वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • नीतिवचनं २८
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

नीतिवचनं रूपरेषा

    • हिज्कीयाच्या लेखकांनी उतरवून घेतलेली शलमोनची नीतिवचनं (२५:१–२९:२७)

नीतिवचनं २८:१

तळटीपा

  • *

    किंवा “तरुण सिंहासारखे.”

समासातील संदर्भ

  • +दान ३:१६, १७; प्रेका ४:१३

नीतिवचनं २८:२

तळटीपा

  • *

    किंवा “बंडामुळे.”

  • *

    शब्दशः “तो.”

समासातील संदर्भ

  • +१रा १६:८, १५, २२
  • +दान ४:२७

नीतिवचनं २८:३

समासातील संदर्भ

  • +नीत १४:३१

नीतिवचनं २८:४

तळटीपा

  • *

    किंवा “देवाचं नियमशास्त्र.”

  • *

    किंवा “देवाचं नियमशास्त्र.”

समासातील संदर्भ

  • +गण २५:६-८; १शमु १५:२२, २३; इफि ५:११

नीतिवचनं २८:५

समासातील संदर्भ

  • +स्तो २५:१४; मार्क ४:११, १२; याक १:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    २/२०१८, पृ. ८

    टेहळणी बुरूज,

    १०/१/२००६, पृ. ६

    १०/१/१९८७, पृ. २९

नीतिवचनं २८:६

समासातील संदर्भ

  • +नीत १६:८; १९:१

नीतिवचनं २८:७

तळटीपा

  • *

    किंवा “देवाचं नियमशास्त्र.”

समासातील संदर्भ

  • +नीत २३:२०; १कर १५:३३

नीतिवचनं २८:८

समासातील संदर्भ

  • +अनु २३:१९
  • +नीत १३:२२; १९:१७

नीतिवचनं २८:९

तळटीपा

  • *

    किंवा “देवाच्या नियमशास्त्राकडे.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ६६:१८; नीत १५:२९; यश १:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (सार्वजनिक आवृत्ती),

    क्र. १ २०२१ पृ. ९

नीतिवचनं २८:१०

समासातील संदर्भ

  • +स्तो ७:१४-१६
  • +अनु ७:१२; स्तो ३७:११, १८; ८४:११

नीतिवचनं २८:११

समासातील संदर्भ

  • +नीत १८:११
  • +मार्क १०:२१

नीतिवचनं २८:१२

समासातील संदर्भ

  • +१रा १७:१-३; नीत २९:२

नीतिवचनं २८:१३

समासातील संदर्भ

  • +१शमु १५:१३-१५
  • +२शमु १२:१३; २इत ३३:१२, १३; स्तो ३२:३, ५; ५१:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/२०००, पृ. १५-१६

    ११/१/१९८८, पृ. २८-२९

    ५/१/१९८७, पृ. २९

नीतिवचनं २८:१४

तळटीपा

  • *

    किंवा “नेहमी भीती बाळगणारा.”

  • *

    शब्दशः “आपलं हृदय कठोर करतो.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग ७:२२; नहे ९:२९; नीत २९:१; यिर्म १६:१२, १३

नीतिवचनं २८:१५

समासातील संदर्भ

  • +सफ ३:३; मत्त २:१६

नीतिवचनं २८:१६

समासातील संदर्भ

  • +नहे ५:१५; आम ४:१
  • +यश ३३:१५, १६

नीतिवचनं २८:१७

तळटीपा

  • *

    किंवा “कबरेपर्यंत.”

समासातील संदर्भ

  • +उत्प ९:६; १रा २१:१९; मत्त २७:३-५

नीतिवचनं २८:१८

समासातील संदर्भ

  • +स्तो २५:२१
  • +स्तो ७३:१२, १८; १थेस ५:३; प्रक ३:३

नीतिवचनं २८:१९

समासातील संदर्भ

  • +नीत २३:२१; लूक १५:१३, १४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    समाधानी जीवन, पृ. ६-७

नीतिवचनं २८:२०

समासातील संदर्भ

  • +१शमु १८:५; नहे ७:२; स्तो १०१:६
  • +२रा ५:२०-२२; यिर्म १७:११; १ती ६:९

नीतिवचनं २८:२१

समासातील संदर्भ

  • +लेवी १९:१५; नीत १८:५; याक २:१

नीतिवचनं २८:२२

तळटीपा

  • *

    किंवा “लोभी.”

