नीतिवचनं
२६ उन्हाळ्यात बर्फवृष्टी आणि कापणीच्या वेळी पाऊस,
तसा मूर्खाला सन्मान शोभत नाही.+
२ पक्षी निसटून जाण्यामागे आणि पाकोळी उडून जाण्यामागे काहीतरी कारण असतं,
तसंच कोणताही शाप विनाकारण लागत नाही.*
४ मूर्खाला त्याच्या मूर्खतेप्रमाणे उत्तर देऊ नकोस,
नाहीतर तुझ्यात आणि त्याच्यात काय फरक राहील?*
५ मूर्खाला त्याच्या मूर्खतेप्रमाणेच उत्तर दे,
नाहीतर तो स्वतःला बुद्धिमान समजेल.+
६ जो मूर्खावर कामं सोपवतो,
तो स्वतःचे पाय कापून टाकणाऱ्या आणि स्वतःचं नुकसान करणाऱ्या* माणसासारखा असतो.
८ मूर्खाचा गौरव करणं
गोफणीला दगड बांधून ठेवण्यासारखं असतं.+
९ मूर्खांच्या तोंडी बोधवाक्य*
म्हणजे दारुड्याच्या हाती आलेलं काटेरी झुडूप.
१० जो मूर्खाला किंवा कोणत्याही येणाऱ्या-जाणाऱ्याला कामावर ठेवून घेतो,
तो नेम न धरता सर्वांना जखमी करणाऱ्या तिरंदाजासारखा असतो.
११ पुन्हापुन्हा तोच मूर्खपणा करणारा मूर्ख,
आपल्या ओकारीकडे परत जाणाऱ्या कुत्र्यासारखा असतो.+
१२ स्वतःला बुद्धिमान समजणारा माणूस तू पाहिला आहेस का?+
त्याच्यापेक्षा एखाद्या मूर्खाला जास्त आशा आहे.
१३ आळशी म्हणतो: “रस्त्यावर सिंहाचा छावा आहे,
चौकात सिंह आहे!”+
१४ जसा दरवाजा बिजागऱ्यांवर फिरत राहतो,
तसा आळशी माणूस अंथरुणावर लोळत राहतो.+
१६ आळशी माणूस स्वतःला,
विचारपूर्वक उत्तर देणाऱ्या सात लोकांपेक्षा हुशार* समजतो.
१७ जो रस्त्याने जाताना दुसऱ्याच्या भांडणात पडून संतापतो,*
तो एखाद्या कुत्र्याचे कान ओढणाऱ्यासारखा असतो.+
१८ एखाद्या वेड्या माणसाने जळते बाण सोडावेत किंवा जीवघेणे भाले फेकावेत,
१९ तसा एखादा माणूस आपल्या शेजाऱ्याची फसवणूक करून, “मी तर फक्त चेष्टा करत होतो” असं म्हणतो.+
२१ जसं आगीसाठी लाकूड आणि निखाऱ्यांसाठी कोळसा लागतो,
तशी भांडखोर माणसामुळे भांडणं पेटतात.+
२४ दुसऱ्यांचा द्वेष करणारा वरवर गोड बोलतो,
पण त्याच्या मनात कपट असतं.
२५ तो प्रेमळपणे बोलला तरी त्याच्यावर भरवसा ठेवू नकोस,
कारण त्याच्या मनात सात घृणास्पद गोष्टी आहेत.*
२६ त्याने कपटीपणे आपला द्वेष लपवला,
तरी त्याचा वाईटपणा सर्वांसमोर उघडा पडेल.
२७ जो खड्डा खोदतो, तो स्वतःच त्याच्यात पडेल
आणि जो धोंडा बाजूला लोटतो, त्याच्यावरच तो उलटेल.+
२८ खोटं बोलणारा, त्याने चिरडलेल्यांचा द्वेष करतो
आणि खोटी स्तुती करणारा नाशाला कारण होतो.+