोर आणलं. मग सगळे लोक येऊन यहोवासमोर उभे राहिले. ६ मोशे त्यांना म्हणाला: “यहोवाने तुम्हाला असं करण्याची आज्ञा दिली आहे, म्हणजे तुम्हाला यहोवाचं तेज पाहता येईल.”+ ७ मग मोशे अहरोनला म्हणाला: “तुझ्यासाठी+ आणि तुझ्या घराण्यासाठी प्रायश्चित्त म्हणून तुझं पापार्पण+ आणि होमार्पण वेदीजवळ आणून अर्पण कर. तसंच लोकांच्या+ प्रायश्चित्तासाठी असलेलं अर्पणही तू दे.+ यहोवाने अशीच आज्ञा दिली आहे.”
८ तेव्हा अहरोनने लगेच वेदीजवळ जाऊन त्याच्यासाठी असलेला पापार्पणाचा गोऱ्हा कापला.+ ९ मग अहरोनच्या मुलांनी त्याच्याजवळ गोऱ्ह्याचं रक्त+ आणलं आणि त्याने आपलं बोट रक्तात बुडवून काही रक्त वेदीच्या शिंगांना लावलं. त्यानंतर त्याने उरलेलं रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतलं.+ १० मग यहोवाने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे, अहरोनने पापार्पणाची चरबी, गुरदे, तसंच यकृतावरची चरबी वेदीवर जाळली.+ ११ पण गोऱ्ह्याचं मांस आणि कातडी त्याने छावणीबाहेर जाळली.+
१२ मग त्याने होमार्पण म्हणून आणलेला पशू कापला आणि अहरोनच्या मुलांनी त्या पशूचं रक्त अहरोनला दिलं आणि त्याने ते वेदीच्या सभोवती शिंपडलं.+ १३ त्यांनी त्याला होमार्पणाचे तुकडे, तसंच डोकंही दिलं आणि अहरोनने ते सर्व वेदीवर जाळलं. १४ त्यानंतर त्याने आतडी आणि पाय धुऊन ते वेदीवरच्या होमार्पणावर जाळले.
१५ मग त्याने लोकांसाठी असलेली अर्पणं दिली. आधी त्याने बकरा घेऊन तो कापला आणि लोकांच्या पापांसाठी तो अर्पण केला. त्याने ज्या पद्धतीने गोऱ्हा अर्पण केला होता, त्याच पद्धतीने हा बकरासुद्धा अर्पण केला. १६ नंतर त्याने होमार्पण आणलं आणि ते नेहमीप्रमाणे अर्पण केलं.+
१७ मग सकाळच्या होमार्पणासोबतच+ त्याने अन्नार्पणही आणलं+ आणि त्यातलं मूठभर घेऊन ते वेदीवर जाळलं.
१८ त्यानंतर त्याने लोकांसाठी असलेल्या शांती-अर्पणाचा बैल आणि मेंढा कापला. अहरोनच्या मुलांनी त्याला त्या पशूंचं रक्त आणून दिलं आणि त्याने ते वेदीच्या सभोवती शिंपडलं.+ १९ पण त्यांनी बैलाची चरबी,+ मेंढ्याचं चरबीदार शेपूट, आतल्या अवयवांवरची चरबी, गुरदे आणि यकृतावरची चरबी+ घेतली, २० आणि हे सर्व चरबीचे तुकडे त्यांनी त्या प्राण्यांच्या छातीच्या भागावर ठेवले. त्यानंतर अहरोनने ते चरबीचे तुकडे वेदीवर जाळले.+ २१ पण मोशेने आज्ञा दिल्याप्रमाणे, अहरोनने छातीचा भाग आणि उजवा पाय यहोवासमोर ओवाळण्याचं अर्पण म्हणून ओवाळला.+
२२ मग अहरोनने आपले हात वर करून लोकांना आशीर्वाद दिला.+ अशा रितीने पापार्पण, होमार्पण आणि शांती-अर्पणं दिल्यावर अहरोन खाली उतरला. २३ शेवटी मोशे आणि अहरोन भेटमंडपाच्या आत गेले आणि मग बाहेर येऊन त्यांनी लोकांना आशीर्वाद दिला.+
यानंतर यहोवाचं तेज लोकांसमोर प्रकट झालं.+ २४ मग यहोवाकडून आग निघून+ वेदीवर असलेल्या होमार्पणाचे आणि चरबीचे तुकडे भस्म करू लागली. लोकांनी हे पाहिलं, तेव्हा ते जयजयकार करू लागले आणि त्यांनी जमिनीवर डोकं टेकवून नमन केलं.+
१० मग नादाब आणि अबीहू या अहरोनच्या मुलांनी+ आपापलं धूप जाळण्याचं पात्र घेतलं आणि त्यात जळते कोळसे ठेवून त्यांवर धूप टाकला.+ यहोवाने आज्ञा दिली नसताना, त्यांनी नियमाविरुद्ध असलेला हा अग्नी त्याच्यासमोर नेला.+ २ तेव्हा, यहोवासमोरून आग निघाली आणि त्या आगीमुळे ते यहोवापुढे जळून मेले.+ ३ मग मोशे अहरोनला म्हणाला: “यहोवा म्हणतो, ‘जे माझ्या जवळ आहेत त्यांनी लक्षात ठेवावं की मी पवित्र आहे,+ आणि सर्व लोकांसमोर माझा गौरव झाला पाहिजे.’” तेव्हा अहरोन शांतच राहिला.
४ मग मोशेने अहरोनचे काका उज्जियेल+ यांची मुलं मीशाएल आणि एलसाफान यांना बोलावून म्हटलं: “इकडे या आणि पवित्र ठिकाणासमोरून आपल्या भावांना उचलून छावणीबाहेर घेऊन जा.” ५ तेव्हा ते आले आणि मोशेने सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्या दोघांना त्यांच्या झग्यांसोबत उचलून छावणीबाहेर नेलं.
६ मग मोशे अहरोनला आणि एलाजार व इथामार या त्याच्या दुसऱ्या मुलांना म्हणाला: “तुम्ही मरू नये आणि इस्राएलच्या सर्व लोकांविरुद्ध देवाचा राग भडकू नये, म्हणून आपले केस विस्कटू देऊ नका आणि आपली वस्त्रं फाडू नका.+ यहोवाने ज्यांना आगीने ठार मारलं आहे, त्यांच्यासाठी तुमचे भाऊ, म्हणजे इस्राएलचं संपूर्ण घराणं शोक करेल. ७ तुम्ही भेटमंडपाच्या प्रवेशाजवळून बाहेर जाऊ नका, नाहीतर तुम्ही मराल; कारण यहोवाचं अभिषेकाचं तेल तुमच्यावर आहे.”+ तेव्हा त्यांनी मोशेने सांगितल्याप्रमाणे केलं.
८ मग यहोवा अहरोनला म्हणाला: ९ “तू आणि तुझी मुलं भेटमंडपात याल, तेव्हा तुम्ही द्राक्षारस किंवा कोणत्याही प्रकारचं मद्य पिऊ नका,+ नाहीतर तुम्ही मराल. हा पिढ्या न् पिढ्या तुमच्यासाठी कायमचा नियम आहे. १० तो पवित्र व अपवित्र; आणि शुद्ध व अशुद्ध यांत फरक करण्यासाठी;+ ११ तसंच, यहोवाने मोशेद्वारे इस्राएली लोकांना सांगितलेले सगळे नियम त्यांना शिकवण्यासाठी आहे.”+
१२ मग अहरोन आणि त्याची राहिलेली मुलं म्हणजे एलाजार आणि इथामार यांना मोशे म्हणाला: “यहोवासाठी अग्नीत जाळून केल्या जाणाऱ्या अर्पणांतल्या अन्नार्पणातून जे उरलं, त्याच्या बेखमीर* भाकरी बनवून वेदीजवळ खा,+ कारण ते परमपवित्र आहे.+ १३ तुम्ही त्या पवित्र ठिकाणी खाव्यात,+ कारण यहोवासाठी अग्नीत जाळून केल्या जाणाऱ्या अर्पणांतून हा तुला आणि तुझ्या मुलांना देण्यात आलेला हिस्सा आहे. कारण मला अशीच आज्ञा देण्यात आली आहे. १४ तसंच, तुम्ही ओवाळण्याच्या अर्पणातून छातीचा भाग आणि पवित्र भागातला पाय+ एका स्वच्छ ठिकाणी खावा. तू तो आपल्या मुलामुलींसोबत खावा,+ कारण हे भाग इस्राएली लोकांनी दिलेल्या शांती-अर्पणांतून तुला आणि तुझ्या मुलांना देण्यात आलेला हिस्सा आहे. १५ अग्नीत जाळून अर्पण केलेल्या चरबीसोबत पवित्र भागातला पाय आणि ओवाळण्याच्या अर्पणातला छातीचा भाग, यहोवासमोर ओवाळण्याचं अर्पण म्हणून ओवाळण्यासाठी आणला जाईल; यहोवाने आज्ञा दिल्याप्रमाणे हा तुझा आणि तुझ्या मुलांचा कायमचा हिस्सा असेल.”+
१६ मोशेने पापार्पणाच्या बकऱ्याचा कसून शोध घेतला,+ तेव्हा तो जाळून टाकण्यात आल्याचं त्याला कळलं. तेव्हा अहरोनच्या राहिलेल्या मुलांवर, म्हणजे एलाजार आणि इथामार यांच्यावर तो भडकला आणि म्हणाला: १७ “पापार्पण हे परमपवित्र आहे आणि तुम्ही लोकांच्या पापांची जबाबदारी स्वतःवर घेऊन त्यांच्यासाठी यहोवासमोर प्रायश्चित्त करावं, म्हणून त्याने ते तुम्हाला दिलं आहे. मग तुम्ही ते पवित्र ठिकाणी खाल्लं का नाही?+ १८ त्याचं रक्त पवित्र ठिकाणाच्या आत आणण्यात आलेलं नाही.+ तुम्ही ते पवित्र ठिकाणी खायलाच हवं होतं, कारण मला अशीच आज्ञा देण्यात आली होती.” १९ अहरोनने मोशेला उत्तर दिलं: “आज त्यांनी यहोवासमोर त्यांचं पापार्पण आणि होमार्पण दिलं,+ आणि तरी या गोष्टी माझ्यासोबत घडल्या. जर मी ते पापार्पण आज खाल्लं असतं, तर यहोवाला हे आवडलं असतं का?” २० हे ऐकल्यावर मोशेचं समाधान झालं.
११ मग यहोवा मोशे आणि अहरोन यांना म्हणाला: २ “इस्राएली लोकांना सांगा, ‘जमिनीवर* राहणाऱ्या जीवजंतूंपैकी तुम्ही हे खाऊ शकता:+ ३ ज्याचे खूर दुभागलेले आहेत आणि जो रवंथ करतो असा प्रत्येक प्राणी तुम्ही खाऊ शकता.
४ पण जे फक्त रवंथ करतात किंवा ज्यांचे फक्त खूर दुभागलेले आहेत, त्यांपैकी हे प्राणी तुम्ही खाऊ नका: उंट, कारण तो रवंथ करतो, पण त्याचे खूर दुभागलेले नसतात. तो तुमच्यासाठी अशुद्ध आहे.+ ५ तसंच बिजू,*+ कारण तो रवंथ करतो, पण त्याचे खूर दुभागलेले नसतात. तो तुमच्यासाठी अशुद्ध आहे. ६ त्याच प्रकारे ससा, कारण तो रवंथ करतो, पण त्याचे खूर दुभागलेले नसतात. तो तुमच्यासाठी अशुद्ध आहे. ७ त्याचप्रमाणे डुक्कर,+ कारण त्याचे खूर दुभागलेले असतात, पण ते रवंथ करत नाही. ते तुमच्यासाठी अशुद्ध आहे. ८ तुम्ही त्यांच्यापैकी कोणाचंही मांस खाऊ नका किंवा त्यांच्या मेलेल्या शरीराला स्पर्श करू नका. ते तुमच्यासाठी अशुद्ध आहेत.+
९ पाण्यातल्या जीवजंतूंपैकी तुम्ही हे खाऊ शकता: ज्यांना पंख आणि खवले आहेत, मग ते जीव समुद्रातले असोत किंवा नदीतले, तुम्ही ते खाऊ शकता.+ १० पण नदी किंवा समुद्रात राहणाऱ्या जीवजंतूंपैकी, ज्यांना पंख आणि खवले नाहीत, असे प्राणी तुमच्यासाठी घृणास्पद आहेत, मग ते घोळक्यांत राहणारे असोत किंवा इतर कोणतेही जीवजंतू असोत. ११ खरोखरंच, तुम्ही त्यांना घृणास्पद समजलं पाहिजे. त्यांचं मांस खाऊ नका+ आणि अशा मेलेल्या जीवजंतूंची तुम्हाला घृणा वाटली पाहिजे. १२ ज्याला पंख आणि खवले नाहीत, असा पाण्यात राहणारा प्रत्येक जीव तुमच्यासाठी घृणास्पद आहे.
१३ उडणाऱ्या जीवजंतूंपैकी हे तुमच्यासाठी घृणास्पद आहेत आणि त्यांचं मांस तुम्ही खाऊ नये: गरुड,+ काळं गिधाड,+ मासेमारी घार,* १४ लाल घार आणि सर्व प्रकारच्या काळ्या घारी, १५ सर्व प्रकारचे कावळे, १६ शहामृग, घुबड, कुरव,* सर्व प्रकारचे ससाणे, १७ पिंगळा,* करढोक,* लांब कानांचं घुबड, १८ हंस, पाणकोळी, गिधाड, १९ करकोचा, सर्व प्रकारचे बगळे, हुदहुद* आणि वटवाघूळ. २० पंख असलेला व घोळक्यांत राहणारा चार पायांचा प्रत्येक जीव* तुमच्यासाठी घृणास्पद आहे.
२१ पंख असलेल्या व घोळक्यांत राहणाऱ्या चार पायांच्या जीवांपैकी, ज्यांना जमिनीवर उड्या मारण्यासाठी दोन लांब पाय असतात, फक्त ते तुम्ही खाऊ शकता. २२ त्यांपैकी तुम्ही हे खाऊ शकता: स्थलांतर करणारे वेगवेगळ्या प्रकारचे टोळ, इतर खाण्यालायक टोळ,+ रातकिडे आणि नाकतोडे. २३ पंख असलेले व घोळक्यांत राहणारे, चार पायांचे इतर सर्व जीवजंतू तुमच्यासाठी घृणास्पद आहेत. २४ त्यांच्यामुळे तुम्ही अशुद्ध होऊ शकता. जो कोणी अशा जीवजंतूंच्या मेलेल्या शरीराला स्पर्श करेल, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध असेल.+ २५ जो कोणी असे मेलेले जीवजंतू उचलेल, त्याने आपले कपडे धुवावेत.+ तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध असेल.
२६ ज्या प्राण्याचे खूर पूर्णपणे दुभागलेले नाहीत आणि जो रवंथ करत नाही, तो तुमच्यासाठी अशुद्ध आहे. अशा प्राण्यांना स्पर्श करणारा प्रत्येक जण अशुद्ध असेल.+ २७ चार पायांवर चालणारा प्रत्येक प्राणी जो आपल्या पंजांवर चालतो, तो तुमच्यासाठी अशुद्ध आहे. जो कोणी त्याच्या मेलेल्या शरीराला स्पर्श करेल, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध असेल. २८ जो कोणी असे मेलेले प्राणी उचलेल, त्याने आपले कपडे धुवावेत+ आणि तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध असेल.+ हे प्राणी तुमच्यासाठी अशुद्ध आहेत.
२९ जमिनीवर रांगणाऱ्या प्राण्यांपैकी हे तुमच्यासाठी अशुद्ध आहेत: घूस, उंदीर,+ सर्व प्रकारच्या पाली, ३० घोरपड, पाणसरडा, सापसुरळी, छोटी पाल आणि सरडा. ३१ हे सर्व रांगणारे प्राणी तुमच्यासाठी अशुद्ध आहेत.+ जो कोणी त्यांच्या मेलेल्या शरीराला स्पर्श करेल, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध असेल.+
३२ यांपैकी एखादा मेलेला प्राणी एखाद्या वस्तूवर पडला, तर ती वस्तू अशुद्ध होईल. मग ते एखादं लाकडाचं भांडं असो किंवा वस्त्र, कातडी असो किंवा गोणपाटाचा कपडा. रोजच्या वापरातलं कोणतंही भांडं जरी असलं, तरी ते पाण्यात बुडवून ठेवावं आणि ते संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील; मग ते शुद्ध होईल. ३३ जर असा मेलेला प्राणी मातीच्या भांड्यात पडला, तर ते भांडं फोडून टाका. त्यात जे काही असेल ते अशुद्ध होईल.+ ३४ अशा भांड्यातल्या पाण्याचा स्पर्श झालेले कोणतेही खाण्याचे पदार्थ अशुद्ध असतील आणि अशा भांड्यात ठेवलेला कोणताही पिण्याचा पदार्थ अशुद्ध असेल. ३५ हे मेलेले प्राणी कोणत्याही वस्तूवर पडले, तर ती अशुद्ध होईल. मग ती भट्टी असो किंवा लहान शेगडी, तिचे तुकडेतुकडे केले जावेत. या वस्तू अशुद्ध आहेत आणि त्या तुमच्यासाठी अशुद्ध राहतील. ३६ जर असा मेलेला प्राणी एखाद्या झऱ्यात किंवा पाणी साठवण्याच्या कुंडात पडला, तर तो झरा किंवा ते कुंड शुद्धच राहील, पण जो कोणी त्याचं मेलेलं शरीर पाण्यातून काढेल, तो अशुद्ध होईल. ३७ हे मेलेले प्राणी पेरणीसाठी असलेल्या बियाण्यावर पडले, तर ते बियाणं शुद्धच राहील; ३८ पण जर या प्राण्यांच्या मेलेल्या शरीराचा एखादा भाग, पाण्याने भिजलेल्या बियाण्यावर पडला, तर ते बियाणं अशुद्ध होईल.
३९ खाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्राण्यांपैकी एखादा मेला, तर त्याच्या मेलेल्या शरीराला स्पर्श करणारा संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.+ ४० त्या मेलेल्या प्राण्याचं मांस खाणाऱ्याने आपले कपडे धुवावेत आणि तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध असेल.+ जो कोणी त्या मेलेल्या प्राण्याचं शरीर उचलून नेईल, त्याने आपले कपडे धुवावेत आणि तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध असेल. ४१ जमिनीवर घोळक्यांत राहणारे जीवजंतू घृणास्पद आहेत,+ ते खाऊ नका. ४२ पोटावर सरपटणारे कोणतेही प्राणी, चार पायांवर चालणारे कोणतेही जीवजंतू किंवा जमिनीवर घोळक्यांत राहणारे व अनेक पाय असणारे जीवजंतू तुम्ही खाऊ नका, कारण ते घृणास्पद आहेत.+ ४३ घोळक्यांत राहणाऱ्या कोणत्याही प्राण्यामुळे तुम्ही घृणास्पद होऊ नका.* त्यांच्यामुळे स्वतःला दूषित करू नका आणि अशुद्ध होऊ नका.+ ४४ कारण मी तुमचा देव यहोवा आहे.+ तुम्ही शुद्ध राहून स्वतःला पवित्र करा,+ कारण मी पवित्र आहे.+ तेव्हा जमिनीवर चालणाऱ्या व घोळक्यांत राहणाऱ्या कोणत्याही जीवजंतूमुळे स्वतःला* अशुद्ध करू नका. ४५ मी तुमचा देव आहे हे सिद्ध व्हावं, म्हणून तुम्हाला इजिप्त* देशातून बाहेर काढणारा मी यहोवा आहे.+ तुम्ही पवित्र असलं पाहिजे,+ कारण मी पवित्र आहे.+
४६ हा प्राण्यांबद्दल, उडणाऱ्या जीवजंतूंबद्दल, पाण्यातल्या प्रत्येक जीवजंतूबद्दल आणि जमिनीवर घोळक्यांत राहणाऱ्या प्रत्येक जीवजंतूबद्दलचा नियम आहे. ४७ जे प्राणी शुद्ध आणि जे अशुद्ध आहेत, तसंच जे खाल्ले जाऊ शकतात आणि जे खाल्ले जाऊ शकत नाहीत, त्यांमध्ये फरक करता यावा म्हणून हा नियम आहे.’”+
१२ मग यहोवा मोशेला म्हणाला: २ “इस्राएली लोकांना सांग, ‘जर एखाद्या गर्भवती स्त्रीला मुलगा झाला, तर ती सात दिवस अशुद्ध राहील. तिच्या मासिक पाळीच्या दिवसांत ती अशुद्ध असते, तशीच ती अशुद्ध राहील.+ ३ आठव्या दिवशी त्या मुलाची सुंता* केली जावी.+ ४ त्या स्त्रीने पुढच्या ३३ दिवसांपर्यंत स्वतःला रक्तस्रावापासून शुद्ध करावं. तिचे शुद्ध होण्याचे दिवस पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत तिने कोणत्याही पवित्र वस्तूला स्पर्श करू नये किंवा पवित्र ठिकाणात येऊ नये.