नीतिवचनं २८:२३

समासातील संदर्भ

  • +२शमु १२:७, ९; गल २:११
  • +स्तो १४१:५; नीत २७:६

नीतिवचनं २८:२४

समासातील संदर्भ

  • +मार्क ७:१०, ११
  • +नीत १९:२६

नीतिवचनं २८:२५

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “अहंकारी जीव.”

समासातील संदर्भ

  • +१रा ३:११-१३

नीतिवचनं २८:२६

समासातील संदर्भ

  • +नीत ३:५; यिर्म १७:९
  • +ईयो २८:२८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/२००५, पृ. २८

नीतिवचनं २८:२७

समासातील संदर्भ

  • +अनु १५:७, १०; स्तो ४१:१; नीत १९:१७; इब्री १३:१६

नीतिवचनं २८:२८

समासातील संदर्भ

  • +एस्ते ८:१७

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

नीति. २८:१दान ३:१६, १७; प्रेका ४:१३
नीति. २८:२१रा १६:८, १५, २२
नीति. २८:२दान ४:२७
नीति. २८:३नीत १४:३१
नीति. २८:४गण २५:६-८; १शमु १५:२२, २३; इफि ५:११
नीति. २८:५स्तो २५:१४; मार्क ४:११, १२; याक १:५
नीति. २८:६नीत १६:८; १९:१
नीति. २८:७नीत २३:२०; १कर १५:३३
नीति. २८:८अनु २३:१९
नीति. २८:८नीत १३:२२; १९:१७
नीति. २८:९स्तो ६६:१८; नीत १५:२९; यश १:१५
नीति. २८:१०स्तो ७:१४-१६
नीति. २८:१०अनु ७:१२; स्तो ३७:११, १८; ८४:११
नीति. २८:११नीत १८:११
नीति. २८:११मार्क १०:२१
नीति. २८:१२१रा १७:१-३; नीत २९:२
नीति. २८:१३१शमु १५:१३-१५
नीति. २८:१३२शमु १२:१३; २इत ३३:१२, १३; स्तो ३२:३, ५; ५१:१
नीति. २८:१४निर्ग ७:२२; नहे ९:२९; नीत २९:१; यिर्म १६:१२, १३
नीति. २८:१५सफ ३:३; मत्त २:१६
नीति. २८:१६नहे ५:१५; आम ४:१
नीति. २८:१६यश ३३:१५, १६
नीति. २८:१७उत्प ९:६; १रा २१:१९; मत्त २७:३-५
नीति. २८:१८स्तो २५:२१
नीति. २८:१८स्तो ७३:१२, १८; १थेस ५:३; प्रक ३:३
नीति. २८:१९नीत २३:२१; लूक १५:१३, १४
नीति. २८:२०१शमु १८:५; नहे ७:२; स्तो १०१:६
नीति. २८:२०२रा ५:२०-२२; यिर्म १७:११; १ती ६:९
नीति. २८:२१लेवी १९:१५; नीत १८:५; याक २:१
नीति. २८:२३२शमु १२:७, ९; गल २:११
नीति. २८:२३स्तो १४१:५; नीत २७:६
नीति. २८:२४मार्क ७:१०, ११
नीति. २८:२४नीत १९:२६
नीति. २८:२५१रा ३:११-१३
नीति. २८:२६नीत ३:५; यिर्म १७:९
नीति. २८:२६ईयो २८:२८
नीति. २८:२७अनु १५:७, १०; स्तो ४१:१; नीत १९:१७; इब्री १३:१६
नीति. २८:२८एस्ते ८:१७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
नीतिवचनं २८:१-२८

नीतिवचनं

२८ दुष्ट लोक कोणी पाठलाग करत नसतानाही पळतात,

पण नीतिमान सिंहासारखे* धैर्यवान असतात.+

 २ देशातल्या अपराधांमुळे* त्याचे अधिकारी बदलत राहतील,+

पण समंजस आणि ज्ञानी माणसाच्या मार्गदर्शनामुळे, अधिकारी* बराच काळ टिकून राहील.+

 ३ दीनदुबळ्यांना लुबाडणारा गरीब माणूस,+

सगळं पीक वाहून नेणाऱ्‍या पावसासारखा असतो.

