पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर उपदेशक रूपरेषा उपदेशक पुस्तकाची रूपरेषा १ “सगळंच व्यर्थ आहे!” (१-११) पृथ्वी सर्वकाळ राहते (४) निसर्गाची चक्रं चालत राहतात (५-७) सूर्याखाली नवीन काहीच नाही (९) माणसाची बुद्धी मर्यादित (१२-१८) वाऱ्यामागे धावण्यासारखं (१४) २ शलमोनच्या कार्यांचं परीक्षण (१-११) बुद्धी तुलनेने जास्त मौल्यवान (१२-१६) मेहनतीची व्यर्थता (१७-२३) खा-प्या आणि मेहनतीच्या फळाचा आनंद घ्या (२४-२६) ३ प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ (१-८) आयुष्याचा आनंद घेणं देवाकडून देणगी (९-१५) माणसांना अनंतकाळाची जाणीव (११) देव सर्वांचा नीतीने न्याय करतो (१६, १७) माणसं आणि प्राणी सर्वच शेवटी मरतात (१८-२२) सगळे पुन्हा मातीतच जाणार (२०) ४ जुलूम मृत्यूपेक्षाही वाईट (१-३) कामाबद्दल योग्य दृष्टिकोन (४-६) मित्राचं मोल (७-१२) एकापेक्षा दोघं चांगले (९) राजाचं जीवनही व्यर्थ असू शकतं (१३-१६) ५ योग्य भय बाळगून देवासमोर जा (१-७) खालच्यांवर उच्च अधिकाऱ्यांची नजर (८, ९) संपत्तीची व्यर्थता (१०-२०) पैशाची हाव असलेल्यांचं कधीच समाधान होत नाही (१०) सेवकाला चांगली झोप लागते (१२) ६ संपत्ती असून उपभोग नाही (१-६) तुमच्याजवळ जे आहे त्याचा आताच आनंद घ्या (७-१२) ७ चांगलं नाव आणि मरणाचा दिवस (१-४) बुद्धिमान माणसाचं ताडन (५-७) सुरुवातीपेक्षा शेवट बरा (८-१०) बुद्धीचा फायदा (११, १२) चांगले आणि वाईट दिवस (१३-१५) टोकाच्या गोष्टी टाळा (१६-२२) उपदेशकाने केलेलं निरीक्षण (२३-२९) ८ माणसांच्या अपरिपूर्ण शासनाखाली (१-१७) राजाच्या आज्ञा पाळ (२-४) माणसाचा अधिकार नुकसानकारक (९) लगेच शिक्षा दिली जात नाही तेव्हा (११) खा-प्या आणि आनंदी राहा (१५) ९ सर्वांचा शेवट सारखा (१-३) मृत्यू अटळ असला तरी जीवनाचा आनंद घ्या (४-१२) मेलेल्यांना काहीच माहीत नसतं (५) कबरेत काहीच काम नाही (१०) वेळ आणि अनपेक्षित घटना (११) बुद्धीची नेहमीच कदर केली जात नाही (१३-१८) १० थोड्याशा मूर्खपणामुळे बुद्धीचा नाश (१) योग्यता आणि कुशलता नसण्याचे धोके (२-११) मूर्खाची वाईट अवस्था (१२-१५) शासकांचा मूर्खपणा (१६-२०) कदाचित पक्षी तुमचे शब्द पुन्हा बोलेल (२०) ११ संधीचं सोनं करा (१-८) “आपलं अन्न पाण्यावर सोड” (१) सकाळपासून संध्याकाळपर्यंत बी पेर (६) तारुण्याचा विचारपूर्वक आनंद घे (९, १०) १२ म्हातारपण यायच्या आधी निर्माणकर्त्याला आठव (१-८) उपदेशकाचा निष्कर्ष (९-१४) “बुद्धिमानांचे शब्द पराणीसारखे” (११) “खऱ्या देवाचं भय मान“ (१३)