५ जर तिला मुलगी झाली, तर ती स्त्री १४ दिवस अशुद्ध राहील. तिच्या मासिक पाळीच्या दिवसांत ती अशुद्ध असते, तशीच ती अशुद्ध राहील. त्या स्त्रीने पुढच्या ६६ दिवसांपर्यंत स्वतःला रक्तस्रावापासून शुद्ध करावं. ६ मुलाच्या किंवा मुलीच्या जन्मानंतर, तिचे शुद्ध होण्याचे दिवस पूर्ण झाल्यावर, तिने होमार्पणासाठी एक वर्षाचा मेंढा+ आणि पापार्पणासाठी कबुतराचं पिल्लू किंवा पारवा, भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ याजकाकडे आणावा. ७ तिच्यासाठी प्रायश्चित्त म्हणून याजक ही अर्पणं यहोवाला देईल आणि ती तिच्या रक्तस्रावापासून शुद्ध होईल. मुलाला किंवा मुलीला जन्म देणाऱ्या स्त्रीबद्दलचा हा नियम आहे. ८ पण मेंढा द्यायची तिची ऐपत नसेल, तर तिने दोन पारवे किंवा कबुतराची दोन पिल्लं आणावीत.+ यांतलं एक होमार्पणासाठी आणि एक पापार्पणासाठी असेल. याजक तिच्यासाठी प्रायश्चित्त करेल आणि ती शुद्ध होईल.’”
१३ यहोवा मोशे आणि अहरोन यांना म्हणाला: २ “एखाद्या माणसाच्या त्वचेवर* सूज, खपली किंवा चट्टा आला आणि त्यामुळे त्याच्या त्वचेवर कुष्ठरोग*+ होण्याची शक्यता असेल, तर त्याला अहरोन याजकाकडे किंवा याजक असलेल्या त्याच्या मुलांपैकी एकाकडे आणावं.+ ३ याजक त्याच्या त्वचेवर झालेला संसर्ग तपासून पाहील. जर संसर्ग झालेल्या त्वचेवरचे केस पांढरे झाले असतील आणि ती जागा त्वचेपेक्षा खोल गेलेली असेल, तर तो कुष्ठरोग आहे. याजक तो तपासेल आणि त्या माणसाला अशुद्ध घोषित करेल. ४ पण जर त्वचेवरचा चट्टा पांढरा असेल आणि तो त्वचेपेक्षा खोल गेल्यासारखा दिसत नसेल, तसंच, त्यावरचे केस पांढरे झाले नसतील, तर याजक संसर्ग झालेल्या माणसाला सात दिवस इतरांपासून वेगळं ठेवेल.+ ५ मग याजक सातव्या दिवशी त्याला तपासेल. जर त्याचा संसर्ग थांबल्याचं आणि त्वचेवर पसरलेला नसल्याचं दिसून आलं, तर तो त्या माणसाला आणखी सात दिवस इतरांपासून वेगळं ठेवेल.
६ सातव्या दिवशी याजक त्याला पुन्हा तपासेल. जर संसर्ग कमी झाला असेल आणि त्वचेवर पसरला नसेल, तर याजक त्याला शुद्ध घोषित करेल;+ ती फक्त खपली होती. त्या माणसाने आपले कपडे धुवावेत म्हणजे तो शुद्ध होईल. ७ पण स्वतःला शुद्ध ठरवण्यासाठी तो माणूस याजकासमोर गेल्यावर, जर ती खपली* त्वचेवर पसरल्याचं स्पष्टपणे दिसून आलं, तर त्याला पुन्हा* याजकासमोर जावं लागेल. ८ याजक ती खपली तपासून पाहील आणि जर ती त्वचेवर पसरली असेल, तर तो त्याला अशुद्ध घोषित करेल. हा कुष्ठरोग आहे.+
९ एखाद्याला कुष्ठरोग झाला, तर त्याला याजकाकडे आणलं जावं. १० याजक त्याला तपासून पाहील.+ जर त्वचेला पांढरी सूज आली असेल आणि तिथले केस पांढरे झाले असतील, तसंच त्या सुजलेल्या जागेवर उघडी जखम+ असेल, ११ तर तो त्याच्या त्वचेवरचा जुनाट कुष्ठरोग आहे. याजक त्याला अशुद्ध घोषित करेल. त्याने त्याला पुन्हा तपासण्यासाठी इतरांपासून वेगळं ठेवू नये,+ कारण तो अशुद्ध आहे. १२ जर त्या माणसाच्या संपूर्ण त्वचेवर कुष्ठरोग पसरला असेल, आणि याजकाला त्या माणसाच्या डोक्यापासून पायांपर्यंत कुष्ठरोग पसरल्याचं दिसत असेल; १३ आणि त्याला तपासल्यानंतर जर याजकाला दिसून आलं, की त्या माणसाच्या संपूर्ण त्वचेवर कुष्ठरोग पसरला आहे, तर याजक त्या संसर्ग झालेल्या माणसाला शुद्ध* घोषित करेल. त्याची सगळी त्वचा पांढरी झाली आहे आणि तो शुद्ध आहे. १४ पण त्याच्या त्वचेवर कधीही उघडी जखम दिसून आली, तर तो अशुद्ध होईल. १५ याजकाने ती उघडी जखम पाहिल्यावर तो त्याला अशुद्ध घोषित करेल.+ ती जखम अशुद्ध आहे. तो कुष्ठरोग आहे.+ १६ पण जर ती उघडी जखम पुन्हा पांढरी झाली, तर त्या माणसाने याजकाकडे यावं. १७ याजक त्याला तपासून पाहील+ आणि जर संसर्ग झालेली त्याची जखम पांढरी झाली असेल, तर तो त्या माणसाला शुद्ध घोषित करेल. तो शुद्ध आहे.
१८ एखाद्याच्या त्वचेवर फोड आला आणि तो बरा झाला, १९ पण त्या जागेवर पांढरी सूज किंवा लालसर-पांढरा चट्टा आला, तर त्याने याजकाकडे जावं. २० याजक तो चट्टा तपासून पाहील.+ तो त्वचेपेक्षा खोल गेलेला दिसत असेल आणि तिथले केस पांढरे झाले असतील, तर याजक त्याला अशुद्ध घोषित करेल. हा फोडावर आलेला कुष्ठरोग आहे. २१ पण त्याला तपासल्यावर जर याजकाला दिसून आलं, की तिथले केस पांढरे झालेले नाहीत आणि ती जागा त्वचेपेक्षा खोल गेलेली नाही, तसंच तो चट्टा फिकट झाला आहे, तर याजक त्याला सात दिवस इतरांपासून वेगळं ठेवेल.+ २२ जर तो चट्टा त्वचेवर पसरल्याचं स्पष्टपणे दिसून आलं, तर याजक त्याला अशुद्ध घोषित करेल. त्याला कुष्ठरोग आहे. २३ पण जर चट्टा तिथेच राहिला आणि पसरला नाही, तर ती फक्त फोडाची सूज आहे. याजक त्या माणसाला शुद्ध घोषित करेल.+
२४ किंवा एखाद्याला आगीने भाजल्यामुळे जखम झाली आणि त्या ओल्या जखमेवर लालसर-पांढरा किंवा पांढरा चट्टा आला, २५ तर याजक तो तपासून पाहील. जर त्या चट्ट्यावरचे केस पांढरे झाले असतील आणि तो त्वचेपेक्षा खोल गेलेला दिसत असेल, तर त्या जखमेत कुष्ठरोग झाला आहे. याजक त्या माणसाला अशुद्ध घोषित करेल. हा कुष्ठरोग आहे. २६ पण याजकाने तो तपासून पाहिल्यावर, त्यावरचे केस पांढरे झालेले नसतील, तो त्वचेपेक्षा खोल गेलेला नसेल आणि फिकट झाला असेल, तर याजक त्याला सात दिवस इतरांपासून वेगळं ठेवेल.+ २७ सातव्या दिवशी याजक त्याला तपासून पाहील. जर तो चट्टा त्वचेवर पसरल्याचं स्पष्टपणे दिसत असेल, तर याजक त्याला अशुद्ध घोषित करेल. हा कुष्ठरोग आहे. २८ पण जर तो चट्टा तिथेच राहिला, जर तो पसरला नाही आणि फिकट झाला, तर ती फक्त जखमेवरची सूज आहे. याजक त्या माणसाला शुद्ध घोषित करेल, कारण ती जखमेवरची सूज आहे.
२९ एखाद्या पुरुषाला किंवा स्त्रीला, डोक्यावर किंवा हनुवटीवर संसर्ग झाला, ३० तर याजक तो तपासून पाहील.+ जर तो त्वचेपेक्षा खोल गेला असेल आणि तिथल्या त्वचेवरचे केस पिवळे आणि कमी झाले असतील, तर याजक अशा व्यक्तीला अशुद्ध घोषित करेल. हा डोक्यावरच्या त्वचेचा किंवा दाढीचा संसर्ग आहे. हा डोक्यावरचा किंवा हनुवटीवरचा कुष्ठरोग आहे. ३१ पण जर तो संसर्ग त्वचेपेक्षा खोल गेला नसल्याचं आणि त्या त्वचेवर एकही काळा केस नसल्याचं याजकाला दिसून आलं, तर त्याने संसर्ग झालेल्या व्यक्तीला सात दिवस इतरांपासून वेगळं ठेवावं.+ ३२ सातव्या दिवशी याजक तो संसर्ग तपासून पाहील. जर संसर्ग पसरला नसेल आणि त्यावर एकही पिवळा केस आला नसेल, तसंच, संसर्ग झालेली जागा त्वचेपेक्षा खोल गेल्याचं दिसत नसेल, ३३ तर त्या व्यक्तीने आपल्या डोक्यावरचे किंवा हनुवटीवरचे केस काढावेत, पण संसर्ग झालेल्या जागेवरचे केस काढू नयेत. यानंतर याजक त्या व्यक्तीला सात दिवस इतरांपासून वेगळं ठेवेल.
३४ सात दिवसांनी याजक संसर्ग झालेली जागा पुन्हा तपासेल. जर तो डोक्यावरचा व दाढीचा संसर्ग त्वचेवर पसरला नसेल आणि त्वचेपेक्षा खोल गेला नसेल, तर याजकाने त्या व्यक्तीला शुद्ध घोषित करावं. त्या व्यक्तीने आपले कपडे धुवावेत आणि शुद्ध व्हावं. ३५ पण शुद्ध झाल्यानंतर, जर संसर्ग त्वचेवर पसरल्याचं स्पष्टपणे दिसून आलं, ३६ तर याजक त्या व्यक्तीला तपासून पाहील. जर संसर्ग त्वचेवर पसरला असेल, तर याजकाला पिवळे केस शोधण्याची गरज नाही. ती व्यक्ती अशुद्ध आहे. ३७ पण तपासून पाहिल्यावर जर संसर्ग पसरला नसल्याचं आणि त्यावर काळे केस उगवल्याचं दिसून आलं, तर संसर्ग बरा झाला आहे. ती व्यक्ती शुद्ध आहे. याजकाने तिला शुद्ध घोषित करावं.+
३८ एखाद्या पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या त्वचेवर चट्टे आले आणि ते चट्टे पांढरे असले, ३९ तर याजक त्या व्यक्तीला तपासून पाहील.+ जर त्वचेवरचे चट्टे* फिकट पांढरे असतील, तर तिथे नुसतंच पुरळ उठलं आहे. ती व्यक्ती शुद्ध आहे.
४० एखाद्या माणसाचे केस गळल्यामुळे त्याला टक्कल पडलं, तर तो शुद्ध आहे. ४१ त्याच्या डोक्याच्या पुढच्या भागावरचे केस गळल्यामुळे त्याला तिथे टक्कल पडलं असेल, तर तो शुद्ध आहे. ४२ पण जर त्याच्या डोक्याच्या टक्कल पडलेल्या भागावर किंवा कपाळावर लालसर-पांढरी जखम झाली, तर त्याच्या डोक्यावर किंवा कपाळावर कुष्ठरोग झाला आहे. ४३ याजक त्याला तपासून पाहील. त्याच्या डोक्याच्या टक्कल पडलेल्या भागावर किंवा कपाळावर जिथे संसर्ग झाला आहे, तिथे जर लालसर-पांढरी सूज आली असेल, आणि ती त्याच्या त्वचेवर कुष्ठरोगासारखी दिसत असेल, ४४ तर तो कुष्ठरोगी आहे. तो अशुद्ध आहे. त्याच्या डोक्यावरच्या रोगामुळे याजकाने त्याला अशुद्ध घोषित करावं. ४५ त्या कुष्ठरोग्याने फाटके कपडे घालावेत. त्याने आपले केस विंचरू नयेत आणि मिशी झाकून, ‘अशुद्ध, अशुद्ध’ असं ओरडावं. ४६ जितके दिवस त्याला रोग असेल तितके दिवस तो अशुद्ध राहील. अशुद्ध असल्यामुळे त्याने लोकांपासून दूर राहावं. त्याचं राहण्याचं ठिकाण छावणीच्या बाहेर असावं.+
४७ जर लोकरीच्या किंवा मलमलीच्या एखाद्या वस्त्रावर कुष्ठरोगाची लक्षणं दिसू लागली; ४८ आणि जर ही लक्षणं मलमलीच्या किंवा लोकरीच्या वस्त्राच्या उभ्या किंवा आडव्या धाग्यांमध्ये, किंवा एखाद्या कातडीवर वा कातडीपासून बनवलेल्या कोणत्याही वस्तूवर दिसू लागली; ४९ शिवाय, रोगाचा हिरवट-पिवळा किंवा लालसर डाग एखाद्या वस्त्रावर, कातडीवर, वस्त्राच्या उभ्या किंवा आडव्या धाग्यांवर, किंवा कातडीपासून बनवलेल्या कोणत्याही वस्तूवर दिसून आला, तर तो कुष्ठरोगाचा डाग आहे. तो याजकाला दाखवावा. ५० याजक तो तपासून पाहील आणि कुष्ठरोग झालेली ती वस्तू सात दिवस वेगळी ठेवेल.+ ५१ सातव्या दिवशी कुष्ठरोग तपासून पाहिल्यावर जर याजकाला तो डाग वस्त्रावर, त्याच्या उभ्या किंवा आडव्या धाग्यांवर किंवा कातडीवर (मग ती कातडी कशासाठीही वापरली जात असो) पसरल्याचा दिसून आला, तर हा घातक कुष्ठरोग आहे. ती वस्तू अशुद्ध आहे.+ ५२ ज्यात कुष्ठरोग दिसून आला आहे, ते लोकरीचं किंवा मलमलीचं वस्त्र किंवा कातडीपासून बनवलेली वस्तू याजकाने जाळून टाकावी, कारण तो घातक कुष्ठरोग आहे. ती वस्तू आगीत जाळून टाकावी.
५३ पण, जर तपासून पाहिल्यावर त्या वस्त्रात किंवा त्याच्या उभ्या किंवा आडव्या धाग्यांमध्ये, किंवा कातडीपासून बनवलेल्या वस्तूत रोग पसरला नसल्याचं याजकाला दिसून आलं, ५४ तर त्याने रोगाची लक्षणं दिसून आलेली ती वस्तू धुण्याची आज्ञा द्यावी आणि त्याने ती वस्तू आणखी सात दिवस वेगळी ठेवावी. ५५ ती वस्तू स्वच्छ धुतल्यावर याजकाने ती पुन्हा तपासून पाहावी. रोग पसरला नसला, पण रोगाची लक्षणं तशीच असल्याचं त्याला दिसून आलं, तर ती अशुद्ध आहे. ती वस्तू जाळून टाकली जावी, कारण ती रोगामुळे आतल्या किंवा बाहेरच्या बाजूने कुजली आहे.
५६ पण जर याजकाने तपासून पाहिल्यावर, ती वस्तू धुतल्यानंतर रोग झालेला भाग फिकट पडल्याचं त्याला दिसून आलं, तर वस्त्रातला किंवा कातडीतला तेवढा भाग त्याने फाडून टाकावा. ५७ पण, जर यानंतरही रोगाची लक्षणं वस्त्राच्या दुसऱ्या भागावर, त्याच्या उभ्या किंवा आडव्या धाग्यांवर किंवा कातडीच्या वस्तूवर दिसू लागली, तर रोग पसरत आहे. रोग लागलेली अशी कोणतीही वस्तू जाळून टाकावी.+ ५८ पण जर ते वस्त्र, त्याचे उभे किंवा आडवे धागे, किंवा कातडी वस्तू धुतल्यावर रोगाची लक्षणं नाहीशी झाली, तर ती वस्तू पुन्हा एकदा धुवावी, म्हणजे ती शुद्ध होईल.
५९ मलमलीच्या किंवा लोकरीच्या वस्त्रात, त्याच्या उभ्या किंवा आडव्या धाग्यांमध्ये, किंवा कातडीपासून बनवलेल्या कोणत्याही वस्तूत दिसून येणाऱ्या कुष्ठरोगाबद्दल आणि ती वस्तू शुद्ध किंवा अशुद्ध घोषित करण्याबद्दल हा नियम आहे.”
१४ यहोवा मोशेला पुढे म्हणाला: २ “कुष्ठरोग्याला शुद्ध ठरवण्याच्या दिवशी ज्या गोष्टी केल्या जाव्यात त्यांबद्दल हा नियम आहे. त्याला याजकाकडे आणावं.+ ३ याजकाने छावणीबाहेर जाऊन त्याला तपासावं. जर त्याचा कुष्ठरोग बरा झाला असेल, ४ तर याजकाने त्याच्या शुद्धीकरणासाठी त्याला दोन शुद्ध जिवंत पक्षी, देवदाराचं लाकूड, गडद लाल रंगाचं सूत आणि एजोबची* फांदी आणण्याची आज्ञा द्यावी.+ ५ मग मातीच्या भांड्यात झऱ्याचं ताजं पाणी घेऊन, त्यांपैकी एका पक्ष्याला त्यावर मारण्याची याजकाने आज्ञा द्यावी. ६ यानंतर याजकाने दुसरा जिवंत पक्षी, तसंच देवदाराचं लाकूड, गडद लाल रंगाचं सूत आणि एजोबची फांदी घ्यावी आणि झऱ्याच्या ताज्या पाण्यावर मारलेल्या पक्ष्याच्या रक्तात हे सर्व बुडवावं. ७ मग त्याने ते रक्त, कुष्ठरोगापासून ज्याचं शुद्धीकरण करायचं आहे त्याच्यावर सात वेळा शिंपडावं आणि त्याला शुद्ध घोषित करावं. यानंतर त्याने जिवंत पक्ष्याला रानात सोडून द्यावं.+
८ शुद्धीकरणासाठी आलेल्या माणसाने आपले कपडे धुवावेत, सर्व केस काढावेत आणि अंघोळ करावी म्हणजे तो शुद्ध होईल. त्यानंतर तो छावणीमध्ये येऊ शकतो, पण त्याने सात दिवस आपल्या तंबूबाहेर राहावं. ९ मग सातव्या दिवशी त्याने आपल्या डोक्यावरचे, दाढीचे आणि भुवयांचे सगळे केस काढावेत. यानंतर त्याने आपले कपडे धुवावेत आणि अंघोळ करावी, म्हणजे तो शुद्ध होईल.
१० मग आठव्या दिवशी त्याने कोणताही दोष नसलेले दोन मेंढे, तसंच कोणताही दोष नसलेली एक वर्षाची मेंढी,+ अन्नार्पण म्हणून तेलात मिसळलेलं तीन दशांश एफा* चांगलं पीठ+ आणि एक लोग* मापाइतकं तेल आणावं.+ ११ जो याजक शुद्धीकरणासाठी आलेल्या माणसाला शुद्ध घोषित करेल, त्याने त्याला भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ त्याच्या अर्पणांसोबत यहोवासमोर आणावं. १२ याजक त्यांतला एक मेंढा दोषार्पण+ म्हणून, लोगभर मापाइतक्या तेलासोबत देईल. तो ते यहोवासमोर ओवाळण्याचं अर्पण म्हणून ओवाळेल.+ १३ मग पापार्पणाचे आणि होमार्पणाचे पशू जिथे कापले जातात, तिथे एका पवित्र ठिकाणी त्याने तो मेंढा कापावा.+ कारण पापार्पणासारखंच दोषार्पणही याजकाचं आहे.+ ते परमपवित्र आहे.+
१४ यानंतर याजकाने दोषार्पणाचं काही रक्त घेऊन, ते शुद्धीकरणासाठी आलेल्या माणसाच्या उजव्या कानाच्या पाळीला, तसंच त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला आणि उजव्या पायाच्या अंगठ्याला लावावं. १५ मग याजकाने एक लोगभर तेलातून काही तेल+ आपल्या डाव्या तळहातावर ओतावं. १६ त्यानंतर याजकाने आपल्या उजव्या हाताचं बोट, डाव्या तळहातावरच्या तेलात बुडवून थोडं तेल यहोवासमोर सात वेळा शिंपडावं. १७ मग याजकाने आपल्या तळहातावरच्या उरलेल्या तेलातलं काही तेल, शुद्धीकरणासाठी आलेल्या माणसाच्या उजव्या कानाच्या पाळीवर, तसंच त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर आणि उजव्या पायाच्या अंगठ्यावर लावलेल्या दोषार्पणाच्या रक्तावर लावावं. १८ यानंतर याजकाने आपल्या तळहातावरचं उरलेलं तेल, शुद्धीकरणासाठी आलेल्या माणसाच्या डोक्याला लावावं आणि यहोवासमोर त्याच्यासाठी प्रायश्चित्त करावं.+
१९ मग याजकाने पापार्पण द्यावं+ आणि शुद्धीकरणासाठी आलेल्या माणसाकरता प्रायश्चित्त करावं. यानंतर त्याने होमार्पणासाठी असलेला पशू कापावा. २० मग याजकाने वेदीवर होमार्पण आणि अन्नार्पण+ द्यावं. अशा प्रकारे याजक त्या माणसासाठी प्रायश्चित्त करेल+ आणि तो शुद्ध होईल.+
२१ पण, जर तो गरीब असेल आणि त्याची ऐपत नसेल, तर त्याने आपल्या प्रायश्चित्तासाठी दोषार्पणाचा एक मेंढा ओवाळण्याचं अर्पण म्हणून आणावा. तसंच अन्नार्पणासाठी, तेलात मिसळलेलं एक दशांश एफा* चांगलं पीठ, लोगभर मापाइतकं तेल, २२ दोन पारवे किंवा कबुतराची दोन पिल्लं त्याच्या ऐपतीप्रमाणे आणावीत. त्यातलं एक पापार्पणासाठी, तर दुसरं होमार्पणासाठी असेल.+ २३ आठव्या दिवशी,+ स्वतःला शुद्ध ठरवण्यासाठी त्याने ही अर्पणं भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ यहोवासमोर याजकाकडे आणून द्यावीत.+
२४ याजकाने दोषार्पणाचा मेंढा+ आणि लोगभर मापाइतकं तेल घेऊन ते यहोवासमोर ओवाळण्याचं अर्पण म्हणून ओवाळावं.+ २५ मग त्याने दोषार्पणाचा मेंढा कापावा. त्यानंतर याजकाने दोषार्पणातलं काही रक्त घेऊन, ते शुद्धीकरणासाठी आलेल्या माणसाच्या उजव्या कानाच्या पाळीला, तसंच त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला आणि उजव्या पायाच्या अंगठ्याला लावावं.+ २६ याजकाने काही तेल आपल्या डाव्या तळहातावर ओतावं.+ २७ त्यानंतर याजकाने आपल्या उजव्या हाताच्या बोटाने, डाव्या तळहातावरचं काही तेल यहोवासमोर सात वेळा शिंपडावं. २८ मग याजकाने आपल्या तळहातावरचं काही तेल, शुद्धीकरणासाठी आलेल्या माणसाच्या उजव्या कानाच्या पाळीवर, तसंच त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर आणि उजव्या पायाच्या अंगठ्यावर, जिथे दोषार्पणाचं रक्त लावलं होतं तिथेच लावावं. २९ यानंतर शुद्धीकरणासाठी आलेल्या माणसाकरता यहोवासमोर प्रायश्चित्त करण्यासाठी, याजकाने आपल्या तळहातावरचं उरलेलं तेल त्याच्या डोक्याला लावावं.