 ४ कायद्याला* न जुमानणारे लोक दुष्टाची प्रशंसा करतात,

पण कायदा* पाळणाऱ्‍यांना त्यांची चीड येते.+

 ५ वाईट माणसांना न्याय समजत नाही,

पण जे यहोवाचा शोध घेतात त्यांना सगळं समजतं.+

 ६ वाईट मार्गांनी चालणाऱ्‍या श्रीमंत माणसापेक्षा

खरेपणाने चालणारा गरीब माणूस बरा!+

 ७ समजूतदार मुलगा कायदा* पाळतो,

पण खादाडांचा सोबती आपल्या बापाला लज्जित करतो.+

 ८ जो व्याजखोरी+ आणि लुबाडणूक करून संपत्ती वाढवतो,

तो गरिबांवर दया करणाऱ्‍यासाठी ती साठवतो.+

 ९ जो कायद्याकडे* दुर्लक्ष करतो,

त्याची प्रार्थनासुद्धा घृणास्पद असते.+

१० जो सरळ मनाच्या माणसाला बहकवून वाईट मार्गाला लावतो, तो आपणच खोदलेल्या खड्ड्यात पडतो;+

पण निर्दोष माणसाला चांगल्या गोष्टींचा वारसा मिळेल.+

११ श्रीमंत स्वतःच्या नजरेत बुद्धिमान असतो,+

पण समंजस असलेला गरीब माणूस, त्याचं खरं स्वरूप ओळखतो.+

१२ नीतिमानांचा विजय होतो, तेव्हा लोक जल्लोष करतात,

पण दुष्टांच्या हाती सत्ता येते, तेव्हा लोक लपून बसतात.+

१३ जो आपले अपराध लपवून ठेवतो, त्याला यश मिळणार नाही,+

पण जो ते कबूल करून सोडून देतो, त्याला दया दाखवली जाईल.+

१४ नेहमी सावध राहणारा* माणूस सुखी असतो,

पण जो अडेलपणा करतो,* तो संकटात सापडेल.+

१५ असाहाय्य लोकांवर राज्य करणारा दुष्ट शासक,

गरजणाऱ्‍या सिंहासारखा आणि हल्ला करणाऱ्‍या अस्वलासारखा असतो.+

१६ समंजसपणा नसलेला नेता आपल्या सत्तेचा गैरवापर करतो,+

पण ज्याला बेइमानीच्या कमाईची घृणा वाटते, त्याला मोठं आयुष्य लाभेल.+

१७ दुसऱ्‍याचा जीव घेतल्यामुळे रक्‍तदोषी झालेला, मरेपर्यंत* पळत राहील.+

त्याला कोणीही मदत करू नये.

१८ निर्दोष मार्गाने चालणाऱ्‍याला वाचवलं जाईल,+

पण जो दुष्ट मार्गांनी चालतो तो अचानक पडेल.+

१९ आपल्या शेतीची मशागत करणाऱ्‍याला अन्‍न कमी पडणार नाही,

पण जो निरर्थक कामांच्या मागे लागतो, त्याच्यावर दारिद्र्‌य येईल.+

२० विश्‍वासू माणसाला पुष्कळ आशीर्वाद मिळतील,+

पण जो श्रीमंत होण्यासाठी उतावळा असतो, तो निर्दोष राहणार नाही.+

२१ पक्षपात करणं चांगलं नाही;+

पण कधीकधी माणूस भाकरीच्या तुकड्यासाठी चुकीचं काम करतो.

२२ दुसऱ्‍यांचा हेवा करणारा* माणूस श्रीमंत व्हायला उत्सुक असतो;

पण आपल्याला गरिबी गाठेल हे त्याला माहीत नसतं.

२३ खोटी प्रशंसा करणाऱ्‍यापेक्षा,

ताडन करणाऱ्‍याचेच+ नंतर जास्त आभार मानले जातील.+

२४ जो आपल्या आईबापाला लुबाडून, “यात काहीच चुकीचं नाही,” असं म्हणतो,+

तो नाश करणाऱ्‍याचा साथीदार असतो.+

२५ लोभी माणूस* भांडणं लावतो,

पण जो यहोवावर अवलंबून राहतो त्याची भरभराट होईल.+

२६ स्वतःच्याच मनावर भरवसा ठेवणारा मूर्ख असतो,+

पण जो सुज्ञपणे चालतो त्याचा बचाव होईल.+

२७ जो गरिबाला मदत करतो त्याला काहीच कमी पडणार नाही,+

पण जो त्यांना पाहून न पाहिल्यासारखं करतो, त्याला बरेच शाप लागतील.

२८ दुष्ट सत्तेवर येतात, तेव्हा लोक लपून बसतात,

पण दुष्टांचा नाश होतो, तेव्हा नीतिमान लोक वाढतात.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा