पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर निर्गम रूपरेषा निर्गम पुस्तकाची रूपरेषा १ इजिप्तमध्ये इस्राएली लोकांची संख्या वाढते (१-७) फारो इस्राएली लोकांचा छळ करतो (८-१४) देवाला भिऊन वागणाऱ्या सुइणी मुलांचे जीव वाचवतात (१५-२२) २ मोशेचा जन्म (१-४) फारोची मुलगी मोशेला दत्तक घेते (५-१०) मोशे मिद्यानला पळून जातो आणि सिप्पोराशी लग्न करतो (११-२२) देव इस्राएली लोकांचा आक्रोश ऐकतो (२३-२५) ३ मोशे आणि जळणारं काटेरी झुडूप (१-१२) यहोवा आपल्या नावाचा अर्थ सांगतो (१३-१५) यहोवा मोशेला सूचना देतो (१६-२२) ४ तीन चिन्हं दाखवण्याबद्दल मोशेला सांगितलं जातं (१-९) आपण योग्य नाही असं मोशेला वाटतं (१०-१७) मोशे इजिप्तला परत येतो (१८-२६) मोशे आणि अहरोनची पुन्हा भेट होते (२७-३१) ५ मोशे आणि अहरोन फारोसमोर (१-५) छळ वाढतो (६-१८) इस्राएली लोक मोशे आणि अहरोन यांना दोष देतात (१९-२३) ६ पुन्हा सुटकेचं वचन (१-१३) यहोवाच्या नावाची पूर्णपणे ओळख झाली नव्हती (२, ३) मोशे आणि अहरोन यांची वंशावळ (१४-२७) मोशेला पुन्हा फारोसमोर जायला सांगितलं जातं (२८-३०) ७ यहोवा मोशेला धीर देतो (१-७) अहरोनच्या काठीचा मोठा साप होतो (८-१३) पहिली पीडा: पाण्याचं रक्त होतं (१४-२५) ८ दुसरी पीडा: बेडूक (१-१५) तिसरी पीडा: चिलटं (१६-१९) चौथी पीडा: गोमाश्या (२०-३२) गोशेन सुरक्षित (२२, २३) ९ पाचवी पीडा: जनावरांचा मृत्यू (१-७) सहावी पीडा: माणसांवर आणि जनावरांवर फोड (८-१२) सातवी पीडा: गारा (१३-३५) फारो देवाची शक्ती पाहील (१६) यहोवाचं नाव जाहीर होईल (१६) १० आठवी पीडा: टोळ (१-२०) नववी पीडा: अंधार (२१-२९) ११ दहाव्या पीडेची घोषणा (१-१०) इस्राएली लोक भेटवस्तू मागतील (२) १२ वल्हांडणाची सुरुवात (१-२८) दाराच्या चौकटींवर रक्त लावण्याची आज्ञा (७) दहावी पीडा: प्रथमपुत्राला ठार मारलं जातं (२९-३२) इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर निघतात (३३-४२) ४३० वर्षं संपतात (४०, ४१) वल्हांडणात भाग घेण्यासाठी सूचना (४३-५१) १३ पहिला जन्मलेला प्रत्येक नर यहोवाचा (१, २) बेखमीर भाकरींचा सण (३-१०) पहिला जन्मलेला प्रत्येक नर यहोवाला समर्पित (११-१६) इस्राएली लोकांना तांबड्या समुद्राकडे जायला सांगितलं जातं (१७-२०) ढगाचा आणि आगीचा खांब (२१, २२) १४ इस्राएली लोक समुद्राजवळ पोहोचतात (१-४) फारो इस्राएली लोकांचा पाठलाग करतो (५-१४) इस्राएली लोक तांबडा समुद्र पार करतात (१५-२५) इजिप्तचे लोक समुद्रात बुडतात (२६-२८) इस्राएली लोक यहोवावर विश्वास ठेवतात (२९-३१) १५ मोशे आणि इस्राएली लोकांचं विजय-गीत (१-१९) मिर्यामसुद्धा त्यांच्या पाठोपाठ गाते (२०, २१) कडू पाण्याला गोड केलं जातं (२२-२७) १६ लोक अन्नासाठी कुरकुर करू लागतात (१-३) यहोवा लोकांची कुरकुर ऐकतो (४-१२) लावे आणि मान्ना पुरवला जातो (१३-२१) शब्बाथाच्या दिवशी मान्ना नाही (२२-३०) आठवणीसाठी मान्ना ठेवला जातो (३१-३६) १७ होरेब इथे पाणी नसल्याची तक्रार (१-४) खडकातून पाणी (५-७) अमालेकी लोकांचा हल्ला आणि पराभव (८-१६) १८ इथ्रो आणि सिप्पोरा येतात (१-१२) न्यायाधीश नेमण्याचा इथ्रोचा सल्ला (१३-२७) १९ सीनाय पर्वताजवळ (१-२५) इस्राएल याजकांनी बनलेलं राज्य होणार (५, ६) देवाला भेटण्यासाठी लोकांना पवित्र केलं जातं (१४, १५) २० दहा आज्ञा (१-१७) दृश्य पाहून इस्राएली लोक घाबरतात (१८-२१) उपासनेविषयी सूचना (२२-२६) २१ इस्राएली लोकांसाठी कायदे (१-३६) इब्री दासांविषयी (२-११) शेजाऱ्याविरुद्ध केलेल्या हिंसेविषयी (१२-२७) प्राण्यांविषयी (२८-३६) २२ इस्राएली लोकांसाठी कायदे (१-३१) चोरीविषयी (१-४) पिकांच्या नुकसानाविषयी (५, ६) नुकसान भरपाई आणि मालकी हक्काविषयी (७-१५) कुमारीला फसवण्याविषयी (१६, १७) उपासना आणि सामाजिक जीवनाविषयी (१८-३१) २३ इस्राएली लोकांसाठी कायदे (१-१९) प्रामाणिक आणि योग्य वागणुकीविषयी (१-९) शब्बाथ आणि सणांविषयी (१०-१९) इस्राएली लोकांना स्वर्गदूताचं मार्गदर्शन (२०-२६) जमीन खरेदी आणि हद्दींविषयी (२७-३३) २४ लोक करार पाळण्याचं मान्य करतात (१-११) मोशे सीनाय पर्वतावर जातो (१२-१८) २५ उपासना मंडपासाठी दान (१-९) साक्षपेटी (१०-२२) मेज (२३-३०) दीपवृक्ष (३१-४०) २६ उपासना मंडप (१-३७) मंडपाची कापडं (१-१४) चौकट आणि खाच असलेल्या बैठका (१५-३०) पडदे (३१-३७) २७ होमार्पणाची वेदी (१-८) अंगण (९-१९) दीपवृक्षासाठी तेल (२०, २१) २८ याजकांची वस्त्रं (१-५) एफोद (६-१४) ऊरपट (१५-३०) उरीम आणि थुम्मीम (३०) बिनबाह्यांचा झगा (३१-३५) सोन्याची पट्टी लावलेली पगडी (३६-३९) याजकांची इतर वस्त्रं (४०-४३) २९ याजकांची नियुक्ती (१-३७) दररोजचं अर्पण (३८-४६) ३० धूपवेदी (१-१०) जनगणना आणि प्रायश्चित्तासाठी पैसे (११-१६) हातपाय धुण्यासाठी तांब्याचं मोठं भांडं (१७-२१) अभिषेकाच्या तेलाचं खास मिश्रण (२२-३३) पवित्र धूप बनवण्याविषयी सूचना (३४-३८) ३१ कारागिरांना भरपूर प्रमाणात पवित्र शक्ती (१-११) शब्बाथ, देव आणि इस्राएली लोक यांच्यातलं चिन्ह (१२-१७) दोन दगडी पाट्या (१८) ३२ सोन्याच्या वासराची उपासना (१-३५) मोशेला विचित्र गाण्याचा आवाज येतो (१७, १८) मोशे नियमांच्या पाट्या फोडतो (१९) लेवी यहोवाला एकनिष्ठ (२६-२९) ३३ देवाकडून ताडनाचा संदेश (१-६) छावणीबाहेर भेटमंडप (७-११) यहोवाचं तेज पाहण्याची मोशेची विनंती (१२-२३) ३४ दगडाच्या नवीन पाट्या (१-४) मोशे यहोवाचं तेज पाहतो (५-९) करारातल्या बारीकसारीक गोष्टी पुन्हा सांगितल्या जातात (१०-२८) मोशेच्या चेहऱ्यातून किरणं निघतात (२९-३५) ३५ शब्बाथाविषयी सूचना (१-३) उपासना मंडपासाठी दान (४-२९) बसालेल आणि अहलियाब यांना भरपूर प्रमाणात पवित्र शक्ती मिळते (३०-३५) ३६ आवश्यकतेपेक्षा जास्त दान (१-७) उपासना मंडपाचं बांधकाम (८-३८) ३७ साक्षपेटी बनवणं (१-९) मेज (१०-१६) दीपवृक्ष (१७-२४) धूपवेदी (२५-२९) ३८ होमार्पणाची वेदी (१-७) तांब्याचं मोठं भांडं (८) अंगण (९-२०) उपासना मंडपासाठी वापरलेल्या साहित्याची यादी (२१-३१) ३९ याजकांची वस्त्रं बनवणं (१) एफोद (२-७) ऊरपट (८-२१) बिनबाह्यांचा झगा (२२-२६) याजकांची इतर वस्त्रं (२७-२९) सोन्याची पट्टी (३०, ३१) मोशे उपासना मंडपाची पाहणी करतो (३२-४३) ४० उपासना मंडप उभा करणं (१-३३) उपासना मंडप यहोवाच्या तेजाने भरून जातो (३४-३८)