३० त्या माणसाने आपल्या ऐपतीप्रमाणे+ आणलेल्या पारव्यांपैकी किंवा कबुतराच्या पिल्लांपैकी एक पक्षी याजकाने अर्पण करावा. ३१ त्याच्या ऐपतीप्रमाणे आणलेल्या पक्ष्यांपैकी एक पापार्पण म्हणून, तर दुसरा होमार्पण म्हणून+ त्याने अन्नार्पणासोबत द्यावा. अशा प्रकारे, याजक शुद्धीकरणासाठी आलेल्या माणसाकरता यहोवासमोर प्रायश्चित्त करेल.+
३२ ज्याला कुष्ठरोग झाला होता, पण स्वतःला शुद्ध ठरवण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आणण्याची ज्याची ऐपत नाही, त्याच्याबद्दल हा नियम आहे.”
३३ मोशे आणि अहरोन यांना यहोवा पुढे म्हणाला: ३४ “मी तुम्हाला वारसा म्हणून देत असलेल्या कनान देशात तुम्ही पोहोचल्यावर,+ त्या देशातल्या एखाद्या घराला जर मी कुष्ठरोग होऊ दिला,+ ३५ तर घराच्या मालकाने याजकाकडे येऊन असं सांगावं, ‘माझ्या घरावर रोगाची लक्षणं दिसत आहेत.’ ३६ घरातल्या सर्व वस्तूंना याजकाने अशुद्ध घोषित करू नये म्हणून, घराची तपासणी करायला येण्याआधी त्याने घरातल्या सर्व वस्तू बाहेर काढण्याची आज्ञा द्यावी. मग तो घराची पाहणी करायला येईल. ३७ त्याने संसर्ग झालेला भाग तपासून पाहावा. जर भिंतींवर हिरवट-पिवळे किंवा लालसर चट्टे पडले असतील आणि जर ते भिंतीत खोलवर गेल्यासारखे दिसत असतील, ३८ तर याजकाने बाहेर, घराच्या दाराजवळ जावं आणि सात दिवसांसाठी ते घर बंद करून ठेवावं.+
३९ सात दिवसांनंतर याजकाने पुन्हा येऊन घराची पाहणी करावी. जर रोगाची लक्षणं घराच्या भिंतींवर पसरली असतील, ४० तर याजकाने रोग लागलेले दगड काढून ते शहराबाहेर एका अशुद्ध ठिकाणी फेकून देण्याची आज्ञा द्यावी. ४१ मग त्याने घराच्या भिंती आतून चांगल्या प्रकारे घासून काढण्याची आज्ञा द्यावी आणि निघालेला सर्व चुना शहराबाहेर एका अशुद्ध ठिकाणी फेकला जावा. ४२ त्यानंतर जे दगड काढण्यात आले, त्यांच्याजागी नवीन चुना वापरून दुसरे दगड बसवले जावेत.
४३ पण जर दगड काढल्यानंतर आणि घर घासून नवीन चुना लावल्यानंतर, रोगाची लक्षणं पुन्हा दिसू लागली, ४४ तर याजक पुन्हा आत जाऊन घराची पाहणी करेल. जर रोग घरात पसरला असेल, तर त्या घराला घातक कुष्ठरोग+ झाला आहे. ते घर अशुद्ध आहे. ४५ ते घर पाडून टाकलं जावं. त्याचे दगड, लाकडी खांब आणि घराचा सर्व चुना शहराबाहेर एका अशुद्ध ठिकाणी फेकून दिला जावा.+ ४६ पण ते घर बंद करून ठेवलं असताना जर त्यात कोणी गेला,+ तर तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध असेल.+ ४७ जो कोणी त्या घरात झोपेल किंवा जेवेल त्याने आपले कपडे धुवावेत.
४८ पण जर नवीन चुना लावल्यावर, रोगाची लक्षणं घराच्या भिंतींवर पसरली नसल्याचं याजकाला दिसून आलं, तर याजकाने घराला शुद्ध घोषित करावं, कारण रोग बरा झाला आहे. ४९ घराचं शुद्धीकरण करण्यासाठी त्याने दोन पक्षी, देवदाराचं लाकूड, गडद लाल रंगाचं सूत आणि एजोबची फांदी घ्यावी.+ ५० मग त्याने मातीच्या भांड्यात झऱ्याचं ताजं पाणी घेऊन, त्यावर एका पक्ष्याला मारावं. ५१ यानंतर त्याने देवदाराचं लाकूड, एजोबची फांदी, गडद लाल रंगाचं सूत आणि जिवंत पक्षी घ्यावा आणि झऱ्याच्या ताज्या पाण्यावर मारलेल्या पक्ष्याच्या रक्तात हे सर्व बुडवावं. मग त्याने ते रक्त घराच्या दिशेला सात वेळा शिंपडावं.+ ५२ पक्ष्याचं रक्त, झऱ्याचं ताजं पाणी, जिवंत पक्षी, देवदाराचं लाकूड, एजोबची फांदी आणि गडद लाल रंगाचं सूत यांनी त्याने त्या घराचं शुद्धीकरण करावं. ५३ मग त्याने जिवंत पक्ष्याला शहराबाहेर रानात सोडून द्यावं. अशा प्रकारे त्याने घरासाठी प्रायश्चित्त करावं, म्हणजे ते घर शुद्ध होईल.
५४ हा नियम कोणत्याही प्रकारचा कुष्ठरोग, डोक्यावर किंवा दाढीला होणारा संसर्ग,+ ५५ वस्त्राला+ किंवा घराला+ होणारा कुष्ठरोग, ५६ तसंच सूज, खपल्या आणि चट्टे यांबद्दल आहे.+ ५७ एखादी गोष्ट केव्हा शुद्ध आणि केव्हा अशुद्ध असते, हे ठरवण्याबद्दल हा नियम आहे.+ हा कुष्ठरोगाबद्दल नियम आहे.”+
१५ अहरोन आणि मोशे यांना यहोवा पुढे म्हणाला: २ “इस्राएली लोकांना असं सांग, ‘जर एखाद्या पुरुषाच्या जननेंद्रियातून* स्राव होत असेल, तर त्या स्रावामुळे तो अशुद्ध आहे.+ ३ त्याच्या जननेंद्रियातून स्राव होत असो, किंवा त्यामुळे त्याच्या जननेंद्रियात अडथळा निर्माण झाला असो, त्या स्रावामुळे तो अशुद्धच आहे.
४ स्राव होत असलेला माणूस ज्या बिछान्यावर झोपेल किंवा ज्या वस्तूवर बसेल, ती अशुद्ध होईल. ५ त्याच्या बिछान्याला स्पर्श करणाऱ्याने आपले कपडे धुवावेत, अंघोळ करावी आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावं.+ ६ स्राव होणारा माणूस ज्या वस्तूवर बसला होता, त्या वस्तूवर जर कोणी बसला, तर त्याने आपले कपडे धुवावेत, अंघोळ करावी आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावं. ७ स्राव होणाऱ्याच्या शरीराला जो कोणी स्पर्श करेल, त्याने आपले कपडे धुवावेत, अंघोळ करावी आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावं. ८ जर स्राव होणारा माणूस शुद्ध असलेल्या कोणावर थुंकला, तर त्याने आपले कपडे धुवावेत, अंघोळ करावी आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावं. ९ स्राव होत असलेला ज्या खोगिरावर बसेल, ते अशुद्ध होईल. १० त्याच्या अंगाखाली असलेल्या कोणत्याही वस्तूला स्पर्श करणारा संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील. जो कोणी त्या वस्तू उचलेल, त्याने आपले कपडे धुवावेत, अंघोळ करावी आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावं. ११ स्राव होणाऱ्याने+ हात न धुता कोणाला स्पर्श केला, तर त्याने आपले कपडे धुवावेत, अंघोळ करावी आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावं. १२ स्राव होणाऱ्याने जर एखाद्या मातीच्या भांड्याला स्पर्श केला, तर ते फोडून टाकावं. जर त्याने एखाद्या लाकडी भांड्याला स्पर्श केला, तर ते पाण्याने धुवावं.+
१३ त्या माणसाचा स्राव थांबल्यावर आणि तो त्यापासून शुद्ध झाल्यावर, त्याने आपल्या शुद्धीकरणासाठी सात दिवस मोजावेत. मग त्याने आपले कपडे धुवावेत आणि ताज्या पाण्याने अंघोळ करावी, म्हणजे तो शुद्ध होईल.+ १४ आठव्या दिवशी त्याने दोन पारवे किंवा कबुतराची दोन पिल्लं+ घेऊन, ती भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ यहोवासमोर आणावीत आणि याजकाकडे द्यावीत. १५ मग याजक त्या पक्ष्यांपैकी एक पापार्पण म्हणून, तर दुसरा होमार्पण म्हणून अर्पण करेल. अशा प्रकारे याजक त्या माणसाच्या स्रावाबद्दल यहोवासमोर त्याच्यासाठी प्रायश्चित्त करेल.
१६ जर एखाद्या पुरुषाचा वीर्यपात झाला, तर त्याने आपलं संपूर्ण शरीर पाण्याने धुवावं आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावं.+ १७ वीर्य लागलेलं कोणतंही वस्त्र किंवा कातडी त्याने पाण्याने धुवावी. ती वस्तू संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.
१८ स्त्रीशी संबंध ठेवताना एखाद्या माणसाचा वीर्यपात होतो, तेव्हा त्यांनी अंघोळ करावी आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावं.+
१९ मासिक पाळीमुळे एखाद्या स्त्रीच्या शरीरातून रक्तस्राव होतो, तेव्हा तिने सात दिवस अशुद्ध राहावं.+ जो कोणी तिला स्पर्श करेल, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.+ २० मासिक पाळीमुळे अशुद्ध असताना ती ज्या कशावर झोपेल किंवा बसेल, ते अशुद्ध होईल.+ २१ जो कोणी तिच्या बिछान्याला स्पर्श करेल, त्याने आपले कपडे धुवावेत, अंघोळ करावी आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावं. २२ ती ज्या गोष्टीवर बसली होती, अशा कोणत्याही गोष्टीला स्पर्श करणाऱ्याने आपले कपडे धुवावेत, अंघोळ करावी आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावं. २३ जर ती बिछान्यावर किंवा इतर कोणत्याही गोष्टीवर बसली, तर त्या गोष्टीला स्पर्श करणारा संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.+ २४ तिच्याशी संबंध ठेवताना एखाद्या पुरुषाला तिच्या मासिक पाळीच्या रक्ताचा स्पर्श झाला,+ तर त्याने सात दिवस अशुद्ध राहावं. तो ज्या बिछान्यावर झोपेल, तो अशुद्ध होईल.
२५ मासिक पाळी नसताना जर एखाद्या स्त्रीला बरेच दिवस रक्तस्राव झाला,+ किंवा तिला मासिक पाळीपेक्षा जास्त दिवस रक्तस्राव झाला,+ तर त्या सर्व दिवसांत तिने मासिक पाळीच्या दिवसांसारखंच अशुद्ध राहावं. २६ रक्तस्राव होणाऱ्या दिवसांत ती ज्या बिछान्यावर झोपेल, तो तिच्या मासिक पाळीमुळे अशुद्ध होणाऱ्या बिछान्यासारखाच अशुद्ध असेल.+ तसंच ती ज्या गोष्टीवर बसेल, ती तिच्या मासिक पाळीमुळे अशुद्ध होणाऱ्या गोष्टीसारखीच अशुद्ध असेल. २७ जो कोणी या गोष्टींना स्पर्श करेल, तो अशुद्ध होईल. त्याने आपले कपडे धुवावेत, अंघोळ करावी आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावं.+
२८ पण, तिचा रक्तस्राव थांबल्यावर तिने सात दिवस मोजावेत आणि त्यानंतर ती शुद्ध होईल.+ २९ आठव्या दिवशी तिने दोन पारवे किंवा कबुतराची दोन पिल्लं+ घ्यावी आणि ती भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ याजकाकडे आणावी.+ ३० मग याजक त्या पक्ष्यांपैकी एक पापार्पण म्हणून, तर दुसरा होमार्पण म्हणून अर्पण करेल. अशा प्रकारे याजक त्या स्त्रीच्या अशुद्ध स्रावाबद्दल यहोवासमोर तिच्यासाठी प्रायश्चित्त करेल.+
३१ अशा रितीने तुम्ही इस्राएली लोकांना त्यांच्या अशुद्धतेपासून दूर ठेवावं; म्हणजे ते त्यांच्यामध्ये असलेल्या+ माझ्या उपासना मंडपाला त्यांच्या अशुद्धतेमुळे दूषित करून मरणार नाहीत.
३२ हा नियम स्राव होणाऱ्या पुरुषाबद्दल, वीर्यपातामुळे अशुद्ध झालेल्या पुरुषाबद्दल,+ ३३ मासिक पाळीमुळे अशुद्ध झालेल्या स्त्रीबद्दल,+ शरीरातून स्राव होणाऱ्या कोणत्याही स्त्रीपुरुषाबद्दल+ आणि अशुद्ध स्त्रीशी संबंध ठेवणाऱ्या पुरुषाबद्दल आहे.’”
१६ यहोवासमोर गेल्यामुळे अहरोनच्या दोन मुलांचा मृत्यू झाल्यानंतर,+ यहोवा मोशेशी बोलला. २ यहोवा त्याला म्हणाला: “तुझा भाऊ अहरोन याला सांग, की त्याने पडद्यामागे परमपवित्र स्थानात, साक्षपेटीच्या झाकणासमोर वाटेल तेव्हा येऊ नये,+ नाहीतर तो मरेल;+ कारण, मी झाकणावर एका ढगात प्रकट होईन.+
३ परमपवित्र स्थानात येण्याआधी अहरोनने पापार्पणासाठी एक गोऱ्हा*+ आणि होमार्पणासाठी एक मेंढा+ अर्पण करावा. ४ त्याने मलमलीचा पवित्र झगा+ घालावा आणि मलमलीच्या अंतर्वस्त्रांनी*+ त्याचं अंग* झाकलेलं असावं. तसंच, त्याने कमरेला मलमलीचा कमरबंद+ बांधावा आणि डोक्यावर मलमलीची पगडी+ घालावी. ही पवित्र वस्त्रं आहेत.+ त्याने अंघोळ केल्यानंतर+ ही वस्त्रं घालावीत.
५ त्याने इस्राएली लोकांकडून+ पापार्पणासाठी दोन बकरे आणि होमार्पणासाठी एक मेंढा घ्यावा.
६ मग अहरोनने स्वतःसाठी असलेला पापार्पणाचा गोऱ्हा आणावा आणि आपल्यासाठी+ व आपल्या घराण्यासाठी प्रायश्चित्त करावं.
७ यानंतर त्याने ते दोन बकरे घेऊन त्यांना भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ यहोवापुढे उभं करावं. ८ अहरोनने त्या दोन बकऱ्यांवर चिठ्ठ्या टाकाव्यात; एक चिठ्ठी यहोवासाठी आणि एक अजाजेलसाठी.* ९ ज्या बकऱ्यावर यहोवाच्या नावाची चिठ्ठी+ निघेल, तो बकरा अहरोन पापार्पण म्हणून देईल. १० पण ज्या बकऱ्यावर अजाजेलची* चिठ्ठी निघेल, त्याला यहोवासमोर जिवंत उभं करावं आणि त्याच्यावर प्रायश्चित्ताचा विधी करावा; नंतर, त्याला अजाजेलसाठी रानात सोडून द्यावं.+
११ अहरोनने स्वतःसाठी असलेला पापार्पणाचा गोऱ्हा आणावा आणि आपल्यासाठी व आपल्या घराण्यासाठी प्रायश्चित्त करावं. त्यानंतर, त्याने स्वतःसाठी असलेला तो पापार्पणाचा गोऱ्हा कापावा.+
१२ मग त्याने यहोवासमोर असलेल्या वेदीतले जळते कोळसे+ धूप जाळण्याच्या पात्रात+ भरावेत आणि दोन मुठी भरून धूपही+ घ्यावा. त्याने या गोष्टी पडद्यामागे परमपवित्र स्थानात आणाव्यात.+ १३ मग त्याने यहोवासमोर आगीवर धूप अशा प्रकारे टाकावा,+ की त्यामुळे साक्षपेटीवर+ असलेलं झाकण+ धूपाच्या धुराने झाकून जाईल, म्हणजे तो मरणार नाही.
१४ त्याने गोऱ्ह्याचं काही रक्त+ घेऊन झाकणासमोर, पूर्वेकडे बोटाने शिंपडावं. त्याने ते सात वेळा आपल्या बोटाने झाकणासमोर शिंपडावं.+
१५ मग त्याने लोकांसाठी असलेल्या पापार्पणाचा बकरा कापावा+ आणि त्याचं रक्त परमपवित्र स्थानात, पडद्याच्या आत आणावं+ आणि गोऱ्ह्याच्या रक्तासोबत केलं होतं, तसंच करावं;+ त्याने ते झाकणासमोर शिंपडावं.
१६ त्याने इस्राएली लोकांच्या अशुद्ध कामांबद्दल आणि त्यांच्या अपराधांबद्दल व पापांबद्दल+ परमपवित्र स्थानासाठी प्रायश्चित्त करावं. भेटमंडपासाठीही त्याने तसंच करावं, कारण तो अशुद्ध कामं करणाऱ्या लोकांच्या मध्ये आहे.
१७ प्रायश्चित्त करण्यासाठी अहरोन परमपवित्र स्थानात गेल्यानंतर, तो बाहेर येईपर्यंत कोणीही भेटमंडपात जाऊ नये. तो आपल्यासाठी आणि आपल्या घराण्यासाठी,+ तसंच इस्राएलच्या संपूर्ण मंडळीसाठी+ प्रायश्चित्त करेल.
१८ मग त्याने बाहेर, यहोवासमोर असलेल्या वेदीजवळ यावं+ आणि तिच्यासाठी प्रायश्चित्त करावं. यानंतर गोऱ्ह्याचं आणि बकऱ्याचं काही रक्त घेऊन त्याने ते वेदीच्या चारही बाजूंना असलेल्या शिंगांना लावावं. १९ तसंच, त्याने आपल्या बोटाने काही रक्त सात वेळा वेदीवर शिंपडावं आणि तिला इस्राएली लोकांच्या अशुद्ध कामांपासून पवित्र आणि शुद्ध करावं.
२० परमपवित्र स्थान, भेटमंडप आणि वेदी+ यांच्यासाठी प्रायश्चित्त+ केल्यानंतर त्याने जिवंत बकराही आणावा.+ २१ अहरोनने आपले दोन्ही हात त्या जिवंत बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून इस्राएली लोकांच्या सर्व चुका, अपराध आणि पापं कबूल करावीत आणि ती त्या बकऱ्याच्या डोक्यावर ठेवावीत.+ मग, त्याने नेमलेल्या माणसाच्या* हातून त्या बकऱ्याला रानात पाठवून द्यावं. २२ अशा रितीने, अहरोन त्या बकऱ्याला पाठवून देईल आणि तो बकरा इस्राएली लोकांचे सर्व अपराध स्वतःवर घेऊन+ रानात निघून जाईल.+
२३ मग अहरोनने भेटमंडपात जावं आणि परमपवित्र स्थानात जाताना जी मलमलीची वस्त्रं त्याने घातली होती, ती काढून ठेवावीत. २४ त्याने एका पवित्र ठिकाणी अंघोळ करून+ आपली वस्त्रं घालावीत.+ मग त्याने बाहेर येऊन आपल्यासाठी असलेलं होमार्पण+ आणि लोकांसाठी असलेलं होमार्पण+ द्यावं आणि स्वतःसाठी व लोकांसाठी प्रायश्चित्त करावं.+ २५ त्याने पापार्पणाची चरबी वेदीवर जाळावी.
२६ ज्या माणसाने अजाजेलसाठी*+ असलेल्या बकऱ्याला रानात सोडलं, त्याने आपले कपडे धुवावेत, अंघोळ करावी आणि मग तो छावणीत येऊ शकतो.
२७ पापार्पणाच्या ज्या गोऱ्ह्याचं आणि पापार्पणाच्या ज्या बकऱ्याचं रक्त प्रायश्चित्त करण्यासाठी परमपवित्र स्थानात नेण्यात आलं होतं, त्यांना छावणीबाहेर घेऊन जावं. त्यांची कातडी, मांस आणि शेण जाळून टाकावं.+ २८ ते जाळून टाकणाऱ्याने आपले कपडे धुवावेत, अंघोळ करावी आणि मग तो छावणीत येऊ शकतो.
२९ तुमच्यासाठी हा एक कायमचा नियम आहे: सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी तुम्ही आपल्या पापांबद्दल शोक करावा.* त्या दिवशी तुम्ही कोणतंही काम करू नये.+ देशातल्या रहिवाशाने, तसंच, तुमच्यामध्ये राहणाऱ्या विदेश्यानेही कोणतंच काम करू नये. ३० त्या दिवशी, तुम्हाला शुद्ध घोषित करण्याकरता तुमच्यासाठी प्रायश्चित्त+ केलं जाईल; म्हणजे तुम्ही यहोवासमोर आपल्या सर्व पापांपासून शुद्ध व्हाल.+ ३१ तो तुमच्यासाठी पूर्ण विश्रांतीचा शब्बाथ आहे आणि त्या दिवशी तुम्ही आपल्या पापांसाठी शोक करावा.+ हा एक कायमचा नियम आहे.
३२ याजक म्हणून+ आपल्या वडिलांच्या जागी सेवा करण्यासाठी+ ज्याला अभिषेक+ करून नियुक्त केलं जाईल,* तो प्रायश्चित्त करेल आणि मलमलीपासून बनवलेली पवित्र वस्त्रं घालेल.+ ३३ त्याने परमपवित्र स्थान,+ भेटमंडप+ आणि वेदी+ यांच्यासाठी; तसंच, याजकांसाठी आणि इस्राएलच्या मंडळीतल्या सर्व लोकांसाठी+ प्रायश्चित्त करावं. ३४ इस्राएली लोकांच्या सर्व पापांसाठी वर्षातून एकदा प्रायश्चित्त करण्याबद्दलचा+ हा नियम, तुमच्यासाठी कायमचा नियम असेल.”+
यहोवाने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणेच त्याने केलं.
१७ यहोवा मोशेला पुढे म्हणाला: २ “अहरोनला, त्याच्या मुलांना, तसंच सर्व इस्राएली लोकांना सांग, ‘यहोवाने अशी आज्ञा दिली आहे:
३ जर इस्राएलच्या घराण्यातल्या कोणत्याही माणसाने छावणीत किंवा छावणीबाहेर एखादा बैल, मेंढा किंवा बकरा कापला; ४ आणि जर त्याने तो भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ, यहोवाच्या उपासना मंडपासमोर, यहोवासाठी अर्पण म्हणून आणला नाही, तर त्याला रक्तदोष लागेल. त्याने रक्त सांडलं आहे म्हणून त्या माणसाला ठार मारलं जावं. ५ हे यासाठी की, इस्राएली लोकांनी यापुढे रानात बलिदानं अर्पण न करता, ती यहोवासाठी, भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ याजकाकडे आणावीत. त्यांनी ती शांती-अर्पणं म्हणून यहोवाला अर्पण करावीत.+ ६ याजक भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ यहोवाच्या वेदीवर रक्त शिंपडेल व चरबी जाळेल आणि या सुवासाने यहोवाला आनंद होईल.*+ ७ ते अविश्वासू होऊन ज्या बकऱ्यांसारख्या दैवतांची* उपासना करत आहेत,*+ त्या दैवतांना यापुढे त्यांनी बलिदानं अर्पण करू नयेत.+ हा तुमच्यासाठी पिढ्या न् पिढ्या एक कायमचा नियम असेल.’
८ त्यांना असं सांग, ‘जर इस्राएलच्या घराण्यातल्या कोणत्याही माणसाने किंवा तुमच्यामध्ये राहणाऱ्या कोणत्याही विदेश्याने होमार्पण किंवा बलिदान दिलं, ९ आणि जर त्याने ते यहोवाला अर्पण करण्यासाठी भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ आणलं नाही, तर त्याला ठार मारलं जावं.+
१० जर इस्राएलच्या घराण्यातल्या एखाद्या माणसाने किंवा तुमच्यामध्ये राहणाऱ्या एखाद्या विदेश्याने, कोणत्याही प्रकारचं रक्त खाल्लं,+ तर मी रक्त खाणाऱ्या त्या माणसाला* नाकारीन आणि त्याला ठार मारीन. ११ कारण प्राण्याचा जीव* त्याच्या रक्तात आहे+ आणि तुम्ही आपल्यासाठी* वेदीवर+ प्रायश्चित्त करावं, म्हणून मी ते तुम्हाला दिलं आहे. रक्तात जीवन* असल्यामुळे रक्तानेच प्रायश्चित्त होतं.+ १२ म्हणूनच मी इस्राएली लोकांना सांगितलं आहे: “तुमच्यापैकी कोणीही* रक्त खाऊ नये आणि तुमच्यामध्ये राहणाऱ्या कोणत्याच विदेश्यानेही+ रक्त खाऊ नये.”+
१३ एखाद्या इस्राएली माणसाने किंवा तुमच्यामध्ये राहणाऱ्या एखाद्या विदेश्याने शिकार करून, खाण्यासाठी असलेला एखादा जंगली प्राणी किंवा पक्षी पकडला, तर त्याने त्याचं रक्त जमिनीवर ओतावं+ आणि मातीने झाकावं. १४ कारण रक्तात जीवन* असल्यामुळे, प्रत्येक प्राण्याचं रक्त म्हणजेच त्याचं जीवन* आहे. म्हणूनच मी इस्राएली लोकांना असं सांगितलं आहे: “कोणत्याही प्रकारचं रक्त खाऊ नका, कारण प्रत्येक प्राण्याचं रक्त म्हणजेच त्याचं जीवन आहे आणि जो कोणी रक्त खाईल त्याला ठार मारलं जाईल.”+ १५ जर कोणीही,* मग तो देशातला रहिवासी असो किंवा विदेशी, जर त्याने मेलेल्या स्थितीत सापडलेल्या किंवा एखाद्या जंगली जनावराने फाडून टाकलेल्या प्राण्याचं मांस खाल्लं,+ तर त्याने आपले कपडे धुवावेत, अंघोळ करावी आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावं;+ मग तो शुद्ध होईल. १६ पण जर त्याने कपडे धुतले नाहीत आणि अंघोळ केली नाही तर त्याला त्याच्या चुकीची शिक्षा मिळेल.’”+
१८ यहोवा मोशेला पुढे म्हणाला: २ “इस्राएली लोकांना सांग, ‘मी तुमचा देव यहोवा आहे.+ ३ ज्या इजिप्त देशात तुम्ही राहत होता, तिथल्या लोकांसारखं वागू नका. तसंच, ज्या कनान देशात मी तुम्हाला नेणार आहे, त्या लोकांसारखंही वागू नका.+ तुम्ही त्या लोकांच्या रीतींप्रमाणे* चालू नका. ४ तुम्ही माझे न्याय-निर्णय* पाळले पाहिजेत आणि माझ्या नियमांप्रमाणे चाललं पाहिजे.+ मी तुमचा देव यहोवा आहे. ५ तुम्ही माझे नियम आणि माझे न्याय-निर्णय पाळा. जो कोणी असं करेल तो त्यांमुळे जगेल.+ मी यहोवा आहे.
६ तुमच्यापैकी कोणत्याही माणसाने शरीरसंबंध ठेवण्यासाठी* आपल्या जवळच्या नातेवाइकांपैकी कोणाजवळ जाऊ नये.+ मी यहोवा आहे. ७ तू आपल्या वडिलांशी शरीरसंबंध ठेवू नको आणि आपल्या आईशी शरीरसंबंध ठेवू नको. ती तुझी आई आहे आणि तू तिच्याशी शरीरसंबंध ठेवू नये.
८ तू आपल्या वडिलांच्या बायकोशी शरीरसंबंध ठेवू नको.+ हे तुझ्या वडिलांची लाज उघडी करण्यासारखं आहे.*
९ तू आपल्या बहिणीशी, म्हणजे तुझ्या वडिलांच्या मुलीशी किंवा तुझ्या आईच्या मुलीशी शरीरसंबंध ठेवू नको; मग तुमचा जन्म एकाच घरात झालेला असो, किंवा वेगवेगळ्या घरांत.+
१० तू आपल्या मुलाच्या मुलीशी किंवा आपल्या मुलीच्या मुलीशी शरीरसंबंध ठेवू नको, कारण यामुळे तुझीच बेअब्रू होईल.*
११ तुझ्या वडिलांच्या बायकोला, तुझ्या वडिलांपासून झालेल्या मुलीशी तू शरीरसंबंध ठेवू नको, कारण ती तुझी बहीण आहे.
१२ तू आपल्या आत्याशी शरीरसंबंध ठेवू नको. तिचं तुझ्या वडिलांशी रक्ताचं नातं आहे.+
१३ तू आपल्या मावशीशी शरीरसंबंध ठेवू नको, कारण तिचं तुझ्या आईशी रक्ताचं नातं आहे.
१४ तू आपल्या काकांच्या बायकोशी शरीरसंबंध ठेवून त्यांची लाज उघडी करू नको.* ती तुझी काकू आहे.+
१५ तू आपल्या सुनेशी शरीरसंबंध ठेवू नको.+ ती तुझ्या मुलाची बायको आहे, म्हणून तू तिच्याशी शरीरसंबंध ठेवू नये.
१६ तू आपल्या वहिनीशी शरीरसंबंध ठेवू नको,+ कारण हे तुझ्या भावाची लाज उघडी करण्यासारखं आहे.*
१७ तू एखाद्या स्त्रीशी आणि तिच्या मुलीशी शरीरसंबंध ठेवू नको.+ तू तिच्या नातीशी, मग ती तिच्या मुलाची मुलगी असो, किंवा मुलीची मुलगी असो; तिला आपली बायको करून तिच्याशी शरीरसंबंध ठेवू नको. त्यांच्याशी तिचं जवळचं नातं आहे; हे एक अश्लील कृत्य* आहे.
१८ तू आपल्या बायकोच्या बहिणीशी लग्न करून तिला आपल्या बायकोची सवत करू नको,+ आणि तुझी बायको जिवंत असताना तिच्या बहिणीशी शरीरसंबंध ठेवू नको.
१९ मासिक पाळीमुळे अशुद्ध असलेल्या स्त्रीशी शरीरसंबंध ठेवायला तिच्याजवळ जाऊ नको.+
२० तू दुसऱ्याच्या* बायकोशी शरीरसंबंध ठेवून स्वतःला अशुद्ध करू नको.+
२१ तू आपल्या मुलांपैकी कोणालाही मोलख दैवताला अर्पण करू नको.*+ असं करून तू आपल्या देवाच्या नावाचा अनादर करू नको.+ मी यहोवा आहे.
२२ तू स्त्रीसोबत शरीरसंबंध ठेवतोस, तसे पुरुषाशी ठेवू नकोस.+ हे घृणास्पद कृत्य आहे.
२३ कोणत्याही माणसाने प्राण्याशी संभोग करून अशुद्ध होऊ नये; तसंच, स्त्रीनेही प्राण्याशी संभोग करायला त्याच्याजवळ जाऊ नये.+ हे अनैसर्गिक कृत्य आहे.
२४ यांपैकी कोणत्याही गोष्टीमुळे स्वतःला अशुद्ध करू नका, कारण ज्या राष्ट्रांना मी तुमच्यासमोरून हाकलून लावणार आहे, त्यांनी याच सर्व गोष्टींमुळे स्वतःला अशुद्ध केलं आहे.+ २५ म्हणूनच, तो देश अशुद्ध झाला आहे आणि मी त्याच्या पापांबद्दल त्याला शिक्षा देईन आणि तो देश आपल्या रहिवाशांना ओकून टाकेल.*+ २६ पण तुमच्यापैकी प्रत्येकाने, मग तो तुमच्या देशाचा रहिवासी असो किंवा तुमच्यामध्ये राहणारा विदेशी असो,+ त्याने माझे नियम आणि न्याय-निर्णय पाळले पाहिजेत+ आणि त्याने यांपैकी कोणत्याही घृणास्पद गोष्टी करू नयेत. २७ कारण तुमच्याआधी त्या देशात राहणाऱ्यांनी या सगळ्या घृणास्पद गोष्टी केल्या+ आणि त्यामुळे आता तो देश अशुद्ध आहे. २८ पण जर तुम्ही या प्रकारे त्या देशाला दूषित केलं नाही, तर तुमच्याआधी तिथे राहणाऱ्या राष्ट्रांना जसा तो देश ओकून टाकणार आहे,* तसा तुम्हाला ओकून टाकणार नाही.* २९ जर कोणीही यांपैकी कोणतीही घृणास्पद गोष्ट केली, तर त्याला* ठार मारलं जावं. ३० तुमच्याआधी तिथे केल्या जाणाऱ्या कोणत्याही घृणास्पद रीती तुम्ही पाळू नका आणि त्यांमुळे स्वतःला अशुद्ध करू नका+ आणि अशा रितीने माझ्याबद्दल असलेलं तुमचं कर्तव्य पूर्ण करा. मी तुमचा देव यहोवा आहे.’”
१९ यहोवा मोशेला पुढे म्हणाला: २ “इस्राएलच्या सर्व लोकांना सांग, ‘तुम्ही पवित्र असलं पाहिजे, कारण मी तुमचा देव यहोवा पवित्र आहे.+
३ तुमच्यापैकी प्रत्येकाने आपल्या आईचा आणि आपल्या वडिलांचा आदर केला पाहिजे.*+ तुम्ही माझे शब्बाथ पाळले पाहिजेत.+ मी तुमचा देव यहोवा आहे. ४ निरुपयोगी देवांच्या मागे लागू नका+ आणि साच्यात ओतून स्वतःसाठी धातूचे देव बनवू नका.+ मी तुमचा देव यहोवा आहे.
५ यहोवाला शांती-अर्पण देताना,+ ते अशा प्रकारे द्या, की तुमचा स्वीकार केला जाईल.+ ६ तुम्ही अर्पणाचं मांस अर्पणाच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी खाऊ शकता. पण तिसऱ्या दिवशी जे उरेल, ते जाळून टाका.+ ७ जर तिसऱ्या दिवशी अर्पणाचं मांस खाल्लं, तर ही एक घृणास्पद गोष्ट ठरेल आणि देव ते अर्पण स्वीकारणार नाही. ८ ते मांस खाणाऱ्याला त्याच्या चुकीची शिक्षा मिळेल, कारण त्याने यहोवाच्या पवित्र अर्पणाचा अनादर केला आहे. त्या माणसाला* ठार मारलं जावं.
९ तुम्ही आपल्या शेतांची कापणी कराल, तेव्हा शेताच्या काठावरचं सगळं पीक कापू नका आणि कापणी करताना जे उरेल ते* उचलू नका.+ १० तसंच, तुम्ही तुमच्या द्राक्षमळ्यांमधली उरलेली द्राक्षं गोळा करू नका, किंवा खाली पडलेली द्राक्षं उचलू नका. तुम्ही ती गरिबांसाठी*+ आणि तुमच्यामध्ये राहणाऱ्या विदेश्यांसाठी तशीच राहू दया. मी तुमचा देव यहोवा आहे.
११ तुम्ही चोरी करू नका,+ फसवणूक करू नका+ किंवा एकमेकांशी बेइमानीने व्यवहार करू नका. १२ तुम्ही माझ्या नावाने खोटी शपथ घेऊन, माझ्या नावाचा अनादर करू नका.+ मी तुमचा देव यहोवा आहे. १३ तू दुसऱ्याशी अप्रामाणिकपणे वागू नकोस+ आणि कोणाला लुबाडू नकोस.+ तू मजुराची मजुरी रात्रभर, दुसरा दिवस उजाडेपर्यंत आपल्याजवळ ठेवू नकोस.+
१४ बहिऱ्या माणसाला शाप देऊ नकोस किंवा आंधळ्यापुढे अडथळा ठेवू नकोस+ आणि तुझ्या देवाचं भय बाळग.+ मी यहोवा आहे.
१५ न्यायनिवाडा करताना अन्याय करू नका. फक्त गरीब आहे म्हणून एखाद्याला दया दाखवू नका आणि श्रीमंताचा पक्ष घेऊ नका.+ तर आपल्या शेजाऱ्याचा न्यायनिवाडा करताना न्यायाने वागा.
१६ तू आपल्या लोकांमध्ये कोणाची बदनामी करत फिरू नकोस.+ तू आपल्या शेजाऱ्याच्या जिवावर* उठू नकोस.*+ मी यहोवा आहे.
१७ आपल्या मनात आपल्या भावाचा द्वेष करू नकोस.+ तू आपल्या सोबत्याची चूक सुधारायला मागेपुढे पाहू नकोस,+ नाहीतर त्याच्या पापाचा दोष तुझ्यावरही येईल.
१८ तू बदला घेऊ नकोस+ किंवा आपल्या भाऊबंदांबद्दल मनात राग बाळगू नकोस; आपल्या सोबत्यावर स्वतःसारखं प्रेम कर.+ मी यहोवा आहे.
१९ तुम्ही माझे हे नियम पाळा: तुमच्या प्राण्यांपैकी दोन जातींच्या प्राण्यांचा समागम घडवू नका.* तुमच्या शेतांत दोन प्रकारची बियाणी पेरू नका+ आणि दोन प्रकारच्या धाग्यांपासून बनवलेले कपडे घालू नका.+
२० एखाद्या माणसाने एखाद्या स्त्रीशी संबंध ठेवले आणि जर ती दासी असून, तिचं लग्न ठरलं असेल, पण तिला अजून सोडवलं नसेल किंवा मुक्त करण्यात आलं नसेल; तर त्या दोघांना शिक्षा दिली जावी. पण त्यांना ठार मारू नये, कारण तिला अजून मुक्त करण्यात आलं नव्हतं. २१ त्याने आपलं दोषार्पण म्हणून एक मेंढा भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ यहोवासाठी आणावा.+ २२ त्याने केलेल्या पापाबद्दल याजक दोषार्पणाचा मेंढा अर्पण करून यहोवासमोर त्याच्यासाठी प्रायश्चित्त करेल, म्हणजे त्याला त्याच्या पापाबद्दल क्षमा केली जाईल.
२३ मी तुम्हाला देत असलेल्या देशात गेल्यावर जेव्हा तुम्ही फळझाडं लावाल, तेव्हा त्या झाडांना लागलेली फळं, तुम्ही अशुद्ध समजा आणि ती खाण्याची तुम्हाला मनाई आहे. तीन वर्षांपर्यंत ती फळं खाण्याची मनाई असेल. तुम्ही ती खाऊ नका. २४ पण चौथ्या वर्षी, त्यांची सगळी फळं तुम्ही मोठा आनंद साजरा करून यहोवाला अर्पण करा.+ २५ मग पाचव्या वर्षापासून तुम्ही त्यांची फळं खाऊ शकता; असं केलं, तर ती झाडं तुम्हाला खूप फळं देतील. मी तुमचा देव यहोवा आहे.
२६ तुम्ही रक्त असलेलं काहीही खाऊ नका.+
तुम्ही शकुन पाहू नका आणि जादूटोणा करू नका.+
२७ आपल्या डोक्याच्या बाजूचे केस कापू नका* आणि आपल्या दाढीची टोकं कापू नका.+
२८ मेलेल्या माणसासाठी* आपल्या शरीरावर घाव करू नका.+ आपल्या शरीरावर गोंदवून घेऊ नका. मी यहोवा आहे.
२९ आपल्या मुलीला वेश्या बनवून तिचा अपमान करू नका,+ नाहीतर देशात व्यभिचार वाढेल आणि देश अनैतिक कामांनी भरून जाईल.+
३० तुम्ही माझे शब्बाथ पाळले पाहिजेत+ आणि माझ्या उपासना मंडपासाठी आदर दाखवला पाहिजे.* मी यहोवा आहे.
३१ भूतविद्या करणाऱ्यांकडे+ आणि ज्योतिष्यांकडे+ जाऊन अशुद्ध होऊ नका. मी तुमचा देव यहोवा आहे.
३२ पिकलेल्या केसांपुढे उभा राहा+ आणि म्हाताऱ्या माणसाला आदर दाखव.+ तू आपल्या देवाचं भय मानलं पाहिजे.+ मी यहोवा आहे.
३३ जर तुमच्या देशात एखादा विदेशी राहायला आला, तर त्याच्यासोबत वाईट वागू नका.+ ३४ तुमच्यामध्ये राहणारा विदेशी तुमच्यासाठी तुमच्याच देशाच्या रहिवाशासारखा असावा+ आणि तुम्ही त्याच्यावर स्वतःसारखंच प्रेम करावं. कारण तुम्हीही इजिप्त देशात विदेशी म्हणून राहत होता.+ मी तुमचा देव यहोवा आहे.
३५ मोजमाप करण्यासाठी किंवा तोलण्यासाठी तुम्ही चुकीची मापं वापरू नका.+ ३६ तुम्ही अचूक तराजू, अचूक वजनं, अचूक एफा* आणि अचूक हिन* वापरला पाहिजे.+ तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणणारा, मी तुमचा देव यहोवा आहे. ३७ अशा रितीने, तुम्ही माझे सगळे नियम आणि माझे सगळे न्याय-निर्णय पाळले पाहिजेत.+ मी यहोवा आहे.’”
२० यहोवा मोशेला पुढे म्हणाला: २ “तू इस्राएली लोकांना असं सांग, ‘इस्राएलच्या एखाद्या माणसाने किंवा इस्राएलमध्ये राहणाऱ्या एखाद्या विदेश्याने, आपल्या मुलांपैकी कोणाला मोलख दैवताला अर्पण केलं, तर त्याला कोणत्याही परिस्थितीत ठार मारलं जावं.+ देशातल्या लोकांनी त्याला दगडमार करून ठार मारावं. ३ मी त्या माणसाला नाकारीन आणि त्याला ठार मारीन, कारण त्याने आपल्या मुलांना मोलखला अर्पण केलं आहे. त्याने माझ्या उपासना मंडपाला दूषित केलं आहे+ आणि माझ्या पवित्र नावाचा अनादर केला आहे. ४ तो माणूस आपल्या मुलांना मोलखला अर्पण करतो, तेव्हा जर देशातल्या लोकांनी मुद्दामहून त्याकडे डोळेझाक केली आणि त्याला ठार मारलं नाही,+ ५ तर मी नक्कीच त्या माणसाला आणि त्याच्या कुटुंबाला नाकारीन.+ मी त्या माणसाला आणि त्याच्याप्रमाणेच मोलखची उपासना* करून माझ्याशी अविश्वासूपणे वागणाऱ्या सर्वांना ठार मारीन.
६ जो कोणी* भूतविद्या करणाऱ्यांकडे+ आणि ज्योतिष्यांकडे+ जाऊन माझ्याशी अविश्वासूपणे वागतो त्या माणसाला* मी नक्कीच नाकारीन आणि ठार मारीन.+
७ तुम्ही शुद्ध आणि पवित्र असलं पाहिजे,+ कारण मी तुमचा देव यहोवा आहे. ८ तुम्ही माझे नियम पाळले पाहिजेत.+ तुम्हाला शुद्ध करणारा मी तुमचा देव यहोवा आहे.+
९ जो आपल्या वडिलांना किंवा आईला शाप देतो, त्याला कोणत्याही परिस्थितीत ठार मारलं जावं.+ त्याने आपल्या वडिलांना किंवा आईला शाप दिल्यामुळे त्याच्या रक्ताची जबाबदारी त्याच्यावरच आहे.
१० जो दुसऱ्याच्या बायकोसोबत व्यभिचार करतो,* म्हणजे जो आपल्या शेजाऱ्याच्या बायकोसोबत व्यभिचार करतो त्याला कोणत्याही परिस्थितीत ठार मारलं जावं. व्यभिचार करणाऱ्या त्या पुरुषाला आणि स्त्रीलाही ठार मारलं जावं.+ ११ जो आपल्या वडिलांच्या बायकोशी शरीरसंबंध ठेवतो, तो आपल्या वडिलांची लाज* उघडी करतो.+ त्या दोघांना कोणत्याही परिस्थितीत ठार मारलं जावं. त्यांच्या रक्ताची जबाबदारी त्यांच्यावरच आहे. १२ एखाद्याने आपल्या सुनेशी शरीरसंबंध ठेवले, तर त्या दोघांना कोणत्याही परिस्थितीत ठार मारलं जावं. त्यांनी अनैसर्गिक कृत्य केलं आहे. त्यांच्या रक्ताची जबाबदारी त्यांच्यावरच आहे.+
१३ एखादा पुरुष स्त्रीसोबत शरीरसंबंध ठेवतो, तसे जर त्याने एखाद्या पुरुषासोबत ठेवले, तर त्या दोघांनीही घृणास्पद कृत्य केलं आहे.+ त्या दोघांना कोणत्याही परिस्थितीत ठार मारलं जावं. त्यांच्या रक्ताची जबाबदारी त्यांच्यावरच आहे.
१४ जर कोणी एखाद्या स्त्रीशी आणि तिच्या आईशी शरीरसंबंध ठेवले, तर ते एक घृणास्पद कृत्य* आहे.+ त्याला आणि त्या दोघींना जाळून टाकावं,+ म्हणजे पुढे तुमच्यामध्ये अशी घृणास्पद कृत्यं होणार नाहीत.
१५ एखाद्याने प्राण्याशी संभोग केला, तर त्याला कोणत्याही परिस्थितीत ठार मारावं. तसंच, तुम्ही त्या प्राण्यालाही ठार मारावं.+ १६ जर एखादी स्त्री एखाद्या प्राण्याशी संभोग करायला त्याच्याजवळ गेली,+ तर त्या स्त्रीला आणि त्या प्राण्याला ठार मारावं. त्यांना कोणत्याही परिस्थितीत ठार मारावं. त्यांच्या रक्ताची जबाबदारी त्यांच्यावरच आहे.
१७ जर एखाद्या पुरुषाने आपल्या बहिणीशी, म्हणजे आपल्या वडिलांच्या मुलीशी किंवा आपल्या आईच्या मुलीशी शरीरसंबंध ठेवले; आणि त्याने तिची नग्नता पाहिली आणि तिने त्याची नग्नता पाहिली, तर ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे.+ त्यांना आपल्या भाऊबंदांच्या देखत ठार मारलं जावं. त्याने आपल्या बहिणीची लाज* उघडी केली आहे. त्याला त्याच्या अपराधाची शिक्षा मिळेल.
१८ एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीची मासिक पाळी सुरू असताना तिच्याशी शरीरसंबंध ठेवले, तर त्या दोघांनीही तिच्या रक्ताचा अनादर केला आहे.+ त्या दोघांना ठार मारलं जावं.
१९ तू आपल्या मावशीशी किंवा आत्याशी शरीरसंबंध ठेवू नको, कारण हे रक्ताच्या नातेवाइकाची लाज उघडी करण्यासारखं आहे.+ त्यांना त्यांच्या अपराधाची शिक्षा मिळेल. २० जो पुरुष आपल्या काकूशी शरीरसंबंध ठेवतो, त्याने आपल्या काकांची लाज* उघडी केली आहे.+ त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळाली पाहिजे. त्यांना मुलं होऊ नयेत. त्यांना ठार मारावं. २१ एखाद्याने आपल्या वहिनीशी शरीरसंबंध ठेवले, तर ही एक घृणास्पद गोष्ट आहे.+ त्याने आपल्या भावाची लाज* उघडी केली आहे. त्यांना मुलं होऊ नयेत. त्यांना ठार मारावं.
२२ तुम्ही माझे सगळे नियम आणि न्याय-निर्णय पाळले पाहिजेत,+ म्हणजे ज्या देशात राहण्यासाठी मी तुम्हाला नेत आहे, तो तुम्हाला ओकून टाकणार नाही.+ २३ ज्या राष्ट्रांना मी तुमच्यासमोरून हाकलून लावत आहे, त्यांच्या रीतींप्रमाणे तुम्ही चालू नका,+ कारण त्यांनी याच सर्व गोष्टी केल्या आहेत आणि मला त्यांची घृणा वाटते.+ २४ म्हणूनच, मी तुम्हाला असं सांगितलं आहे: “तुम्ही त्यांच्या देशाचा ताबा घ्याल आणि मी तुम्हाला तो देश, म्हणजेच दूध आणि मध वाहत असलेला देश वारसा म्हणून देईन.+ मी तुमचा देव यहोवा आहे. मीच तुम्हाला सर्व लोकांपासून वेगळं केलं आहे.”+ २५ तुम्ही शुद्ध आणि अशुद्ध प्राण्यांमध्ये, तसंच शुद्ध आणि अशुद्ध पक्ष्यांमध्ये फरक केला पाहिजे;+ मी तुमच्यासाठी अशुद्ध ठरवलेल्या कोणत्याही प्राण्यामुळे, पक्ष्यामुळे किंवा जमिनीवर रांगणाऱ्या कोणत्याही जीवजंतूमुळे तुम्ही स्वतःला* दूषित करू नका.+ २६ तुम्ही माझ्या दृष्टीत पवित्र असलं पाहिजे, कारण मी यहोवा पवित्र आहे+ आणि तुम्ही माझे लोक व्हावेत, म्हणून मी तुम्हाला इतर लोकांपासून वेगळं केलं आहे.+
२७ पुरुष किंवा स्त्री यांच्यापैकी कोणी भूतविद्या करणारे किंवा ज्योतिषी असतील,* तर त्यांना कोणत्याही परिस्थितीत ठार मारावं.+ लोकांनी त्यांना दगडमार करावा. त्यांच्या रक्ताची जबाबदारी त्यांच्यावरच आहे.’”
२१ यहोवा मोशेला पुढे म्हणाला: “याजकांना, म्हणजे अहरोनच्या मुलांना असं सांग, ‘तुमच्यापैकी कोणीही आपल्या लोकांमधल्या एखाद्या मेलेल्या माणसासाठी* स्वतःला दूषित करू नये.+ २ पण तो आपल्या जवळच्या रक्ताच्या नातेवाइकांसाठी म्हणजे आपल्या आईसाठी, वडिलांसाठी, मुलासाठी, मुलीसाठी आणि भावासाठी असं करू शकतो. ३ तसंच, जर त्याची बहीण कुमारी असेल, म्हणजे तिचं लग्न झालं नसेल आणि ती त्याच्यासोबत राहत असेल,* तर ती मेल्यावर तो तिच्यासाठी शोक करून स्वतःला दूषित करू शकतो. ४ त्याने स्वतःला अशा स्त्रीसाठी दूषित करू नये, जी त्याच्या लोकांपैकी एखाद्या माणसाची बायको होती. ५ याजकांनी आपल्या डोक्यावरचे केस काढू नयेत+ किंवा आपले कल्ले कापू नयेत, किंवा आपल्या शरीरावर घाव करू नयेत.+ ६ त्यांनी आपल्या देवाच्या दृष्टीत पवित्र असावं+ आणि आपल्या देवाच्या नावाचा अनादर करू नये.+ कारण ते यहोवासाठी अग्नीत जाळून केली जाणारी अर्पणं, म्हणजे देवाची भाकर* अर्पण करतात. त्यांनी पवित्र असलं पाहिजे.+ ७ त्यांनी वेश्येसोबत+ किंवा जिला भ्रष्ट करण्यात आलं आहे, किंवा जिच्या पतीने तिला घटस्फोट दिला आहे, अशा स्त्रीशी+ लग्न करू नये. कारण याजक त्याच्या देवाच्या दृष्टीत पवित्र आहे. ८ तू त्याला पवित्र कर,+ कारण तो तुझ्या देवाची भाकर अर्पण करतो. तू त्याला पवित्र मानलं पाहिजे, कारण तुला पवित्र करणारा मी यहोवा पवित्र आहे.+
९ एखाद्या याजकाच्या मुलीने वेश्या बनून स्वतःला अशुद्ध केलं, तर तिने आपल्या वडिलांचा अनादर केला आहे. तिला आगीत जाळून टाकावं.+
१० याजकांच्या भावांपैकी जो महायाजक आहे, ज्याच्या डोक्यावर अभिषेकाचं तेल ओतण्यात आलं आहे+ आणि ज्याला याजकाची खास वस्त्रं घालण्यासाठी नियुक्त करण्यात आलं आहे,*+ त्याने आपले केस विस्कटू देऊ नयेत आणि आपली वस्त्रं फाडू नयेत.+ ११ त्याने कोणत्याही मृतदेहाजवळ* जाऊ नये.+ आपल्या वडिलांसाठी किंवा आपल्या आईसाठीही त्याने स्वतःला दूषित करू नये. १२ त्याने उपासना मंडपाच्या बाहेर जाऊ नये आणि आपल्या देवाच्या उपासना मंडपाचा अनादर करू नये.+ कारण समर्पणाचं चिन्ह, म्हणजे त्याच्या देवाचं अभिषेकाचं तेल त्याच्यावर आहे.+ मी यहोवा आहे.
१३ त्याने कुमारी असलेल्या स्त्रीशीच लग्न करावं.+ १४ त्याने विधवेशी, घटस्फोट झालेल्या किंवा जिला भ्रष्ट करण्यात आलं आहे अशा स्त्रीशी किंवा वेश्येशी लग्न करू नये, तर त्याने आपल्या लोकांपैकी कुमारी असलेल्या स्त्रीशीच लग्न करावं. १५ त्याने आपल्या संततीला* आपल्या लोकांमध्ये दूषित करू नये,+ कारण त्याला पवित्र करणारा मी यहोवा आहे.’”
१६ यहोवा मोशेला पुढे म्हणाला: १७ “अहरोनला सांग, ‘तुझ्या संततीच्या* येणाऱ्या सर्व पिढ्यांमध्ये, ज्याच्यात दोष असेल अशा कोणत्याही पुरुषाने आपल्या देवाची भाकर अर्पण करण्यासाठी वेदीजवळ येऊ नये. १८ जर एखाद्या माणसामध्ये कोणताही दोष असेल तर त्याने वेदीजवळ येऊ नये; म्हणजे आंधळा, लंगडा किंवा ज्याचा चेहरा विद्रूप आहे* किंवा ज्याचा एक हात किंवा पाय लांब आहे, १९ ज्याचा हात किंवा पाय मोडला आहे, २० कुबडा किंवा बुटका,* ज्याच्या डोळ्यांत दोष आहे, किंवा ज्याला इसब किंवा नायटा आहे, किंवा ज्याच्या अंडांत दोष आहे.+ २१ अहरोन याजकाच्या संततीपैकी,* ज्याच्यात दोष आहे अशा कोणत्याही माणसाने यहोवासाठी अग्नीत जाळून केलेली अर्पणं देण्यासाठी वेदीजवळ येऊ नये. त्याच्यात दोष असल्यामुळे, त्याने आपल्या देवाची ही भाकर अर्पण करण्यासाठी वेदीजवळ येऊ नये. २२ तो परमपवित्र+ आणि पवित्र+ गोष्टींमधून आपल्या देवाची भाकर खाऊ शकतो. २३ पण, त्याच्यात दोष असल्यामुळे त्याने पडद्याजवळ+ व वेदीजवळ+ येऊ नये आणि माझ्या उपासना मंडपाचा अनादर करू नये.+ कारण त्यांना पवित्र करणारा मी यहोवा आहे.’”+
२४ तेव्हा मोशेने अहरोनला, त्याच्या मुलांना आणि सर्व इस्राएली लोकांना या सर्व गोष्टी सांगितल्या.
२२ यहोवा मोशेला पुढे म्हणाला: २ “अहरोनला आणि त्याच्या मुलांना सांग, की इस्राएली लोकांनी दिलेली पवित्र अर्पणं हाताळताना त्यांनी काळजी घ्यावी.* तसंच, ज्या गोष्टी ते माझ्यासाठी पवित्र करत आहेत त्यांचा गैरवापर करून त्यांनी माझ्या पवित्र नावाचा अनादर करू नये.+ मी यहोवा आहे. ३ त्यांना सांग, ‘तुमच्या येणाऱ्या सर्व पिढ्यांमध्ये, तुमच्या संततीपैकी जो कोणी अशुद्ध असताना, इस्राएली लोकांनी यहोवासाठी दिलेल्या पवित्र अर्पणांच्या जवळ येईल त्याला* ठार मारलं जाईल.+ मी यहोवा आहे. ४ अहरोनच्या संततीपैकी ज्याला कुष्ठरोग झाला आहे+ किंवा ज्याच्या गुप्तांगातून स्राव होत आहे,+ किंवा मेलेल्या माणसामुळे* अशुद्ध झालेल्या व्यक्तीला ज्याने स्पर्श केला आहे,+ किंवा ज्याचा वीर्यपात झाला आहे,+ अशा कोणत्याही माणसाने शुद्ध झाल्याशिवाय पवित्र अर्पणांतून काहीही खाऊ नये;+ ५ तसंच, जो कोणी घोळक्यात राहणाऱ्या एखाद्या अशुद्ध जीवजंतूला स्पर्श करतो+ किंवा कोणत्याही कारणामुळे अशुद्ध झालेल्या आणि दुसऱ्यालाही अशुद्ध करू शकणाऱ्या माणसाला स्पर्श करतो,+ त्यानेही पवित्र अर्पणांतून काही खाऊ नये. ६ यांपैकी कोणालाही स्पर्श करणारा माणूस* संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील आणि त्याने पवित्र अर्पणांमधलं काहीही खाऊ नये. त्याने अंघोळ करून स्वतःला शुद्ध करावं.+ ७ सूर्य मावळल्यावर तो शुद्ध होईल आणि त्यानंतर तो पवित्र अर्पणांतून खाऊ शकतो कारण ते त्याचं अन्न आहे.+ ८ तसंच, त्याने मेलेल्या स्थितीत सापडलेल्या प्राण्याचं किंवा जंगली पशूंनी फाडलेल्या प्राण्याचं मांस खाऊन स्वतःला अशुद्ध करू नये.+ मी यहोवा आहे.
९ त्यांनी माझ्याबद्दलचं त्यांचं कर्तव्य पूर्ण केलं पाहिजे, नाहीतर या पापाबद्दल ते दोषी ठरतील आणि त्यांना यासाठी मरावं लागेल, कारण त्यांनी माझ्या पवित्र अर्पणांचा अनादर केला आहे. त्यांना पवित्र करणारा मी यहोवा आहे.
१० ज्याला अधिकार नाही अशा कोणत्याही माणसाने* पवित्र अर्पणांतून काहीही खाऊ नये.+ याजकाच्या विदेशी पाहुण्याने किंवा एखाद्या मजुराने पवित्र अर्पणांतून काही खाऊ नये. ११ पण जर याजकाने एखाद्याला* स्वतःच्या पैशांनी विकत घेतलं असेल, तर तो त्यांतून खाऊ शकतो. याजकाच्या घरात जन्मलेले दासही त्याच्या अन्नातून खाऊ शकतात.+ १२ याजकाच्या मुलीने याजक नसलेल्या एखाद्याशी* लग्न केलं, तर तिने पवित्र दानातलं काही खाऊ नये. १३ पण, जर याजकाची मुलगी विधवा झाली, किंवा तिचा घटस्फोट झाला आणि तिला मुलं नसतील, आणि जर ती तरुणपणी होती तशीच आपल्या वडिलांच्या घरी राहायला परत आली, तर ती आपल्या वडिलांच्या अन्नातून खाऊ शकते;+ पण अधिकार नसलेल्या कोणत्याही व्यक्तीने* ते अन्न खाऊ नये.
१४ जर एखाद्या माणसाने पवित्र असलेलं काही चुकून खाल्लं, तर त्याने त्या पवित्र अर्पणाच्या पूर्ण भरपाईसोबतच त्याचा पाचवा भाग याजकाकडे आणून द्यावा.+ १५ इस्राएली लोकांनी यहोवासाठी दिलेल्या पवित्र गोष्टींचा याजकांनी अनादर करू नये,+ १६ आणि पवित्र अर्पणांतून खाल्ल्याच्या पापाबद्दल त्यांनी त्या लोकांना शिक्षा भोगायला लावू नये; कारण त्यांना पवित्र करणारा मी यहोवा आहे.’”
१७ यहोवा मोशेला पुढे म्हणाला: १८ “अहरोनला, त्याच्या मुलांना आणि सर्व इस्राएली लोकांना सांग, ‘एखादा इस्राएली किंवा इस्राएलमध्ये राहायला आलेला एखादा विदेशी जेव्हा आपले नवस फेडण्यासाठी किंवा स्वेच्छेने दिलेलं बलिदान म्हणून यहोवासाठी होमार्पण आणतो,+ १९ तेव्हा त्याने गुराढोरांपैकी, किंवा मेंढ्यांपैकी वा बकऱ्यांपैकी कोणताही दोष नसलेला नर आणावा,+ म्हणजे त्याचं अर्पण स्वीकारलं जाईल. २० दोष असलेला कोणताही प्राणी तुम्ही अर्पण म्हणून आणू नये,+ नाहीतर तुमचं अर्पण स्वीकारलं जाणार नाही.
२१ एखाद्याने नवस फेडण्यासाठी किंवा स्वेच्छेने दिलेलं बलिदान म्हणून यहोवासाठी शांती-अर्पण आणलं,+ तर त्याने गुराढोरांच्या किंवा बकऱ्यांच्या वा मेंढरांच्या कळपातून कोणताही दोष नसलेला प्राणी आणावा, म्हणजे त्याचं अर्पण स्वीकारलं जाईल. त्या प्राण्यात कोणताही दोष नसावा. २२ अर्पण म्हणून आणलेला कोणताही प्राणी आंधळा, हाड मोडलेला, शरीरावर घाव असलेला किंवा चामखीळ, इसब वा नायटा झालेला असू नये. तुम्ही असे कोणतेही प्राणी यहोवासाठी आणू नका किंवा त्यांना वेदीवर यहोवासाठी अर्पण करू नका. २३ एखाद्या बैलाचा किंवा मेंढ्याचा एखादा पाय लांब किंवा छोटा* असेल, तर तुम्ही तो प्राणी स्वेच्छेने आणलेलं अर्पण म्हणून देऊ शकता; पण, असा प्राणी नवस फेडण्यासाठी दिलेलं अर्पण म्हणून स्वीकारला जाणार नाही. २४ एखाद्या प्राण्याच्या अंडांत दोष असेल, ते चिरडलेले असतील, किंवा काढून टाकण्यात आले असतील किंवा कापून टाकण्यात आले असतील, तर असे प्राणी तुम्ही तुमच्या देशात यहोवासाठी बलिदान म्हणून अर्पण करू नका. २५ असे प्राणी तुम्ही एखाद्या विदेश्याकडून घेऊन तुमच्या देवाची भाकर म्हणून अर्पण करू नका, कारण त्यांच्यात दोष आणि कमतरता आहेत. अशी अर्पणं स्वीकारली जाणार नाहीत.’”
२६ यहोवा मोशेला पुढे म्हणाला: २७ “एखादं वासरू, मेंढरू किंवा कोकरू जन्मल्यावर सात दिवस आपल्या आईजवळच राहील,+ पण आठव्या दिवसापासून तुम्ही ते यहोवासाठी अग्नीत जाळून केलेलं अर्पण म्हणून देऊ शकता. ते स्वीकारलं जाईल. २८ गुराढोरांना किंवा मेंढ्यांना तुम्ही त्यांच्या पिल्लासोबत एकाच दिवशी कापू नका.+
२९ जर तुम्ही यहोवाचे आभार मानण्यासाठी अर्पण आणलं,+ तर ते स्वीकारलं जावं अशा रितीने तुम्ही ते अर्पण करा. ३० ते अर्पण त्याच दिवशी खाल्लं जावं. त्यातलं काहीही दुसरा दिवस उजाडेपर्यंत ठेवू नका.+ मी यहोवा आहे.
३१ तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या पाहिजेत.+ मी यहोवा आहे. ३२ तुम्ही माझ्या पवित्र नावाचा अनादर करू नका,+ तर तुम्ही इस्राएली लोकांमध्ये मला पवित्र मानलं पाहिजे.+ मी तुम्हाला पवित्र करणारा तुमचा देव यहोवा आहे.+ ३३ मीच तुमचा देव आहे हे सिद्ध करण्यासाठी मी तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणलं.+ मी यहोवा आहे.”
२३ यहोवा मोशेला पुढे म्हणाला: २ “इस्राएली लोकांना सांग, ‘तुम्ही यहोवाचे जे नेमलेले सण+ साजरे* केले पाहिजेत,+ ते पवित्र मेळावे आहेत. माझे नेमलेले सण हे आहेत:
३ सहा दिवस तुम्ही काम करू शकता. पण सातवा दिवस हा पूर्ण विश्रांतीचा शब्बाथ*+ असेल. तो एक पवित्र मेळावा आहे. त्या दिवशी तुम्ही कोणत्याही प्रकारचं काम करू नका. तुम्ही कुठेही राहत असला, तरी त्या दिवशी यहोवासाठी शब्बाथ पाळा.+
४ हे यहोवाचे नेमलेले सण आहेत. हे पवित्र मेळावे आहेत. त्यांच्या नेमलेल्या वेळी तुम्ही ते साजरे* करावेत: ५ पहिल्या महिन्याच्या १४ व्या दिवशी+ संध्याकाळी* यहोवासाठी वल्हांडण सण+ असेल.
६ या महिन्याच्या १५ व्या दिवशी यहोवासाठी बेखमीर* भाकरींचा सण+ असेल. सात दिवसांपर्यंत तुम्ही बेखमीर भाकरी खा.+ ७ पहिल्या दिवशी तुम्ही पवित्र मेळावा ठेवा.+ तुम्ही कोणतंही मेहनतीचं काम करू नका. ८ सात दिवसांपर्यंत तुम्ही अग्नीत जाळून केलेलं अर्पण यहोवाला द्या. सातव्या दिवशी एक पवित्र मेळावा असेल. त्या दिवशी कोणतंही मेहनतीचं काम करू नका.’”
९ यहोवा मोशेला पुढे म्हणाला: १० “इस्राएली लोकांना सांग, ‘मी तुम्हाला देत असलेल्या देशात जेव्हा तुम्ही पोहोचाल आणि तिथे आपल्या शेतांची कापणी कराल, तेव्हा आपल्या कापणीच्या पहिल्या पिकातली एक पेंढी+ तुम्ही याजकाकडे आणा.+ ११ तुमच्यासाठी ती स्वीकारली जावी म्हणून याजक ती यहोवापुढे ओवाळेल. याजकाने ती शब्बाथाच्या दुसऱ्या दिवशी ओवाळावी. १२ पेंढी ओवाळली जाईल त्या दिवशी, तुम्ही कोणताही दोष नसलेला एक वर्षाचा मेंढा यहोवासाठी होमार्पण म्हणून द्यावा. १३ त्यासोबत तुम्ही अन्नार्पण म्हणून तेलात मिसळलेलं दोन दशांश एफा* चांगलं पीठ, अग्नीत जाळून केलेलं अर्पण म्हणून यहोवाला द्यावं आणि त्याच्या सुवासाने त्याला आनंद होईल.* तसंच, पेयार्पण म्हणून तुम्ही एक हिन* द्राक्षारसाचा चौथा भागही द्यावा. १४ या दिवसापर्यंत, म्हणजे तुम्ही तुमच्या देवासाठी हे अर्पण आणेपर्यंत, कोणत्याही प्रकारची भाकर, भाजलेलं धान्य किंवा नवीन धान्य खाऊ नका. तुम्ही कुठेही राहत असला, तरी तुम्ही पिढ्या न् पिढ्या हा कायमचा नियम पाळला पाहिजे.
१५ शब्बाथाच्या पुढच्या दिवसापासून, म्हणजे तुम्ही ओवाळण्याच्या अर्पणाची पेंढी आणाल त्या दिवसापासून सात शब्बाथ मोजा.+ ते पूर्ण सात आठवडे असले पाहिजेत. १६ सातव्या शब्बाथाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत तुम्ही ५० दिवस+ मोजा आणि मग तुम्ही यहोवासाठी एक नवीन अन्नार्पण आणा.+ १७ तुम्ही ओवाळण्याचं अर्पण म्हणून आपल्या घरून दोन भाकरी आणा. त्या दोन दशांश एफा* चांगल्या पिठापासून बनवलेल्या असाव्यात. त्या यहोवासाठी पहिल्या पिकाचं अर्पण+ म्हणून खमीर* टाकून भाजलेल्या+ असाव्यात. १८ त्या भाकरींसोबत तुम्ही कोणताही दोष नसलेली, एकेका वर्षाची सात कोकरं, तसंच एक गोऱ्हा* आणि दोन मेंढेही आणावेत.+ तुम्ही ते यहोवाला होमार्पण म्हणून द्यावेत आणि त्यांसोबत दिलं जाणारं अन्नार्पण आणि पेयार्पणंही तुम्ही द्यावीत. ही अग्नीत जाळून केलेली अर्पणं आहेत आणि त्यांच्या सुवासाने यहोवाला आनंद होईल.* १९ तुम्ही पापार्पण म्हणून एक बकरा+ आणि शांती-अर्पण म्हणून एकेका वर्षाचे दोन मेंढे आणावेत.+ २० याजक त्या दोन मेंढ्यांसोबत पहिल्या पिकाच्या भाकरी, ओवाळण्याचं अर्पण म्हणून यहोवापुढे ओवाळेल. हे अर्पण यहोवाच्या नजरेत पवित्र असून ते याजकासाठी असेल.+ २१ त्या दिवशी तुम्ही आपल्यासाठी पवित्र मेळावा जाहीर करा.+ तुम्ही कोणतंही मेहनतीचं काम करू नका. तुम्ही कुठेही राहत असला, तरी हा नियम पिढ्या न् पिढ्या एक कायमचा नियम म्हणून पाळा.
२२ तुम्ही आपल्या शेतांची कापणी कराल, तेव्हा शेताच्या काठावरचं सगळं पीक कापू नका आणि कापणी करताना जे उरेल, ते उचलू नका.+ तुम्ही ते गरिबांसाठी*+ आणि तुमच्यामध्ये राहणाऱ्या विदेश्यासाठी+ तसंच राहू द्या. मी तुमचा देव यहोवा आहे.’”
२३ यहोवा मोशेला पुढे म्हणाला: २४ “इस्राएली लोकांना सांग, ‘सातव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, तुम्ही पूर्ण विश्रांतीचा दिवस पाळावा. कर्णा वाजवून त्या दिवसाची आठवण करून दिली जावी.+ तो एक पवित्र मेळावा असेल. २५ तुम्ही त्या दिवशी कोणतंही मेहनतीचं काम करू नका आणि अग्नीत जाळून केलेलं अर्पण यहोवासाठी द्या.’”
२६ यहोवा मोशेला पुढे म्हणाला: २७ “पण याच सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी प्रायश्चित्ताचा दिवस+ असेल. तुम्ही त्या दिवशी पवित्र मेळावा ठेवा आणि शोक करा.*+ तसंच, तुम्ही अग्नीत जाळून केलेलं अर्पण यहोवासाठी द्या. २८ या खास दिवशी तुम्ही कोणत्याही प्रकारचं काम करू नका; कारण तुमचा देव यहोवा याच्यासमोर तुमच्याबद्दल प्रायश्चित्त करण्यासाठी+ हा प्रायश्चित्ताचा दिवस असेल. २९ या दिवशी जो कोणी* शोक करणार नाही* त्याला ठार मारलं जाईल.+ ३० आणि या दिवशी जो कोणत्याही प्रकारचं काम करेल, अशा प्रत्येकाचा* मी नाश करीन. ३१ तुम्ही कोणत्याही प्रकारचं काम करू नका. तुम्ही कुठेही राहत असला, तरी हा नियम पिढ्या न् पिढ्या एक कायमचा नियम म्हणून पाळा. ३२ हा तुमच्यासाठी संपूर्ण विश्रांतीचा शब्बाथ असेल आणि त्या महिन्याच्या नवव्या दिवशी संध्याकाळी तुम्ही शोक करा.+ तुम्ही त्या दिवसाच्या संध्याकाळपासून दुसऱ्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत शब्बाथ पाळावा.”
३३ यहोवा मोशेला पुढे म्हणाला: ३४ “इस्राएली लोकांना सांग, ‘या सातव्या महिन्याच्या १५ व्या दिवशी यहोवासाठी सात दिवस मंडपांचा* सण असेल.+ ३५ पहिल्या दिवशी एक पवित्र मेळावा असेल आणि तुम्ही त्या दिवशी कोणतंही मेहनतीचं काम करू नका. ३६ सात दिवस तुम्ही अग्नीत जाळून केलेलं अर्पण यहोवाला द्या. आठव्या दिवशी तुम्ही एक पवित्र मेळावा ठेवा+ आणि अग्नीत जाळून केलेलं अर्पण यहोवाला द्या. तुम्ही कोणतंही मेहनतीचं काम करू नका. ही एक पवित्र सभा असेल.
३७ हे यहोवासाठी नेमलेले सण+ आहेत. तुम्ही ते पवित्र मेळावे म्हणून जाहीर करा+ आणि यहोवासाठी अग्नीत जाळून केलेलं अर्पण, म्हणजेच होमार्पण,+ बलिदानासोबत द्यायचं अन्नार्पण+ आणि पेयार्पणं,+ ही प्रत्येक प्रसंगासाठी ठरलेल्या नियमाप्रमाणे द्या. ३८ या अर्पणांसोबतच तुम्ही यहोवाच्या शब्बाथांच्या दिवशी देत असलेली अर्पणं,+ तुमची दानं,+ नवसाची अर्पणं,+ तसंच तुमची स्वेच्छेने दिलेली बलिदानं+ यहोवाला देत राहावीत. ३९ पण, तुम्ही आपल्या शेतांतलं पीक गोळा केल्यावर, सातव्या महिन्याच्या १५ व्या दिवशी यहोवासाठी सात दिवस सण साजरा करा.+ यांपैकी पहिला आणि आठवा दिवस हा पूर्ण विश्रांतीचा दिवस असेल.+ ४० पहिल्या दिवशी तुम्ही सर्वात चांगली फळं, खजुराच्या झाडांच्या फांद्या,+ हिरव्यागार झाडांच्या फांद्या, तसंच दऱ्याखोऱ्यांतली झाडं घ्या आणि तुमचा देव यहोवा याच्यासमोर सात दिवस+ आनंद साजरा करा.+ ४१ तुम्ही वर्षातून सात दिवस यहोवासाठी हा सण साजरा करा.+ तुम्ही पिढ्या न् पिढ्या एक कायमचा नियम म्हणून सातव्या महिन्यात हा सण साजरा केला पाहिजे. ४२ तुम्ही सात दिवस मंडपांमध्ये राहा.+ इस्राएलच्या सर्व रहिवाशांनी मंडपांमध्ये राहावं. ४३ असं केल्यामुळे तुमच्या पुढच्या पिढ्यांना कळेल,+ की मी इस्राएली लोकांना इजिप्त देशातून बाहेर आणताना त्यांना मंडपांमध्ये राहायला लावलं.+ मी तुमचा देव यहोवा आहे.’”
४४ तेव्हा मोशेने यहोवाच्या नेमलेल्या सणांबद्दल इस्राएली लोकांना सांगितलं.
२४ यहोवा मोशेला पुढे म्हणाला: २ “दिवे सतत जळत राहावेत, म्हणून इस्राएली लोकांना शुद्ध जैतुनाचं तेल तुझ्याकडे आणण्याची आज्ञा दे.+ ३ अहरोनने भेटमंडपातल्या साक्षपेटीच्या पडद्याबाहेर, संध्याकाळपासून सकाळपर्यंत यहोवासमोर सतत दिवे जळत ठेवण्याची व्यवस्था करावी. हा तुमच्यासाठी पिढ्या न् पिढ्या कायमचा नियम आहे. ४ त्याने यहोवासमोर असलेल्या शुद्ध सोन्याच्या दीपवृक्षावरच्या* दिव्यांची+ नेहमी काळजी घ्यावी.
५ तू चांगलं पीठ घेऊन त्याच्या १२ भाकरी भाज. प्रत्येक भाकरीसाठी दोन दशांश एफा* पीठ वापरावं. ६ तू यहोवासमोर शुद्ध सोन्याच्या+ मेजावर त्या भाकरींच्या दोन थप्प्या रचून ठेव. प्रत्येक थप्पीत सहा भाकरी असाव्यात.+ ७ प्रत्येक थप्पीवर शुद्ध ऊद* ठेव. तो ऊद भाकरींच्या अर्पणाचं प्रतीक*+ असेल. तो अग्नीत जाळून यहोवाला अर्पण केला जाईल. ८ त्याने प्रत्येक शब्बाथाच्या दिवशी, यहोवासमोर नियमितपणे भाकरी रचून ठेवाव्यात.+ हा इस्राएली लोकांसोबत माझा कायमचा करार आहे. ९ त्या भाकरी अहरोनसाठी आणि त्याच्या मुलांसाठी असतील.+ त्यांनी त्या एका पवित्र ठिकाणी खाव्यात,+ कारण कायमच्या नियमाप्रमाणे, यहोवासाठी अग्नीत जाळून केल्या जाणाऱ्या अर्पणांतला, हा याजकासाठी असलेला परमपवित्र भाग आहे.”
१० इस्राएली लोकांमध्ये एक असा मुलगा होता, ज्याची आई इस्राएली आणि वडील इजिप्तचे होते.+ एकदा छावणीत त्याचं एका इस्राएली माणसाशी भांडण झालं. ११ तेव्हा तो इस्राएली मुलगा देवाच्या नावाची* निंदा करू लागला आणि त्याच्या नावाला शाप देऊ लागला.+ म्हणून लोकांनी त्याला मोशेकडे आणलं.+ त्या मुलाच्या आईचं नाव शलोमीथ होतं आणि ती दान वंशातल्या दिब्रीची मुलगी होती. १२ त्या मुलाबद्दल यहोवाचा निर्णय स्पष्ट होईपर्यंत, त्यांनी त्याला कैदेत ठेवलं.+
१३ मग यहोवा मोशेला म्हणाला: १४ “ज्याने शाप दिला त्याला छावणीबाहेर आणा आणि ज्यांनी त्याला शाप देताना ऐकलं, त्या सर्वांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवावेत. त्यानंतर इस्राएलच्या सर्व लोकांनी त्याला दगडमार करावा.+ १५ इस्राएली लोकांना सांग, ‘जो कोणी आपल्या देवाला शाप देईल, त्याला त्याच्या पापाची शिक्षा मिळेल. १६ म्हणून यहोवाच्या नावाची निंदा करणाऱ्याला कोणत्याही परिस्थितीत ठार मारलं जावं.+ इस्राएली लोकांनी त्याला कोणत्याही परिस्थितीत दगडमार करावा. देवाच्या नावाची निंदा केल्याबद्दल त्याला ठार मारलं जावं, मग तो तुमच्यात राहायला आलेला विदेशी असो, किंवा देशाचा रहिवासी.
१७ जर एखाद्याने दुसऱ्या माणसाचा जीव घेतला, तर त्याला कोणत्याही परिस्थितीत ठार मारलं जावं.+ १८ जर कोणी एखाद्या पाळीव प्राण्याला मारल्यामुळे त्या प्राण्याचा जीव गेला, तर त्याने जिवाबद्दल जीव अशी त्याची भरपाई करावी. १९ जर एखाद्याने दुसऱ्या माणसाला दुखापत केली, तर त्याने दुसऱ्याला जसं केलं, तसंच त्यालाही केलं जावं.+ २० मोडलेल्या हाडाबद्दल मोडलेलं हाड, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, याप्रमाणे त्याने जी काही दुखापत केली असेल, तीच त्यालाही केली जावी.+ २१ जर कोणी एखाद्या प्राण्याला मारल्यामुळे त्या प्राण्याचा जीव गेला, तर त्याने त्याबद्दल भरपाई करावी.+ पण जर कोणी एखाद्या माणसाला मारल्यामुळे त्या माणसाचा जीव गेला, तर त्याला ठार मारलं जावं.+
२२ तुमच्यातल्या प्रत्येकासाठी एकच न्याय-निर्णय असेल. तुमच्यात राहायला आलेला विदेशी आणि देशातला रहिवासी या दोघांसाठी एकच न्याय-निर्णय असेल,+ कारण मी तुमचा देव यहोवा आहे.’”
२३ तेव्हा मोशेने इस्राएली लोकांना या सर्व गोष्टी सांगितल्या आणि त्यांनी शाप देणाऱ्याला छावणीबाहेर आणून त्याला दगडमार केला.+ अशा प्रकारे, यहोवाने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणेच इस्राएली लोकांनी केलं.
२५ सीनाय पर्वतावर यहोवा मोशेला पुढे म्हणाला: २ “इस्राएली लोकांना सांग, ‘मी तुम्हाला देत असलेल्या देशात जेव्हा तुम्ही पोहोचाल,+ तेव्हा देश यहोवासाठी शब्बाथ* पाळेल.+ ३ सहा वर्षं तुम्ही आपल्या शेतात बियाणं पेरा. तसंच, सहा वर्षं आपल्या द्राक्षमळ्याची छाटणी करा आणि देशातून पीक गोळा करा.+ ४ पण सातव्या वर्षी देशासाठी संपूर्ण विश्रांतीचा शब्बाथ असावा. हा यहोवासाठी शब्बाथ असेल. त्या वर्षी तुम्ही आपल्या शेतात पेरणी करू नका किंवा आपल्या द्राक्षमळ्याची छाटणी करू नका. ५ कापणीनंतर उरलेल्या धान्यातून उगवणारं पीक कापू नका आणि छाटणी न केलेल्या वेलाची द्राक्षं गोळा करू नका. एक वर्ष देशाला संपूर्ण विश्रांती द्या. ६ पण या शब्बाथादरम्यान देशात उगवणारं अन्न तुम्ही खाऊ शकता. तुम्ही, तुमचे दास व दासी, तुमचे मजूर आणि तुमच्यामध्ये राहायला आलेले विदेशी ते अन्न खाऊ शकतात. ७ तसंच, तुमच्या देशातले पाळीव आणि जंगली प्राणीही ते खाऊ शकतात. देशात जे काही उगवेल ते खाल्लं जाऊ शकतं.
८ तुम्ही सात शब्बाथांची वर्षं मोजा, म्हणजे सात गुणिले सात वर्षं. या सात शब्बाथांचा काळ ४९ वर्षं इतका असेल. ९ मग सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, म्हणजे प्रायश्चित्ताच्या दिवशी+ तुम्ही मोठ्याने शिंग फुंका. शिंगाचा आवाज तुमच्या सबंध देशात ऐकू आला पाहिजे. १० तुम्ही ५० व्या वर्षाला पवित्र माना आणि देशाच्या सर्व रहिवाशांसाठी सुटकेची घोषणा करा.+ ते तुमच्यासाठी सुटकेचं वर्ष* असेल. तुमच्यापैकी प्रत्येकाला त्याची विकलेली जमीन परत मिळेल. तसंच, ज्या कोणाला दास म्हणून विकण्यात आलं होतं, त्याने आपल्या कुटुंबाकडे परत जावं.+ ११ ते ५० वं वर्ष तुमच्यासाठी सुटकेचं वर्ष असेल. त्या वर्षी तुम्ही बियाणं पेरू नका किंवा उरलेल्या धान्यातून आपोआप उगवलेलं पीक कापू नका, तसंच, छाटणी न झालेल्या द्राक्षवेलींची द्राक्षं गोळा करू नका.+ १२ कारण ते सुटकेचं वर्ष आहे. ते तुमच्यासाठी पवित्र असावं. जमिनीतून जे आपोआप उगवेल, फक्त तेच तुम्ही खाऊ शकता.+
१३ या सुटकेच्या वर्षात, तुमच्यापैकी प्रत्येकाला त्याची विकलेली जमीन परत मिळेल.+ १४ आपल्या शेजाऱ्याला काही विकताना किंवा त्याच्याकडून काही विकत घेताना, एकमेकांना लुबाडू नका.+ १५ आपल्या शेजाऱ्याकडून जमीन-जुमला विकत घेताना, सुटकेच्या वर्षानंतर किती वर्षं झाली आहेत हे मोजून किंमत ठरवा. तसंच त्यानेही जमीन विकताना, पीक घेण्याची किती वर्षं उरली आहेत हे मोजून किंमत ठरवावी.+ १६ जर बरीच वर्षं उरली असतील तर तो किंमत वाढवू शकतो आणि थोडीच वर्षं उरली असतील तर त्याने किंमत कमी करावी, कारण खरंतर तो तुम्हाला तितक्या वर्षांदरम्यानची पिकं विकत असतो. १७ तुमच्यापैकी कोणीही आपल्या शेजाऱ्याला लुबाडू नये+ आणि तुम्ही आपल्या देवाचं भय मानावं,+ कारण मी तुमचा देव यहोवा आहे.+ १८ तुम्ही माझ्या नियमांचं आणि माझ्या न्याय-निर्णयांचं पालन केलं, तर तुम्ही या देशात सुरक्षित राहाल.+ १९ देश तुम्हाला भरपूर पीक देईल+ आणि तुम्ही पोटभर खाल आणि तिथे सुरक्षित राहाल.+
२० पण तुम्ही कदाचित म्हणाल: “जर आम्ही सातव्या वर्षी पेरणी केली नाही आणि पीक गोळा केलं नाही, तर आम्ही काय खाणार?”+ २१ मी सहाव्या वर्षी तुमच्यावर माझा आशीर्वाद पाठवीन, म्हणजे जमीन तीन वर्षं पुरेल इतकं पीक देईल.+ २२ मग आठव्या वर्षी तुम्ही पेरणी कराल आणि नवव्या वर्षापर्यंत तुम्ही आधीच्याच पिकातून खाल. जोपर्यंत नवीन पीक येत नाही, तोपर्यंत तुम्ही जुन्या पिकातून खाल.
२३ कोणतीही जमीन कायमची विकली जाऊ नये,+ कारण देशातली जमीन माझी आहे.+ माझ्या दृष्टीने तुम्ही इथे राहायला आलेले विदेशी आणि परके आहात.+ २४ तुमच्या सबंध देशात, जमिनीच्या मूळ मालकाला ती परत विकत घेण्याचा हक्क तुम्ही दिला पाहिजे.
२५ समजा तुमच्या भावाला गरिबी आली आणि त्याला आपली काही जमीन विकावी लागली, तर ती सोडवण्याचा हक्क असलेल्या त्याच्या जवळच्या नातेवाइकाने येऊन आपल्या भावाने विकलेली जमीन परत विकत घ्यावी.+ २६ जर एखाद्याचा कोणी सोडवणारा नसेल, पण पुढे तो स्वतः श्रीमंत झाला आणि त्याच्याजवळ आपली जमीन सोडवून घेण्याइतकी संपत्ती आली, २७ तर त्याने जमीन विकल्यापासून जितकी वर्षं झाली असतील, तितक्या वर्षांच्या पिकांची किंमत मोजावी. मग त्याने ती रक्कम जमिनीच्या मूळ किंमतीतून वजा करून, उरलेली रक्कम जमीन विकत घेणाऱ्याला द्यावी. मग त्याला त्याची विकलेली जमीन परत मिळेल.+
२८ पण जर आपली जमीन परत विकत घेण्याइतकी त्याची ऐपत नसेल, तर विकलेली जमीन सुटकेच्या वर्षापर्यंत विकत घेणाऱ्याकडेच राहील.+ मग सुटकेच्या वर्षी ती पुन्हा त्याच्या मालकीची होईल आणि त्याला त्याची विकलेली जमीन परत मिळेल.+
२९ एखाद्या माणसाने तटबंदी असलेल्या शहरातलं आपलं घर विकलं, तर ते विकल्यानंतर एका वर्षापर्यंत ते सोडवण्याचा त्याला हक्क असेल; एक संपूर्ण वर्षभर त्याला ते सोडवण्याचा हक्क+ असेल. ३० पण वर्षाच्या शेवटापर्यंत, जर त्याने ते पुन्हा विकत घेतलं नाही, तर तटबंदी असलेल्या शहरातलं ते घर विकत घेणाऱ्याचं होईल आणि पिढ्या न् पिढ्या, कायमचं त्याच्या मालकीचं राहील. ते सुटकेच्या वर्षात परत दिलं जाऊ नये. ३१ पण ज्यांच्याभोवती भिंती नाहीत अशा वस्त्यांमधली घरं ही शेतजमिनीचाच भाग समजली जावीत. विकणाऱ्याला पुढेही ते घर सोडवण्याचा हक्क राहील आणि सुटकेच्या वर्षी ते घर त्याला परत मिळेल.
३२ लेव्यांच्या शहरांतली+ त्यांची घरं विकल्यानंतर, ती सोडवण्याचा त्यांना कायमचा हक्क राहील. ३३ लेव्यांची मालमत्ता परत विकत घेण्यात आली नाही, तर सुटकेच्या वर्षी त्यांच्या शहरातलं त्यांचं घर त्यांना परत केलं जाईल,+ कारण लेव्यांच्या शहरांतली त्यांची घरं ही इस्राएली लोकांमधली लेव्यांची मालमत्ता आहे.+ ३४ शिवाय, त्यांच्या शहरांभोवती असलेली गुरं चारण्याची जमीन+ विकली जाऊ शकत नाही, कारण ती त्यांचा कायमचा वारसा आहे.
३५ जर तुमच्या जवळपास राहणाऱ्या तुमच्या भावाला गरिबी आली आणि तो आपलं पोट भरू शकत नसेल, तर तुमच्यामध्ये राहायला आलेल्या विदेश्याला आणि परक्याला+ जशी तुम्ही मदत कराल, तशीच त्याला करा,+ म्हणजे तोही तुमच्यासोबत जिवंत राहील. ३६ त्याच्याकडून व्याज घेऊ नका किंवा आपला फायदा करून घेण्याचा प्रयत्न करू नका.+ तुम्ही आपल्या देवाचं भय मानलं पाहिजे,+ म्हणजे तुमचा भाऊ तुमच्यासोबत जिवंत राहील. ३७ तुम्ही त्याला व्याजाने पैसे देऊ नका+ किंवा आपल्या फायद्यासाठी त्याला अन्न देऊ नका. ३८ मी तुमचा देव यहोवा आहे. कनान देश तुम्हाला देण्यासाठी आणि मी तुमचा देव आहे हे सिद्ध करण्यासाठी,+ मीच तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणलं.+
३९ तुमच्या जवळपास राहणाऱ्या तुमच्या भावाला गरिबी आली आणि त्याने स्वतःला तुम्हाला विकलं,+ तर तुम्ही त्याच्याकडून दासासारखे कष्ट करून घेऊ नका.+ ४० तुम्ही त्याच्याशी मजुरासारखा, तुमच्यामध्ये राहायला आलेल्या माणसासारखा* व्यवहार करा.+ सुटकेच्या वर्षापर्यंत त्याने तुमची सेवा करावी. ४१ मग तो आणि त्याची मुलंबाळं* तुम्हाला सोडून आपल्या कुटुंबाकडे जातील. त्याने आपल्या वाडवडिलांकडून मिळालेल्या जमिनीकडे परत जावं.+ ४२ कारण मी त्यांना इजिप्त देशातून बाहेर आणलं आणि ते माझे दास आहेत.+ म्हणून दासाला विकलं जातं, तसं त्यांनी स्वतःला विकू नये. ४३ तुम्ही त्यांच्याशी क्रूरपणे वागू नका+ आणि तुम्ही तुमच्या देवाचं भय माना.+ ४४ तुमचे दास आणि तुमच्या दासी आसपासच्या राष्ट्रांमधून असाव्यात आणि त्यांच्यामधून तुम्ही दास किंवा दासी विकत घेऊ शकता. ४५ तसंच तुमच्यामध्ये राहायला आलेले विदेशी+ आणि तुमच्या देशात त्यांना झालेली मुलं यांमधून तुम्ही आपल्यासाठी दास विकत घेऊ शकता आणि ते तुमच्या मालकीचे होतील. ४६ तुम्ही त्यांना आपल्यानंतर कायमचा वारसा म्हणून आपल्या मुलांना देऊ शकता. तुम्ही त्यांच्याकडून काम करून घेऊ शकता, पण आपल्या इस्राएली बांधवांशी तुम्ही कधी क्रूरपणे वागू नका.+
४७ जर तुमच्यामध्ये राहणारा एखादा विदेशी किंवा परका माणूस श्रीमंत झाला आणि तुमच्या भावाला गरिबी आली; आणि जर तुमच्या भावाला स्वतःला त्या विदेशी माणसाला, किंवा परक्याला किंवा त्या विदेशी माणसाच्या एखाद्या नातेवाइकाला विकावं लागलं, ४८ तर स्वतःला विकल्यावरही त्याला स्वतःला सोडवून घेण्याचा हक्क असेल. त्याच्या भावांपैकी एक त्याला परत विकत घेऊ शकतो.+ ४९ किंवा त्याचा काका किंवा त्याच्या काकाचा मुलगा त्याला परत विकत घेऊ शकतो. तसंच, त्याच्या कुटुंबातला कोणताही जवळचा नातेवाईक* त्याला परत विकत घेऊ शकतो.
शिवाय, जर तो स्वतः श्रीमंत झाला असेल, तर तोसुद्धा स्वतःला परत विकत घेऊ शकतो.+ ५० त्याने स्वतःला ज्या वर्षी विकलं, त्या वर्षापासून त्याने सुटकेच्या वर्षापर्यंतचा काळ आपल्या विकत घेणाऱ्यासोबत मोजावा.+ त्या वर्षांनुसार त्याच्या विक्रीची किंमत ठरेल.+ त्या वर्षांमध्ये त्याच्या कामाच्या दिवसांची मजुरी, मजुराला दिल्या जाणाऱ्या मोबदल्याच्या हिशोबाने मोजली जाईल.+ ५१ जर अजून बरीच वर्षं असतील, तर उरलेल्या वर्षांच्या प्रमाणात त्याने स्वतःला सोडवण्याची किंमत द्यावी. ५२ पण जर सुटकेच्या वर्षासाठी थोडीच वर्षं उरली असतील, तर त्याने तसा हिशोब लावावा आणि उरलेल्या वर्षांच्या प्रमाणात स्वतःला सोडवण्याची किंमत द्यावी. ५३ त्याने दरवर्षी त्याची मजुरासारखी सेवा करावी आणि तो त्याला क्रूरपणे वागवत नाही याची तुम्ही खातरी करावी.+ ५४ पण जर या अटींप्रमाणे तो स्वतःला परत विकत घेऊ शकला नाही, तर तो आणि त्याची मुलंबाळं* सुटकेच्या वर्षी मुक्त होतील.+
५५ कारण इस्राएली लोक माझे दास आहेत. मी त्यांना इजिप्त देशातून बाहेर आणलं आणि ते माझे दास आहेत.+ मी तुमचा देव यहोवा आहे.
२६ तुम्ही आपल्यासाठी निरुपयोगी देव बनवू नका+ आणि कोरलेली मूर्ती किंवा पूजेचा स्तंभ उभारू नका.+ तसंच, तुम्ही आपल्या देशात कुठेही आकृती कोरलेला दगड ठेवून त्याच्यापुढे नमन करू नका,+ कारण मी तुमचा देव यहोवा आहे. २ तुम्ही माझे शब्बाथ पाळले पाहिजेत आणि माझ्या उपासना मंडपाबद्दल आदर दाखवला पाहिजे.* मी यहोवा आहे.
३ जर तुम्ही नेहमी माझ्या नियमांनुसार चालत राहिलात आणि माझ्या आज्ञा पाळत राहिलात,+ ४ तर मी वेळच्या वेळी पाऊस पाडीन+ आणि जमीन तिचा उपज देईल+ आणि फळझाडं तुम्हाला फळं देतील. ५ तुमचा मळणीचा हंगाम द्राक्षांच्या कापणीपर्यंत चालेल आणि द्राक्षांची कापणी पेरणीच्या हंगामापर्यंत चालेल; तुम्ही पोटभर अन्न खाल आणि तुमच्या देशात सुरक्षित राहाल.+ ६ मी देशात शांती आणीन+ आणि जेव्हा तुम्ही झोपाल तेव्हा तुम्हाला कोणाचीही भीती वाटणार नाही.+ मी देशातून हिंस्र प्राण्यांना काढून टाकीन आणि तुमच्या देशावर युद्धाची तलवार चालणार नाही. ७ तुम्ही आपल्या शत्रूंचा पाठलाग कराल आणि ते तुमच्यापुढे तलवारीने पडतील. ८ तुमच्यातले पाच जण १०० जणांचा पाठलाग करतील आणि १०० जण १०,००० जणांचा पाठलाग करतील आणि तुमचे शत्रू तुमच्यापुढे तलवारीने पडतील.+
९ मी तुमच्यावर माझा आशीर्वाद पाठवीन* आणि तुम्हाला फलदायी करून तुमची संख्या वाढवीन.+ मी तुमच्यासोबत केलेला माझा करार पाळीन.+ १० तुम्ही मागच्या वर्षाचं पीक खात असतानाच, तुम्हाला नवीन धान्य साठवण्यासाठी जुनं टाकून द्यावं लागेल. ११ मी माझा उपासना मंडप तुमच्यामध्ये उभारीन+ आणि मी* तुम्हाला नाकारणार नाही. १२ मी तुमच्यासोबत असेन आणि तुमचा देव होईन+ आणि तुम्ही माझे लोक व्हाल.+ १३ मी तुमचा देव यहोवा आहे. मीच तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणलं आणि त्यांच्या गुलामगिरीतून सोडवलं. तुम्हाला ताठ मानेने चालता यावं,* म्हणून मी तुमचं जू* तोडून टाकलं.
१४ पण जर तुम्ही माझं ऐकलं नाही आणि माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत,+ १५ आणि जर तुम्ही माझे नियम नाकारले+ आणि तुम्ही* माझ्या न्याय-निर्णयांचा तिरस्कार करून माझ्या सर्व आज्ञांचं पालन केलं नाही आणि जर तुम्ही माझा करार मोडला,+ १६ तर मी तुमच्यासोबत या सर्व गोष्टी करीन: मी तुम्हाला क्षयरोगाने आणि तापाने पीडित करीन. तुमची दृष्टी जाईल आणि तुमची शक्ती नाहीशी होईल. तुम्ही बियाणं पेराल पण तुम्हाला त्याचा काहीही उपयोग होणार नाही कारण तुमचे शत्रू त्याचं पीक खातील.+ १७ मी तुम्हाला नाकारीन आणि तुमचे शत्रू तुम्हाला हरवतील;+ तुमचा द्वेष करणारे तुम्हाला चिरडतील+ आणि कोणी पाठलाग करत नसतानाही तुम्ही पळत सुटाल.+
१८ इतकं सगळं होऊनही तुम्ही माझं ऐकलं नाही, तर तुमच्या पापांबद्दल मला तुम्हाला सातपट शिक्षा करावी लागेल. १९ मी तुमचा अहंकार मोडून टाकीन आणि तुमचं आकाश लोखंडासारखं+ आणि तुमची जमीन तांब्यासारखी करीन. २० तुम्ही व्यर्थच आपली शक्ती खर्च कराल, कारण तुमची जमीन पीक देणार नाही+ आणि फळझाडं फळं देणार नाहीत.
२१ तरीही, जर तुम्ही माझ्या विरोधात चालत राहिलात आणि माझं ऐकलं नाहीत, तर तुमच्या पापांबद्दल मला तुम्हाला सातपट शिक्षा करावी लागेल. २२ मी तुमच्यामध्ये रानातल्या हिंस्र प्राण्यांना पाठवीन+ आणि ते तुमच्या मुलांना उचलून नेतील+ आणि तुमच्या गुराढोरांना मारून टाकतील. तुमची संख्या कमी होत जाईल आणि तुमचे रस्ते ओसाड पडतील.+
२३ हे सर्व होऊनही जर तुम्ही माझं ताडन स्वीकारलं नाही+ आणि हट्टीपणे माझ्या विरोधात चालत राहिलात, २४ तर मीही तुमच्या विरोधात चालीन आणि मी तुमच्या पापांबद्दल तुम्हाला सातपट शिक्षा करीन. २५ माझा करार मोडल्याबद्दल मी तुमच्यावर सूड उगवणारी तलवार आणीन.+ तुम्ही तुमच्या शहरांत आश्रय घेतला, तर मी तुमच्यावर रोगराई पाठवीन+ आणि तुम्हाला तुमच्या शत्रूंच्या हातात देईन.+ २६ मी तुमचा अन्नाचा* पुरवठा* नष्ट करीन.+ तेव्हा दहा स्त्रिया मिळून एकाच भट्टीत तुमच्या भाकरी भाजतील आणि तुम्हाला वजनाने मापून देतील.+ तुम्ही खाल, पण तुमचं पोट भरणार नाही.+
२७ इतकं होऊनही जर तुम्ही माझं ऐकलं नाही आणि हट्टीपणे माझ्या विरोधात चालत राहिलात, २८ तर मी तुमचा आणखीन विरोध करीन,+ आणि तुमच्या पापांबद्दल मला तुम्हाला सातपट शिक्षा द्यावी लागेल. २९ तुम्हाला आपल्या मुलामुलींचं मांस खावं लागेल.+ ३० मी तुमची पूजेची उच्च स्थानं नष्ट करीन+ आणि तुमचे धूपस्तंभ कापून टाकीन आणि तुमच्या घृणास्पद मूर्तींच्या* प्रेतांवर तुमच्या प्रेतांचा ढीग लावीन.+ तुमची किळस आल्यामुळे मी* तुमच्याकडे पाठ फिरवीन.+ ३१ मी तुमची शहरं तलवारीच्या हवाली करीन+ आणि तुमची पवित्र ठिकाणं निर्जन करीन. तुमच्या बलिदानांचा सुवास* मला नकोसा होईल. ३२ मी स्वतः तुमचा देश ओसाड करीन+ आणि त्यात राहणारे तुमचे शत्रू त्याच्याकडे आश्चर्याने पाहत राहतील.+ ३३ मी सर्व राष्ट्रांमध्ये तुमची पांगापांग करीन+ आणि तलवार उपसून ती तुमच्यामागे पाठवीन.+ तुमचा देश ओसाड पडेल+ आणि तुमची शहरं उद्ध्वस्त होतील.
३४ तुम्ही आपल्या शत्रूंच्या देशात असताना तुमचा देश जितके दिवस ओसाड पडून राहील, तितके दिवस तो आपल्या शब्बाथांची परतफेड करेल. त्या वेळी देश विश्रांती घेईल,* कारण त्याला आपल्या शब्बाथांची परतफेड करावी लागेल.+ ३५ देश जितके दिवस ओसाड पडून राहील, तितके दिवस तो विश्रांती घेईल; कारण तुम्ही त्यात राहत असताना तुमच्या शब्बाथांच्या वेळी त्याला विश्रांती मिळाली नाही.
३६ शिवाय जे वाचतील,+ ते आपल्या शत्रूंच्या देशांत असताना मी त्यांच्या मनात निराशा उत्पन्न करीन. वाऱ्याने उडणाऱ्या पानाच्या आवाजाने ते असे पळू लागतील, जसा कोणी तलवारीपासून लांब पळतो आणि कोणीही पाठलाग करत नसताना ते पडतील.+ ३७ कोणी पाठलाग करत नसतानाही, ते तलवारीपासून लांब पळणाऱ्यांसारखे अडखळून एकमेकांवर पडतील. तुम्ही आपल्या शत्रूंसमोर टिकू शकणार नाही.+ ३८ राष्ट्रांमध्ये तुमचा नाश होईल+ आणि शत्रूंचा देश तुम्हाला गिळून टाकेल. ३९ तुमच्यापैकी जे वाचतील ते तुमच्या अपराधांमुळे तुमच्या शत्रूंच्या देशात सडत पडतील.+ हो, त्यांच्या वाडवडिलांच्या अपराधांमुळे+ ते सडत पडतील. ४० मग ते स्वतःच्या अपराधांची, तसंच आपल्या वाडवडिलांच्या अपराधांची आणि त्यांच्या अविश्वासूपणाची कबुली देतील.+ माझ्या विरोधात जाऊन ते अविश्वासूपणे वागले ही गोष्ट ते मान्य करतील.+ ४१ मग मीसुद्धा त्यांना त्यांच्या शत्रूंच्या देशात पाठवून त्यांचा विरोध करीन.+
कदाचित यामुळे, त्यांचं सुंता न झालेलं* हृदय नम्र होईल+ आणि मग ते आपल्या अपराधांची भरपाई करतील. ४२ तेव्हा मी याकोबसोबत,+ इसहाकसोबत+ आणि अब्राहामसोबत केलेला माझा करार आठवीन+ आणि मी त्या देशाची आठवण करीन. ४३ इस्राएली लोक आपला देश सोडून गेल्यावर त्यांचा देश ओसाड पडून राहील. त्यांचा देश आपल्या शब्बाथांची परतफेड करेल+ आणि ते आपल्या अपराधांची भरपाई करतील, कारण त्यांनी माझे न्याय-निर्णय नाकारले आणि त्यांनी* माझ्या नियमांचा तिरस्कार केला.+ ४४ पण इतकं सर्व होऊनही, ते त्यांच्या शत्रूंच्या देशात असताना मी कधीही त्यांना पूर्णपणे नाकारणार नाही,+ किंवा त्यांचा नाश होईल इतकं दूर त्यांना लोटणार नाही; कारण, यामुळे त्यांच्यासोबत केलेला माझा करार मोडेल.+ मी त्यांचा देव यहोवा आहे. ४५ त्यांच्यासाठी मी त्यांच्या वाडवडिलांसोबत केलेला माझा करार आठवीन.+ मी त्यांचा देव आहे हे सिद्ध करण्यासाठी मी त्यांना सर्व राष्ट्रांदेखत इजिप्त देशातून बाहेर आणलं.+ मी यहोवा आहे.’”
४६ हे कायदे, न्याय-निर्णय आणि नियम, यहोवाने सीनाय पर्वतावर इस्राएली लोकांना मोशेद्वारे ठरवून दिले.+
२७ यहोवा मोशेला पुढे म्हणाला: २ “इस्राएली लोकांना सांग, ‘जर एखाद्या माणसाने एका व्यक्तीची* ठरलेली किंमत यहोवाला देण्याचा खास नवस केला,+ ३ तर २० ते ६० वर्षं वयाच्या पुरुषाची ठरलेली किंमत, ही पवित्र ठिकाणाच्या ठरलेल्या शेकेलप्रमाणे* चांदीचे ५० शेकेल* असेल. ४ पण जर ती स्त्री असेल, तर तिची ठरलेली किंमत ही ३० शेकेल असेल. ५ जर मुलगा ५ ते २० वर्षं वयाचा असेल, तर त्याची ठरलेली किंमत २० शेकेल आणि मुलीची ठरलेली किंमत १० शेकेल असेल. ६ एक महिना ते पाच वर्षं वयाच्या मुलाची ठरलेली किंमत चांदीचे पाच शेकेल, तर मुलीची ठरलेली किंमत चांदीचे तीन शेकेल असेल.
७ जर पुरुषाचं वय ६० वर्षं आणि त्यापेक्षा जास्त असेल, तर त्याची ठरलेली किंमत १५ शेकेल आणि स्त्रीची ठरलेली किंमत १० शेकेल असेल. ८ पण जर नवस करणारा माणूस गरीब असेल आणि ठरलेली किंमत देण्याची त्याची ऐपत नसेल,+ तर तो त्या व्यक्तीला याजकासमोर उभं करेल आणि याजक तिची किंमत ठरवेल. नवस करणाऱ्या माणसाच्या ऐपतीप्रमाणे याजक किंमत ठरवेल.+
९ जर त्याने यहोवाला अर्पण करण्यासाठी योग्य असलेला एखादा प्राणी देण्याचा नवस केला असेल, तर यहोवाला दिलेला तो प्राणी पवित्र होईल. १० त्याने चांगल्या प्राण्याच्या बदल्यात वाईट किंवा वाईट प्राण्याच्या बदल्यात चांगला, अशी अदलाबदल करू नये. पण जर त्याने अशी अदलाबदल केलीच, तर आधीचा आणि त्याच्या बदल्यात दिलेला असे दोन्ही प्राणी पवित्र मानले जातील. ११ जर त्याने यहोवाला अर्पण करण्यासाठी योग्य नसलेला एखादा अशुद्ध प्राणी आणला,+ तर तो त्या प्राण्याला याजकासमोर उभं करेल. १२ मग तो प्राणी चांगला आहे की वाईट, यावरून याजक त्याची किंमत ठरवेल. याजक ठरवेल तीच त्याची किंमत असेल. १३ पण जर कधी त्या माणसाला तो प्राणी परत विकत घ्यायचा असेल, तर त्याला ठरलेल्या किंमतीसोबतच तिचा पाचवा भागही द्यावा लागेल.+
१४ जर एखाद्या माणसाने आपलं घर यहोवासाठी पवित्र म्हणून अर्पण केलं, तर ते घर चांगलं आहे की वाईट, यावरून याजक त्या घराची किंमत ठरवेल. याजकाने ठरवलेली किंमत हीच त्या घराची किंमत असेल.+ १५ पण आपलं घर अर्पण करणाऱ्या माणसाला ते परत विकत घ्यायचं असेल, तर त्याने ठरलेल्या किंमतीसोबतच तिचा पाचवा भागही द्यावा आणि मग ते घर त्याचं होईल.
१६ जर एखाद्या माणसाला आपल्या मालकीच्या शेताचा काही भाग यहोवाला अर्पण करायचा असेल, तर त्याची किंमत ते शेत पेरायला जितकं बियाणं लागतं, त्या प्रमाणात ठरवली जाईल: एक होमर* जवाच्या बियाण्याची किंमत चांदीचे ५० शेकेल असेल. १७ जर त्याने सुटकेच्या वर्षापासून* आपलं शेत अर्पण केलं,+ तर त्याच्या शेताची ठरवलेली किंमत तितकीच राहील. १८ पण जर त्याने सुटकेच्या वर्षानंतर आपलं शेत अर्पण केलं, तर पुढच्या सुटकेच्या वर्षापर्यंत किती वर्षं उरली आहेत, हे मोजून याजक त्याच्या शेताची किंमत ठरवेल. मग मूळ किंमतीतून तेवढी रक्कम वजा केली जावी.+ १९ पण शेत अर्पण करणाऱ्याला ते पुन्हा विकत घ्यायचं असेल, तर त्याने शेताच्या ठरलेल्या किंमतीसोबतच तिचा पाचवा भागही द्यावा आणि मग ते शेत पुन्हा त्याच्या मालकीचं होईल. २० जर त्याने ते शेत पुन्हा विकत घेतलं नाही आणि जर ते दुसऱ्याला विकण्यात आलं, तर त्याला ते परत विकत घेता येणार नाही. २१ सुटकेच्या वर्षी जेव्हा ते शेत परत केलं जाईल, तेव्हा ते यहोवाला समर्पित केलेलं पवित्र शेत होईल. ते याजकांच्या मालकीचं होईल.+
२२ जर एखाद्या माणसाने त्याला वारशाने मिळालेल्या मालमत्तेतलं नाही, तर विकत घेतलेलं शेत यहोवाला अर्पण केलं,+ २३ तर याजक सुटकेच्या वर्षापर्यंत त्याची किती किंमत होते हे ठरवेल आणि तो माणूस त्याच दिवशी तितकी किंमत देईल.+ ती यहोवासाठी पवित्र आहे. २४ सुटकेच्या वर्षी, ते शेत ज्या माणसाकडून त्याने विकत घेतलं होतं, म्हणजे मुळात ते ज्याच्या मालकीचं आहे, त्याला परत मिळेल.+
२५ पवित्र ठिकाणाच्या ठरलेल्या शेकेलप्रमाणे प्रत्येक गोष्टीची किंमत ठरवली जावी. एक शेकेल म्हणजे २० गेरे* असतील.
२६ कोणीही प्राण्यांमधून प्रथम जन्मलेल्यांना अर्पण करू नये, कारण प्रथम जन्मलेले असल्यामुळे ते आधीच यहोवाचे आहेत.+ बैल असो किंवा मेंढा, तो आधीच यहोवाचा आहे.+ २७ जर कोणी अशुद्ध प्राण्यांपैकी एखादा अर्पण केला असेल आणि जर त्याला ठरवलेल्या किंमतीप्रमाणे तो प्राणी सोडवून घ्यायचा असेल, तर त्याने त्याच्या ठरवलेल्या किंमतीसोबतच तिचा पाचवा भागही द्यावा.+ पण त्याने तो प्राणी परत विकत घेतला नाही, तर ठरवलेल्या किंमतीला तो विकून टाकला जाईल.
२८ पण एखादा माणूस यहोवाला आपल्या मालकीच्या वस्तूंपैकी जे काही बिनशर्तपणे समर्पित करतो,* ते विकलं किंवा परत विकत घेतलं जाऊ शकत नाही. मग तो एखादा माणूस असो, प्राणी असो किंवा शेत. प्रत्येक समर्पित वस्तू यहोवासाठी परमपवित्र आहे.+ २९ शिवाय, ज्या माणसाला मृत्यूची शिक्षा सुनावण्यात आली आहे, म्हणजेच ज्याला नाशासाठी राखून ठेवण्यात आलं आहे, त्याला सोडवलं जाऊ शकत नाही.+ त्याला कोणत्याही परिस्थितीत ठार मारावं.+
३० जमिनीच्या उत्पन्नातला प्रत्येक दहावा भाग,*+ मग तो शेताच्या पिकाचा असो किंवा झाडांच्या फळांचा असो, तो यहोवाचा आहे. तो यहोवासाठी पवित्र आहे. ३१ जर एखाद्याने दिलेला दहावा भाग त्याला परत विकत घ्यायचा असेल, तर त्याने त्याच्या किंमतीसोबतच तिचा पाचवा भागही द्यावा. ३२ मेंढरांच्या किंवा बकऱ्यांच्या कळपातला आणि गुराढोरांतला प्रत्येक दहावा प्राणी* तुम्ही यहोवाला द्यावा. मेंढपाळाने आपले प्राणी मोजताना प्रत्येक दहावा प्राणी देवासाठी राखून ठेवावा. प्रत्येक दहावा प्राणी पवित्र असेल. ३३ तो चांगला आहे की वाईट, हे त्या माणसाने पाहू नये किंवा त्याची अदलाबदलही करू नये. पण जर त्याला अशी अदलाबदल करायची असलीच, तर आधीचा आणि त्याच्या बदल्यात दिलेला, असे दोन्ही प्राणी पवित्र मानले जातील.+ त्यांना परत विकत घेतलं जाऊ शकत नाही.’”
३४ या आज्ञा यहोवाने सीनाय पर्वतावर+ मोशेद्वारे इस्राएली लोकांना दिल्या.
शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “इस्राएलच्या मुलांशी.”
किंवा “तरणा बैल.”
शब्दशः “जाळून धूर करावा.”
किंवा “समाधान होईल.” शब्दशः “शांतिदायक.”
किंवा “समाधान होईल.” शब्दशः “शांतिदायक.”
किंवा “चरबीयुक्त राख,” म्हणजे बलिदानांच्या चरबीत भिजलेली राख.
किंवा “समाधान होईल.” शब्दशः “शांतिदायक.”
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “आठवणीसाठी (नमुना म्हणून) अर्पणातला काही भाग.”
किंवा “समाधान होईल.” शब्दशः “शांतिदायक.”
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “आठवणीसाठी (नमुना म्हणून) अर्पणातला काही भाग.”
किंवा “समाधान होईल.” शब्दशः “शांतिदायक.”
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “समाधानासाठी.” शब्दशः “शांतिदायक.”
किंवा “आठवणीसाठी (नमुना म्हणून) अर्पणातला काही भाग.”
किंवा “समाधान होईल.” शब्दशः “शांतिदायक.”
शब्दशः “भाकर,” म्हणजे शांती-अर्पणातला देवाचा हिस्सा.
शब्दशः “भाकर,” म्हणजे शांती-अर्पणातला देवाचा हिस्सा.
किंवा “समाधानासाठी.” शब्दशः “शांतिदायक.”
किंवा “एखाद्या जिवाने.”
हे महायाजकाला सूचित करतं.
किंवा “तरणा बैल.”
किंवा “चरबीयुक्त राख,” म्हणजे बलिदानांच्या चरबीत भिजलेली राख.
कदाचित हे मंडळीच्या वडीलजनांना सूचित करत असावं.
कदाचित हे मंडळीच्या वडीलजनांना सूचित करत असावं.
किंवा “एखाद्या जिवाने.”
किंवा “समाधान होईल.” शब्दशः “शांतिदायक.”
किंवा “एखाद्या जिवाने.”
शब्दशः “शापाचा (शपथेचा) आवाज.” हे कदाचित एखाद्या अपराधाबद्दल केलेल्या अशा घोषणेला सूचित करत असावं, जिच्यात अपराध्याविरुद्ध किंवा साक्ष न देणाऱ्या साक्षीदाराविरुद्ध शाप घोषित केला जायचा.
किंवा “एखाद्या जिवाने.”
हे कदाचित घोळक्यांत राहणाऱ्या लहान जीवजंतूना सूचित करतं.
किंवा “एखाद्या जिवाने.”
आपण घेतलेली शपथ तो पूर्ण करत नाही, असं कदाचित इथे सूचित केलं असावं.
एक एफाचा दहावा भाग म्हणजे २.२ ली. अति. ख१४ पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “आठवणीसाठी (नमुना म्हणून) अर्पणातला काही भाग.”
किंवा “एखाद्या जिवाने.”
एक शेकेल म्हणजे ११.४ ग्रॅम. अति. ख१४ पाहा.
किंवा “पवित्र शेकेलप्रमाणे.”
किंवा “एखाद्या जिवाने.”
किंवा “एखाद्या जिवाने.”
किंवा “आत घालायचे कपडे.”
किंवा “चरबीयुक्त राख,” म्हणजे बलिदानांच्या चरबीत भिजलेली राख.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “आठवणीसाठी (नमुना म्हणून) अर्पणातला काही भाग.”
किंवा “समाधान होईल.” शब्दशः “शांतिदायक.”
शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
एक एफाचा दहावा भाग म्हणजे २.२ ली. अति. ख१४ पाहा.
किंवा “समाधान होईल.” शब्दशः “शांतिदायक.”
शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “खाणाऱ्या जिवाला.”
किंवा “जिवाने.”
किंवा “त्या जिवाला.”
किंवा “कोणत्याही जिवाने.”
किंवा “त्या जिवाला.”
किंवा “जो जीव.”
किंवा “तरणा बैल.”
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “कमरपट्टा.”
शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “पवित्र मुकुट.”
किंवा “गंगाळ.”
किंवा “बांधल्या.”
किंवा “समाधानाचं.” शब्दशः “शांतिदायक.”
किंवा “समाधानासाठी.” शब्दशः “शांतिदायक.”
इथे हिब्रू भाषेत “नियुक्तीची टोपली” असं म्हणण्यात आलं आहे.
शब्दशः “तुमचा हात भरण्यासाठी.”
किंवा “तरणा बैल.”
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “पृथ्वीवर.”
खडकांमध्ये राहणारा सशासारखा एक प्राणी.
किंवा “कैकर.”
एक समुद्री पक्षी.
किंवा “छोटं घुबड.”
पाण्यात सूर मारून मासे पकडणारा एक पक्षी. याच्या पायांची बोटं त्वचेच्या पडद्यांनी जोडलेली असतात.
सुतार पक्ष्यासारखा दिसणारा एक पक्षी.
किंवा “प्रत्येक किडा.”
किंवा “तुमचा जीव घृणास्पद होऊ देऊ नका.”
किंवा “तुमच्या जिवाला.”
किंवा “मिसर.”
शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “त्याच्या मांसाच्या त्वचेत.”
“कुष्ठरोग” असं भाषांतर केलेल्या हिब्रू शब्दाचे अनेक अर्थ आहेत. हा शब्द बऱ्याच प्रकारच्या संसर्गजन्य त्वचारोगांना सूचित करू शकतो. कपड्यांना आणि घरांना होणाऱ्या काही संसर्गांनाही तो सूचित करू शकतो.
किंवा “तो संसर्ग.”
किंवा “दुसऱ्यांदा.”
किंवा “माणसाचा रोग संसर्गजन्य नसल्याचं.”
शब्दशः “त्यांच्या मांसाच्या त्वचेत.”
शब्दार्थसूची पाहा.
तीन दशांश एफा म्हणजे ६.६ ली. अति. ख१४ पाहा.
एक लोग म्हणजे ०.३१ ली. अति. ख१४ पाहा.
एक दशांश एफा म्हणजे २.२ ली. अति. ख१४ पाहा.
शब्दशः “त्याचं शरीर.”
किंवा “तरणा बैल.”
किंवा “आत घालायचे कपडे.”
किंवा “त्याचं उघडं शरीर.”
अजाजेल या शब्दाचा अर्थ कदाचित “नाहीसा होणारा बकरा” असा असावा.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “तयार उभ्या असलेल्या माणसाच्या.”
शब्दार्थसूची पाहा.
हा शोक उपास करून किंवा अशाच प्रकारची इतर बंधनं स्वतःवर लादून केला जात असावा.
शब्दशः “ज्याचा हात भरला जाईल.”
किंवा “समाधान होईल.” शब्दशः “शांतिदायक.”
शब्दशः “बकरे.”
शब्दशः “त्यांच्यासोबत व्यभिचार करत आहेत.”
किंवा “जिवाला.”
किंवा “जीवन.”
किंवा “आपल्या जिवांसाठी.”
किंवा “जीव.”
किंवा “कोणत्याही जिवाने.”
किंवा “जीव.”
किंवा “जीव.”
किंवा “कोणत्याही जिवाने.”
किंवा “नियमांप्रमाणे.”
शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “नग्नता उघडी करण्यासाठी.” या आणि पुढच्या वचनांत.
शब्दशः “ही तुझ्या वडिलांची नग्नता आहे.”
शब्दशः “त्या तुझीच नग्नता आहेत.”
शब्दशः “वडिलांच्या भावाची नग्नता उघडी करू नको.”
शब्दशः “ही तुझ्या भावाची नग्नता आहे.”
किंवा “लाजिरवाणी वागणूक; बीभत्स.”
किंवा “तुझ्या शेजाऱ्याच्या; तुझ्या सोबत्याच्या.”
किंवा “वाहू नको; बलिदान करू नको.”
किंवा “देशातून रहिवाशांना काढून टाकलं जाईल.”
किंवा “जसं त्या देशातून काढून टाकलं जाणार आहे.”
किंवा “तसं तुम्हाला काढून टाकलं जाणार नाही.”
किंवा “त्या जिवाला.”
शब्दशः “भीती बाळगली पाहिजे.”
किंवा “जिवाला.”
किंवा “सरवा.”
किंवा “पीडितांसाठी.”
शब्दशः “रक्तावर.”
किंवा कदाचित, “तुझ्या शेजाऱ्याचा जीव धोक्यात असताना नुसताच उभा राहू नकोस.”
किंवा “दोन प्रकारच्या प्राण्यांचा संकर करू नका.”
किंवा “कल्ले कापू नका.”
किंवा “एखाद्या जिवासाठी.” इथे वापरला गेलेला नेफेश हा हिब्रू शब्द मेलेल्या माणसाला सूचित करतो.
शब्दशः “भीती बाळगली पाहिजे.”
अति. ख१४ पाहा.
अति. ख१४ पाहा.
शब्दशः “त्याच्यासोबत व्यभिचार.”
किंवा “जीव.”
किंवा “जिवाला.”
किंवा “शरीरसंबंध ठेवतो.”
शब्दशः “आपल्या वडिलांची नग्नता.”
किंवा “लाजिरवाणी वागणूक; बीभत्स.”
शब्दशः “आपल्या बहिणीची नग्नता.”
शब्दशः “आपल्या काकांची नग्नता.”
शब्दशः “आपल्या भावाची नग्नता.”
किंवा “आपल्या जिवांना.”
किंवा “त्यांच्यात भविष्य सांगणारा दुष्ट स्वर्गदूत असेल.”
किंवा “जिवासाठी.”
शब्दशः “त्याच्या जवळची असेल.”
किंवा “अन्न,” जे अर्पणांना सूचित करतं.
शब्दशः “ज्याचा हात भरण्यात आला आहे.”
किंवा “मेलेल्या जिवाजवळ.” इथे वापरला गेलेला नेफेश हा हिब्रू शब्द “मेलेला” या अर्थाच्या हिब्रू शब्दाशी संबंधित आहे.
शब्दशः “बीज.”
शब्दशः “बीज.”
शब्दशः “किंवा ज्याच्या नाकाला चीर आहे.”
किंवा कदाचित, “हडकुळा.”
शब्दशः “बीज.”
शब्दशः “त्यांनी स्वतःला त्यांपासून वेगळं ठेवावं.”
किंवा “त्या जिवाला.”
किंवा “जिवामुळे.”
किंवा “जीव.”
शब्दशः “परका.” म्हणजे, अहरोनच्या वंशातला नसलेला माणूस.
किंवा “एखाद्या जिवाला.”
किंवा “एखाद्या परक्याशी.”
शब्दशः “परका.” म्हणजे, अहरोनच्या वंशातला नसलेला माणूस.
किंवा “आखूड; तोकडा.”
किंवा “जाहीर.”
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “जाहीर.”
किंवा “संधिप्रकाशाच्या वेळी.” शब्दशः “दोन संध्याकाळींच्या मधे.”
शब्दार्थसूची पाहा.
दोन दशांश एफा म्हणजे ४.४ ली. अति. ख१४ पाहा.
किंवा “समाधान होईल.” शब्दशः “शांतिदायक.”
एक हिन म्हणजे ३.६७ ली. अति. ख१४ पाहा.
दोन दशांश एफा म्हणजे ४.४ ली. अति. ख१४ पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “तरणा बैल.”
किंवा “समाधान होईल.” शब्दशः “शांतिदायक.”
किंवा “पीडितांसाठी.”
हा शोक उपास करून किंवा अशाच प्रकारची इतर बंधनं स्वतःवर लादून केला जात असावा.
किंवा “जीव.”
किंवा कदाचित, “उपास करणार नाही.”
किंवा “प्रत्येक जिवाचा.”
किंवा “तात्पुरत्या आश्रयांचा.”
एक प्रकारची समई.
दोन दशांश एफा म्हणजे ४.४ ली. अति. ख१४ पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “आठवणीसाठी (नमुना म्हणून) अर्पणातला काही भाग.”
म्हणजे, १५ आणि १६ या वचनांवरून दिसून येतं त्याप्रमाणे यहोवा या नावाची.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “योबेल वर्ष.”
किंवा “परक्यासारखा.”
शब्दशः “मुलं.”
किंवा “रक्ताचा नातेवाईक.”
किंवा “मुलं.”
शब्दशः “भीती बाळगली पाहिजे.”
शब्दशः “तुमच्याकडे वळीन.”
किंवा “माझा जीव.”
शब्दशः “ताठ चालता यावं.”
किंवा “जोखड.” शब्दार्थसूची पाहा.
किंवा “तुमच्या जिवांनी.”
किंवा “भाकरींचा.”
शब्दशः “सळई.” हे कदाचित भाकरी अडकवून ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सळईला सूचित करत असावं.
इथे वापरलेला हिब्रू शब्द, “विष्ठा” या अर्थाच्या शब्दाशी संबंधित असावा आणि तो तिरस्कार दाखवण्यासाठी वापरला जातो.
किंवा “माझा जीव.”
किंवा “समाधान देणारा वास.” शब्दशः “शांतिदायक.”
किंवा “शब्बाथ पाळेल.”
किंवा “हट्टी.”
किंवा “त्यांच्या जिवांनी.”
किंवा “जिवाची.”
किंवा “पवित्र शेकेलप्रमाणे.”
एक शेकेल म्हणजे ११.४ ग्रॅम. अति. ख१४ पाहा.
एक होमर म्हणजे २२० ली. अति. ख१४ पाहा.
किंवा “योबेल वर्षापासून.”
एक गेरा म्हणजे ०.५७ ग्रॅम. अति. ख१४ पाहा.
किंवा “नाशासाठी राखून ठेवतो.”
किंवा “प्रत्येक दशांश.”
किंवा “डोकं.” मेंढपाळ आपल्या प्राण्यांना मोजताना त्यांना आपल्या काठीखालून जायला लावायचे.